R_joshi
| |
| Monday, December 11, 2006 - 4:10 am: |
| 
|
श्री छान चाललय मज ना बनायचे राधा मज ना बनायचे मीरा प्रेमातुर तुझी भक्त मी मज बनव तुझी बासरी आता प्रिति
|
Phatrya
| |
| Monday, December 11, 2006 - 7:02 am: |
| 
|
प्रिति छान चाललंय. राधा आणि मीराशिवाय मी कसा जगणार? बासरी कोणासाठी वाजवणार? श्री
|
Phatrya
| |
| Monday, December 11, 2006 - 7:03 am: |
| 
|
राधा तूलाच बनायचे आहे माझ्यासाठी मीराही तुलाच बनायचे आहे माझ्यासाठी माझ्या बासरीत स्वर तुझेच आहेत मग हा हट्ट कशासाठी? श्री
|
R_joshi
| |
| Monday, December 11, 2006 - 7:14 am: |
| 
|
मीच राधा,मीच मीरा मग बासरीचे स्वर भुलवि कोणाला हट्ट हा मिलनाचा आहे मिलन ना राधेशी,ना मीरेशी आहे प्रिति
|
Phatrya
| |
| Tuesday, December 12, 2006 - 5:59 am: |
| 
|
अगं बासरी फक्त राधा आणि मीरासाठी वाजवली तर, इतरांचे काय हाल होणार? मिलन हे एक सत्य आहे माझ्या गुलालाने तुझी वेनी लाल होणार. श्री
|
R_joshi
| |
| Tuesday, December 12, 2006 - 6:33 am: |
| 
|
गुलाल तु उधळलास एकटिच कशी त्या रंगात रंगेन नभ तु बरसणारा झालास एकटिच का मी भिजेन? प्रिति श्री आता काहितरी वेगळ येऊ देत ना झुळुकेवर.
|
Phatrya
| |
| Tuesday, December 12, 2006 - 7:19 am: |
| 
|
प्रिति खूप वैतागलीस वाटतं? असो. काहीतरी वेगळं. प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत मग, हे विषय वेगळे का नसावेत? मन समजून घेण्यासाठी मित्रत्वाचे नाते असावेत. श्री.
|
Badbadi
| |
| Wednesday, December 13, 2006 - 3:42 am: |
| 
|
चूक नसतानाही मनविरुद्ध वेगळं व्हावं लागतं काय करणार??? परिस्थितिसमोर कधी कधी असं झुकावं लागत!!!
|
R_joshi
| |
| Wednesday, December 13, 2006 - 4:02 am: |
| 
|
श्री वैतागली नाहि,पण मला वाटल संदर्भ एकाच दिशेने जात आहे. मानलि तर मैत्री मानल तर सर्वस्व मैत्रिचे नाते हे असच जगावेगळ प्रिति
|
R_joshi
| |
| Wednesday, December 13, 2006 - 4:05 am: |
| 
|
बडबडि सुरुवात कोणी करावी हा प्रश्नच आपल्यात येत नाहि तुझे आणि माझे विचार परस्परांहुन काहि वेगळे नाहित प्रिति
|
Phatrya
| |
| Wednesday, December 13, 2006 - 4:15 am: |
| 
|
प्रिति तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे. आणि हो, चारोळी खूप छान आहे. बडबडी चारोळी छान आहे. श्री
|
Phatrya
| |
| Wednesday, December 13, 2006 - 4:22 am: |
| 
|
सखे अशी काय परिस्थिती होती कि, तू माझं मन तोडलं? ती म्हणाली, "घरच्या दहा जणांसाठी मी एकाला सोडलं. श्री
|
तुमच्या सर्वांच्या चारोळ्या खुपच छान आहेत. तरीही मझ्याकडुन ही- स्वप्नात माझ्या येउन जा मनातील प्रीत फ़ुलवुन जा माझ्या रात्री जागवुन जा प्रीतीची फ़ुले वेचुन जा प्राजक्ताचे सडे उडवित जा हळुच मनातील गंध उधळीत जा वार्याच्या झुळकेबरोबर हळुच मनाला स्पर्शुन जा विद्या
|
तुझीच स्वप्ने पाहुनी, दिवसही जातोय झोपुनी !! मनही थकलेय तुला शोधुनी, संपव आता ही भटकंती.. सामोरे तु येउनी..
|
R_joshi
| |
| Friday, December 15, 2006 - 3:31 am: |
| 
|
विद्या छानच. योगी कोणाच्या स्वप्नामध्ये असतोस,जो दिवसहि झोपेत काढतोस सत्यात कधी बघितले नाहिस स्वप्नात मात्र नेहमी बघतोस माझी स्वप्ने बघुन ही माझाच कसा रे तु शोध घेतोस...?? प्रिति योगी माझि म्हणजे कोणति गुलाबो कि कोणती
|
पुन्हा तुझा ध्यास घेउनी दिवस सुरु झाला.. सपंतांना उजेड... भास जागा झाला. किती छळणार अजुन.. हा श्वास ओला झाला..!!!
|
सपंतांना उजेड... भास जागा झाला. किती छळणार अजुन.. हा श्वास ओला झाला..!!! एकदम मस्तच…मनाला भिडलं ग लोपा…
|
विद्या, प्रिति, योगी, मनिशा, लोपा एकदम मस्तं. कोण आहेस तू का छळतेस मला? माझी राख पाहून आनंद होईल का तूला? श्री
|
तुझ्या आठवणीनींचे माझे सुरेख लेणे.. प्रजक्ताचा गंध लेवुन अबोलीचे उगाच हळवे होणे..!!!
|
मनही थकलेय तुला शोधुनी, संपव आता ही भटकंती..>>>>योगी कोणाच्या स्वप्नामध्ये असतोस,जो दिवसहि झोपेत काढ>>>प्रिति त्याला असे म्हणायचय की आता सपु दे हे कंद्यापोह्य्चे कर्यक्रम आनी उडौन टाकु आता बार..!!! योगी हो की नाही?
|