Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 14, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » मार्गशीर्ष » विनोदी साहित्य » विडंबन » Archive through December 14, 2006 « Previous Next »

Sarang23
Thursday, November 23, 2006 - 4:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


मुळ गाणे                                विडंबन

जीवनात ही घडी अशीच राहू दे        जेवणात ही गोडी अशीच राहू दे
प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे        शांतपणे दोन घास निवांत खाऊ दे

रंगविले मी मनात चित्र देखणे           थांबव ते तू मधेच प्लेट फेकणे
आवडले वेडीला स्वप्न खेळणे            आवडते का तुला अवेळी लाटणे?
स्वप्नातील चांदवा जीवास लाभू दे       भांड्यांना काही काळ उसंत लाभू दे

हळूच तुला बघण्याचा छंद आगळा       पिऊन मला बोलण्याचा छंद आगळा
लज्जेचा त्याविणका अर्थ वेगळा           तू उगाच लावू नको अर्थ वेगळा
स्पशार्तून अंग अंग धूंद होऊ दे          थाळ्यांवर राग राग बंद होऊ दे

पाहू दे असेच तुला नित्य हासता        राहू दे अशी घरात नित्य शांतता
जाऊ दे असाच काळ शब्द झेलता       जाऊ दे असाच काळ काहि न फोडता
मिलनात प्रेमगीत धन्य होऊ दे         भांड्यांच्या वापरास अर्थ राहू दे


सारंग


Deodharmv
Thursday, November 23, 2006 - 4:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फारच छान, सुंदर, अप्रतिम विडंबन

Jayavi
Thursday, November 23, 2006 - 6:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंगा.... वा मज्जा आली :-) तुझी काव्य प्रतिभा चांगलीच बहरलीये रे!

Sarang23
Thursday, November 23, 2006 - 8:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मंडळी.
जयश्री, तुमच्यात मेलला
reply देत नाहीत का? :-)

Athak
Thursday, November 23, 2006 - 10:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंगा , बहोत खुब बहोत खुब , तुझ्या विडंबनाने आमचा फायदा झाला :-) वाचुन दाखवल्यावर आज कमी भांडी फेकली :-)

Dineshvs
Thursday, November 23, 2006 - 1:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग, विडंबन आवडले पण आता कजाग बायको आणि दारुड्या नवरा, हे फार कॉमन होत चाललेय. जरा वेगळे विषय हवे आता.
आपल्यापैकी बहुतेकानी, आशाचे, घातली ओटीत मुलगी विहिणबाई, सांभाळ करावा, हिच विनवणी पायी, हे गाणे ऐकले असेल.
याच गाण्याचे सुंदर विडंबन, आशाच्याच आवाजात, सासु वरचढ जावई, सिनेमात होते.
घातला ओटीत मुलगा विहिणबाई, असे. आशाने तेहि तश्याच उत्कटतेने गायले होते. ( पडद्यावर सुलोचना आणि पद्मा चव्हाण होत्या ) कुणी आधीचे गाणे ऐकलेले नसेल तर त्यालाहि हे गाणे छानच वाटेल, पण ते विडंबन आहे, हे लक्षात घेतले तर आणखी मजा येते.


Laalbhai
Thursday, November 23, 2006 - 10:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I beg your pardon Dinesh. Was it Padma Chavhan -- Saasu and Ranjana -- Mulagi?
And hilerous Ashok Saraf as Javai. :-)

Kmayuresh2002
Friday, November 24, 2006 - 12:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग, सही रे भिडु :-)

Devdattag
Friday, November 24, 2006 - 4:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


सारंग मस्तच..:-)
प्रसादच्या गझलेचे स्वैर विडंबन

काय बोलता? अता घशास कोण ऐकतो
मोकळा आवाज जो तो नाकात आज काढतो

शब्द चालीस ते देतात का नवे नवे
सर्व म्हणती का हा उगाच रेडा रेकतो

मानले मी आवाज तो ऐकता न येतसे
रेडीओ ही हवा तेंव्हा मिरचीवर ठेवतो

आवाज हा ऐकवावा त्याला एकदातरी
मौका अशा छळाचा कधीकधीच भेटतो

रोज रोज ती भिकार ललकार ऐकता
घाव झेलण्या अता बोळा कानात घालतो


Himscool
Friday, November 24, 2006 - 4:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग सहीच...
देवा एवढा का बाबा तुला राग त्या नाकेश भेसूरीयाचा


Dineshvs
Friday, November 24, 2006 - 8:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा लालभाई, तोच सिनेमा तो.

Nagarchadeepak
Monday, November 27, 2006 - 3:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुळ गाणे

सागं सागं भोलानाथ
पाउस पडेल काय
शाळेभोवती तळे साचुन
सुट्टी मिळेल काय


विडंबन

सांगा सांगा चपल राव
मॅच जिंकेल काय
फ़टाक्याची माळ आमची
कधी फ़ुटेल काय

सचिन भाउ. अजित भाउ
खरं सांगा एकदा
जाहिराती पेक्षा प्रॅक्टीस
करताल का हो तीनदा

सहेवाग भाउ, रैना दादा,
जागे व्हाल काय
बॅटीतुन तुमच्या
रन निघेल काय

अजित दादा
उद्या आहे वल्ड कप फ़ेवर
दंडात तुमच्या जोर येवुन
विकेट पडेल काय

सांगा सांगा चपल राव
मॅच जिंकेल काय
कागदी वाघ कधीतरी
डरकाळी फ़ोडेल काय

--- नगरचा दिपक (काळे)






Vaibhav_joshi
Wednesday, November 29, 2006 - 3:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग .. छान ..
काही ठिकाणी लय जातीय असं मला वाटलं पण thats ok विडंबन आहे म्हणून . कविता / गझल असती तर भांडलो असतो आपण कडाकडा .. ( अर्थात तिथे तुझी लय जाणारही नाही म्हणा )
:-)


Sarang23
Wednesday, November 29, 2006 - 5:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे...
पिऊन मला बोलण्याचा छंद आगळा
आणि इथे...
जाऊ दे असाच काळ काहि न फोडता
बरोबर...
हे खास तुझ्यासाठी केलेले बदल...
पिऊन मला हसण्याचा छंद आगळा

आणि
जाऊ दे असाच काळ फक्त हासता

आता गझलेचेच विडंबन टाकतो म्हणजे problem नाही:-)


Laxmi_vishnu
Thursday, December 07, 2006 - 11:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अपुरव excellent class extraordinary

Aaftaab
Tuesday, December 12, 2006 - 3:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूळ गाणे: ती गेली तेव्हा रिमझिम
http://geetgunjanmarathi.tripod.com/marathi/lyrics/384.html

"ती" गेली
ती गेली तेव्हा कुई कुई एक श्वान केकाटत होता
चाकात अडकली तंगडी तो मूर्ख सोडवीत होता

ती "बाई" होति समजूनी
बिंधास मीहि लगटलो..
त्या वेळी एक भिकारी बत्तीशी दाखवित होता...
"ती" गेली...

"टाळी"तुन गमले मजला
चुकलाच निशाणा माझा
खिडकीतुन "शुकशुक" तेव्हा आवाजहि खुणवित होता..

"ती" गेली...

- रवि



Sarang23
Thursday, December 14, 2006 - 7:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुळ गझल
इथे मिळेल...

वैभवची अतिशय सुरेख गझल... मोहच आवरला नाही :-)

फक्त गझलसारखी वाचावी

गणपती तुझे नाव चांगले
आवडी बहू चित्त रंगले


या चालीत म्हणू नये... :-)

कावळे...

बोलणे तिचे ना मला वळे
जीभ चाचरे! नाकही गळे!

नजर रोखते श्वास थांबतो
घोरते तरी भय कुठे टळे

हासणे तसे; बोलणे असे....
डाकिणीतही न्यून आढळे

चेहर्‍यावरी लाल पोपडे;
काय थापते तेच ना कळे

काय ही तर्‍हा जीव घ्यायची
खायचे कुणी रोज भोपळे?

भीत भीत जे घाम गाळती
मावळे न ते फक्त कावळे


सारंग




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators