|
Dineshvs
| |
| Wednesday, December 13, 2006 - 12:53 pm: |
| 
|
BSNL मधल्या दोस्ताच्या मागे लागुन, आम्ही एकदा मुद्दाम क्रॉस कनेक्शन बसवुन घेतलं होतं. हल्ली तंत्रज्ञान फारच पुढे गेल्यामुळे, पुर्वीसारखे क्रॉस कनेक्शन, चकटफु मिळत नाही, ते असे मागुन घ्यावे लागते. त्यातुन कानावर आलेली हि कुजबुज, अर्थात ह. ह. ची क्षमा मागुन. आता यातली पात्रे कोण हे मूळातच माहित नसल्याने, माफी कुणाची मागायची ? K K K काय मॅडम, आमचा धंडा बुडवायला निगाला का ? कित्ती दिस म्हनुन राह्यलो, कि कायतरी फ़र्मास लिहा, तर काहि देतबी न्हाई तुमी. अहो अजुन कुठे काय लिहुन झालय. एकच कथा झाली होती, तर तुम्हाला आणखी काहितरी हवे. आता रोजरोज कुठुन कथा लिहिणार ? ती वाचुन टाकली कि तिच्या मायला. आता दोन कथासंग्रह काडले कि आमी, त्यात काय दम नाही बगा. आता कसं जंक्शान काम झालं पाहिजे. एकांदी कादंबरीच लिवा कि. अगदी ठासुन झाली पायजेलाय. सध्या तरी एकच कथा आहे. अहो मग तिच्या X X X वाडवा कि. आत्ता आमास्नी लिवायला येत असलं तर, तुमच्या मागं का लागलो असतो वो. x x x x अहो कित्ती त्या शिव्या. समोर बाईमाणुस आहे याचं भान ठेवा कि. आता समोर कुट्टे हात वो. आनि जरा आमच्याकडे युन बगा. बायामान्सबी अश्या गाळ्या घालतात, कि एकांद अडेल गाडावबी, गुमान चालु लागतय. त्यात काय वो x X x X त्यो गोपाळ अण्णा काय कमी शिव्या गाळी करतोय का ? सगळे टापचे आर्टिष्ट तेच्या नाटकात काम करतातच कि. त्यास्नी काय नाईट मिळाल्याशी कारन. कोन का दीना, तिच्या X X X X आता मलाहि थोड्याफार कळायला लागल्या बरं का तुमच्या त्या शिव्या. पण मला नाही बाई, देता येणार कुणाला. ह्ये लई बेस झालं. तुमच्या कादंबरीत घाला कि सगळ्या शिव्या. तुमी नुसतं अक्षर सांगा, त्यावरुन तिथल्या तिथं पाच पंचवीस शिव्या देऊन टाकतो कि तिच्या x x X X शी बाई, लोक काय म्हणतील ? म्हणतील बाई लई फ़ॉरवर्ड हैत. डेरिंगबाज हैत. अवो शिव्या द्यायला बी छाती लागती, नायतर तुमचं ते पुलं, त्या फुलराणी नाटकात, नुसतं तुजं म आनि तुजं भं लिहुन गेलत. अवो उडत्या पाकराची X X मोजनारी मानसं आमी. आमाला काय वेगळं सांगाव लागतय का. शी, भाईंबद्दल काय बोलताय हे ? पण तुमी म्हणताय ते करुन बघायला पाहिजे. k K K काय मॅडम, कुठपर्यंत आलं ? अहो तुमी म्हणताय म्हणुन घातल्या बरं का शिव्या. पण पटत नाही बघा. अहो काय पटायचं त्यात. वाचक नुसतं उड्या मारतील बगा. टायटल मात्र चांगलं जंटलमन लोकांसारखं द्या. म्हणजे, समोरच्याला कळणार नाही, आत काय हाय ते. सगळं कसं आतुन किर्तन वरुन तमाशा सारखं. एक लक्षात ठेवायचं. ठ्ठासुन झाली पायजेलाय. मराठीत या x x x लोकाना असलं गरमागरम कुटं वाचायला मिळतय. मुतायला जाताना बी चोरी करयला जाण्यासारखा त्वांड करत्यात. त्यांच्या x X X X दम नाही, ती विंग्रजी पुस्तकं घेऊन वाचायची खाज असनारच कि. त्यापरास हे आपलं बरं कि. काय नविन स्टॉक हवाय का, कवापण सांगा. अहो पण अजुन १०० पानाच्या पुढे जात नाही हो. काय करु ? आता त्ये मी आमीच सांगायचं का ? अहो लिवा कि आज कुठे गेलात, काय केलात. आत्ता काय करताय ? अहो आत्ता तर टिव्ही बघतोय. काय ती बाई चिरगुटं नेसुन नाचतीय. आत्ता समदे म्हनत्यात म्हनुन तुमी त्वांड वेंगाडु नका. काय ती x X X X फाकडु दिसती का नाही. जी घातलीत तेवडी बी कापडं नसती तर लई ब्येस असं वाटतय का न्हाई. आता तुमच्याकडे कश्याला खोटं बोलु. सगळे पुरुष नुसते चळत असतील नाही का, असे नाच बघुन. अहो पुरुषाना काय, तुमाला काय वाटतय ते लिवा कि k K K काय मेडम झालं का न्हाई ? अहो आज घरात पसारा पडलाय सगळा. माळा साफ करायला घेतला तर चिमणीचं घरटं दिसलं तिथे. अंडी खाली पडुन फुटली. एक पिल्लु आहे, त्याला झाडुने उचलुन वर ठेवत्ये. पण त्याचे आईबाबा त्याला मारुन तर नाही ना टाकणार, माणसाचा हात लागला कि म्हणे, पक्षी पिल्लाना मारुन टाकतात. त्ये काय आमाला म्हाईत वो. आता ट्ये टिव्हीवर दाकवतात ना, पाखरांच्या पायात रिंगा वैगरे घालतात, तिच्या x x x X बरं त्ये राहु दे, तुमी ह्ये बी लिहुन टाका कि. k K K काय मॅडम, कुटवर आलात ? अहो क्लायमॅक्स गाठताना खुप दमछाक होते हो हल्ली. तिच्या x x x x परवाच हे कार्टुनमधे बघितलं कि. त्या बाईचा तोंडावळा अक्षी तुमच्यासारकाच व्हता कि वो. आत्ता किती पानं लिहिलीत. आत्ताशी २०० झालीत. अवि एवड्यानं काय होतय. रद्दी म्हणुन बी कुनी घेनार न्हाई. आता काय करताय. अहो एकटी मी, भिन्तीवर पाल होती ती मारली, तर तिची शेपटी तुटुन पडलीय. वळवळतेय नुसती. बघत बसले होते तिच्याकडे. अवो मग त्ये बी लिहा कि. जाहिरात करुन बसलोय. एक मेगा कादंबरी काडतोय म्हनुन. पबलिकशिट्टी करुन ठेवलीय. k K K अवो मॅडम, वाचुन काडली कि, पन अजुन थोडं वाडवा कि. आत्ता लिवायला मुड लागत नसल, तर जरा तमाकुचा बार भरा कि. त्यो बार तेवडा भरला ना कि, म्हातारी बी तरन्या x x xX वानी नाचाय लागती बगा, हो एक एक्स्पेरियन्स म्हणुन खाल्ले होते बघां ते एकशे वीस, का काय म्हणतात ते. ज्याम डोकं फिरलं कि. अवो मग त्ये बी लिवा कि. आनि ते मागे आमच्या पार्टीत चारमिनार वडली व्हती, ती बी लिवा कि. k K K K काय मॅडम, कित्ती वाट बगायला लावायची. आणखी पाच पन्नास पान लिवुन द्या कि. वजनात कमी भरतय कि बाड. अहो काय लिहिणार कप्पाळ ? आज पोळ्यांची बाई आलेली नाही. गेल्या तीन महिन्यात चार झाल्या. एक टिकेल तर शपथ. काय तर म्हणे, तुमच्या पार्ट्या, ड्रिन्क्स आम्हाला चालणार नाही. एकेका x x x x चे नखरे बघा. वा झ्क्कास, तुमीबी लागल्या कि आमच्यासारख्या शिव्या द्यायला. आत्ता दुसरं काय सुचत नसलं तर या बायांशी ईष्टोरी लिवा कि k K K वा बाई झक्क जमलय बगा. सगळं कसं आमच्या बोलण्यातलं वाटतय आता. अहो तुम्ही लिहुन घेतलत माझ्याकडुन. खरे तर आता पब्लिकला कसे सामोरे जायचे याचाच प्रश्ण पडलाय मला. त्येची काय काळजी करु नका बगा. एकदम जंक्शान पब्लिकशिट्टी करनार आमी. त्या सगळ्या समीकशकांची जंगी पार्टी ठेवलीय बरं का. गावरान चिकन, गावठी आपलं त्ये हे, आणि खास परभणीहुन, बकुळाला आनलीय. असं लिहितील ना x X X X तुमच्या पुस्तकावर. समद्या पेपरवर फ़्रंटपेजवर एकदम झक्कास पबलिकशिट्टी मिळणार बगा. पहिलीच कादंबरी आणि हे असलं भारी काम, मॅडम आत्ता हितुन पुढं तुमी नुसती कागदाला पेणशिल लावली कि, आगाऊ चेक मिळणार बगा तुमाला. आमाला विसरु नगा म्हंजी झालं. चला हो, तुमचं काहितरीच. आईच्यान, अवो लोक शिणेमा वैगरे काडायचा का म्हणुन ईचारायला लागलंत. त्या मल्लिका अन याना बाईना म्हनं मराटीत पिच्चरमदे काम करायचय. आता या ईष्टोरीपेक्षा भारी चानस मिळणार का तेना., कुटं ? ईश्य. x s x S ता. क. ईथला फ़ुल्ल्या फ़ुल्ल्या मायबोलिच्या नेमस्तकानी घातल्या आहेत.
|
Chafa
| |
| Wednesday, December 13, 2006 - 3:16 pm: |
| 
|
हो ना, 'विनोदी' ऐवजी 'हास्यास्पद' मधे शोभून दिसले असते. नो दिवे.
|
Asami
| |
| Wednesday, December 13, 2006 - 2:20 pm: |
| 
|
दिनेश हे चांगले जमले आहे. फ़क्त BB चुकला.
|
Asami
| |
| Wednesday, December 13, 2006 - 4:14 pm: |
| 
|
आता इथे मेघना आणी तिच्या साहित्याबाबत अधिक वाद होण्याआधी हे दुसर्या BB वर move झालेले बरे
|
Yog
| |
| Wednesday, December 13, 2006 - 4:54 pm: |
| 
|
>>दिनेश हे चांगले जमले आहे. फ़क्त BB चुकला. >>हे दुसर्या BB वर move झालेले बरे काहीही काय... विनोदी साहित्य या नावाखाली इतकी "बुजबुज" झालीये तिथे अजून थोड्या XXX नी काय बिघडणार आहे..? मला तर वाटत इथून दुसरीकडे move करण्यापेक्षा हितगुजवरील अनेक bb विशेष करून v&c हे इथे विनोदी साहित्याखाली move करावेत.. याने गुलमोहरावरील विनोदाला एक "सर्वसमावेशक" स्वरूप येइल.. शिवाय भालजीन्च्या स्टुडीओलाही खास जागा मिळेल.. 
|
Raina
| |
| Wednesday, December 13, 2006 - 9:09 pm: |
| 
|
दिनेशदा- याची खरंच गरज होती का? विनोदी साहित्य या नावाखाली इतकी "बुजबुज" झालीये >>> Yog, Do you have anything against appreciating others' sense of humour?
|
Dineshvs
| |
| Wednesday, December 13, 2006 - 10:35 pm: |
| 
|
रैना, मी तर वरच्या पोस्टमधे लेखिका मेघना पेठे यांचे नावहि घेतले नाही, आता लोकानी ते तसे मानले तर मी काय करु ? हि तर केवळ ऐकीव कुजबुज. याची गरज नव्हती, हे अगदी खरे, पण मग नातिचरामि चे वस्तुनिष्ठ परिक्षण करुन, ते पुस्तक कसे श्रेष्ठ आहे, हे न सांगता, केवळ माझ्याच मुद्द्याना हरकत घेणेहि योग्य नव्हते. कधी कधी योग्य त्या शब्दात उत्तर देणे गरजेचे असते. आणि ते मी साधले आहे. जर मेघना पेठे याना वाट्टेल ते लिहिण्याचे स्वातंत्र्य आहे, तर मलाहि त्यावर माझे मत मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. केवळ माझे मत खोडुन काढणार्यानी, त्या तीन धोब्यांच्या प्रकरणावर अर्थपुर्ण मौन बाळगले आहे, हे लक्षात आले असेलच. एकतर त्याचे संदर्भ स्पष्ट करायचे होते किंवा, ते संदर्भहिन आहे हे मान्य करायचे होते.
|
Chafa
| |
| Wednesday, December 13, 2006 - 11:38 pm: |
| 
|
मी तर लेखिका मेघना पेठे यांचे नावहि घेतले नाही, आता लोकानी ते तसे मानले तर मी काय करु ? अरे वा दिनेश! 'अगं अगं म्हशी मला कुठे नेशी?' आठवले बरं का. गंमत म्हणजे तुमचे या विषयावरचे सगळ्यात पहिले पोस्ट परत वाचा. तिथेही 'मला तर लेखिकेची आधीची पुस्तकेही आवडलीच नव्ह्ती; त्यामुळे मला परत त्यांच्या वाटेला जायचे कारण नव्हते. पण केवळ मैत्रिणीला भेट द्यायला म्हणून नातीचरामि विकत घेतले होते म्हणून वाचून काढलेच!' असा सूर. काय गंमत आहे ना? कोणी एखादे न वाचलेले पुस्तक असे आपल्या मित्रमैत्रिणींना भेट देतात हे नव्यानेच कळले. आणि especially त्या लेखिकेची आधीची पुस्तके आवडली नसतील तरीही? गंमतच नाही का? असो, ही तपशीलातली क्षुल्ल्क चूक असावी कदाचित. शिवाय जसे तुम्हाला तुमचे मत मांडण्याचे स्वातंत्र्य आहे तसे ते मत जर चुकीच्या बादरायण संबंधांवरुन मांडले गेले आहे असे इतरांना वाटले तर त्याच्याविरुद्ध मत नोंदवण्याचेही इतरांना स्वातंत्र्य आहे. की तुमचेच मत प्रमाण आणि अचूक असे 'तुमचे' मत आहे? आणि शिवाय वरती 'योग्य त्या शब्दात उत्तर देण्याचे मी साधले आहे' हा खोटा आत्मविश्वास? नातिचरामि श्रेष्ठ पुस्तक आहे असे माझ्या आठवणीत कोणी म्हटलेलेच नाही. ते तद्दन टुकार पुस्तक आहे असे म्हटले तरी इथे कोणाला काय फरक पडणार आहे? पण उगीच नसत्या चुकीच्या मुद्द्यांवरुन लेखिकेला आणि तिच्या साहित्यकृतीला हिणवण्यामागची भावना तुमच्या so called समीक्षणातून चाणाक्ष वाचकांच्या लक्षात यायला वेळ लागत नाही. पण सगळ्यांनाच ती कळावी म्हणून खोडून काढले एवढेच. आता कोणाला पटेल तर कोणाला नाही. कोणी बोलून दाखवेल कोणी नाही. आणि आता तर तुमचे तेच तेच मुद्दे परत परत वाचून कंटाळा आला आहे. स्पष्टपणे उदाहरणासकट मुद्दा खोडून काढल्यावरही तुम्ही त्याच कबरीवरच्या फुलांसारख्या आधारहीन मुद्द्यावर अडून बसला आहात, मग काय बोलायचं? दुसरी गंमत म्हणजे एके ठिकाणी तुमच्या पोस्टमधे लेखिकेच्या एका वर्णनात्मक शब्दप्रयोगाचा उपहास तुम्ही उडवला आहे; पण अगदी तेच शब्द तुम्ही स्वतः इथे मायबोलीवरच फार पूर्वी वापरलेले आहेत. कुठे आणि कुठले शब्द ते लिहित नाही पण आहेत ते अजूनही इथेच कुठेतरी. याला काय म्हणायचे? का लेखिकेने वापरले म्हणून ते सवंग आणि तुम्ही वापरले की मग सभ्य? आणि कोणीही विचारले तरी मी हा संदर्भ कुठला हे लिहिणार नाही कारण मर्यादा सोडून मला इथे वाद घालायचा नाही. धोब्यांचा मुद्दा प्रत्येकाने ज्याला त्याला जसा झेपेल, रुचेल, पटेल तसा समजावून घ्यावा किंवा मग लेखिका बेअक्कल आहे आणि नुसती पाने वाढवण्यासाठी तिने काहीतरी खरडले आहे असे खुशाल समजावे. तुम्हाला खरोखरच एवढे कुतूहल असेल (नाही नाही म्हणता तरीही) तर मग तुम्ही लेखिकेलाच का नाही विचारत? तिचे लिखाण एकदम फालतू कसे आहे हे दाखवण्याची अहमहिका ही सुद्धा एक फ्याशन झाली आहे असे तुमच्याच शब्दात म्हणायचे का? नेमस्तक, कृपया योग्य ठिकाणी हलवाल का? धन्यवाद! आणि मी शक्यतो मर्यादा न ओलांडता उत्तर द्यायचा प्रयत्न केला आहे पण तुम्हाला काही भाग पटला नाही तर जरुर खोडा.
|
Tulip
| |
| Thursday, December 14, 2006 - 12:32 am: |
| 
|
हे खरोखरच हास्यास्पद आणि स्वस्त झालेले आहे. मी तरी अजून कोणाला इतक्या वैयक्तीक आकसाने एखाद्या लेखिकेबद्दल वा तिच्या लेखनाबद्दल मायबोलीवर लिहिले गेलेले पाहिले नव्हते. हा माणूस ह्या लेखीकेबद्दल असे सतत का लिहितो ह्याचे कारण मला तर आता काही वैयक्तीकच असावेसे वाटायला लागलेले आहे. खरच खूप खेद वाटला. ते नातीचरामी पुस्तक साहित्यीक दृष्ट्या ग्रेट वगैरे आहे असा दावा आम्ही कधीच कोणी केला नव्हता. केवळ स्वत्:चे भरकटलेले मुद्दे योग्य पणे खोडून काढले गेले म्हणून एक वयाविचाराने प्रौढ व्यक्ती अशा पातळीवर येऊन लेखन करु शकते हे थोरचं. लेखीकेच्या एका काल्पनीक कादंबरीमधे संदर्भ शोधणारी व्यक्ती आपण स्वत्: किती संदर्भहीनपणे समीक्षा ( ?? ) करत आहोत ह्याचे भान विसरलेली दिसते. की सतत सर्वांच्या 'वाहवा' ची सवय झाल्याने थोडाही विरोध स्वत्:च्या कोणत्या लिखाणाला झालेला खपत नाहीये? anyways frustrations काढण्याचे प्रत्येकाचे मार्ग निराळे.
|
Raina
| |
| Thursday, December 14, 2006 - 1:17 am: |
| 
|
दिनेशदा- अहो पुस्तक टाकाऊ किंवा श्रेष्ठ या दोनच सदरात मोडतं का?- त्यात कितीतरी अजून श्रेणी नाहीत का? एकाच पुस्तकातला काही भाग वाचनीय, काही टूकार, उत्तम, बेक्कार, काही गल्लाभरू एकांगी वगैरे वगैरे अनेक विशेषणांची खैरात करता येईल... त्यामुळे टाकाऊ आहे म्हणा नाहीतर श्रेष्ठ कसे आहे ते सिद्ध करा- असे बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर style आपण म्हणू शकतो का? पुस्तकाची भलावण कोणीच केलेली नाही- मला वाटत चाफ्याने किंवा ट्युलिपने किंवा शंतनूनेही नाही. पण पुस्तक का टुकार आहे ह्या बद्द्लच्या तुमच्या मुद्यांवर त्यांनी त्यांचे विचार मांडले.त्यावर तुम्ही ही आधी " हा विषय मी माझ्यापुरता केंव्हाच संपवला होता. " आणि we may agree to disagree ही भुमिका घेतली होती ना? मग आता तुमच्या मतस्वातंत्र्यावर घाला घातला जातोय असे का वाटले तुम्हाला? तुम्ही मायबोलिवरचे लोकप्रिय व्यक्तिमत्व आहात, अनेकांचे श्रद्धास्थान आहात. तुमच्या कडून दिलदार वृत्तीची किंवा हे मुलंमुली असे का म्हणतात हे समजावून घ्याल अशी अपेक्षा होती. चाफा- आतापर्यंतच्या पोस्टसची मर्यादा आता तुमच्याकडुन ही खरोखरीच ओलांडली जाते आहे असे एक त्रयस्थ वाचक म्हणून मला वाटते. थोडक्यातच गोडी असते!. कोणी एखादे न वाचलेले पुस्तक असे आपल्या मित्रमैत्रिणींना भेट देतात हे नव्यानेच कळले etc...etc...etc. All this was not required. यावर दोघांनी ही उठून मला "तुला काय करायचे आहे- आम्ही आमचे पाहून घेऊ?" असे फटकारले तर त्यात वावगे काहीच नाही.मध्ये बोलल्याबद्दल मी तुमची दोघांचीही क्षमा मागते.!
|
Chafa
| |
| Thursday, December 14, 2006 - 1:43 am: |
| 
|
नाही रैना, तसे नव्हे. तुमचा मुद्दा मला मान्य आहे आणि म्हणूनच मी दिनेश यांचे ते पहिले पोस्ट वाचताक्षणी मला 'अगं अगं म्हशी' जाणवले होते तरी त्याबद्दल लिहिले नव्हते. पण आता त्यांनीच 'मी तर मेघना पेठेंचे नावसुद्धा घेतले नव्ह्ते बॉ' असे बालिश विधान केल्यामुळे लिहावेच लागले. आता तुम्हाला माझा तो परिच्छेद फार असंयुक्तिक वाटू नये.
|
Dineshvs
| |
| Thursday, December 14, 2006 - 4:00 am: |
| 
|
पहिल्यान्दा हे सांगायचे होते, कि हे पोस्ट मी ईथे टाकले ते विनोदाने घेण्यासाठी. त्या BB वर मी कधीच विषय संपवला होता. दुसर्यांदाहि चाफ्याच्या मताचा आदर राखत मी रजा घेतली होती. पुस्तक भेट द्यायच्या आधी मी तरी एरवी वाचत नाही. त्या व्यक्तीची आवड माहित असते, म्हणुन देतो. यावेळी ते वाचले एवढेच. एखाद्या कविला, भेट देताना, मी आवर्जुन कवितासंग्रह घेईन. आणि तो मी एरवीहि वाचलेला असायची शक्यता नसेलच. त्या BB वर जेन्व्हा माझे नाव घेऊन पोस्ट केले गेले तेन्व्हाच मी उत्तर दिले होते. ईथेहि माझे नाव घेतले म्हणुन मी पहिले पोस्ट गमतीने लिहिले, ते चाफाने लाईटली घेतले नाही, म्हणुन परत लिहिले. आताहि सगळ्यानी, पुरेसा खिलाडुपणा दाखवला नाही. जर मला लिहायचे असते, तर मी थेट नाव घेऊन लिहिलेच असते कि. पण तरिही लिहितोच, वरच्या पोस्टमधले, बरेचसे उल्लेख, म्हणजे समीक्षकांच्या पार्ट्या, नाट्यनिर्मात्यांच्या तोंडच्या शिव्या, हे वास्तवाला धरुन आहे. मी माझे मुद्दे बदललेले नाहीत, आणि त्याचा योग्य परामर्ष कुणी घेतलाहि नाही. माझ्या दृष्टीने ते अजुनहि महत्वाचे आहेत. अचुक नसतील. मुद्दे अचुकपणे खोडायचे म्हणजे काय ? उदा कबरीवरच्या फुलाचाच मुद्दा घ्या. रस्त्यावर फुले विकणारी मुले, ती फुले कॅथॉलिकांच्या कबरीवरुन चोरुन आणतात आणि विकतात आणि त्यामुळे ती घेऊ नयेत, असे नायिकेचे मत आहे. आता कबरीवरची फुले नेमकी कश्याने अपवित्र होतात ? फुलांचे पावित्र्य आणि देहाचे पावित्र्य, याबद्दल नायिकेच्या मतात एवढा विरोधाभास का ? आणि जर हे तिचे वैयक्तिक मत आहे, तर केवळ त्या कारणासाठी ती त्या मुलान्ची अगतिकता नजरे आड का करते ? मग ती जेन्व्हा एखादे अनाथ मुल घरी आणते, हे कसे पटवुन घ्यायचे ? तसाच मुद्दा होता, पारश्यांच्या विहिरिचा. त्या विहिरीत म्हणे प्रेते टाकतात, आणि ती प्रेते खाण्यासाठी घारी वर घिरट्या घालतात. आज ईतक्या गजबजाटातहि ती विहिर तिथे दिमाखात उभी आहे. पारसी लोक तिथे श्रद्धेने जातात. प्रार्थना करतात. अशीच एक विहिर, हाय कोर्टाच्या कुंपणालगत आहे. ती विहिर हायकोर्टापेक्षाहि पुरातन आहे, हायकोर्टाची भिंत, त्या विहिरीसाठी थोडी वळवुन घेतली आहे. आजहि तिच्यातले पाणी प्यायले जाते. पारश्यांची प्रेते टॉवर ऑफ़ सायलेन्स जवळ ठेवली जातात. ती एक बंदिस्त जागा असते. तिथे ईतर धर्मियाना प्रवेश नसतो. मानवी काय किंवा ईतर मृतदेह काय, गिधाडे खातात, घारी नाहीत. हे सगळे जाणुन घेणे, अगदी सोपे होते. Tulip मला तिच्याबद्दल आकस असायचे काहि कारणच नाही. तिला कुठलाहि पुरस्कार मिळाल्यास माझ्या पोटात दुखणार नाही. खरे तर या, सगळ्यांचा मेणु कि फ़रक पैंदा ? ( आत्ता या वाक्यावर कुणी लेखिकेचा कॉपीराईट सांगु नये, या पुस्तकात दोनदा आले आहे हे वाक्य. ) लेखक वा समीक्षक म्हणवुन घ्यायची माझी लायकिहि नाही. लोक वाहवा करतात, त्यात लेखनाच्या गुणापेक्षा, वैयक्तिक स्नेह अधिक असावा, असे मी मानतो. हा स्नेह प्रत्यक्ष भेटण्यातुन आणि बोलण्यातुन आलेला आहे. मायबोलिवरचे लेखन हे त्या स्नेहाला पुर्णपणे कारणीभुत नाही. विरोध माझ्या लेखनाला नव्हता तर माझ्या मत मांडण्याला होता. एरवी माझी चुक दाखवल्यावर मी ताबडतोब आभार मानतो. आणि शक्य तर चुक सुधारुन टाकतो. अलिकडेच कॅलिग्राफी बद्दल असे झाले होते. मी त्या शब्दाचा चुकीचा उच्चार लिहिला होता. मी त्या भाषेला, per se सवंग नव्हते म्हंटले, भाषेचा सवंगपणा हि संदर्भाने जोखायची गोष्ट आहे. चाफा बहुतेक, माझ्या झोपाळा त्या घरचा, या कथेतल्या, एका वृद्ध कोकणी स्त्रीने, आपल्या आळशी गड्याना उद्देशुन, वापरलेल्या एका शब्दाबद्दल संदर्भ देत असावा. मराठीला अशी भाषा नवीन नाही. अनेक थोर लेखकानी, योग्य त्या संदर्भात शिव्यांचा वा ग्राम्य भाषेचा वापर केला आहे. एखादे उदाहरण द्यायचे तर, विदुषी दुर्गा भागवतानी, चंद्रकांत खोतांच्या एका पुस्तकाला जी प्रस्तावना लिहिलीय, त्यात त्यानी, XXX नाही X आणि कावळ्याला आमंत्रण, अशी म्हण वापरली आहे. मला ती चांगलीच खटकली होती. पण त्याच प्रस्तावनेत त्यानी, त्याचे पुरेसे स्पष्टिकरण केले आहे. अशी कुठलिही कारणमींमांसा या पुस्तकात सापडत नाहीत. लेखिका उत्तम शब्दयोजना करु शकते, तिने एकदोन शब्द तसे योजिले आहेत, आणि त्याबद्दल मी दादहि दिली आहेच. जे काहि कथानक आहे त्या संदर्भात, त्या नायिकेच्या संदर्भात, मला तरी ती भाषा, सवंग वाटली. आणि जर हे लेखन स्वस्त असेल, तर पुस्तकाचे काय हो ? ज्या लेखकांचे लेखन मला आवडते, त्यांच्याशी संपर्क मी साधतोच. प्रत्यक्ष भेटहि घेतो. पण आवर्जुन या लेखिकेची भेट घ्यावी असे वाटत नाही. अकारण मिळवुन दिली जाणारी प्रसिद्धि, यावर माझा आक्षेप आहे. KANK कसा हिट घोषित केला गेला होता, तसेच मला हे वाटते. काहि पुस्तके अकारण गाजली तरी कालांतराने, त्यांचा बोलबाला कमी होतो, कारण लोकाना खरे स्वरुप कळुन येते. आणखी एक उदाहरण द्यायचे, तर अलिकडे टॉप टेन मधे असणार्या, मुंबईचा अन्नदाता या पुस्तकाचे देता येईल. हे पुस्तकहि पद्धतशीरपणे प्रमोट केले गेले. पण मग लोकाना त्यातल्या उणीवा कळल्या, आणि ते मागे पडले. मी वाचुनहि त्याबद्दल लिहिले नाही, कारण मुंबईच्या डबेवाल्यांच्या कार्यपद्धतीची, तोंडओळख त्यातुन होते, हे मह्त्वाचे होते. रैना, पुस्तक श्रेष्ठ कि टाकाऊ, यापेक्षा ते पद्धतशीरपणे गाजवणे, याला माझी हरकत होती. आणि खुल्या व्यासपिठावर, मी तरी मधे पडु नका, असे कुणालाहि म्हणणार नाही. असो, आपल्या सगळ्यांच्या वादात, त्या पुस्तकाला अकारण प्रसिद्धि मिळत आहे, केवळ याच कारणासाठी मी हा वाद ईथे संपवतो. आणि माझ्यावतीने आणखीहि कुणी लिहु नये, अशी विनंति करतो. माझ्या विरोधात ज्याना लिहायचे आहे, त्याना थांबवणारा मी कोण ?
|
Yog
| |
| Thursday, December 14, 2006 - 11:47 am: |
| 
|
very well said.. ..
|
Saee
| |
| Thursday, December 14, 2006 - 1:06 pm: |
| 
|
दिनेश, frankly , हे पोस्ट विनोदाने नाही घेता आलं. तुमच्या नावाखाली तर अजिबात बरं वाटलं नाही हे वाचायला. कारणे काही असोत.
|
Pooh
| |
| Thursday, December 14, 2006 - 1:19 pm: |
| 
|
दिनेश, मला या विशिष्ट पुस्तकावर आणि त्याच्या साहित्यीक मूल्यांबद्दल काही म्हणायचे नाही आहे कारण मी हे पुस्तक वाचलेले नाही. तुम्ही वर जे काही लिहिलेले आहे त्यातून तुमचा आक्षेप २ गोष्टींवर आहे असे वाटते १. पुस्तकातील तपशीलाच्या चुका २. पुस्तकाची केलेली पद्धतशीर प्रसिद्धी माझ्या मते एखाद्या काल्पनिक गोष्टी मधे तपशीलाच्या चुका असणे हा अक्षम्य अपराध नाही. चुका होऊ नयेत ह्यची खबरदारी घेणे हे लेखकाचे कर्तव्य आहे पण चुका झाल्या तर पुस्तकाचे वाचक त्याचे मूल्यमापन योग्य रीतिने करतातच. आणि पद्धतशीर प्रसिद्धी बद्दल म्हणाल तर १. तुम्हाला या पद्धतशीर प्रसिद्धी करण्यामध्ये फ़क्त लेखकाचा हात आहे असे म्हणायचे का? २. प्रकाशकाचा यात काहीच सह्भाग नसेल का? ३. लेखक आणि प्रकाशक या दोघांचा पुस्तके लिहून विकणे हा जर पोटापाण्याचा धंदा असेल तर प्रसिद्धी करून पुस्तकांची जास्तीत जास्त विक्री करणे यात काय चुकीचे आहे? ४. लेखकाने फ़क्त उच्च साहित्यीक मूल्ये असलेली पुस्तकेच लिहावीत का? ५. लेखकाला इतर चरितार्थ करणार्या लोकांपेक्षा वेगळ्या मापदंडाने मोजले जावे असे तुमचे मत आहे का? माझा इथे चर्चा वाढविण्याचा उद्देश नाही. तुमचे इतर लिखाण मी नेहेमी वाचतो आणि ते आवडते ही (विशेषत्: तुमची प्रवासवर्णने) पण मला जे मुद्दे उपस्थित करावेसे वटले ते मी मांडले आहेत. तुम्हाल उत्तर द्यावेसे वटले तर इथे किंवा इथे चर्चा वाढवायची नसेल तर email मधून आले तरी चालेल.
|
Deshi
| |
| Thursday, December 14, 2006 - 1:26 pm: |
| 
|
ज्ञानपिठ पुरस्कार कुठल्या पुस्तकाला द्यायचे ह्याची पण चर्चा ईतकी ( १ वर्ष) होत नसावी. त्या मेघना ला हे कळवा रे कोणीतरी.
|
दिनेशदा, हे लिखाण मला विनोदी वाटलं नाही. मी पूर्ण वाचूच शकले नाही. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. मायबोलीवर असं लिखाण प्रकाशित होऊ नये असं माझं मत आहे. मी ते डिलीट करायची विनंती ऍडमिनना करत आहे.
|
Sashal
| |
| Thursday, December 14, 2006 - 1:57 pm: |
| 
|
एव्हढं काय चूक आहे या लिखाणात ..? कोणीतरी delete करायची विनंती करावी एव्हढं काय आक्षेपार्ह आहे?
|
ठीक आहे जो जे वांछील तो ते लिहो... अशी जरी धारणा असली तरी हितगुजवर काही व्यक्तींकडून काही किमान दर्जाची अपेक्षा केली जाते. त्यामुळे दिनेशने ते कदाचित विनोदी म्हणून लिहिलेही असेल अथवा दिनेशचे म्हणणे त्याच्या कोनातून बरोबरही असू शकेल पण भावले मात्र नाही. माझीच जुनी उपमा पुन्हा वापरून मी म्हणेन जसं आपण म्हणतो सचिन आज सचिनसारखं खेळला नाही म्हणजे सचिनचा दर्जा घसरला असं होत नाही पण ती खेळी तरी आवडलेली नसते... दिनेश भाऊ ये बात कुछ हजम नही हुई...
|
Asmaani
| |
| Thursday, December 14, 2006 - 2:53 pm: |
| 
|
seriously दिनेशदा, त्या पुस्तकाच्या वादात ते वाचलेले नसल्याने मला पडायचे नाही, पण हे लिखाण तुमच्या नेहमीच्या standard चे नाही एवढे नक्की! btw तुमची एकही कथा बरेच दिवसात आलेली नाही. तेव्हा एकदा होऊन जाऊदे!
|
|
|