Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
क्रॉस कनेक्शन ...

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » मार्गशीर्ष » विनोदी साहित्य » क्रॉस कनेक्शन « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through December 14, 200620 12-14-06  2:53 pm

Sashal
Thursday, December 14, 2006 - 3:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एखाद्या लेखिकेने एक काल्पनिक कादंबरी लिहिली .. ती काहि जणांना ठिक ठिक वाटली, काहि जणांना अतिशय आवडली, काहि जणांना अजिबात आवडली नाहि, काहि जणांना ती वाचून राग आला, काहिंना ती लेखिका आवडते तिच्या इतर काहि कलाकृतींमुळे, काहिना तिचं काहिच आवडत नाहि ..

एका वाचकाला तिचं लेखन अजिबात आवडत नाहि .. काहिही कारण का असेना त्या वाचकाने ही कादंबरी वाचली, त्या कादंबरीवर काहि मतं मांडली .. बरेच जणांना ती मतं त्या वाचकाची आहेत ह्यावर विश्वासच बसला नाहि .. ह्या वाचकाला इतरत्र लोकं ओळखतात, त्यामुळे हा वाचक काय प्रकारचे वाचन, लेखन करेल ह्याबाबत लोकांच्या काहि अपेक्षा असतात, म्हणून अशा अपेक्षा असलेल्या लोकांना आश्चर्य वाटलं ..

या कादंबरीबद्दलची त्या वाचकाची मतं वाचून बरेच लोकांना वाटलं की ती biased आहेत .. कदाचित खरोखर असतील काहि पूर्वग्रहांमुळे किंवा मग ज्या लोकांना ती biased वाटतात ती लोकं स्वतः विरुध्द बाजूने prejudiced असतील म्हणून कदाचित .. पण त्यांना ह्या वाचकाची मतं अजिबात आवडत नाहित .. अशी लोकं त्या वाचकाच्या मतांविरुध्द biased किंवा unbiased मतं मांडतात .. हे सगळेच human beings , मग वाद विवादाला सुरुवात होते .. " माझ्यापुरता हा विषय मी संपवतो / ते .." असं म्हणतात आणि परत परत वाद घालत रहातात ..

ह्या सगळ्या प्रकाराशी direct किंवा indirect संबंध असलेले आणि नसलेले लोक पण मग त्यात सामिल होतात .. मग परत मानापमान, हेवेदावे आणि असलंच बरंच काहि काहि .. परत एक वादळ आणि नंतर परत भरपूर शांतता .. हाच हितगुजचा निसर्गनियम असावा ..

" अति तेथे माति " तेव्हढी होऊ नये ..




Bhagya
Thursday, December 14, 2006 - 8:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा! मी तर हे सगळं वाचून असाच निष्कर्ष काढला, की दिनेशदा, लोकांना तुझ्याकडून कायम दर्जेदार, उत्तम लिखाणाची अपेक्षा असते.
पण मेघना पेठेने काहीही लिहिलं तरी चालेल्- तिच्याकडून दर्जाची अपेक्षा नसावी बहुधा.

मला या लिखाणात काही आक्षेपार्ह वाटलं नाही, कारण ही एक सत्य परिस्थीती आहे. बर्‍याच गल्लाभरू पुस्तकांच्या मागे हेच वास्तव आहे. आणि या पेक्षाही, अगदी पर्सनल लेव्हल ला जाऊन, लोकांवर कारण नसताना टिका करणारं, लोकांची क्रूर थट्टा करणारं (एक ताजे उदाहरण लक्षात असेलच सगळ्यांच्या) आणि अगदी हमरी तुमरी वर येऊन लिहिलेलं मी इथेच मायबोलिवर वाचलेलं आहे.

जे असेल ते असो, कोणीही काहीही लिहिलं तरी चालेल, पण दिनेशदा, तु असं लिहू नयेस. कारण हे लिहिण्यात, तुझ्या मुद्द्यांचं समर्थन (समर्थनाची गरजच काय? प्रत्येकजण आपल्याला हवे ते, योग्य वाटते ते लिहितोच तसेच तु ही लिहू शकतोस ना?) करण्यात तुझा बहुमूल्य वेळ वाया गेला आणि आम्ही सगळे तुझ्या एका आनंददायक, माहितिपूर्ण चांगल्या लेखाला मुकलो, जो तुला या वाया गेलेल्या वेळात लिहिता आला असता.
मला हे लिखाण नातिचरामी चे अगदी परखड, योग्य त्या मुद्द्यांवर बोट ठेवून केलेले
विनोदी विडंबन वाटले.
तरीपण, माझ्या मते, मेघना पेठेचं लिखाण इतका वेळ द्यायच्या मुळीच लायकीचं नाही....






Dineshvs
Thursday, December 14, 2006 - 10:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्या मित्रमैत्रीणिंच्या मतांचा आदर राखुन मीच नेमस्तकाना हा पुर्ण BB डिलीट करायची विनंति करतो.

माझ्याकडुन दर्जेदार लिखाणाची अपेक्षा, करता, याचा आनंद जरुर आहे, पण माझ्या हातुन दर्जेदार लिखाण होत नाही, याचीही मला पुर्ण कल्पना आहे.
ज्याना माझे हे लिखाण आवडले नाही, त्यांची जाहिर माफी मागतो, पण ईथे तर मी कुठलेच आक्षेपार्ह शब्द वापरले नाहीत, आणि या पुस्तकात तर केवळ अशीच भाषा आहे. असे लिहिल्याशिवाय, या पुस्तकाच्या दर्जाची कल्पना, ज्यानी वाचले नाही, त्याना येणे शक्य नव्हते.
फ़क्त Pooh च्या मुद्द्याना उत्तरे देतोय.
तपशीलाच्या चुका, फक्त पारश्यांच्या विहिरीबद्दलच्या आणि पक्ष्यांच्या पिल्लाबाबत होत्या.
( आपल्या मायबोलिवरचे सर्व, कवि, कवितेवरच्या शंकाना आवर्जुन उत्तरे देतात, हेहि मला ईथे नमुद करावेसे वाटतेय )
कबरीवरची फुले आणि जेवण शिजवणे या मुद्द्याबाबत प्रचंड विरोधाभास होता.
तीन धोब्यांच्या मुद्द्याला अगदी चलाखपणे बगल देण्यात आली, शेवटी ज्याला हवा तसा अर्थ घ्यावा, अशी पळवाट काढली. मला नाही लागला त्याचा संदर्भ, ज्याना लागला त्यानी तो स्पष्ट करायला हवा होता.
पद्धतशीर प्रसिद्धि बाबात, स्मिता तळवलकरने नावानिशी लिहिले होते एकदा. त्यामुळे ती कुणीहि केली तरी गैरच.
मराठीत साहित्यिक दशहतवाद, आधी नेमड्यांच्या कोसला पासुन सुरु झाला, आणि या प्रकाराला माझा कायम विरोध राहिल.


Limbutimbu
Thursday, December 14, 2006 - 11:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> वा! मी तर हे सगळं वाचून असाच निष्कर्ष काढला, की दिनेशदा, लोकांना तुझ्याकडून कायम दर्जेदार, उत्तम लिखाणाची अपेक्षा असते.
पण मेघना पेठेने काहीही लिहिलं तरी चालेल्- तिच्याकडून दर्जाची अपेक्षा नसावी बहुधा.
भाग्या, अप्रतिम निष्कर्ष!
बाकी दिनेशभाऊ, लेखाचा विषय, घाऊकरित्या पुस्तके लिहुन घेणारे प्रकाशक असा असेल तर तो योग्यच हे! एकेका विषयाची क्रेझ आली की तत्सम क्लोन टाईपचे लिखाण बाजारात घुसडले जाते त्याचे सद्ध्याचे प्रातिनिधिक चित्रण झाल हे!
बाकी ते दुसरे पुस्तक, कुणाचे काय वगैरे मी ते पुस्तकच वाचले नसल्याने मला तो विषय अगम्य हे!

उलट मी असे म्हणेन, की वाचकान्ना काही एक जाणवुन देण्यासाठि नेमका हेतू मनाशी ठेवुन रन्गवायचा प्रयन्त केलेले एक बर्‍यापैकी परिणामकारक लिखाण असे तुमच्या लेखाचे स्वरुप हे!



Aaftaab
Friday, December 15, 2006 - 1:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटतं की असं काही वाचायलासुद्धा ताकद लागते. मागे GS1 ने एका कथेमध्ये पत्रकार आणि वृत्तवाहिन्या कुठल्या दर्जाला जाऊ शकतात हे अगदी प्रभावीरित्या मांडलं होतं.. त्यातही काही शब्द वेगळे काढून वाचले तर काहीन्ना झेपण्यासारखे नव्हतेनसतील.. पण एखादे लिखाण वाचतानाच काही पूर्वग्रह ठेऊन वाचले तर ते नाही पटणार किंवा आवडणार कदाचित. मला वाटतं की अशा वेळी प्रतिक्रिया सांभाळून द्यावी.. काहीही झालं तरी आपण एका मायबोली कुटुम्बातले.. काही खरच खूप third class असेल तर देतील मॉड्स उडवून... कुणी त्यावरून लगेच भांडणे सुरु करु नयेत.. दिनेशदा, ही वेगळ्या प्रकारची समीक्षा आवडली, त्यातल्या फुल्यांसकट!..

Lopamudraa
Friday, December 15, 2006 - 2:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा! मी तर हे सगळं वाचून असाच निष्कर्ष काढला, की दिनेशदा, लोकांना तुझ्याकडून कायम दर्जेदार, उत्तम लिखाणाची अपेक्षा असते.
पण मेघना पेठेने काहीही लिहिलं तरी चालेल्- तिच्याकडून दर्जाची अपेक्षा नसावी बहुधा.>>>>. bhagyaa... hmm!!!
yaa sagaLyaa vaadaat malaa Rainaachii bhumikaa ekadam patalii.


Chafa
Friday, December 15, 2006 - 2:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सशलचं पोस्ट वाचलं आणि वाचल्यावर त्यावर विचारही करावासा वाटला आणि मग मनात विचार आला की खरंच आपण एवढा आटापिटा करुन का लिहिले? काय फरक पडला असता कोणी कोणत्याही कारणावरुन कोणत्याही पुस्तकाला नावं ठेवली तर? म्हणजे अगदी "मैनू की फरक पैंदा" बरं का! अशा कितीतरी न पटणार्‍या गोष्टी रोज डोळ्यादेखत घडत असतात आणि आपण डोळे मिटून घेण्यापलिकडे काऽहीही करत नाही. मग इथे पुलावरुन एवढे पाणी का वाहवले? तर त्याबद्दल थोडेसे लिहून माझी भूमिका स्पष्ट करावीशी वाटली.

मी या वादात पडण्यापूर्वीही अनेकांनी दिनेशना प्रत्यक्षपणे लिहिले होते की तुम्ही मेघना पेठेंबद्दल वैयक्तिक आकस असल्यासारखे लिहित आहात. आणि नेमकी हीच बाब लक्षात न घेता दिनेश यांचे त्यानंतरचेही सर्व लिखाण (वरच्या 'विनोदी' प्रकरणासहित) होत आहे हे जाणवले. एका पूर्णतः काल्पनिक कथेला वैयक्तिक आयुष्याशी किती आणि कुठे जोडायचे याची मर्यादा न ओळखल्याने त्यांची अजूनही त्याभोवती झुंज सुरु आहे असे वाटत राहते. मला इथे पुलंच्या "नाटक कसे असावे" आणि "संस्कार" मधला कितीतरी भाग राहून राहून आठवतो. साहित्यप्रकार हा वैयक्तिक, सामाजिक, काल्पनिक, भौतिक, ऐहिक, कुठल्याही विषयावर, कुठल्याही संदर्भांवर, कुठल्याही पात्रांवर आधारित असू शकतो. त्याला न स्थळाचे बंधन आहे ना काळाचे. लेखकाच्या कल्पनेची भरारी कुठे आणि कशी उडेल याचे steering वाचकांच्या हातात कधीच नव्हते, नसावे. तसे असते तर सद्वर्तनी अशा पांडवांनाही जुगार (तेव्हाचे द्यूत) खेळताना कशाला हो दाखवले असते आपल्या ग्रंथकारांनी? (आता तसं बघायला गेलं तर तेव्हाही 'द्यूत', 'वस्त्रहरण' वगैरे मसालेदार कथानके सवंग प्रसिद्धीसाठी घुसडलेली आहेत असे आरोप व्यास ऋषींवर झाले असल्यास कल्पना नाही.)

आता एखाद्या सत्यकथेच्या किंवा आत्मचरित्राच्या खरेपणाची छाननी कोणी केली तर त्याचा बाऊ करणेही अयोग्यच ठरेल. ( James Frey च्या A million little pieces बद्दल उठलेले वादळ तसे ताजेच आहे.) पण एखाद्या काल्पनिक आणि प्रतीकात्मक कथेतून अशा अपेक्षा किती ठेवायच्या त्याला मर्यादा आहेतच. तेव्हा लेखिकेचे काही तपशील चुकले असण्याची शक्यता नाकारता येत नसली तरी 'त्यासाठी' तिचे साहित्य बाद ठरवता येत नाही. कारण जिथे पात्रे आणि प्रसंगच जर कल्पित आहेत तिथे त्यांचे संवाद आणि विचारही कल्पित असणार की. आता भाषा! हा तर मोठाच विषय आहे. कोण कशी भाषा बोलेल हे कोण ठरवणार. चुकीच्या ठिकाणी चुकीची भाषा आली तर नक्कीच खटकते. आणि माझे वैयक्तिक मत विचाराल तर या पुस्तकातली भाषा मला स्वतःला प्रचंड खटकली हे मी आधीपासूनच लिहिले आहे. पण दिनेश तसे न लिहिता ती केवळ अस्सल कशी नाही आणि आयदान किंवा मीना प्रभू किंवा दुर्गाबाईंसारखी कशी नाही हेच लिहित राहिले. आणि इथे परत त्यांनी चूक केली. अनुराधा पौडवालची लता मंगेशकरबरोबर तुलना करणे अयोग्य असले तरी त्यामुळे अनुराधा ही काही टाकाऊ गायिका ठरत नाही. अनुराधाचेही लाखो चाहते आहेत जे जीवाचा कान करुन तिचे गाणे ऐकतातच. तिचेच कशाला, पण अलिशा चिनॉयपासून सुनिधी चौहान पर्यंत सगळ्या गायिकांचे चाहते आहेत. याविषयी दिनेशबरोबर मागे चर्चा झाली असता त्यांचे शेवटचे उत्तर होते '(अनुराधाला) ऐकणारे ऐकोत' आणि माझे त्यावर उत्तर होते, 'जरुर ऐकतील, ऐकणारे जरुर ऐकतील'. शेवटी आवड ही वैयक्तिक असते. आता आपल्याला remix हा प्रकार लाख आवडत नाही पण अशी कितीतरी लोकं आहेत ज़्यांना तो आवडतो. आपल्याला त्याचे कितीही वैषम्य वाटले तरी सत्य बदलत नाही. तसेच काहीसे इथे घडले असावे.

आता नातिचरामिचे साहित्यिक potboilers मधे स्थान काय असे विचारले तर उत्तर "शून्य" असे आहे यात वादच नाही. पण त्याचा अर्थ ते पुस्तक एकदम टाकाऊ आहे असा होत नाही.

कबरीवरची फुले कोणाही संवेदनशील व्यक्तिला विकत घ्यावीशी वाटणार नाहीतच. कित्येकदा फूल हे केवळ त्याच्या रंगगंधासाठी नव्हे तर ते देण्याच्या भावनेसाठी महत्वाचे असते. नाहीतर निर्माल्य हा प्रकार जन्माला आलाच नसता. त्याचा आणि गरीब मुलांना मदत करण्याचा किंवा न करण्याचा काय संबध? दिनेशना तसा संबंध जाणवत असला तरी लेखिकेला किंवा इतरांना तो जाणवत नाही याचा विचार दिनेशनी (ट्युलिपने दिलेल्या उदाहरणानंतर तरी) करुन पहायला हवा होता. प्रत्येक जण जरी दुसर्‍यांचे उःश्वास श्वास म्हणून घेत असला तरी म्हणून आपण दुसर्‍याने वापरलेल्या भेळीच्याच पुडीत आपली भेळ बांधून द्यायला भेळवाल्याला सांगत नाही ना? तसेच! मुद्दाम पाल्हाळ लावून लिहिले आहे कारण ती कबरीवरची फुले आपली सारखी प्रत्येक पोस्टमधे रिसायकल होतातच आहेत बिचारी.

राहता राहिला 'पद्धतशीर प्रसिद्धी' या विषयाबाबतचा सतत येणारा उल्लेख. आता चितळ्यांची बाकरवडी दर्जाने authentic बाकरवडीपेक्षा कितीतरी गौण असेल (नव्हे मला खात्री आहे असतेच) पण सत्य हेच आहे की आज बाकरवडी म्हटले की बहुतांश जगाला चितळेच आठवतात. ही प्रयत्नपूर्वक प्रसिद्धी झाली का? मला नाही वाटत. ज्यात थोडे तरी तथ्य आहे, थोडा तरी गाभा आहे, आणि थोडेतरी मूल्य आहे अशाच गोष्टी तग धरु शकतात आणि काळाच्या ओघात टिकू शकतात. आणि त्यामुळेच रिमिक्स ची गाणी दोन दिवस टिकतात आणि जुनी गाणी कैक दशकांनंतरही हळवी करत जातात.

मेघना पेठेंचं हे पुस्तकही कदाचित दोन वर्षात विसरलं जाईल. पण त्यात थोडेतरी का होईन साहित्यिक मूल्य आहे म्हणूनच त्याची प्रसिद्धी होते आहे. आपल्याला ते पटत नसेल कदाचित पण म्हणून ते नाहीच असे म्हणून सत्य नाकारता येत नाही.

सरतेशेवटी दिनेश यांच्या लिखाणाविषयी. वेळोवेळी जेव्हा त्यांचे लिखाण आवडते तेव्हा मी आवर्जून तसे लिहिले आहे. जेव्हा आवडले नाही आणि तसे सांगावेसे वाटले तेव्हाही तसे लिहिले आहे. तेव्हा या विषयावर जेव्हा त्यांनी मांडलेले मुद्दे मनापासून पटले नाहीत तेव्हा तेही लिहिले. धोब्यांच्या रुपकाचा मुद्दा चतुरपणे वगैरे अजिबात टाळला नाहीये. मागे 15 Park Avenue या चित्रपटाच्या शेवटाबद्दल अशीच चर्चा रंगली होती. तो शेवट नक्की कसलं रुपक आहे याविषयी. तर इथे लेखिकेला काय रुपक अपेक्षित आहे हे वाचकाने स्वतच्या अनुभवविश्वातून किंवा कथेच्या कथानकातून ओळखावे. लेखिकेने ते स्पष्ट केलेले नाही. Life of Pie मधे नाही का ही जबाबदारी वाचकावर सोपवलेली? तेव्हा लेखिकेने निव्वळ पाने भरली आहेत असा निष्कर्ष काढायला कोणाचीच काही हरकत नाही पण कोणाला त्यात अर्थही दिसू शकेल ही शक्यताही नाकारता येत नाही. कोणाला ते प्रकरण म्हणजे माणसांची, जीवनाची 'सवय' होत असतानाच; त्याचा 'नेम' बसत असतानाच परिस्थितीने व दैवाने उलथापालथ करणार्‍या, घडी विस्कटणार्‍या, बदल घडवून आणणार्‍या नात्यांच्या, भावनांच्या आणि जीवनाच्या संघर्षाचे, कल्लोळाचे ते रुपक वाटेल. कोणाला नुसती रद्दी!

दिनेश, पोचला, तुमचा विरोध पोचला. तसा तो तुमच्या अगदी पहिल्याच पोस्ट मधून व्यवस्थीत पोचला होता. पण सत्य हे आहे की विरोधालाही विरोध होतच राहणार. अनुराधा पौडवाल सुरेख गाणी गातच राहणार, ती (आणि दुर्दैवाने तद्दन टुकार अशी रिमिक्स गाणीसुद्धा) लोक अतिशय आवडीने ऐकतच राहणार, आणि तुम्हाला कितीही आवडले नाही काय किंवा "कोई फरक नही पैंदा" काय तरीही नातिचरामिची प्रसिद्धी आणि चर्चा इतरत्र होतच राहणार. दुर्दैवी विरोधाभास हाच की इथे मायबोलीवरच्या छोट्याश्या जगात तरी ती प्रसिद्धी होण्यात तुमचाच हातभार सर्वाधिक लागला.

तुम्हाला वैयक्तिक उद्देशून कधीच काही लिहायचे नव्ह्ते. पण प्रश्न तत्वाचा होता.


Limbutimbu
Friday, December 15, 2006 - 3:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>> तुम्ही मेघना पेठेंबद्दल वैयक्तिक आकस असल्यासारखे लिहित आहात.
मला ते काही समजत नाही पण पुलन्च्या लिखाणावरच्या माझ्या पोस्ट्स मात्र नक्कीच पुलन्वरील वैयक्तीक आकसातुन नव्हत्या, आधीच सान्गुन ठेवतोहे हांऽऽ!
पण माझा तो वेगळाच विषय हे, पुलन्चे लिखाण काय की भालजीन्चा स्टुडिओ काय.....! तो प्रान्त वेगळा, इथे त्याचा सम्बन्ध मी लावत नाही!
बाकी तुमचे चालुद्या, मेन्दुला जरा खुराक मिळतो हे!
:-)

Kiru
Friday, December 15, 2006 - 3:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>>>मेंदुला जरा खुराक मिळतो हे!

लिंब्या.. मुद्दल नाही तिथे व्याजाच्या गोष्टी!!!!


Limbutimbu
Friday, December 15, 2006 - 4:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>> मुद्दल नाही तिथे व्याजाच्या गोष्टी!!!! सहीऽऽऽ

बर बाबाऽऽ, गुढग्याला मसाज होतो हे अस म्हणतो...........! झाल समाधान??????
DDD


Lopamudraa
Friday, December 15, 2006 - 5:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुद्दल नाही तिथे व्याजाच्या गोष्टी>>>. layee bharee

Giriraj
Friday, December 15, 2006 - 7:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किर्‍या,अगदी ज़बरी...
मग लिम्बोजीराव आता होऊन जाऊद्या! :-)





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators