Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 12, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » माघ » कथा कादंबरी » Friend » Archive through December 12, 2006 « Previous Next »

Hems
Friday, December 08, 2006 - 12:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त लिहितेयस नंदिनी ... लिखाणाच्या style मुळे प्रियाचा वेगळेपणा खुलून आलाय.

Marathi_manoos
Friday, December 08, 2006 - 1:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Good going.....finish it pleeeease...new style...

Nandini2911
Saturday, December 09, 2006 - 1:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ती बाइकवर त्याच्या पाठी बसली. त्याला सहज चेष्टा करायची लहर आली. "ठीक से पकडके बैठना. I drive very fast "

तिने हाताचे तळवे त्याच्या चेहर्‍यापुढे धरले.. लाल निळे. " your shirt is expensive. चालेल?"

आता रेहानला काही बोलताच येईना. खरं तर तिथेच थांबून त्याला तिच्याशी गप्पा मारायच्या होत्या. पण नको, ही बया पागल आहे असं म्हणतात. त्याने बाईक चालू केली.

"इतनी रात को यहा क्या कर रही थी? डर नही लगता?" त्याने विचारलं.

ती खळखळून हसली. "डर, किसका? अख्ख्या गावात लोक मला घाबरतात."

तो चमकला. "इथून राईट मार." तिने त्याला सांगितलं.

" your painting is good. I like abstract style " तो सहज बोलायचं म्हणून बोलला.
" Thank You " तिनं शान्तपणं सांगितलं.
"घर कहा है तुम्हारा" त्याने विचारलं. "चलो बताती हु"

त्यानन्तर त्याचं बोलणंच खुंटलं, मस्त वारा सुटला होता. आता भुताचा माळ पाठी पडला. तिचं occasionally राईट लेफ़्ट एवढंच बोलणं सुरू होतं. तशी त्याला गावाची अजून माहिती नव्हती. आणि हा तर एकदम अनोळखी रस्ता लागला. कुठच्या कपारीत राहते ही असा विचार सुरू होता तेवढ्यात ती म्हणाली. "रेहान लेफ़्ट मारना."

"बास इथे या गेटसमोर थांबव. thanks Bye " एवढं बोलून ती उतरली.

तिने बंगल्याच्या गेटमधून आत जाताना पाठी वळून पाहिलं आणि हसली. तेच ते लहान मूलवालं smile . तो चमकून बघतच राहिला. रात्री अकरा वाजता ही मुलगी त्याच्या बाईकवरून लिफ़्ट घेऊन अर्धं गाव फ़िरवून त्याच्याच बंगल्यात गेली होती.


Nandini2911
Saturday, December 09, 2006 - 2:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता मात्र रेहानला काहीच सुचेना. त्याने बाईक गेटमधून आत घातली. दरवाजा उघडाच होता. तो आत गेला.
दादी सोफ़्यावर बसली होती. दादाजी खुर्चीवर बसून कसलतरी जाडजूड पुस्तक वाचत होते. आणि प्रिया.. ती कुठे होती.

"आ गये बेटा, आज जल्दी आ गये." दादाजी पुस्तकातून मान वर न करता म्हणाले.

"दादी, एक लडकी आयी थी यहा पे, प्रिया.. कहा है." रेहान दादीजवळ बसत म्हणाला.

"यहा है," प्रिया किचनमधून हात पुसत बाहेर आली. "दादी, तुझा हा नातू वेडा आहे, मला विचरतो, तुझं घर कुठाय?"
दादाजीनी पुस्तकातून डोकं वर काढलं, आणि ते मनमुरादपणे हसले.
"रेहान, मी तुझ्या घराच्या पाठी राहते. गडगा ओलांडला की माझं घर. रोज पाहते मी तुला पण तु तुझ्याच तन्द्रीत असतोस."

" listen priya, my marathi is not that much clear, OK? I have never seen u around"
प्रियाने दादीकडे पाहिलं. त्या दोघीही हसतच होत्या. आता मात्र रेहानला वाटलं की त्याला खरंच वेड लागलंय. त्याच्या चेहर्‍यावरचे भाव तिने ओळखले.
" dont get so confused. have ur dinner. we will discuss then Ok? "

काय ओके ते त्यालाहि कळलं नाही. पण ती दादीला मदत करायला किचनमधे गेली. दादाजीनी पुस्तक बंद केलं. "गोड छोकरी आहे. हम अकेले रहत्ते है, तो रोज आती थी. दादी की तो सहेली हो गयी है."

"पहले कभी नही देखा घर मे" रेहान म्हणाला.
"हा, अब कॉलेज जाती है, पढाई भी तो होती है"
"दादाजी, आपको पता है वो मेरे क्लास मे है."

तेवढ्यात प्रियाने किचनमधून आवाज दिला. "रेहान, चलो, टबल लगाओ."

एवढ्या अधिकाराने तर त्याला त्याच्या आईने ही कधि सांगितलं नसतं. "तुला माहितीय रेहान, दादी तुझ्यासाठी थांबली जेवायची. तसं मी तिला कित्यकदा सांगितं असं कुणासठी थंबू नको. पण ऐकतच नाहि. इतके दिवस मी यायचे जेवायला. पण तू आल्यापासून कधी जमलंच नाही." ती वर्षाची ओळख असल्यासारखी बोलत होती.

रेहानला आता थोडा धीर आला. तशी तिच्या हातातला चाकूपाहून भिती वाटली पण तो काकडीसाठी हे कळल्यावर तो जरा हुशारला.
"कॉलेजमे कभी बात निही की आपने?" त्याने खवचटपने विचारलं.
"लेकीन मे तुमसे बात करू ही क्यु? क्या काम रहता है?" तिने काकडीचा जीव घेत विचारलं.
"काम तो कुछ नहि रहता, पर तुम कॉलेजमे रहती हो क्या?" त्याने खुर्चीवर बसत विचारलं.

तिने हातातली काकडी खाली ठेवली. चाकू तसाच होता. ती किन्चित पुढे वाकली. तो जरा घाबरला. तिने त्याच्या कानाजवळ ओठ नेले आणि हलकेच पुट्पुटली, "कमसे कम असिफ़ के साथ बैठके मनोरमाबार मे बैठके बीअर तो नही मारती."

त्याने तिच्याकडे पाहिलं. तिच्या नज़रेतला अर्थ clear होता Dont ever try to mess with me

तेवढ्यात दादी आली. अख्खं डिनरभर तो गप्प बसून होता. खरं तर त्याला कुणी बोलायचा chance दिलाच नाही.

प्रिया मात्र अखंड बडबडत होती. दादा-दादीना तिच्या बडबडीची सवया असावी. कॉलेजातले सगळ्या प्रोफ़ेसरची नक्कल करून झाली. एवेढंच काय पण देशपांडे रेहानला वर्गात "युवराज" म्हणून कसा चिडवतो हेही सांगून झालं.

रेहान confused होता. कुणीही झालं असतं म्हणा. करण प्रियाची कॉलेजमधली image तिच्याविषयी चालणारे समज आणि असिफ़ने दिलेली माहिती हे सगळं समोरच्या प्रियापेक्षा खूप वेगळं होतं. पण आता त्याला काही जाणून घेण्याची घाई नव्हती. जर तिचं आपल्याघरी इतकं येणं ज़ाणं असेल तर त्याला त्याच्या प्रश्नाची उत्तर आज ना उद्या मिळणारच होती.

जेवण झाल्यावर तो TV बघत बसला. साडेअकराझाले असतील. दादाजीनी त्याला प्रियाच्या घराविषयी थोडी माहिती दिली. ती एकटीच मुलगी आहे. वडिल IAS Officer आहेत. इथे दोन वर्षापुर्वी आले, वगैरे वगैरे.

प्रिया दादीला मदत करत होती. सगळं आटोपून ती बाहेर आली. "बाय दादाजी. good night rehaan " ती निघाली.
"should i drop u?" त्याने विचारलं.
no thanks ती म्हणाली.
आणि गेलीसुद्धा.
इतक्या रात्री हिचे आईवडील हिला बाहेर पाठवतात कसे हा प्रश्न त्याला पडला.
तो त्याच्या बेडरूम मधे आला. त्याच्या बेडवर एक पेटिग ठेवलं होतं. अजून ओलं. लाल निळ्या रंगातलं.


R_joshi
Saturday, December 09, 2006 - 3:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी कथा फारच छान आणि गुढ अशा छाटातली लिहिली आहेस. लवकर पूर्ण कर कथा औत्सुक्य वाढत चालले आहे.

Nandini2911
Saturday, December 09, 2006 - 4:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रेहान त्या पेंटिंगकडे बघत होता. कितीवेळा त्याने घर बदललं. देश बदलला. पण हे पेंटिंग कायम त्याच्या बेडरूममधे राहिलं.
"कॉफ़ी बना रही हो या शाम का खाना?" त्याने हाक मारली.
किचनमधून तिचा आवाज आला. "उठो और ब्रश करो नही तो कॉफ़ी नही मिलेगी.."
छे! आता उठणं भागच होतं.
तो बाथरूममधून बाहेर आला, तेव्हा breakfast तयार होता. french toast and coffee
"आजकल अच्छा बनाने लगी हो, its eatable " त्याने तिला डिवचलं.
ती शान्त बसलेली त्याला कधीच आवडायची नाही.
रेहानने परत तिच्याकडे पाहिलं. किती बदलली होती! काळ एवढ्या पटपट जातोय हे मानायला त्याचं मन तयार नव्हतं. पण बाहेरून प्रिया कितीही बदलली तरी प्रिया अजूनही होती तशीच होती. पागल...
त्याचं त्याला हसू आलं.
"एकटाच का हसतोय? माहितेय ना एकटं हसणार्‍या मुलाला वेडा म्हणतात."
"एकटं हसणार्‍या मुलाला वेडं म्हणतात की नाही ते माहित नाही, पण एकटं असणार्‍या मुलीला मात्र म्हणतात. पागल." तो म्हणाला.
" You scoundral, " तिने त्याला मारण्यासाठी हात उगारला.
त्यानं तो हात धरला. आणि तिला ओढलं, स्वत्:च्या मिठीत घेतलं, गेलेल्या रात्रीच्या आठवणी परत जागवण्यासाठी आणि आज तिला थांबवण्यासाठी......त्याचा एक प्रयत्न..


Neelu_n
Saturday, December 09, 2006 - 5:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनि.. एकदम मस्त.. प्रिया कुलकर्णीचे character छान साकारतेयस. आता उत्सुकता वाढलीय लिही पटापट.:-)

Rupali_rahul
Saturday, December 09, 2006 - 6:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी, एकदम सुपर्ब तुझी लेखन शैली. पुढच्या क्षणाला काय होईल याची उत्कंठा सारखी वाढत जातेय...

Nandini2911
Saturday, December 09, 2006 - 7:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दुसर्‍या दिवशी अम्मीचा फ़ोन आला. मुम्बैला ये म्हणून तसं urgent नव्हतं. पण तिला त्याला पाहायचं होतं. अम्मीला येणं शक्य नव्हतं म्हणुन त्यालाच बोलावलं, त्याने दादाजीना विचारलं, तर तेही म्हणाले जाऊन ये एक दिवस.
पहाटेच त्याची ford Ikon घेऊन तो रवाना झाला. मात्र निघताना ते पेंटिंग त्याने आठवणीने घेतलं. अम्मीला gift देण्यासाठी.

खरं तर घरी जाणं हा त्याच्या द्रुष्टीने सगळ्यात वैतागवाणा प्रकार. ज्या माणसाचं तोंड बघणं त्याला अशक्य होतं त्याच्याच घरी जाणं, म्हणजे त्याच्या सहनशक्तीची परिक्षा होती. पण नाईलाज होता, ज्याच्याशी वैर होतं, तो रेहानच्या आईचा नवरा होता. त्याला बाप म्हणणं त्याने केव्हाच सोडलं होतं.

नशीबाने या वेळेला काही राडा झाला नाही. बाप दिल्लीला गेला होता. तरी तिथं राहणं त्याला कठीणच पडलं असतं, दुपारून तो बान्द्र्याला त्याच्या घरी पोचला. त्याच्या आवडीचं जेवण तयारच होतं. सन्ध्याकाळी सगळ्या बहिणीना घेऊन shopping झालं. परत रात्री driving करायचं आणि पहाटेपर्यंत पोचाअयचं असं त्याने ठरवलं होतं. पण अम्मी ऐकायला तयार नव्हती. अजून एक दिवस थांब हाच एक लकडा लावला होता. पण दादाजीचा फ़ोन आला. आणि या धर्मसंकटातून त्याची सुटका झाली.

रेहानला खरं तर या सर्वाशी संबंध तोडून दूर कुठेतरी जायचं होतं. तसा त्याने मनाशी कित्यकदा निश्चयही केला होता. पण दरवेळेला त्याच्या मार्गातला एकच अडसर होता. अम्मी. paralysis होऊन अंथरूणाला कायमची खिळलेली.

निघताना त्याने ते पेटिग परत घेतले. का ते त्यालाच कळलं नाही. तरी बडी दिदिने विचारलं का?
तो म्हणाला"सोचा था अपने drawing room मे लगायेंगे. लेकीन यहा के interiors के साथ match नही होता. दादा के घर मे ही ठीक कै. "
तिने विचारलं किसने बनाया?
त्याच्या नकळत तो म्हणाला "दोस्त ने"

हायवेवर गाडी भन्नाट सोडल्यावर त्यालाच हसू आले.
कोण कोठची पोरगी दोनदाही धड भेटली नाही आणि आपण तिला "दोस्त" बनवलंसुध्हा... too fast Rehaan, slow down."


Vadini
Saturday, December 09, 2006 - 4:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा नंदिनी,कथालेखनाचा हा पहिलाच प्रयत्न असूनही तुमचे लेखन अतिशय ओघवते आहे. दोन वेगवेगळ्या काळात ही कथा मांडत असूनही तपशील अचूक आहेत.शिवाय कथाभाग अगदी वेळेवर टाकत आहात-मानले बुवा तुम्हाला!

Srk
Sunday, December 10, 2006 - 4:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी, धमाल गोष्ट आहे.

Jhuluuk
Sunday, December 10, 2006 - 11:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सही आहे, एकदम fast चाललेली आहे, आणि with details


Bhramar_vihar
Monday, December 11, 2006 - 12:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

too slow nandini, be fast अस म्हणावसं वाटतय, धीर धरवतं नाहीये!

Zakasrao
Monday, December 11, 2006 - 12:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी छान आहे गोष्ट
अजुन येवुदे. फ़क्त जरा speed मध्ये येवुदे. धीर धरवत नाही.


Nandini2911
Monday, December 11, 2006 - 1:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गावाला आल्यानंतर दोन तीन दिवस प्रिया दिसलीच नाही. तिच्या मामाकडे गेली होती म्हणे. रेहाननेही नियमितपणे कॉलेजात जाणं सुरू ठेवलं. त्याला शक्य तितक्या लवकर prove करायचं होतं की तो व्यवस्थित राहू शकतो. दादाजीच्या या शिस्तवाल्या कचाट्यातून त्याला बाहेर पडायचं होतं. पण एक अर्थाने इथे बरं सुद्धा वाटत होतं. इथे कसलीच कटकट नव्हती. कसलीच भिती नव्हती.

bio चं लेक्चर नुकतंच संपलं होतं, नंतर english होतं. हा तास रेहान मस्त enjoy करायचा. कारण विषय त्याच्या द्रुष्टीने अजिबात कठीण नव्हता. उलट मजा वाटायची. तेवढ्यात्ती वर्गात आली. काळी जीन्स आणि व्हाईट टॉप. खाली मान घालून. ती आल्या आल्या वर्गातली टारगट मुलानी काहितरी comments मारल्या. काय ते नकी कळलं नाही.
पण ती शांतपणे मागच्या बेन्चवर जाऊन बसली. त्याने तिला हाय केलं. तिने ओळख नसल्यासारख. त्याच्याकडे पाहिलं. रेहान चिडला. काय खेळ चालू आहे त्याला अजून कळलं नव्हतं. उत्तर सापडतं म्हणे-म्हणेपर्यंत प्रश्न पाठलाग करायला लागायचे. अर्थात हे त्याच्या बाबतीत कायमचं होतं.
रेहानने मनोमन निश्चय केला आज, आता या क्षणापासून तिचा विचार पूर्ण पणे सोडायचा. असिफ़ बरोबर म्हणतो, ती वेडी आहे. आपल्याला काय जगात मुलीची कमी नाही. ही कोणी त्रिलोकसुन्दरी नाही लागून गेली. मनामधे का कोणास ठाऊक तिच्याबद्दल एक सॉफ़्ट कॉर्नर तयार झाला होता. कुठेतरी त्याला वाटत होतं की ती जाणून बुजून एकटी नाही आहे. तिला एकतं टाकण्यात आलय. पण आजचं तिचं हे वागणं त्याला अपमानास्पद वाटलं.

English लेक्चर नेहमीसारखं झालं, पण त्याचं पूर्ण लक्ष तिच्याकडे होतं. लेक्चर संपलं, पाटीलमेडम वर्गाबाहेर पडल्या, तशी प्रिया पण बाहेर पडली. वर्गाच्या दारापर्यन्त गेली. आनि तिने पाठी वळून त्याच्याकडे पाहिलं, वर्गात कुणाला कळं पण नाही पण तो काय अते समजला. किती अर्धा सेकंद ही तिने पाहिलं नसेल, पण त्याला त्याच्या प्रश्नाची अर्धी उत्तरं मिळाली. ती वर्गाबाहेर पडली. तोही निघाला.


Nandini2911
Monday, December 11, 2006 - 5:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ती कट्ट्याजवळच्या झाडाखाली थांबली होती. अच्छा, म्हणजे रेहान येईल याची तिला पूर्ण खात्री होती. रेहान तिच्याजवळ गेला. तसा तो अजून चिडलेलाच होता. पण ती मात्र शान्त होती.
"मला वाटलंच तू येशील." ती म्हणाली.
"समझके क्या रखा है तुमने मुझे?" तो जराशा रागात म्हणाला.
" what do you mean? " ती उद्गारली. आता मात्र रेहानला खात्री पटली.
इतके दिवस त्याने कुणाला सांगितलं नव्हतं, पण आज त्याला कळलं होतं, त्याने कितीही प्रयत्न केला तरी जे व्हायचं ते घडलंच होतं. त्याच्या बापाची दुसरी बायको त्याच्या जीवावर उठली होती. तिने त्याच्या अम्मीची जागा तर घेतलीच होती, पण आता मात्र ती त्याला मारणार होती. तिच्यापासून वाचवण्यासाठी तर दादाजी त्याला इथे घेऊन आले होते.

पण तिने इथेही सगळ्याना मात दिली होती. त्याच्या आधीच तिने त्याला मारायला म्हणूउन कोणाला तरी पाठवलं होतं. हीच प्रिया काल चाकू घेऊन उभी होती. आणि आज तर तिने त्याला मारण्याचा पूर्ण निर्धार केला होता. कुठचाही क्षणी तिने वार केला असता, त्या आधी त्याला काहीतरी करणं भाग होतं. काय केलं पाहिजे?

तिने त्याच्याकडे पाहून smile दिलं, तेच ते लहान मूलवालं. त्याच्या डोक्यातला विखार वाढत गेला. " dont get so angry " ती म्हणाली.

छान! मी तुझा मारून टाकते तू चिडू नकोस. आता मात्र हे सगळं सहन करणं कठीण झालं. त्याने तिचा गळा धरला. ती ओरडली. आसपास कोणीही नव्हतं. अंगातली सगळी शक्ती वापरून त्याने तिचा गळा दाबला. साली समजते कोण स्वत:ला. तिचा श्वास घुसमटायला लागला. जीव वाचवण्यासाठी तिची धडपड सुरू झाली. किती वेळ चालला असती ही धडपड.. एक मिनिट.. दोन मिनिटे.. त्याच्या पावणेसहा फ़ूट उंचीला आणि आडदाड बांध्याला तशीही ती मुकाबला करू शकली नसती.

बास आज हा खेळ कायमचा संपवायला हवा. त्या बईने खूप प्रयत्न केले मला मारायचे, पण आता नाही.

प्रिया मरत होती. श्वासा-श्वासासाठी झगडत होती. आणि त्याक्षणी पाहत होती.... रेहानच्या डोळ्यातला शुध्द वेडेपणा... पागल....


Himscool
Monday, December 11, 2006 - 7:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी प्रेम कथेत एकदम हिंसा...
एखादी मालिका बघताना कसे दिग्दर्शक योग्य जागी भाग थांबवतात आणि प्रेक्षकांना पुढचा भाग पहायला भाग पाडतात तसे प्रत्येक वेळेस कथेचा भाग लिहिल्यावर वाचणार्‍यांची उत्सुकता कशी ताणली जाईल व ते पुढचा भाग नक्कि वाचतील ह्याची पूरेपूर काळजी घेतली आहेस


Manishalimaye
Tuesday, December 12, 2006 - 2:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लगे रहो..... छान लिहित्येस! उत्सुकता चाळवणारे वगैरे. पुढचं लिही बरं आता पटपट!

Jhuluuk
Tuesday, December 12, 2006 - 2:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला कळले नाही, प्रिया केव्हा चाकु घेउन उभी होती?

(मला smileys कसे टाकायचे ते कुणी सागेंल का? clip-art ची लिंक द्याना)


Abhijat
Tuesday, December 12, 2006 - 5:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>> रेहानला आता थोडा धीर आला. तशी तिच्या हातातला चाकूपाहून भिती वाटली पण तो काकडीसाठी हे कळल्यावर तो जरा हुशारला.

सापडला का चाकू आणि तो प्रियाच्या हातात कधी होता ते?





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators