Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 08, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » माघ » कथा कादंबरी » Friend » Archive through December 08, 2006 « Previous Next »

Nandini2911
Thursday, December 07, 2006 - 3:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हरामी साला भ****
ती पुटपुटली...
क्या?
तो उडाला.. तीन ताड.
ती.. प्रिया कुलकर्णी. तो रेहान खान..
स्थळ अकरावीचा वर्ग आणि वेळ्: गणिताच्या तासाची.
देशपान्डे सर unit test चे पेपर वाटत होते. पहिलीच test बहुतेकजण उडालेच होते.. तिचा नम्बर आला..
"या, कुलकर्णीबाई.. दिवे लावले आहेत. दिवसभर उनाडत फ़िरता.. वर्गात बसायला नको. घ्या पेपर."
ती शान्तपणे उठली.. नाकावरचा चष्मा वर केला आणि जाऊन पेपर आणला.. किती मार्क्स पडले हे सर बोलले नाहीत.. तिने शान्तपणे पाहिले.. पन्नासपैकी एकेचाळीस होते Not Bad .. ती शेवटच्या बेन्चवर येऊन बसली..

वर्गात तिच्या बाजुला कुणीच बसायला तयार नसायचे.. हे रेहानला एव्हाना समजलं होतं. पण आज नाइलाज होता. एक तर त्याची late admission होती.. त्यात लेक्चरला उशीर झालेला.. आला देशपाड़एनी "उगवलात का युवराज" हे ऐकायला मिळाले. पटकन पाठी जाऊन बसला.. तिच्याच बेँचवर..
पेपर घेऊन आली आणि सराचा सत्कारसमारंभ सुरू झाला होता.. अर्थात हळू आवाजात.. this was reaaly surprising for him एकतर या गावात सगळ्या मुली म्हणजे एकता कपूरच्या सिरियल सारख्या सज्जनतेचा परिपाक.. देहरादूनच्या boarding मधे त्याचे शिक्षण... तिथल सगळेच वेगळे होते. त्यात ही मुलगी म्हणजे एक अजब रसायन होतं.
काय भान्गड आहे ती त्याला ही माहित नव्हतं. पण मुलगी होती एकदम ग्रेट.


Abhijat
Thursday, December 07, 2006 - 3:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इन्टरेस्टिंग! पण इन्टरेस्ट टिकून रहाण्यासाठी पुढची पोस्टिंग्ज लौकर येणार का अशी शंका वाटते या महिन्यातल्या बाकीच्या कथांकडे बघून!

Jhuluuk
Thursday, December 07, 2006 - 3:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो ना, मला पण असे वाटु लागले आहे.
असो.
नंदिनी तु तरी लवकर लवकर पुर्ण करशील अशी आशा आहे.
रेहान वाचुन अगदी 'फ़ना' ची आठवण झाली. :-)


Rupali_rahul
Thursday, December 07, 2006 - 4:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी, सुरुवात छान पण पटपट लिहि बघु...

Nandini2911
Thursday, December 07, 2006 - 5:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद पहिलाच प्रयत्न आहे.. गोड मानून घ्यावा

Nandini2911
Thursday, December 07, 2006 - 7:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गावातलं एकदम बुजुर्ग व्यक्तिमत्व म्हणजे खानचाचा.. त्यानी सुरू केलेला कापडाचा व्यपार त्याच्या मुलानी परदेशात नेला. तीनही मुलगे कर्तुत्ववान निघाले. रेहान हे मोठ्याचे शेंडेफ़ळ. हातात पैसा असल्यावर मुलान्चं जे होतं तेच याचही झालेलं. खरं खोटं कुणालाही माहीत नव्हतं.पण गावात चर्चा होती की खानचा हा लाडका नातू बारावी नापास होता. आणि "बाहेरच्या" नादाला लागला होता.

खानाचाचानी बिझिनेस मुलाकडे केव्हाच सोपवला होता. त्यामुळे बरेचसे दिवस त्याचा मुक्काम गावात असायचा. सध्या त्यानी नारळी पोफ़ळीच्या बागेत लक्ष घालायला सुरुवात केली होती. मात्र अचानक त्यानी रेहानला इथल्या कॉलेजात घातलं. आणि कधीही विशेष काही न घडणार्या गावात चर्चेला ऊत आला. तो वीस वर्षाचा मुलगा जणू एखादा हिरोच्याच प्रसिद्धीला जाऊन पोचला. त्यातच रेहानसाठी त्याची दादी मुलगी बघतेय असं अशी बातमी फ़ुटली आणि मग तर विचारूच नका. आणि हे सगळे कॉलेजात जॉईन व्हायच्या आधी.....
कॉलेजात सगळ्या मुली आपल्याकडे चोरून पाहतात याची त्याला गम्मता वाटायची. चुकुन एखादिला हाय म्हटले तर त्यात लाजण्यासारखे काय आहे हे त्याला अजूनतरी समजलं नव्हतं.

एकतर सगळ्या मुली हिन्दी फ़िल्म हीरॉईन प्रमाणे गरज नसतानाही मुरकायच्या. त्यात मुलगे मुलीशी बोलत नसतात हेही त्याला पहिल्यादाच समजलं. लायब्ररी मधे केंटीनमधे gents & ladies सेक्शन वेगळं पाहून त्याची छान करमणूक झाली होती.

मात्र या सगळ्या प्रिया हे एक गूढ होतं. तिच्याशी जास्त कोणी बोलत नाही हे तर कळलं होतं पण का ते माहित नव्हतं. सावळा वर्ण, लाम्ब केस आणि अत्यन्त सडपातळ. नाकवर घसरणारा चष्मा.. पाहताक्षणी हे ध्यान बावळट आहे याची पूर्ण कल्पना यायची. पण आज या बावळटाच्या तोंडुन हे असं बोलणं?
खरं तर त्याला प्रश्न पडला..की एवढे चांगले मार्क्स असूनही सर तिला असं का म्हणाले There must be some reason



Himscool
Thursday, December 07, 2006 - 7:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गुड... एका दिवशी कथेचे दोन भाग.. म्हणजे बाकीच्या कथांच्या वळणावर कथा जायचे चान्सेस जरा कमी झाल्या सारखे वाटत आहेत

Lampan
Thursday, December 07, 2006 - 9:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुरुवात आकर्षक भासते ....

Nandini2911
Friday, December 08, 2006 - 1:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लेक्चर चालू झालं. अर्थात तिचं लक्ष नव्हतं आणि त्याचंही. तिनं त्याच्याकडं पाहिलं आणि हसली. एखाद्या लहान मुलाकडं पाहून हसावं तसं. निरागसपणे.
का कोणास ठाऊक रेहानला तिला काहीतरी विचारावंसं वाटत होतं. पण काय विचारावं तेच समजत नव्हतं. तसं आवडलेल्या मुलीला तो your place or mine हे पहिलंच वाक्य फ़ेकू शकत होता.. पण प्रिया..

तिनं पेपर शान्तपणे बेगेत घातला. देशपांडे integration समजावत होता. ती उठली. आणि लेक्चर चालू असताना चक्क वर्गाबाहेर पडली. shocking . रेहान बघतच राहिला. ती वर्गाबाहेर गेली तशी देशपांडेची टकळि सुरू झाली.. काय बोलला ते रेहानला जास्त समजलं नाही. तेवढं मराठी clear नव्हतं ना!

पण काहीतरी प्रियाच्या सन्दर्भात होतं. आणि मुलं हसत होती याचा अर्थ तिची निन्दा चालू असणार. अन्दाज बान्धायला काय जातय? मुळात ज्या कॉलेजातल्या मुली आणि बरीचशी मुलं सुद्धा लेक्चर बंक करणे हीनपणाचं मानत होते तिथे ही पोरगी उठून बाहेर जाते. अख्खं लेक्चरभर त्याच्या मनात हाच विचार चालू होता.
शेवटी एकदाचं लेक्चर संपलं. तो वर्गाबाहेर आला. आता फ़िजिक्स ऐकणं was too much for him तो अकरावी पास झाला होता तरी दादाजीनी त्याला मुद्दाम परत बसवलं होतं. एकदा करायला कंटाळा येतो तर परत चार वर्षानी कोण ते परत रखडणार.

सध्या मात्र त्याला प्रियाला भेटायचं होतं, या शहरात जिथे त्याला दोन चार मित्र मिळणं अवघड झालं होतं तिथे ही बिनधास्त फ़टाकडी भेटली होती. त्यानं अख्खं कॉलेज शोधलं. ती कुठेच दिसली नाही. हे सगळं इतक्या अचानक घडलं ना की त्याला वाटलं आपण स्वप्नातच आहोत. आज आपण कसलीही नशा केली नाही याची त्याने मनोमन खात्री केली.
रेहानने स्वत:चीच समजूत घातली.
बहुतेक आपण स्वप्नातच असू.




Maku
Friday, December 08, 2006 - 3:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला कोनी मदत करू शकेल का...
मला पन कथा लिहय्ची आहे... पन ति कुथे जाउन लिहायची ते मला कोनी तरी सानगता का ....
plzzzz
mi star new thread madhe jaun type kele tari pan yeth nahi aahe ....

Nandini2911
Friday, December 08, 2006 - 3:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

U have started a new thread, but write in the message box. click on Devnagari, you will get a new window for typing.

Jhuluuk
Friday, December 08, 2006 - 4:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hi नंदिनी, ३ पोस्ट्स..
going good !!
छान वाटतेय सुरुवात


Maku
Friday, December 08, 2006 - 4:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नवरा

माज़ा नवरा ........

माज़्या नवरा बद्दल काय सन्गू...

आसे कहितरि येत आहे ..

Maku
Friday, December 08, 2006 - 4:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hi Nandini मी खुप try केला. पन होत नहीये.
plzz help mee ..

Paresh_joshi
Friday, December 08, 2006 - 5:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खुपच छान नन्दिनी सस्पेंस चांगला आहे. लवकर पुढचे लिही.

Nandini2911
Friday, December 08, 2006 - 6:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"रे उठ ना सकाळची आठ वाजले. बाबा काय लडका आहे?"
रेहान डोळे चोळत उठला. खरं तर त्याला स्वप्नातून बाहेर पडावंसंच वाटत नव्हतं. गेली दहा वर्षं हेच स्वप्न तो जगत आला होता.
त्याने डोळे किलकिले करून पाहिलं. प्रिया नुकतीच न्हाउन आली होती. पाठीवर मोकळे सोडलेले तेच केस तोच कमनीय बान्धा तीच भेदक नज़र.. हीच का ती प्रिया? शोधणं कठीण नाही..
"नीन्द आ रही है.." त्याने परत चादर तोंडावर घेतली. प्रिया गर्र्कन पाठी वळली. "बैला उठतोस का घालू कमरेत लाथ?" तिने चिडून विचारलं. पण रेहान काही आता अकरावीच्या वर्गात बसला नव्हता तिच्या शिव्यानी बिचकायला. बरोबर हीच ती प्रिया..
तिने त्याच्या तोंडावरची चादर खेचली. "झोपेचं सोंग बरं जमतं रे तुला?"
"अजूनही बरच कही चांगलं जमतं मला" त्याने डोळे मिटूनच उत्तर दिलं,
"अच्छा, तो फ़िर जरा breakfast बनाके दिखाना"
"प्रिया,तुला काय मजा येते माझं स्वप्न दरवेळेला तोडायला सोने दो और थोडी देर"
प्रिया आता मात्र मनापासून चिडली. तिला सकाळी साडेपाचला उठायची सवय आणि हे महाराज मात्र सकाळी दहाला साखरझोपेत!
"रे उठ ना प्लिज"
तो अंथरूणात उठून बसला. "प्रिया मी कसम खाल्लि आहे ..."
"की सकाळी लवकर उठणार नाही. अरे पण कमीतकमी सकाळी उठ. हे काय दुपारपर्यन्त झोपणं"
त्याचे वाक्य पूर्ण न करू देता ती म्हणाली
" Ok I give up, now make a cup of coffee for me "
ती परत हसली.. तेच लहान मुलवाले smile
"सकाळी कॉफ़ी?"
तिच्या प्रश्न्नातला मिस्किलपणा त्याला समजला. पण त्याने उत्तर द्यायचं टाळलं. त्याने तिचा हात हातात घेतला. तिच्या डोळ्यात त्याने पाहिल
"आज रह जाओ यही पे"
प्रियाने हात सोडवून घेतला. या विनवणीची तिला सवय झाली होती.
तिचं काही न बोलणं त्याला त्रास देत होतं. पण ती थाम्बली नसती. तशी जायची घाई नव्हती. पण तरी ती गेली असती. त्याची पर्वा न करता. त्या दिवशी वर्गातून गेली तशीच.


Paresh_joshi
Friday, December 08, 2006 - 6:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खुपच छान म्हणजे सगळ स्वप्नच का शेवटी?

Nandini2911
Friday, December 08, 2006 - 8:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अख्खं कॉलेज धुंडाळून सुद्धा ती त्याला दिसली नाही. शेवटी त्याने असिफ़ला विचारलं. "यार तुझे प्रिया पता है?"
असिफ़ कॉलेजचं वर्तमानपत्र होता. "कौनसी प्रिया? यहापे सात प्रिया है और उनमे से एकभी तुम्हारी category की नही है" असिफ़ने शान्तपणे सिगरेट सुलगावत सांगितलं.
"असिफ़, मे कोई girl frined नही ढुढ रहा हू. I just want to talk to her. Priya Kulkarni " रेहानने सांगितलं. "क्या?" आता असिफ़ उडाला.
"रेहान, मेरी बात मान, वो लडकी पागल है. उसके पागलपन के किस्से सबको पता है."
"मतलब?" आता मात्र रेहानची उत्सुकता ताणली गेली. बावळट आहे हे कळलं होतच पण पागल?
"रेहान, मतलब ये के वो पागल है."
"असिफ़, बात को ऐसे घुमा मत. साफ़ बता"
आता असिफ़ रंगात आला. त्याची Q&A ची स्टाईल होती.
"रेहान, मुझे बता ये लडकीको देखके क्या लगता है? LEts say Financial Condition "
रेहानने जरा मेमरीवर जोर दिला. तिचे ड्रेस तर एकदम सिम्पल होते. रोज एकच चप्पल असायची. म्हणजे घरची परिस्थिती बेताची असावी. रेहान काही बोलणार तेवढ्यात असिफ़ला परत सूर सापड्ला. " middle class लगती है ना.. रेहान ये लडकी का बाप लाखो का मालिक है. ये अकेली बेटी है. सुना है के बहोत होशियार है, एकदम scholar पर पिछले साल घरसे भाग गयी थी. बाप पकडके वापस लेके आया. लेकीन क्युन भागी थी किसिको नही पता."
आता मात्र रेहानला मजा वाटली. अवघी चाळीस किलो वजनाची, चष्म्यावरच्या नाकाचं वजन नाही पैलवत अणि चक्क पळून जाते. त्याला आठवलं त्याक्ने घरातून पळून जण्यासाठी किती प्लान्स केले होते. पण पळाला मात्र एकदाही नाही. मग हिने असं का करावं?
"रेहान, आज भी अगर कोई उससे अच्छेसे बात करता है ना तो ये लडकी मुह फ़िराके चल देतीहै. पुरे गाव मे किसिसे नही बात करती. भूल जा उसकी बात. बीअर मारेगा?"

त्या दिवशी तो विषय त असाच राहिला. नन्तर तो विसरूनही गेला की आपल्या वर्गात एक अशी मुलगी आहे, ती लेक्चरला आली नाही आणि तसा तो तरी कुठे regular होता.

असच एके दिवशी बाईकवरून भटकत होता. रात्रीचे दहा साडेदहा झाले असतील. रस्ता सुनसान होता. त्याने गाडी आडवळणाने घातली. सगळे याला भुताचा माळ म्हणयचे. पण ज्याचा देवावर विश्वास नाही. त्याचा भुतावर काय डोम्बल असणार. इथे आल्यापासून हा एक त्याचा favourite spot होता. मस्त स्ट्रीट लाईट्स होते आणि शान्तता होती. छान वाटायचं इथं आल्यावर शाळेत असतानापण तो असाच एका टेकडीवर जायचा. एकटाच. आणि ऐकाय्चा खामोशी की आवाज. त्याने बाईक स्टेंडवर लावली. थोड्या अन्तरावर कुणीतरी आहे असं त्याला वाटलं. तो पुढे चाल गेला. ती बसली होती. प्रिया....
आणि तिच्या पुढ्यात होतं एक अर्धवट चित्र. तिचा हात रंगाने माखला होता. लाम्बसडक केस पाठवर मोकळॅ होते, त्यातले थोडेसे हवेने उडतहोते. पण तिला भानच नव्हतं. चान्दण्याखाली पाठमोरी बसलेली ती स्वत्: एक चित्र वाटत होती.
तिला बहुतेक चाहुल लागली असावी. तिने पाठी वळून पाहिलं.
"आज लवकर आलास?" तिने घड्याळाकडे पाहत विचारले.
"जी?" तो भाम्बावला.
परत ती हसली. चान्दण्यात सुद्ध त्याला तिच्यागालावरची खळी दिसली.
"जल्दी आ गये. रोज तो बारा बजे आते हो."
हिला आपलं टाइम टेबल कसं काय माहित?
तिने तिचं रंगाचं सामान आवरायला सुरुवात केली.
"हाय i am rehan " त्याला बोलायला काहिच सुचत नव्हतं,
i know माझ्य्यच class मधे आहेस ना?
बर बाय. एवढं बोलून ती चालायला लागली.
wait, can i drop u? how u will go?
खरं तर त्यालातिचं घर कुठे आहे ते बघायचं होतं. पण त्याला पूर्ण खात्री होती की ती नाही म्हणेल.
थीक आहे ती म्हणाली. if ur shedule permits


Lampan
Friday, December 08, 2006 - 9:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिया कुलकर्णीवर फ़िदा ...
dyanmic and unpredictable ... और अपनी मस्ती मे जीनेवाली ..

Chinnu
Friday, December 08, 2006 - 9:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी, मस्त चाललिये कथा!




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators