गावकडच्या गोष्टी. गोष्ट्: १ गुलाल अरमानच्या अंगावरचा
|
कोणाच्या घरचं लग्न असो अगर गणेश विसर्जनाची मिरवणूक, अरमानच्या ताशाने गाव दणदणते. त्याच्या ताशाच्या तालावर नाचणार्यांना चेव चढतो. मग अरमान अंगात आल्यागत ताशा पिटू लागतो. गुलाल उधळला जातो. तो अरमानच्या अंगावरही पडतो. घामाघूम झालेल्या अरमानच्या अंगावरुन गुलाल निथळतो. अरमानला भान नसते भान हरपलेला अरमान गुलालाने न्हाऊन निंघतो. (क्रमश
|
अरमान मुसलमान आहे.... मुसलमानांना गुलाल वर्ज्य असते म्हणे. अरमान ते जाणतो पण कुछ नही होता हो! हमारे लोग बी बोलते है. असं त्याचं उत्तर असतं. गावातल्या गुलालात न्हाऊन निघालेला अरमान पाहिला की मशिदीवर गुलाल पडल्याने शहरात उसळणार्या दंगलींची आठवण होते. कोणत्याहि धार्मिक कार्यक्रमानिमित्त निघालेल्या मिरवणुकीत गुलाल उधळला गेला आणि तो चुकून मशिदीवर पडला की मुस्लिम मोहल्ला पेटून उठतो. काल एका कपात चहा पिणारे हिंदू-मुस्लिम दोस्त आज वैरी होतात. माथी भडकतात. एकमेकाचा जीव घेण्यासाठी सरसावतात. अरमानच्या अंगावर गुलाल पडल्याने फ़ोड उठलेले गावाने कधी पाहिले नाहीत. पण शहराच्या मशिदीतून तर आगिचे लोळच बाहेर पडतात. ईस्लाम खतरे मे ची आवई उठवली जाते. मशिदीजवळून ताशा तडतडू लागला की मुसलमानांची नसही तडकते. त्यांना गुलालाचे वावडे. अरमानच्या अंगावर गुलाल पडला की त्याच्या अंगात येते. त्याच्या चेहर्यावर हासू फुटते. भान हरपून ताशा वाजवतांना ताशा फुटेल याचे भान त्याला रहात नाही.
|
नाचणार्यांसोबत तो एकरुप होतो. वाजवता वाजवता नाचतो. त्याचे ते मिरवणुकितील तल्लिन होणं आणि मशिदीतील्या मुसलमानांनी भडकणं हा भेद कुठे जन्माला आला? गावाला शहरची लागण झाली नव्हती तेव्हा अरमानचाच वाजा वाजायचा. त्याचा ताशा वाजायला लागला म्हणजे गावात काही तरी मन्गल कार्य आहे हे गावभर समजायचं. कोणाचं जाऊळ असो अगर लगीन अरमानच्या ताशाने गावात चैतन्य यायचं. अलिकडे गावात कोणाची शेंडी कापायचा कार्यक्रम असला तरी हजार रुपये खर्चून बन्ड लागतो. लग्नातही बन्डशिवाय पोरांचे पाय थिरकत नाहीत. त्यामुळे अरमानचा वाजा दुय्यम झालाय. त्याला आता वाजवायची सुपारी येत नाही.
|
अजून गोष्टी येऊ द्या!
|
Chinnu
| |
| Tuesday, December 05, 2006 - 5:55 pm: |
| 
|
चिंतुभाउ, छान चाललय. येऊ द्या पुढे.
|
त्यामुळे अरमानला आता मोलमजुरी करावी लागते. या धंद्यात दम नाही म्हणून त्याची पोरंही लहानपणापासून सालदारी करु लागली आहेत. पाच वर्षापूवी'ची गोष्ट तेव्हा अरमान आमच्या गाई चारायचा. गुरांची संख्या वाढली तसं वैरण पुरेना म्हणून गायी-वासरं सातपुड्यात पाठवावित या मतावर आम्ही आलो. गुरं नेण्यासाठी भावाने उमर्टीहून माणूस पाठवला. अरमान वर्ष झालं ती गुरं च्रीत होता. त्या गुराढोरांवर त्याचा भारी जीव. ती सातपुड्याच्या वाटेला लावली तेव्हा मोठ्या गाईच्या गळ्यात पडून तो ढसढसा रडला. माझी लेकरच तुम्ही पहाडात पाठवताहात अशी खंत त्याने आईजवळ व्यक्त केली. अरमानचं ते रुप पाहून माझ्या काळ्जात कालवाकालव झाली. त्यानंतर त्याने कोणाची गुरं चारली नाहीत. मंगलकार्यात लोकांना आता ब्यांडंच हवा. त्यामुळे त्याचा ताशा आता अडगळीत पडला. मग त्याने गाव सोडायचा निर्णय घेतला. तो आता सुरतला गेलाय. तिथे भंगार गोळा करायचे आणि विकायचा धंदा सुरू केला. त्यात त्याचा चांगलाच जम बसलाय. रोजगारानिमित्ताने त्याला गाव सोडावे लागले असले तरी आजही गावच्या जत्रेला तो सहकुटुंब येतो. तेव्हा त्याला ना धर्म आडवा येत ना प्रथा. अरमान गावाशी एकरुप झालाय. त्यामुळेच तो गावचा झालाय. परकेपणाला थाराच जेथे उरला नाही, तिथे अंगावर गुलाल पडो अगर चिखल त्याची परवा कोणाला? अरमानला तर मुळीच नाही. ज्या गावाने भरभरून प्रेम दिले त्या गावचा गुलाल तो सहर्ष अंगावर घेतो. त्यावेळी मशिदीवर गुलाल पडल्याने पेटलेल्या शहराच्या वस्त्या नजरेसमोर उभ्या राहतात. गुलाल एकच होता; अरमानच्या अंगावरचा आणि मशिदीवरचाही....... (समाप्त)
|
Jhuluuk
| |
| Wednesday, December 06, 2006 - 3:13 am: |
| 
|
सुंदर कथा.. अजुन येउ द्यात. फक्त एक request आहे. २-३ छोट्या छोट्या परिच्छेदांपेक्षा एक सलग मोठा लिहा
|
Lopamudraa
| |
| Wednesday, December 06, 2006 - 4:57 am: |
| 
|
खुप सुंदर जमताएय कथा. मला भुसावळच्या गणपती मिरवणुकीनंतर जे रस्ते धुवुन काढावे लागतात तहसिलदाराला ते आठवलेऽजुन detail मध्ये इथे त्याच्या काही गोष्टी मला लिहायचा मोह होतोय पण वेळेचा प्रश्न आहे. पुन्हा कधीतरी.
|
Asami
| |
| Wednesday, December 06, 2006 - 11:42 am: |
| 
|
first class रे एकदम
|
Robeenhood
| |
| Wednesday, December 06, 2006 - 1:11 pm: |
| 
|
चिन्तामण, एकदम सुरेख, मला माझ्या गावातल्या ताशावाल्या शिलेमान आताराची(सुलेमानचा गावठी अपभ्रंश)आठवण झाली. ही कथा V&C च्या बी बी वरील आग्यावेताळानी पाहिली तर तुझी सुन्ता झालीय का असे विचारतील. बरे झाले ते इथे येत नाहीत.[लोपे इथे लपून बसलीस काय? तिकडे अहिराणीच्या बी बी वर कोण येणार? अन तुझा ई मेल आय डी हा जगातला भन्नाट प्रकार आहे अन याहू मेसेन्जर तर त्याहूनही! ] }
|
Kedarjoshi
| |
| Wednesday, December 06, 2006 - 1:38 pm: |
| 
|
अरे सही पाटील भाउ. आमच्या अखील कैलास नगर गणेश मंडळाचा माझ्या नंतर होनारा अध्यक्ष मुसलमान सरवर मूजीब होता व ते ही नांदेंड सारख्या संवेदनशिल ठिकानी.
|
Peshawa
| |
| Wednesday, December 06, 2006 - 5:27 pm: |
| 
|
सुंदर... बर्याच गावतून जेंव्हा छबिने निघतात तेंव्हा गावच्या मुसलमानाचे पण मान असतात... चु.भु.द्या.घ्या.
|
Bee
| |
| Wednesday, December 06, 2006 - 9:47 pm: |
| 
|
शेवट खूपच छान आहे ह्या कथेचा.
|
चिन्तामण फ़ारच संवेदनशिल ह्रुदयाला लागेल अशि गोष्ट.. यावरुन माझा भाउ आम्च्या गावाचा सरपंच आहे त्याचे वाक्य आठवते.. माझ्याकडे फ़क्त एकच धर्म आहे व तो म्हणजे माणुसकि
|
Meenu
| |
| Thursday, December 07, 2006 - 12:59 am: |
| 
|
वा मस्त लिहीलत ..
|
चिंतामण नाना, लहि भारि. येऊ द्या कि अजुन, तुम्च्या सवडिने.........
|
Saee
| |
| Thursday, December 07, 2006 - 2:43 am: |
| 
|
सुरेख. गोष्ट क्र. २ कधी?
|
Ramani
| |
| Thursday, December 07, 2006 - 11:41 am: |
| 
|
खरोखरच स्पर्शुन जाणरि कथा. अजुन येउ द्यात.
|
Seema_
| |
| Thursday, December 07, 2006 - 11:45 am: |
| 
|
सुंदर लिहिलय . आवडल एकदम .
|