Ldhule
| |
| Thursday, December 07, 2006 - 12:03 pm: |
| 
|
गोष्ट क्र. 1 सुरेख. गोष्ट क्र. 2 लवकर येवुदेत.
|
मित्रहो ह्या कथेचा भावार्थ काढायचा झाल्यास, मी पण विसरता आले तर कुठेही प्रेमाचा झरा झुळुझुळू वाहू लागतो. शेतीतून भरघोस पीक काढायचे झाल्यास मातीत माती व्हावे लागते. भारतातील मुसलमान येथल्या संस्क्रुतीशी एकरुप झाले तर सध्याचे सगळे वाद संपतील. दुसरी कथा लवकरच. नमस्कार.
|
अहो रॉबीन हे V&C चे आग्यावेताळ काय भानगळ आहे. जरा सविस्तर सांगाल काय? }
|
Deemdu
| |
| Friday, December 08, 2006 - 1:07 am: |
| 
|
वा रे चिंतामण सहीच मांडलयस.
|
छान गोष्ट आहे हो चिंतामणपाटील.
|
छान जमलीय गोष्ट! जे सांगायचे होते, समजावयाचे होते ते मनाला जाउन भिडते. लिहित रहा.
|
चिंतामणराव, छान लिहीलंय तुम्ही.
|
Avdhut
| |
| Friday, December 08, 2006 - 2:25 pm: |
| 
|
पाटील छान लिहिलेय. बस हीच आशा की मुसलमानांन मधे अश्या अरमान ची संख्या वाढावी.
|
Savani
| |
| Friday, December 08, 2006 - 2:47 pm: |
| 
|
चिंतामण, छान आहे गोष्ट.
|
आमच्या कोकणातही काही पालख्याना मुसलमानांचा मान आसतो. हे लोक ४ दिवस सेवेकरी असतात!
|
गावाकडची गोष्ट २ लगीन .......तेव्हा ती गोठ्यातच गोवर्या थापीत होती. पाव्हणे आल्याचं कळलं तशी कावरीबावरी होऊन पोरीनं गोवर्या थांबवलं. धुतलेले हात परकराला पुशीत पोरगी घराकडे परतली. लहानी बहीण मोठ्या कौतुकाने तिच्याकडे टक लावून पहात होती. आपल्या ताईच्याबाबतीत काहीतरी नवलाईचं घडतय याचं कुतूहल तिच्या चेहेर्यावर दिसत होतं ताई नि ती, दोघी मागच्या दारानं घरात गेल्या. चुलीत घातलेल्या लाकडामुळे घरभर धूर भरलेला. पोरीची आई चुल्हा फुकीत, डोळे-नाक पुशीत बसलेली. चुलीवर चहाच पातेलं ठेवलेलं. पोरी घरात आल्याबरोबर (क्रमश (kramash
|
Laalbhai
| |
| Monday, December 11, 2006 - 5:53 am: |
| 
|
पाटिल, चांगले लिहिले आहेत.
|
पोरी घरात आल्याबरोबर धुरामुळे डबडबलेल्या आईच्या डोळ्यातही आनंदाचे हसू चमकले. चहाच्या पातेल्यात पाणी, चहापावडर टाकता टाकता पोरींची आई मुलीला लुगडं नेसायला सांगते. एवढ्यात शेजारची काकू घरात येवून दाखल होते. पाव्हणे आल्याची वार्ता तिच्या कानावर पोहोचलेलीच असते. ती पोरीला लुगड नेसायला मदत करते. तोवर चहा तयार होतो. रामजी दाराआडून बायकोवर खेकसून चहा झाला का? विचारतो. पोरीला चहा घेऊन पाठव असे सांगून तो पुन्हा पाव्हण्यांकडे वळतो. गरीब रामजीकडे घरात धड कपबशा नाहीत. म्हणून मग शेजरच्यांकडून पव्हण्यापुरत्या कपबशा येतात. पोरीला नेसायला शेजारच्याच काकूच लुगडं येत. त्या काकूच लुगड तिला सावरत येत नाही. पण रामजी नी त्याची बायको आपल्या पोरीला लुगड्यात पहून हरखून जातात. लुगडं साव्रीत, थरथरत्या हातात कपबशा घेऊन पोरगी पाव्हण्यांसमोर येऊन उभी राहते. चहापाणी झाल्यावर पाव्हणे पोरीला दोनचार आडवेतिडवे प्रश्न विचारतात. घाबर्गुंडी उडालेली पोरगी हलक्या आवाजात कसेबसे उत्तरे देते. पोरीच्या हातात पाव्हणे दहा-पाच रुपयांची दक्शिणा कोंबतात. पाव्हण्यात एक पोरगही असतो. त्याच मुलासाठी पाव्हणे रामजीची पोरगी पसंत करायला आलेले असतात. पोरचं वय असतं सतरा नि पोरीचं असत तेरा. दहावी नापास, धोरं चारणार्या पोराल रामजीनं आपली सातवी पास, कोवळी, अल्पवईन पोरगी देण्याचं पक्क केलं होतं. गावात आपल्या पोरीच्या वयाच्या पोरींची लग्ने उरकली होती. त्याचा घोर त्यच्या जिवाला लागला होता. आठरा वर्षाच्या आत पोरीचं लग्न म्हणजे गुन्हा, हे माहीत असूनही रामजीनं आपल्या कोवळ्या पोरीला ऊजवायच ठरवलं होत. त्यासाठी त्याला दोन बिघे जमीन विकावं लागलं. आणखी दोन यत्ता शिकाव्यात ही पोरीची ईच्छ. पण ती रामजीन मारून टाकली. गल्लीतल्या आपल्या मैत्रिंन्मध्ये कडब्याच्या काडीला लाल पिवळ्या चिंध्या बांधून नवरा-नवरीचा खेळ खेळणार्या पोरीच्या अंगावर आज हळद चढत होती. खेळायच्या वयात पोरगी मयबापाला सोडून सासरी जाणार होती. जे चाललय ते तिचा पचनी पडत नव्हत. बावरलेल्या वासरासारखी पोरगी कावरीबावरी होऊन मय नि बापाकडे पहात होती. ना नवर्या मुलाचं लग्नाच वय होतं ना मुलीचं (क्रमश
|
आईशप्पथ.. डोळ्यात पाणी आलं, आज या शतकात सुद्धा अशा घटना घडतात हे माहित असूनसुद्धा... पाटिल.. मस्तच लिहिताय तुम्ही...
|
चिंतामन नाना, खरच मस्त लिहितात तुम्हि, अगदि डोळ्या समोर चित्र उभं राहत........
|
काल परवापर्यंत वार्याबरोबर वारा होणारी झुल्यावर बसून झुला होणारी, फुलांच्या वेलीवर फुल होऊन सुगन्ध देणारी. या फुलावरून त्या फुलावर फुलपाखरू होऊन बागडणार्या कोवळ्या पोरीला आता संसाराच्या रामरगाड्यात जुपलं जाणार होतं. सगळे सोपस्कार झाले लग्न लागलं रामजीनं आपल्या कोवळ्या पोरीच्या पदराची गाठ नवर्या मुलाच्या उपरण्याला बांअध्ली. आपल्या पाडसाला आपन शिकार्याच्या हवाली करतोय ह्याची पुसट भावना त्याला शिवून गेली. मान खाली घालून पोरगी आसवे ढाळीत ऊभा होती. घरादारात बागडणारी आपली पोरगी आता आपलं घर सुनं सुनं करुन जाणार हे सत्य रामजीला नि त्याच्या बायकोला असह्य करीत होतं. आजपासून पोरगी आपल्याला परकी होणार म्हणून रामजीच्या डोळ्यातून आसवे ओघळत होती. तरी पोरीचं लगीन ऊरकल्याच समाधान त्या बापाच्या चेहर्यावर दिसत होतं. पण हा बाप हे सपशेल विसरला होता की, आपल्या पोरीला आता कुठे तेरावं सरून चौदावं लागलं होतं....!
|
समाप्त..........! समाप्त समाप्त समाप्त समाप्त समाप्त समाप्त समाप्त !!!!!!!!!!!!
|
मस्त रे भो.. आजही हे घडत आणी शहर आणि खेडं even तालुका आणि पुणे मुम्बई यात आजही खुप फ़रक आहे हे मी खुपदा सांगितलय.. पण जे कधी पाहिलेच नाही त्यावर तरी विश्वास कसा बसणार.
|
Jhuluuk
| |
| Friday, December 15, 2006 - 6:29 am: |
| 
|
सहीच, अजुन details पण आवडतिल. गोष्ट क्र. ३ रुपातील पण आवडेल. छान लिहित आहात.
|
Srk
| |
| Monday, December 18, 2006 - 6:16 am: |
| 
|
पाटील,झ्याक चालल व्हत की. थांबताइसा कशापाइ? अजुन लै गोष्टी हाइत. जत्रा हाय झालच त उत्सव हाय, शेती,जमीनदारी,मरिआय. चला फुडे थांबु नगासा. होउन जाउ देत.
|
बरं मंडळी लवकर सुरु करतो.
|
Radhe
| |
| Thursday, December 21, 2006 - 4:16 am: |
| 
|
पाटील साहेब तुमंच लिखानं लई चांगल बघा. वाचता बरूबर माज़्या मनाने गावाकडं धाव घेतली. लईच बेसं हाय माज़ा गाव. पण त्या गावाची मांड्णी करनारा तुमच्या सारखा लेखक नाही हो आमच्याकडे.
|
राधे त्या गावाकडे तु बोलतेय की बोलतोय?? तशी भाषा नाही कोणी बोलत... एव्हढ नक्कि की तुम्ही जळागवचे नाहित.!!! पाटील पुढची गोष्ट येउ द्या..
|
Radhe
| |
| Saturday, December 23, 2006 - 7:40 am: |
| 
|
लोपमुद्रा मी मुळ्चा जळगावचाच. चिंतामन पाटीलसाहेंबांसोबत काम करतो. तरुण भारत पेपरमध्ये आहोत.
|