Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 05, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » मार्गशीर्ष » कथा कादंबरी » आम्हा तिघींची कथा » Archive through December 05, 2006 « Previous Next »

Krups
Tuesday, November 28, 2006 - 8:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रद्धा एकदम सही. जास्त वेळ वाट नको ग पहायला लावूस. :-(

Maku
Tuesday, November 28, 2006 - 11:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान लिह्त आहे . पुधाचे लवकर लिहि.
लिहियला खुप वेल लाऊ नकोस.

Madhurag
Wednesday, November 29, 2006 - 11:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रद्धा सहीच लिहीते आहेस. पुढचा भाग लवकर टाक

Ramani
Thursday, November 30, 2006 - 5:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रद्धा, अहो कुठे गायब झालात इतकी रन्गलेली कथा सोडुन?? आम्ही वाट बघतोय इथे. पुढचे येउ द्यात की.
कुणी तरी मला अनुस्वार कसा द्यायचा ते सान्गेल काय?


Zakasrao
Thursday, November 30, 2006 - 6:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रमनी
ra.ngane रंगणे
अस द्या. देवनागरीत लिहिण्यसाठी मदत येथे clik
करा
श्र गोष्ट लवकर पुर्ण करा
pls

Maku
Thursday, November 30, 2006 - 11:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोनिच क पुर्न करत नहि आहे कथा.

Shraddhak
Friday, December 01, 2006 - 3:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विनीने तिचा हात माझ्या हातावर ठेवला होता.
" हे असं का होतं गं अनू? "
" माहीत नाही. मलादेखील ते आजपर्यंत कळलेलं नाही. एका क्षणी सगळंच नको वाटायला लागलं आणि मी विवेकला आणि पर्यायाने माझ्या संसाराला सोडून निघून आले. "

.... " विवेक, हे आता तुला आणि मलाही सावरता येण्यापलिकडे गेलं आहे. आता मी निघून गेलेलं बरं! "
" जातेयस तर जा. एक क्षणही थांबू नकोस. " त्याचाही पारा चढलेला. " तुला आजवर कशाची उणीव जाणवू दिली नाही. दुनियेतलं प्रत्येक सुख.. पैसा, नाना तर्‍हेच्या गोष्टी, ऐशारामाची राहणी, परदेशप्रवास, माझं प्रेम ( इथे मी चमकले. मी अमुक प्रकारे वागले, तमुक प्रकारे राहिले तर आणि तरच मिळणार्‍या त्या प्रेमाला प्रेम का म्हणावं बरं?). सगळं तुला देऊ केलं. आणखी काय करायला हवं होतं? जगातल्या लाखो तरुणी असं आरामात जगता यावं म्हणून नवसदेखील करतात आणि तू... "
" यावर आपलं आधीही बोलणं झालंय विवेक. त्यामुळे तेच मुद्दे पुन्हा उगाळून वाद घालण्यात काहीही हशील नाही, हे तुलाही माहीतेय आणि मलाही. तू म्हणालास एकही क्षण थांबू नकोस म्हणून. ठीक आहे, आत्ताच निघते. "

थोडेफार कपडे एका लहानशा बॅगेत भरून मी अक्षरशः दहा मिनिटांत विवेकचं घर सोडलं. कुठे जायचं, हे कळत नव्हतं, कशाला जायचं हेही. कुणाचं काय चुकलं? हेही उमगेनासं झालेलं. विचारांच्या भोवर्‍यात गरगरत मी जळगाव गाठलं. तिथेही माझ्या या निर्णयावरून मला बोल लावला गेला. आईने, बाबांनी माझ्याशी बोलणं टाकलं. कदाचित ते असह्य होऊन मी विवेककडे परत जाईन या आशेने. ते असह्य झालं आणि मी घर सोडलंदेखील. पण विवेककडे नक्कीच जायचं नव्हतं, हे ठरवलेलं. शेवटी इथे आले. एक नोकरी मिळवली, घर घेतलं.

विनीच्या डोळ्यांत पाणी तरळलेलं. तिच्याकडे पाहता पाहता नकळत माझेही डोळे भरभरून वाहू लागले. विवेकला सोडताना, आई बाबांकडून नाकारलं जाताना मन दगड झालं होतं जणू! तेव्हा आतल्या आतच राहून गेलेले अश्रू आता दोन वर्षांनी बाहेर पडत होते. विनीच्या मांडीत डोकं खुपसून मी कोण जाणे, किती वेळ रडत होते. आणि कालपरवापर्यंत बालिश, लहानशी, हेकेखोर वाटणारी विनी प्रेमाने माझ्या डोक्यावर थोपटत होती.

" चल घरी जाऊयात? बराच उशीर झाला आहे. आशाकाकी वाट बघत असतील. "
विनी माझ्यामागोमाग उठली. गाडीकडे जाताना म्हटली,
" मला त्या आशाकाकी मुळीच आवडत नाहीत. मी दिसले की चिडक्या चेहर्‍यानं माझ्याकडे बघत राहतात. आणि ते मनोहरकाका पण... माझ्यावर खुन्नस असल्यासारखे वागतात दोघेही. "

तिचं त्या दोघांबद्दलचं मत आणि त्यांचं तिच्याबद्दलचं मत मनात येऊन मला एकदम हसायलाच आलं.
आम्ही घरी आलो तेव्हा काकी अंगणात अस्वस्थ होऊन उभ्या होत्या. मनोहरकाका त्यांना ' शांत हो, येतील पोरी, घरात ये ' इत्यादी इत्यादी घरातून ओरडून सांगत होते. पण त्या काही आत जायला तयार नव्हत्या. आम्ही दिसलो, तसा त्यांचा जीव भांड्यात पडलेला दिसला.
" इतका वेळ गं अनू? डॉक्टर नव्हते का? "
" होते ते.. पण त्यानंतर आम्ही जरा लांबवर गेलो होतो फिरायला. "
काकींचं तेवढ्याने नक्कीच समाधान झालेलं नव्हतं आणि त्यांनी आणखीही काही विचारायची तयारी केलीच होती तेवढ्यात मनोहरकाका स्वतः बाहेर आले. आल्या आल्या त्यांनी काकींच्या वरचा सूर लावत म्हटलं,
" आशा, त्या आजारी पडल्यात दोघी आणि तू त्यांना अंगणात उभं करून उलटतपासणी कसली घेत्येयस? आत तरी येऊ दे दोघींना. बंद कर बघू तुझं प्रश्नोपनिषद आधी. "
काकी त्यावर काही बोलल्या नाहीत. रात्री पुन्हा त्यांनी मला आवाज दिला.
" अनू, मगाशी विचारायला विसरल्ये, कशी आहे ती? " काकींची सगळी लाडकी नावं ( भवानी, महामाया, वगैरे) प्रथमच त्यांनी वापरली नाहीत बहुधा.
" ठीक आहे. "
" बरं ऐक. आता स्वयंपाक करत बसू नकोस. सगळं केलंय मी. दोघीही जेवायला या जराशाने. "

काकींचं असं साधं बोलणं म्हणजे आज्ञाच असते. विनीला प्रथमच काकींच्या आमंत्रणाचा बहुमान प्राप्त झाला होता. मी हसू दाबत घरात गेले आणि विनीला सांगितलं.

पुढचा अर्धा तास तिचा चिंताक्रांत चेहरा पाहताना मला हसू पुन्हापुन्हा अनावर होत होतं.

" चल गं विनी... दहा मिनिटांत बोलावतीलच काकी. "
" नको.. मी नाही येत. "
" चल गं, तुला काही खाणार नाहीत त्या. "
" अगं त्यांना सांग ना मी गोळी घेऊन झोपलेय आणि माझं ताट घेऊन ये. "
" नको नको, असा खोटेपणा बरा का विनी? "
" अनू... "
" चल गं, जाऊयात आता. "

तयारी करताना माझा चेहरा, बर्‍याच वर्षांनी उमटलेल्या मनापासूनच्या हास्यामुळे केवढातरी बदलला होता.

क्रमशः


Himscool
Friday, December 01, 2006 - 5:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चला एक तरी कथा थोडितरी पुढे सरकली म्हणायची...

Swaatee_ambole
Friday, December 01, 2006 - 11:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्र, सुरेख लिहित्येस. पण किती तंगवतेस गं!!

Krups
Friday, December 01, 2006 - 2:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"intezar ka fal mitha hota hai".. asa eikalay kuthetari.....
Aapanhi wat baghu jara wel...

Tustin1
Friday, December 01, 2006 - 5:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

shra chan ahe g katha khupac
jalgaon vachalyavar anakhinac interest ala
pan lavakar purn kar.

Ramani
Saturday, December 02, 2006 - 5:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रद्धा, खुपच छान रंगत आहे कथा. पण लवकर लवकर टाका हो, पुढे काय होणार याची उत्कंठा शीगेला पोहोचली आहे अगदी!!
धन्यवाद झकास राव.


Rupali_rahul
Saturday, December 02, 2006 - 5:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रद्धा खुप छान लिहिलि अहेस कथा नेहमीसारखी , पण जरा पटपट लिहि ना गं...

Srk
Monday, December 04, 2006 - 1:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या उत्सुक मना शांत हो. श्रद्धाला वेळ मिळाला की ती पुढचा भाग पोस्ट करणारच.

Lampan
Monday, December 04, 2006 - 4:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही real story असावी बहुतेक .. कारण त्याच speed नी जात आहे .. अता " त्या " तिघी काही करतच नसतील तर त्याला कोण काय करणार i mean लिहीणार ? :-(

Shraddhak
Monday, December 04, 2006 - 5:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जेवण आटोपून आम्ही सगळे त्यांच्या बैठकीच्या खोलीत येऊन बसलो. फार काही रोमांचक, थरारक प्रसंग ( शाब्दिक चकमकी, इ. इ.) काकी आणि विनीमध्ये न होता जेवणाचा सोहळा पार पडला. काकींचा स्वयंपाक नेहमी असतो तसा साधा आणि चवदार होता. काल परवापासून मोजकंच अन्न पोटात गेलेली विनीदेखील मनापासून जेवली.
" बसा दोघी थोडा वेळ... आम्हालाही बरं वाटेल. " असं मनोहरकाकांनी म्हटलं तेव्हा आम्हा दोघींपैकी कुणीही नाही म्हटलं नाही.

" कुठल्या वर्षाला आहेस गं? " काकांना डायरेक्ट विनीलाच प्रश्न केल्यामुळे ती जरा गडबडलीच.
" सेकंड इयर; कॉम्प्युटर ब्रॅंच. "
" बरं शिकवतात कॉलेजात? " आता काकीही सामील झाल्या. हळूहळू त्यांचं आणि विनीचं मनमोकळं बोलणं सुरु झालं. ही दोघं छान गप्पा मारू शकतात, हे तिला नव्यानेच कळलेलं आणि ही ' महामाया ' वाटते तितकी भयंकर नाही, हे त्यांनाही उमगलेलं.

... " पण खरं सांगत्ये हो विनी, तू जेव्हा अनूला त्रास द्यायचीस ना, मला भारी संताप यायचा हो. वाटायचं, तुला चांगला चोप द्यावा. "

काकींचा परखडपणा जगजाहीर आहे. आता यावर विनीची काय प्रतिक्रिया येते म्हणून मी धास्तावून तिच्याकडे बघितलं. पण तिने फक्त मान खालती घातली. काकी बोलत होत्या.

" दोनेक वर्षांत संसार मोडला गं माझ्या अनूचा. आधीच या दुःखाने पोळलेली ती. आणि त्यातून तू तिला त्रास द्यायला लागलीस... तुला माहीत नसेल, फार सहन केलंय तिनं! "

" अनूने आजच मला सांगितलं ते. " विनी हळू आवाजात म्हणाली. " मी फार चुकले काकी... सॉरी. "
काकींनी तिच्या डोक्यावर समाधानाने थोपटलं.. " तुला कळलं यातच सगळं आलं हो. आता दोघी आनंदानं राहा जितकी वर्षं सोबत असाल तितकं. " हा विषय इतक्यावर तुटला असं समजून मी हुश्श.. केलं मनात, पण तसं व्हायचं नव्हतं.

" तो तुझा काळ्या मोटरसायकलवरून येणारा मित्र दिसला नाही गेला आठवडाभरात.... " विनीचा क्षणार्धात पालटलेला चेहरा बघून मी ताडलं की मनोहरकाकांनी अजाणता उल्लेख केला तो नेमका विक्रमचा. त्यांनाही कळलं असावं आपण काहीतरी भलतेच बोलून गेलो आहोत. काकींनी चटकन ' उगी, उगी.. ' करत विनीला जवळ घेतलं आणि काकांना सुनावलं,
" नको तेव्हा, नको तिथं बोलत असता काहीबाही. पहिल्यांदा आली ती पोर आपल्याकडे अन् तुम्ही... जा बघू, सर्वांसाठी गरमागरम कॉफी आणा... "
काका चटकन उठून आत गेले आणि काकींनी अतिशय आश्वासक सुरात विचारलं,
" काय झालं विनी, सांगत्येस का मला? "

विनीने अडखळत, रडत तिची कहाणी त्यांना सांगू लागली. काकी डोळे मिटून ते सर्व ऐकत होत्या.

" त्याने माझ्याजवळ या शहरात राहावं एवढीच माझी अपेक्षा होती हो काकी. त्याच्यावर प्रेम आहे माझं आणि मला हवीय हो त्याची सोबत. पण आत्तातरी कमिटमेंट नको आहे म्हणे त्याला. कारण तो किमान दोन तीन वर्षं परत येणार नाहीये इकडे. मला म्हणतो, We will be in touch through phone, mails , वगैरे. आणि लग्नबिग्न फार लांबची गोष्ट आहे. पण.. पण.. माझी अपेक्षा होती... " तिला पुढे बोलवेनासं झालं.
" आपण एखाद्यावर जिवापाड प्रेम करत असतो आणि त्या व्यक्तीने आपल्या अपेक्षा अजिबातच समजून नाही घेतल्या तर त्रास होतो ना, विनी? "

काकींचं हा प्रश्न विनीला उद्देशून असला तरी मलादेखील किती अचूक लागू पडत होता तो! विवेक... त्याला सगळ्या भल्याबुर्‍या गोष्टींसकट विसरणं अजून जडच जातंय मला. नकळत डोळे पाणावले.

विनी बोलत होती.
" लहानपणापासून आई बाबांचं आणि माझं कधीच पटलं नाही. ती दोघं त्यांच्या business मध्ये मग्न असायची. माझे लाड झाले ते वस्तू, खाऊ, खेळणी, असल्या स्वरुपात. त्यांचा वेळ असा कधीच मिळाला नाही मला. त्यातून आईच्या मनातला सो कॉल्ड आधुनिक आणि पारंपारिक विचारांचा गुंता. एकीकडे माझ्या वैयक्तिक गोष्टींमध्ये तिने नाक खुपसू नये असं तिला वाटायचं आणि दुसरीकडे माझ्यावर लक्ष ठेवलं नाही तर मी कुठल्यातरी संकटात सापडेन ही धारणा! ह्या असल्या गोंधळामुळे मीही तशीच झाले होते. Totally confused! मी कॉलेजमध्ये जायला लागले तशी तिला माझ्या सुरक्षिततेची, मी कुणामध्ये गुंतले आणि काहीतरी भलतंसलतं करून बसले तर याची प्रचंड काळजी वाटायला लागली. कारण माझी राहणी, स्वभाव यांवर तिनं फारसं लक्ष न दिल्यानं तिच्या मते, त्या गोष्टी केव्हाच हाताबाहेर गेल्या होत्या.
अनूकडे मला ठेवायचा निर्णय तिचाच! मला मात्र होस्टेलवर राहायचं होतं. माझी एक प्रामाणिक समजूत ही होती की, या शहरात जर अनूचं घर नसतं तर मला विनासायास होस्टेलवर राहायला मिळालं असतं. इथे अनूकडे येण्याअगोदर मी मनोमन प्रार्थना करत होते की, अनू मला ठेवून घ्यायला नाही म्हणू दे. ते झालं नाही, तशी मी वैतागले.
नंतर मुद्दाम तिला त्रास दिला याच अपेक्षेने की, तिने कंटाळून मला तिच्या घरात ठेवून घ्यायला नकार द्यावा. पण अनू खूप सहनशील आहे.... "

विनीचं हे आत्मकथन चालू असताना मी विचार करत होते, मूल वाढवण्यात चूक झाली तर हे असे, इतके दूरगामी परिणाम होतात? ती व्यक्ती सदोदित वैचारिकदृष्ट्या गोंधळलेली राहण्याइतके? विनीला सगळ्यात जास्त मानसिक आधार वाटावा तो विक्रमचा, ह्यात प्रियामावशी आणि तिच्या नवर्‍याचा पराभव नाही का?...

मी विचारांचा तंद्रीतून बाहेर आले तेव्हाही विनी बोलतच होती,

" तुमचा काळ किती चांगला होता काकी! हे असले प्रॉब्लेम्स वाट्याला आले नसतील तुमच्या. "
" काकी, त्या काळी मुलींच्या जोडीदाराकडूनच्या अपेक्षा फार नसायच्या ना हो? किमान दारुण अपेक्षाभंगाचं दुःख सतत बाळगावं लागत नसेल मनावर. " मी संभाषणात भाग घेत बोलले.

काकी हसल्या, साठेक वर्षांचा प्रदीर्घ कालखंड अनुभवल्यानंतरच असं हसू फुलत असावं बहुधा. प्रॉब्लेम कितीही मोठा असला तरी. त्या काही बोलणार एवढ्यात,

" आशा, ह्यांना ' नवर्‍यामागे देशोदेशी बिर्‍हाड घेऊन हिंडलेल्या विशीतल्या मुलीची गोष्ट ' सांगायच्ये का? " मनोहरकाका कॉफीचा ट्रे घेऊन बैठकीच्या खोलीत आले होते.

" सांगू का खरंच? " काकी मंद हसल्या आणि हातातल्या कपातली कॉफी पीत त्यांनी बोलायला सुरुवात केली.

क्रमशः


Manishalimaye
Monday, December 04, 2006 - 6:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगदी उत्सुकता ताणुन धरावी लागणार तर! पुढच येईपर्यंत!लवकर येउ दे, छान आहे.इंटरेस्टिंग वगैरे.

Ramani
Monday, December 04, 2006 - 7:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझे पण मनिषला अनुमोदन!!

Shraddhak
Tuesday, December 05, 2006 - 7:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

" माझा जन्म एका लहानशा खेडेगावातला. माझे वडील गावच्या पाटलाकडं कारकुनी कामं करायचे. परिस्थिती तशी बेताचीच होती. मी सगळ्यात थोरली. माझ्यामागं आणखी चार भावंडं. मला बाबांनी चौथीपर्यंत शिकवलं. नंतर शिक्षण चालू ठेवण्यासारखी परिस्थितीही नव्हती.
मला तेरावं वर्ष लागलं तशी त्यांना माझ्या लग्नाची चिंता सतावू लागली. हुंडा द्यायची ऐपत नव्हती हो. पंचक्रोशीतली स्थळं हुंड्यासाठी अडून बसलेली. बरं, माझ्या लग्नात खर्च करावा पैसा, तर पाठीवर आणखी दोन बहिणी होत्या. दोघे भाऊ अगदीच लहान! ते हाताशी येईपर्यंत काय? बाबांना खर्च करायचा कसा, याचाच घोर पडलेला.
ह्यांचं स्थळ आलं तेव्हा आई बाबा दोघांना मनात धाकधूक... ह्यांचा स्वतःचा कापडाचा व्यापार होता. सतत फिरावं लागे. भारतभर नक्कीच फिरले असतील. हे तेव्हा ज्या गावी होते त्याचं नाव मी तर सोडाच, आई बाबांनीही आधी ऐकलं नव्हतं. बरं बोलणी करायला हे आणि यांचे वडीलच आलेले. यांची आई हे दहा वर्षांचे असतानाच गेली, गोतावळाही फारसा नाही.
बाबांची एक थोरली बहीण दूर तिकडं मध्य प्रदेशात दिली होती, तिच्या ओळखीतून हे स्थळ आलेलं. बरं स्थळात नाकारण्यासारखं काही नव्हतं. हे आणि सासरे, दोघांचीही काहीही मागणी नव्हती. ' गावातल्या देवळात लग्न लावा अन तुमची मुलगी अन नारळ द्या. बास! ' आई बाबांना पेच पडला. आत्याला पत्र लिहून विचारणा झाली यांच्या कुटुंबाबद्दल. खोट काढण्याजोगं काही नव्हतं. शेवटी हो ना करता करता माझं न ह्यांचं लग्न ठरलं.
लग्न झाल्यानंतर सासरे आधी निघाले आणि चारेक दिवस माहेरी राहून मी ह्यांच्यासोबत निघाले. माझं वय तेव्हा अठरा वर्षांचं, तर हे तीस वर्षांचे. ( इथे विनीने ' बापरे! ' असं म्हटल्यावर काकी तिच्याकडे पाहून हसल्या.) ह्यांचा धाक वाटे मनात.
खरं तर कुठल्याही सामान्य मुलीप्रमाणे माझी इच्छा होती हो, की जवळचं सासर मिळावं. कधी वाटलं तर आईकडे चटकन जाता आलं पाहिजे. पण झालं नेमकं उलटं. मी तर गावापासून बरीच दूर चालल्ये होते. पण ह्या अपेक्षा मला काही ह्यांच्यासमोर बोलून दाखवायचं धाडस झालं नाही तेव्हा...
पहिल्यांदा या निमित्तानं मी रेल्वे पाह्यली. लांबचा प्रवास होता. ह्यांनी मला बसायला खिडकीपाशी जागा करून दिली. मी इकडं तिकडं पाहत मुकाट बसून राहिल्ये... "

" मला तर कित्येक वर्षं कळलंच नाही, हिच्या अपेक्षा नेमक्या काय होत्या माझ्याकडून, संसाराकडून? " इतका वेळ शांतपणे बसून ऐकणारे मनोहरकाका संभाषणात भाग घेत म्हणाले.
" हिला पहिल्यांदा तिच्या गावाहून घेऊन निघालो. तिच्या गावी रेल्वे स्टेशनही नव्हतं. चार तासांचा बसप्रवास करावा लागायचा रेल्वेप्रवासाआधी.
चार तासांचा तो बसमधला खाचखळग्यांतूनचा प्रवास मला वाटतं, आशाच्या आयुष्यातला पहिलाच प्रवास असेल. बिचारी गप्प गप्प होती. त्यानंतर रेल्वेमध्येही फारशी बोलली नाही. तिच्या लहानशा जगातून पहिल्यांदाच बाहेर पडताना बावरली होती बहुधा! मी तिच्याशी बोलायला हवं होतं खरं तेव्हा पण मीही फार खोलात जाऊन विचारायच्या फंदात पडलो नाही.
खरं तर तो माझ्या आयुष्यातला भयंकर अस्थिरतेचा काळ होता. व्यापार चालू होताच, पण मला अजून काही संधी खुणावत होत्या. त्यात बरा पैसा मिळेल, तर पहावं असं मी मनाशी ठरवलं होतं. पण त्याआधी आशाला विश्वासात घेऊन या गोष्टी समजावून सांगणं, हे काही माझ्या हातून झालं नाही किंवा तशी गरजही वाटली नाही म्हणा... मग ही अचानकच गप्प गप्प राहायला लागली, बोलेनाशी झाली. मला आधी तेवढं जाणवलं नाही ते... कारण सतत फिरतीवर असायचो.. कधी हिला सोबत घेऊन तर कधी न घेता.... हे सगळं असंच सुरु राह्यलं असतं, पण एक दिवस हिने धक्काच दिलान् मला... "
" मी जीव द्यायचा प्रयत्न केला. विहिरीवर गेल्ये आणि दिलं झोकून स्वतःला. निराश झाल्ये होते हो मी. "
" तेव्हा तीन वर्षांत पहिल्यांदा मनमोकळेपणाने बोललो हिच्याशी. विचारलं, बयो, कशाला हे असलं करायला निघाली होतीस? कुठे काही जाचतंय का तुला? तेव्हा सांगितलन. तिच्या साध्या साध्या अपेक्षा ऐकून खजील झालो मनाशी... बायकोला समजून घेता आलं नाही म्हणून. तिचं जग मर्यादित होतं, त्यानुसार तिच्या अपेक्षा घडल्या होत्या. मी तिला पूर्णपणे वेगळ्या दुनियेत आणलं होतं आणि तिने ते सहज स्वीकारावं अशी अपेक्षा होती माझी.... "

काका बोलत होते एकीकडे आणि मला वाटत होतं, माझी अन विवेकचीच कहाणी सांगतायत ते. मनोहरकाका वागले तसं विवेकला वागायला का जमलं नाही? कदाचित मी काकींसारखं टोकाचं पाऊल उचललं असतं तर?.. जणू ते त्यांना कळलं असावं, अशा सुरात काकी म्हणाल्या,
" म्हणूनच अनू, तू जेव्हा इथे आलीस ना राहायला आणि तुझी कहाणी कळली ना मला... तेव्हा प्रचंड धास्तावल्ये होते मी. वाटलं, मी जशी वागल्ये तसंच कदाचित तू करू बघितलंस तर? विचारही नको वाटायचा मला... "

तसं पुन्हा मनात आलं, काळ नक्कीच बदललाय. काकींचा आणि माझा प्रॉब्लेम एकच असला तरी त्याला आम्ही दोघी वेगवेगळ्या पद्धतीने सामोर्‍या गेलो होतो. कदाचित त्या काळच्या रीतींमध्ये नवर्‍याला सोडून जाणं हे अजिबातच बसत नसल्याने काकींनी असला मार्ग पत्करला असावा. पण सुदैवाने मनोहरकाकांना परिस्थितीची जाणीव होऊन सगळं गाडं सुरळीत झालं.

कधीतरी विवेकलादेखील अशीच जाणीव होईल का? हा प्रश्न मनात येताक्षणी जाणवलं, अजूनही मनामध्ये कुठेतरी रुतून राहिलेयत ते लग्नानंतरचे सुरुवातीचे सोनेरी दिवस. आणि कुठेतरी ते परत यावेत, अशी इच्छाही आहे मनात.

क्रमशः


Srk
Tuesday, December 05, 2006 - 7:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रद्धा मस्त जातेय गं गोष्ट. येउ देत पटापट.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators