|
Supermom
| |
| Monday, December 04, 2006 - 9:01 pm: |
| 
|
लग्न होऊन दोन वर्षे झाली तरी अजून गोड बातमी नाही याची आम्हां उभयतांपेक्षा इतरांनाच फ़ार काळजी वाटू लागली. प्रथम आडून आडून चौकशी, मग काय पेढे कधी देणार,अशा प्रश्नांनंतर काय,काही प्रॉब्लेम आहे का असंही हलकेच विचारलं जाऊ लागलं. नव्या नवलाईच्या दिवसांमधे आधी मलाही काही वाटलं नाही. पण बरोबरीच्या मैत्रिणींच्या मुलांच्या बारशाचे,तर कधी पहिल्या वाढदिवसांचे निरोप जसे वारंवार कानांवर पडू लागले,तशी मनात काजळछाया दाटू लागली. 'घाई कसली आहे तुला?आता तर कुठे हिंडतोय फ़िरतोय.' नवरा नेहेमीप्रमाणेच शांत,समजूतदार. मग माझ्या हट्टासाठी डॉक्टर च्या वार्या सुरू झाल्या. देशापरदेशातल्या आधुनिक सुश्रुताचार्यांनी सगळे काही ठीक असल्याचा निर्वाळा दिल्यावर मन जरा निवळले.पण वाट पहाता पहाता जेव्हा लग्नाचा चौथा वाढदिवस उजाडला तेव्हा परत काळजाने ठाव सोडला.लग्नाला पाचवं वर्ष पूर्णं होत आलं अन आता आपल्या घरात बाळाचे बोबडे बोल घुमणार नाहीत ही खात्री होऊ लागली. सासूबाई माझ्या लग्नाआधीच देवाघरी गेलेल्या.पण त्यांची उणीव स्वभावानं अतिशय गोड अन लाघवी अशा मोठ्या जाऊबाईंनी भरून काढली होती.त्यांच्या कुशीत शिरून एक दिवस हमसाहमशी रडले. हुंदके देत देत दत्तकाचा विचार बोलून दाखवला. 'जरूर घ्या बेटा. अग,आई होण्यासाठी जन्मच द्यावा लागतो असं नाही बरं.' त्यांनी पूर्ण पाठिंबा दर्शवला. अमेरिकेत परत आल्यावर दत्तकाच्या दृष्टीने विचार सुरू झाले. ख्रिसमस ची सुट्टी इथे घालवून जानेवारीत भारतात दत्तक घ्यायला जायचे असा विचार पक्का केला. ख्रिसमसच्या आधी काही दिवस बरे वाटत नाही म्हणून डॉक्टर कडे सगळ्या टेस्ट करायला मी गेले होते. ख्रिसमसला दोन दिवस राहिले असताना नर्स चा फोन वाजला. 'i have a good news for you,my dear.' चला viral वगैरे काही दिसत नाही. मला हुश्श झाले. 'what is it, stacy?' 'you are pregnant' माझा माझ्या कानांवर विश्वासच बसेना. 'are you sure,stacy?' 'i am positive,my dear.'
|
Jhuluuk
| |
| Tuesday, December 05, 2006 - 4:58 am: |
| 
|
Supermom सुरुवात तर मस्त झालिये...
|
Supermom
| |
| Tuesday, December 05, 2006 - 8:21 am: |
| 
|
आनंदातिशयाने मला बोलताच येईना. मला रडू येतंय हे त्या अनुभवी बाईने जाणले. 'don't worry honey. everything will be ok.' तिने मला धीर दिला. फ़ोन ठेवल्याबरोबर नवर्याचा नंबर फ़िरवला. मग काय,सासरी,माहेरी आनंदोत्सव सुरू झाला. रोज फ़ोनवर इतक्या सूचना की बस्स. पण एखादी गोष्ट दृष्टीपथात येणं अन प्रत्यक्ष हातात येणं यात महदंतर असते हे लवकरच लक्षात आले. दुसर्याच महिन्यात तब्येत इतकी बिघडली की दोघेही पुन्हा काळजीने व्यग्र झालो. डॉक्टरने सांगितले की एवढ्या लवकर आम्ही अल्ट्रासाऊंड करत नाही पण सगळे ठीक असल्याची खात्री करून घेणे भाग आहे. तातडीने सकाळी सात वाजताच दवाखान्यात बोलावले.दोघेही मनातून अगदी घाबरून गेलेलो. स्क्रीनवर काय दिसतेय ते कळत नव्हते. डॉक्टरचा चेहेरा अगदी विचारमग्न. टाचणी पडली तरी ऐकू येईल अशी रूममधे शांतता. अन अचानक त्याच्या चेहेर्यावर प्रसन्न हास्य पसरले. 'oh my god, you guys have two babies in there.' टेबलवर उठून बसलेली मी पुन्हा रडायला लागले. घरी जाताना डॉक्टरने मोठ्ठी यादीच दिली.कशी काळजी घ्यायची याची. हे करू नका नि ते करू नका. कसेबसे दोन महिने सुरळीत गेले अन पुढच्या व्हिजिटला सांगण्यात आले, ' बी. पी. शुगर, सारेच खूप वाढलेले आहे. आता पूर्णपणे बेडरेस्ट.' सगळ्यात मोठा प्रश्न होता लांबसडक केसांचा. अंथरुणावरच कोण न्हाऊ घालणार? नवर्याने काही दिवस अगदी ब्यूटी पार्लर मधल्यासारखे छोट्या भांड्यात केस धुवूनही दिले. पण नंतर नोकरीमुळे अन इतरही कामे खूप करावी लागत असल्याने त्याची खूपच धावपळ होऊ लागली.मन घट्ट केले अन केसांचा बॉब करून घेतला. 'मुलांसाठी आईच्या त्यागाला आत्तापासूनच सुरुवात झाली वाटतं?' नवर्याने चिडवले. अन तितक्यातच ती बातमी आली. आई बाबा माझ्या बाळंतपणासाठी येणार होते पण बाबांची तब्येत अचानक बिघडल्याने दोघेही येऊ शकणार नव्हते. बाबांना स्ट्रोक आला होता नि त्यांची स्मृती गेली होती हे मला तेव्हा सांगण्यात आले नव्हते.
|
Mrinmayee
| |
| Tuesday, December 05, 2006 - 8:59 am: |
| 
|
'सुपरमॉम', आता खरंच जाणवतय, ही ID किती सार्थ आहे ते! छान लिहीलयस. पूर्ण कधी करणार?
|
Supermom
| |
| Tuesday, December 05, 2006 - 9:10 am: |
| 
|
मृ, मुलांच्या शाळेत निघालेय volunteering साठी. आले की करतेच पूर्ण.
|
Suyog
| |
| Tuesday, December 05, 2006 - 1:08 pm: |
| 
|
we have also gone through similar experience lagnanantar 4 varshane mulaga zala pan tya aadhi mehi dattak ghyayacha vichar karat hote pan tyaaadhi 3 mahine majin aai ji la mulanchi khup hous hoti ti cancer ne geli i was to tense in last trimester aata aamacha mulaga 6 yrs aahe lok punha vicharatat second chance nahi ka ghenar
|
Princess
| |
| Tuesday, December 05, 2006 - 1:14 pm: |
| 
|
सुपरमॉम, छान लिहितेय ग... खरच आता कळले तु हा id का घेतलाय. प्रत्येकाचे आयुष्य एक मोठी कहाणीच असते नाही का...
|
Supermom
| |
| Tuesday, December 05, 2006 - 3:20 pm: |
| 
|
रोज एकएक दिवस मोजत साडेआठ महिने उलटले.खर्या अर्थाने मी हे दिवस कधीच enjoy करू शकले नाही. डॉक्टरांनी ही अतिशय हाय रिस्क प्रेग्नन्सी सांगितली होती. दोन्ही मुलांपैकी एका मुलाच्या जिवाला धोकाही होऊ शकतो ह्याचीपण कल्पना दिली होती. माझ्या मैत्रिणींनी या काळात माझी फ़ार काळजी घेतली.सतत आवडीचे पदार्थ करून आणले. रोज मला फ़ोन करून धीर देत असत सगळ्या. अगदी डॉक्टर च्या परवानगीने झोपाळ्यावरचे सुरेख डोहाळजेवण सुद्धा केले.मनावर मात्र सतत काळजीचा डोंगर असायचा. दोन्ही बाळांबद्दल मुलगा की मुलगी हे मात्र अल्ट्रासाऊंड करूनही शेवटपर्यंत कळले नाही. म्हणजे एक मुलगा आहे हे ते खात्रीने सांगत होते.पण दुसर्या बाळाबद्दल कोणीच नीट सांगू शकत नव्हते. नवर्याला मुलीची फ़ार हौस. तो सारखा म्हणायचा, दुसरी मुलगीच असायला पाहिजे ग.मुलीशिवाय घराला शोभा नाही. मला मात्र आता काहीही असू दे देवा,पण सारे सुखरूप होऊ दे.एवढेच वाटत होते. शेवटच्या तपासणीसाठी गेलो अन डॉक्टरचा चेहेरा विलक्षण गंभीर झाला. नवर्याला बोलावून तिने सांगितले की ताबडतोब हिला दवाखान्यात हलवा. जुलै महिना.ऊन मी म्हणत होते.बाळंतपणासाठी आलेली माझी मोठी नणंद अन नवरा दोघांनी धावपळ करून मला हॉस्पिटल मधे दाखल केले. तिथे लवकर डिलिव्हरी होऊ नये म्हणून औषधे सुरू केली.कारण अजूनही पंधरा दिवस बाकी होते. सतत उलट्या सुरू झाल्या.मला फ़ार नवल वाटले कारण मला संपूर्ण प्रेग्नन्सीमधे कधीच उलट्या झाल्या नव्हत्या. हॉस्पिटलचा मुख्य gastroenterologist सारख्या चकरा मारत होता. तेव्हा कळले की माझ्या लिव्हरला काहीतरी गंभीर प्रॉब्लेम झाला आहे. अविस्मरणीय अशा त्या पंधरा दिवसांनंतर अखेर तो दिवस उगवला. हाय ब्लड प्रेशर,प्रेग्नन्सी डायबेटीस, elevated liver enzymes अशा अनेक जबरदस्त दुखण्यांना तोंड देऊन, मी माझ्या जुळ्यांपैकी पहिल्या अपत्याला जन्म दिला. 'मुलगी झाली आपल्याला.' हे नवर्याचे आनन्दाचे उद्गार कानी पडले अन अतिशय थकून जाऊन मी डोळे मिटले. no, no,you can't sleep,dear,you have another baby coming. नर्स ने मला हलवले. आतापर्यंत मी इतकी थकले होते की बोलायचेही त्राण मला उरले नव्हते. तीन तास पुन्हा झगडून मी माझ्या मुलाला जन्म दिला, अन मग मात्र मला पुढचे काहीच कळेनासे झाले. अजूनही ते आठवत नाहीच.
|
Fulpakhru
| |
| Tuesday, December 05, 2006 - 3:40 pm: |
| 
|
supermom i can understand your mental stress. my friend has gone through exactly same situation during her pregancy. same high risk pregancy with twins. and when we are far away from our parents friends are everything to us..
|
Supermom
| |
| Tuesday, December 05, 2006 - 3:50 pm: |
| 
|
मुलांना जन्म दिल्यानंतरही मला तब्येतीचा भयंकर त्रास झाला. माझ्या त्यावेळच्या तब्येतीची कल्पना एकाच गोष्टीने येईल ती म्हणजे माझे हिमोग्लोबिन पाच च्या खाली गेले होते. तातडीने मला रक्त देण्यात आले. डॉक्टर सतत लक्ष ठेवून होते. रक्त दिल्यानंतर मात्र माझी प्रकृती बरीच सुधारली. त्यानंतरचे सारेच कसे अजूनही स्वप्नवत वाटते. पंधरा दिवस intensive care मधे राहून दोन्ही मुले घरी आली.भेटवस्तू, पाहुणे,या सर्वांनी घर कसे गजबजून गेले. मुले सव्वा महिन्याची झाल्यावर नणंद परत भारतात गेली. नवर्याला पुन्हा नोकरीवर रुजू व्हावे लागले. तो सतत म्हणजे सोमवार ते शुक्रवार फ़िरतीवर असे. फ़क्त शनिवार रविवारी येई. त्या काळात म्हणजे मुले पावणेदोन वर्षाची होईपर्यंत मला खूपच त्रास झाला.दोन तान्ह्या मुलांसाठी जागरणे करणे हे ज्याने केलेय तोच समजू शकेल. नवरा बिचारा थकून भागून आलेला दोन्ही मुलांचा ताबा घेत असे. त्यालाही त्या काळात खूपच दगदग झाली. ते सारे दिवस भराभर निघून गेले. नंतर मी भारतात दीड दोन वर्षे राहूनही आले.बाबांची तब्येत बघून फ़ारच धक्का बसला.त्यांचे सारे आजारपण हा एका दुसर्या लेखाचा विषय होईल. आज माझी मुले पाच वर्षांची झालीत. त्यांच्या जन्माआधीचा नि जन्माच्या वेळचा सारा त्रास मी पार विसरले आहे. नजरेसमोर आहे फ़क्त माझं हसतं खेळतं 'द्विदल '.
|
सुपरमॉम, चांगले लिहिले आहेस!
|
Asmaani
| |
| Tuesday, December 05, 2006 - 4:12 pm: |
| 
|
supermom.... you r really a supermom! simply gr8! अक्षरश्: अंगावर काटा आला वाचून!
|
Chinnu
| |
| Tuesday, December 05, 2006 - 5:52 pm: |
| 
|
सुमॉ, हॅट्स ऑफ़ टु यु! तुम्ही आणि तुमचे द्विदल नेहमी हसते खेळते रहा!
|
Manuswini
| |
| Tuesday, December 05, 2006 - 7:11 pm: |
| 
|
supermom अगदी सेम सेम माझ्या आईची हीच अवस्था होती. आम्ही दोघी बहिणी जुळ्या आहोत. आई पुर्णपणे दोन वर्षे बेड वर होती आमच्या जन्मानंतर. स्वःता डॉकटर असुनही आईला nutrition ची कमी कशी भरायची ते कळले नाही त्या दिवसात विषेश करुन calcium calcium इतके कमी झाली की तीला थंडीत अजुनही हाडे दुखायचा त्रास होतो. वयच्या २३ वर्षी झालेला त्रासाची नंतर बरयाच व्याधी डोकं काढ्तात. तेव्हा तु काळजी घे. तुझी दोन्ही मुले सुखरूप वाढो.
|
Supermom
| |
| Tuesday, December 05, 2006 - 8:32 pm: |
| 
|
सगळ्या मित्रमैत्रिणींचे प्रतिक्रियांबद्दल, शुभेच्छांबद्दल मनपूर्वक आभार. मनु, तुझं म्हणणं अगदी खरंय ग. या डिलिव्हरीनंतर मला थंडी किंवा बर्फ़ पडला की खूप काळजी घ्यावी लागते, नाहीतर सांधे दुखायचा त्रास होतो. अर्थात इतकं मोठं दान देवानं पदरात टाकलंय की त्यापुढे हा त्रास म्हणजे किस झाड की पत्ती
|
Raina
| |
| Tuesday, December 05, 2006 - 8:48 pm: |
| 
|
बापरे... कल्पना सुद्धा करवत नाही तुमच्या त्रासाची. पण all's well that ends well"! द्विदल सुरेख आहे.
|
Manuswini
| |
| Tuesday, December 05, 2006 - 9:40 pm: |
| 
|
supermom एवढेच सांगेन की तु strength training घे, balanced diet ठेव, it helps, MY mom did start this but little late so she suffers severe pains during little cold and have knee pains . मुळात स्वःता premature जन्माला आलेली माझी आईतच calcium कमीच होते तेव्हा असा त्रास होणे स्वः भावीक होते आमच्या जन्माच्यावेळेला. मला आई कडे बघुन खुप वाईट वाटते, मी तुला घाबरवत नाही पण सांधीदुखीचा त्रास एतका वाढला की वयच्या ४० व्या वर्षी आईने आपली medical practice सोडुन स्वःताच्या आजारपणा वर concentrate केले. ... तेव्हा तु आताच जपायला लाग. सर्व डॉकटरानी हेच सांगीतले featus uses all calcium and if mother has less calcium in body during pregnancy then mother may suffer more for calcium deficiency आई ला सुद्धा ह्याच्यातच धन्यता आहे की आम्ही दोघी सुखरूप आहोत. काही व्यांग नाही, आमची डोकी वगैरे ठिक चालतात (हे मी गमतीने म्हणते आईला) मी आईला कायम म्हणते, यार आई तु कसे काय केलेस हे? जुळे काय पण एक सांभाळणे भारी दिसते मला
|
Ashwini
| |
| Tuesday, December 05, 2006 - 9:48 pm: |
| 
|
सुपरमॉम, छान लिहिलयस. फोटो टाक कुठेतरी द्विदलाचा. 
|
Psg
| |
| Wednesday, December 06, 2006 - 12:48 am: |
| 
|
बापरे! सुपरमॉम, काय अनुभव आहे गं! तुझे आणि तुझ्या नवर्याचे कौतुक आहे.. स्वत:ची काळजी घे.. मुलांना जप..
|
Jhuluuk
| |
| Wednesday, December 06, 2006 - 1:30 am: |
| 
|
Supermom, you are simply Superb!!! Hats off to you!! खरच फोटो टाकाना, सोनुल्यांचा आणि आईचा..
|
|
|