Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
द्विदल

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » मार्गशीर्ष » ललित » द्विदल « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through December 06, 200620 12-06-06  1:30 am

Rupali_rahul
Wednesday, December 06, 2006 - 1:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुपेर मॉम, खरच तुझे नाव तु सार्थ केलेस ग...
अश्विनि आणि झुळुकला अनुमोदन...


Jayavi
Wednesday, December 06, 2006 - 2:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुपरमॉम, काय विलक्षण अनुभव आहे गं तुझा! तुस्सी ग्रेट यार! एक कडक सॅल्यूट तुमको :-) ए फ़ोटो टाक ना गं तुझ्या गोडुल्यांचे!

Supermom
Wednesday, December 06, 2006 - 8:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रैना,मनु,पूनम,अश्विनी, रूपाली, झुळुक,आणि जयु,
सगळ्यांचे मनापासून आभार. फ़ोटो टाकते एक दोन दिवसात.
जयु, अग, मी काहीच ग्रेट नाही.या सगळ्या जीवघेण्या अनुभवातून मला नि माझ्या बाळांना सुखरूप ठेवणारा परमेश्वर खरा ग्रेट.
मला नेहेमी माझ्या नवर्‍याची पण कमाल वाटते. डिलिव्हरी रूम मधल्या सगळ्या नाट्याला त्यानं अगदी धीरानं तोंड दिलं. एका क्षणी माझाही धीर सुटला.मी त्याला सांगितले की i am going to die. पण तो माझा हात घट्ट धरून मला पुन्हापुन्हा सांगत राहिला की i won't let you die. don't give up.

अन हो, माझ्या अनुभवावरून ज्यांना अजून मुले नाहीत त्यांनी मुळीच घाबरून जाऊ नये माझी केस ही फ़ार rare होती.


Zelam
Wednesday, December 06, 2006 - 9:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुपरमॉम खरच नाव सार्थ केलंस.
तुझं आणि तुझ्या नवर्‍याचं कौतुक आहे. hats off to you . तुम्हा सर्वाना शुभेच्छा.


Divya
Wednesday, December 06, 2006 - 9:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुपरमॉम माझी एक मैत्रीण अगदी सेम केस ग. जुळे आणि जोडीला डायबेटीस असल्यामुळे घ्यावी लागलेली काळजी. तिला तर इन्सुलिन होते. रोज जेवण झाले की ब्लडशुगर बघायची आणि मोजुन मापुन घ्यायचा आहार, खुप खावस वाटुनही खाता यायच नाही मुल झाल्यावर सुद्धा त्या दोघंची झालेली ओढाताण ही बघीतली आहे. तो ऑफ़ीस मधुन आला की ही जाउन झोपायची, अगदी झोप पण मिळत नव्हती. आई वडील होतेच पण नेहमी म्हणायची रात्री अपरात्री आई बाबांना उठवायला नको वाटत म्हणुन स्वताच जागरण करायची. बाई ग नवरा फ़िरतीवर असताना कस केल असशील. खरच ग्रेट आहेस.

Nalini
Wednesday, December 06, 2006 - 10:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाग्याला भेटलेय. एकदा तुला भेटायची ईच्छा आहे. तुसी ग्रेट हो. परमेश्वर तर अश्या संकटसमयी आपल्या सोबतच असतो.

Megha16
Wednesday, December 06, 2006 - 1:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुपरमॉम,
तुला तुझ नाव अगदी बरोबर शोभत.....
खरच तुस्सी ग्रेट हो....


Prajaktad
Wednesday, December 06, 2006 - 3:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुपरमॉम!ग्रेट आहात तुम्ही दोघं... आमच एकच पिल्लू नाकि ९-१० आणतय!..

Radhadeshpande
Wednesday, December 06, 2006 - 3:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुपरमॉम,खूप सहन केलेस ग! पण आता तुझी बाळे मोठि झाल्यावर,त्यांच्याकडे बघितल्यावर खूपच छान वाटत असेल. तुला अन तुझ्या बाळांना खूप सार्‍या शुभेच्छा!!

Savani
Wednesday, December 06, 2006 - 4:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुपरमॉम, खरच ग काय दिव्यातुन गेली आहेस. पण ह्या सगळ्यात तुझे तर आहेच पण तुझ्या अहोंचं सुद्धा कौतुक ग. तुम्ही दोघेही super parents आहात.
Best wishes to you and your family!

Sunidhee
Wednesday, December 06, 2006 - 4:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाप रे supermom माझी बोलतीच बंद झाली. काय काय दिव्यातुन जावं लागले तुला!!! पण तुझ्या कष्टांची फळं किती गोड मिळाली ना. (आता ती फळं आम्हाला पण पाहु दे जरा:-)) बाळंतपण म्हणजे बाईचा दुसरा जन्म म्हणतात ते किती खरं आहे.

Disha013
Wednesday, December 06, 2006 - 5:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुपरमाॅम,ग्रेट आहेस खरी! माझ्या बाळंत्पनाच्या वेळी व्हिसा प्राॅब्लेम मुळे आई येवु शकली न्हवती. आम्ही दोघांनी मिळून केले सगळे. त्या दिवसात रात्री जागवणे काय असते,अजुनही विसरलेली नाही. माझे नशीब चांगले होते की दोन्ही प्रेग्नन्सीत problem आले नाह्हीत. तरीही मला वाटायचे की मी किती great ! तुझा अनुभव वाचल्यावर आता नाही वाटत तसे....:-)तु तर दोन,दोन बाळे कशी संभाळलीस गं? पण चला,एक्बरे आहे,...मुलगा पण आणि मुलगी पण! :-)तुझ्या सुपर फ़ॅमिलीला खूप खूप शुभेच्छा!

Adtvtk
Wednesday, December 06, 2006 - 5:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरच ग खुप great आहेस. मला फ़क्त diabetes झालेला पण प्रचंड काळजी वाटत रहायची. तुझ्या मनस्थितीची तर कल्पना पण करवत नाही. खुप धीरची आहेस.
माझे पहीले miscarriage झाले होते. पण ३ महीन्यानंतर माझा पहीला ultrasound करताना doctor ने हे find out केले. त्यामुळे मी पण माझ्या दोन्ही pregnancy अजिबात enjoy केल्या नाहीत आणि वर बाकी त्रास होतेच


Tustin1
Thursday, December 07, 2006 - 12:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

supermom tumhi doghapan great haes g.tu he sarv kas sahan kel asashil g.vachata vachata kharac mala tar radaylac aal.tumhi dogha ani tumache dwidal sukhat raho hic devala prarthana.

Savyasachi
Thursday, December 07, 2006 - 5:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

really touching !
and good to know that everything went safe :-)

Maku
Friday, December 08, 2006 - 3:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला कोनी मदत करू शकेल का...
मला पन कथा लिहय्ची आहे... पन ति कुथे जाउन लिहायची ते मला कोनी तरी सानगता का ....
plzzzz
mi star new thread madhe jaun type kele tari pan yeth nahi aahe ....

Dineshvs
Saturday, December 09, 2006 - 7:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुपरमॉम, आता ५ वर्षानी सगळे एन्जॉय करता येतेय.
ईथे मला एक छोटिसी गोष्ट लिहावीशी वाटते, एक फ़र्टिन, नावाच्या गोळ्या असतात, त्या घेतल्या, कि साधारणपणे मल्टिपल प्रेग्नन्सी होते.


Zakasrao
Monday, December 11, 2006 - 1:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

supermom ग्रेट.
तुम्ही तुमचा id असा का घेतला ते आता कळाले. आता तुमच्या twin चा व तुमचा एक फोटो पहायची ईच्छा आहे.
hats of to all your greate family


Kukku
Monday, December 11, 2006 - 5:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खुपच सुदर मी हे समजु शकते कारण मी पण ह्या सगळ्यातन गेले आहे. माजी पण अगदि अशीच अवस्था होती, त्यात पहिलि ट्युबनल प्रेगनानसि.

Srk
Monday, December 11, 2006 - 5:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुपरमॉम खुप सहन केलस गं. तुझ्या बाळांची नावं काय?




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators