Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 04, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » मार्गशीर्ष » कथा कादंबरी » विषामृत... » Archive through December 04, 2006 « Previous Next »

Lopamudraa
Thursday, November 23, 2006 - 10:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

" हुश्श... दमलेय ग पोरींनो त्रास नका.. देउ बर..!!! "
मी माझ्या लाडक्या.. लेकींना दम भरला...
सई आणि साती माझ्या जुळ्या लेकी काही एक ऐकायला.. तयार नव्हत्या.. " आमच्या सोबत खेळ. " . एव्हढा एकच धोशा लावला होता त्यानी..
" आताच तर सामान येउन पडलय.. अजुन पुर्ण साफ़्सफ़ाई सुध्दा झाली नाही....तुमच झाल सुरु हु दु दु...! जरा शांतता लाभु द्या वैजयंताकाकु.........तुमचा चहा राहिला असेल तर माझाही ठेवा.. " मी ओरडुन माझ्या स्वयंपाकाच्या काकुंना सांगितले.., भारीच चहाबाज आहेत काकु.. दर तासाला चहा लागतोच..!!!
काकुंचा काहीच आवाज आला नाही की भांड्यांची खुड खुड ऐकु आली नाही..!!!
इथे तर अजुन ओळखी व्हायच्या आहेत, त्यामुळे शेजारी गेल्या असण्याची शक्याता.. कमी.., " कस व्हायच इथल्या शेजार्‍यांच " ...!!! मी माझ्याशीच पुटपुटले.. काकुंना भारी बोलायला लागत मग त्या समोरच्याचा अजिबात विचार न करता आपल्या बोलत बसतात.. समोरचीव्यक्ती त्यांचे बोलणे ऐकतेय की नाही या कडे.. तर बर्‍याचदा त्यांचही लक्ष नसत आणि त्या व्यक्तीच पण...
देवा वाचव माझ्या शेजार्‍यांना..!!!
तेव्हढ्यात दाराचा आवज आला.. तर काकु.. हातात रिकामी वाटी घेउन बाहेरुन येताहेत. मी काही विचारायच्या आतच त्यांचा चेहरा.. काहितरी वेगळेच बोलत होता.. त्यांनी मला हाताला धरुन बळेच kitchen मध्ये नेले.. " अग साखर संपली होती. "
" आणि तुम्ही लगेच शेजारी मागायला गेलात "
माझा आवाज चढलेला.. पाहुनही त्यांना काही फ़रक पडला नाही..
" अग हो पण पुढे ऐक ना.. म्हटल ओळख होइल उद्याला भाजी वाल्याची दुध्वाल्याचि चौकशी करता येइल..
" आहो पण काकु रात्रीचे साडेआठ वाजलेत
" फ़क्त साडे आठच वाजलेत ना...!!! आणि त्यांन्चा light सुरु दिसला मला..म्हणुन गेले होते.. इथुन मला खिडकीत हालचालही दिसली होती.. ,दुपारी तुमची गाडी यायच्या आत मी सामानाच्या गाडी बरोबर पोहचले ना तेव्हा तर त्या घरातल्या बाईची ओळख झाली माझी.... " काकुंनी आवेशाने सांगितले.. " रीटायर नवरा बायको तर आहेत तेव्हढच माझ्या जाण्याने त्यांना बर वाटेल.. "
काकुंचा अजुन एक (गैर)समज होता..कि त्यांच्या गप्पांन्नी सगळ्याना.. खुप बर वाटत आणि मी तो कधी दुर करायच्या भान्गडीतही पडले नव्हते.
त्या गप्प बसायच्या तर फ़क्त अमर समोर... अमर अरेच्चा... मी तर माझ्या नवर्‍याला या सामान लावण्याअच्या भानगडीत विसरुनच गेले होते..!!!
काकुंच्या नादी न लागता.. मी अमरला फोन लावु लागले.. नंतर त्यांच्याशी बोलण्यात आणि मुलिंना झोपवण्यात मी काकु काय सांगत होत्या विसरुनही गेले..
आणि थोड्यावेळात अमर घरी येउन पोहचल्यावर काकुंनी खिचडीचा कुकर चढवला..त्यांन्तार आम्हाला वाढुन त्या झोपायला निघुन गेल्या... रात्री त्या फ़ारश्या जेवत नसत..!!!
त्या नव्या घरातल्या नव्या गावातल्या पहिल्या दिवशी कांकुंचे बोलणे पुर्न न ऐकल्यामुळे.. काही फ़रक पडणार आहे अथवा भविष्यातल्या काही (?) गोष्टीची ती लवकर मिळालेली सुचना आहे अशी पुसटशीही शंका यायचे कारण नव्हते..!!!
(क्रमश:


Prajaktad
Friday, November 24, 2006 - 11:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा!सुरवात तर छान झालिय आता जावु दे कथेची गाडी जोरात.....

Shyamli
Saturday, November 25, 2006 - 1:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

madamसुरवात तर छान झालिये पण पुर्ण करा लवकर

Mrudgandha6
Saturday, November 25, 2006 - 3:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


छान ग लोपा,सुरुवात उत्कंठावर्धक आहे.


Fulpakhru
Tuesday, November 28, 2006 - 10:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा लवकर टाक ना पुढचा भाग. खूप उत्सुकता वाटते आहे.

Maku
Tuesday, November 28, 2006 - 11:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान लिहिले आहे.
लवकर पुधचा भाग येउ दे लवकर .


Princess
Wednesday, November 29, 2006 - 1:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा लिही ना ग लवकर... आम्ही वाट बघतोय...:-)

Lopamudraa
Wednesday, November 29, 2006 - 4:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुढचे दोन दिवस अमरनी रजा घेतली होती, आम्ही दोघही आमच्या आम्च्या job वर जायची तयारी करु लागलो..
दुसर्‍या दिवशी मात्र.. काकु सकाळीच म्हणाल्या.. " हे बघ बाई साखरेचा डबा मला कायी गवला नाही तु जावईबापुंना पाठव जरा... "
काकु आईच्या माहेरुन (माझ्या अजोळाहुन) आमच्याकडे आल्या होत्या.. त्यामुळे.. माझ्या नवर्‍याला त्या जावईबापुच म्हणत... आणि त्याच्या समोर नेहमी गप्पच रहात..
" काहो शेजारी गेल्या होत्या ना तुम्ही मागायाला... "
मी त्यांना थोडे चिडवले..
" अग्गो बाई... जाउदे.. रात्रीचे उगाच गेले बाई.., मला काही भास झाला वाट्टे? कोण जाणे.. " आमर असल्याने त्या फ़ार काही न बोलता पसारा आवरायला लागल्या...
माझी या गावी college मध्ये नेमणुक झाली.. आधीच्या गावाहुन ६० Km वर...!!
मग अमरने up down चा निर्णय स्वताकडे घेतला... आणि आम्ही इकडे shift झालो..
शिकवणे हा प्रकार मला फ़ारसा आवडत नसला तरी मी collage मध्ये चांगली रुळले. मुली पण शाळेत जाउ लागल्या.. आणि त्याही रमल्या. आमरला जा ये मुळे मात्र रात्री थोडा उशिर होउ लागला..
रहता राहिल्या काकु.. त्यांना मात्र अजुन पाहिजे तशा ओळखी होत नव्हत्या.. डविकडचे शेजारी ससे काकु.. आणि काका.. जे आजारी असल्यामुळे कधी घराबाहेर पडायचेच नाहित. काकुंना बर्‍याचदा.. आम्ही जातायेता.. बोलावायचो पण अ.. ह.. काही थांग लागु द्यायच्या नाहीत त्या.. दुसरे शेजारी.. दोघेही नोकरीवाले असल्यामुळे.. फ़ारसे भेटले नाहित कधी.... आता इथे येउन १५ दिवस झाले होते...
" तेजु... तुला.. त्या ससे बाई.. कशा वाटतात ग,मला तर बाई अजिबात वाटत नाही त्या retitre आहेत म्हणुन.. दिसते कशी जुन्या काळातल्या खाष्ट सरदारणी सारखी.. ,लबाडच वाटते नायी.. काग..?दागिने तर कित्ती बाई अंगावर.. त्यांचीमुलगी पाहीली का.. ग.., तीही मला तितकीच लाबड वाटते.. पण आई इतकी गोरी ती मात्र काळी ढ्हुस्स.. अगदी.. !!नवरा तर अगदी गप्प बिचारा दिल्या भाकरीचा.. राहतो. "
आता मात्र काकुंच्या बोलण्याचा.. कहर.. झाला...
" किति मेलं ते एखाद्याचा दुस्वास करणं.. तुमच्याशी ती बाई निट बोलत नाही म्हणुन एव्हढा गहजब करायच काय कारण? " आपल्यला येउन दोन आठवडे झाले नाहित तोवर सगळ्यांनी आपल्याशी बोलावच हा हट्ट का म्हणे?
या वर काही न बोलता काकु खाली मान घलुन झाडत राहिल्या..
मी काकुंना दटावले खरे पण मलाही ससे बाइ थोड्या वेगळ्याच वाटल्या.. पहिल्या दर्शनात नजरेत भरले ते त्यांचे सौदर्य.. तरुण असतांना किती सुंदर दिसत असतील.. हा विचार मनात येत असत्तंना त्यांच्या निळ्या. डोळ्यात कुठेतरी वेदना तरळल्याचा भास होता होता कृर काहीतरी चमक दिसु लगायची इतकी की... तेव्हा त्यांच्याकडे बघणे.. नकोसे व्हावे.., कोडेच होते ससे काकु म्हणजे.. !!!
झाडता झाडता काकु मागील दारी गेल्या.. ..तशा तीथुअनच हाका मारु लागल्या.. " तेजु इकड ये आधी इकड ये... बघ ह्या भिंतिवरुन.(कंपाउन्ड च्या). खरकट फ़ेकलय बघ..
पलिकडच्या ससेंच्या बाजुन.. आमच्या.. आवारत पोळीचे तुकडे भात अस काय येउन पडल होतं...
" तीचच काम आसन.. ,शेजार्‍यांशी धड बोलायला नको.. आणि हे आस...!! "
" काकूऊ उ... गप्प बसा...!! " हे अस खरकट येउन पडने रोज नाही पण मधुन मधुन होत राहिलं..
एकदा मी..खरकट फ़ेकणारा हात ओझरता पाहिला...
तो ससे बाईंचा नक्किच नव्हता... हातभर बांगड्या नव्हत्या.. काटकुळा.. थरथरता हात अगदी लहान मुलीसारखा वाटला मला.. पाठोपाठ लहान कृश आक्रुती दिसली नजर ठरत नाही तोवर घरात दिसेनाशी झाली..


Zpratibha
Wednesday, November 29, 2006 - 5:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा लवकर लिहि बाई, आता धिर धरवत नाहि अगदि.

Lopamudraa
Wednesday, November 29, 2006 - 6:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दुसर्‍या दिवशी रिक्षापर्यंत मुलींना सोडायला.. आले.तर ससे काकु बाहेरुन भाजी घेउन येतांना दिसल्या... नाही नाही म्हणत असतांना त्यांना चहाला.. घरात घेउन गेले...
" अहो शेजारीच तर सर्व काही असतात.. नातेवाईक तर फ़ार लांब रहातात... अजुन बरच काही.. बोलत राहिले.. त्यांच्याशी...
पण मला वाटल त्यांच लक्षच नाहिये माझ्या बोलण्याकडे.. माझ्या अघळपघळ गप्पांना सावधपणे उत्तर देत होत्या. त्यांचे माहेर कलकत्याच्या आसपास.. आहे म्हणाल्यात.. आणि लग्न करुन इकडे महारष्ट्रात आल्यात.. शाळेत शिक्षिका.. म्हणून होत्या.. सध्या retire आहेत.. म्हणाल्यात..
आमच्यात चहाचे कप घेउन वैजयताकाकु.. येउन मिसळल्या.. मग काय.. त्यांची गाडी सुसाट सुटली.. तरी मी काकुंना खुणा करत राहिले.. जरा कमी बोला.. म्हणुन,... पन कसल काय.. त्या.. कुठे माझ्याकडं लक्ष देतायत.. तेव्हढ्यात काकुंनी " कुत्र हे का हो तुमच्याकडं.? " . असा असंबध्द प्रश्न टाकला..
त्यावर मीच काय.. ससेबाई पन गोंधळल्या... त्यांच्या उत्तराची वाट न बघता.. काकुंचे चालुच होते.. " नाही एकदा.. आमची साती खेळता खेळता तुमाच्या बागेत शिरली तीला आणायला.. मी तीच्या पाठोपाठ गेले तर मला कुत्र विवळण्याचा आवाज आला.. आणि पहिल्यांदा रातीला.. मी तुमच्या घरी साखर आणायला... आले ना तवा तर.... ".
काकुंचे बोलणे पुर्ण व्हायच्या आत.. ससेबाइ ताडकन उठुन उभ्या राहिल्या.. " हे घरात एकटेच आहेत.. मला निघाल पाहिजे.. " म्हणुन तरातरा.. दार उघडुन मागे वळु नही न बघता.. चालु लागल्या.. तर न राहवुन मी कालची ती मुलगी आठवुन " तुमची मुलगी पण बाहेर गेलिये.. का? " .. असा विचाराय्चा प्रयत्न केला.. पण नुसतच होची मान हलवत त्या त्यांच्या त्या.. विचित्र रंग दिलेल्या घरात नाहिशाही झाल्या..
मी माघारी वळले तर.. कसलीशी किल्लि दिसली मला..सोफ़्यावर,.. " राहिली वाटते ससे बाईंची.. "
" मी नाही जायची द्यायला.. तीच्याकड.. ती चाबी.. " ..काकु झाल्या प्रकारातुन अजुन बाहेर आल्या नव्हत्या.. आता तर त्यांचा ससे बाईबद्दलचा राग आजुन उफ़ाळुन आला असेल.. मीच जाते लगेच.. मलाही थोड्यावेळाने निघयचय.. म्हणत मी ससेंच्या दारात जाउन पोहचले.. दार लोटलेलेच होते.. मी हळुच उघडुन त्यांना आवाज दिला...
घरात अंधार दाट होता.. एव्हढ्या सकाळी.. छान कोवळे उन घरात घ्यायचे तर.. दार खिडक्या बंद करुन काय बसतात लोकं.. आणि अंधारातुन.. अचान्क दोन डोळे.. माझ्या कडे बघतायत चा भास.. होउन मी जागिच थांबले.. एक अशक्त मुलगी अंगावर साडी होती बहुतेक.. अंधारात.. निटसा रंग रुप काही कळले नाही पण तीची नजर थिजलेली वाटली.... अर्थहीन, निर्जिव...
" घे चावी, ससेबाई विसरल्या होत्या आमच्याकडे.. .. मुलगी का ग तु त्यांची "
माझ्या बोलण्यावर ती इंचभरही जागची हलली नाही तीची नजर.. आता माझ्यामागे वळली होती आणी त्यात फ़क्त भयंकर भिती गोठुन आल्यासारखी वाटली मला... ,असाहाय्य्य मी मागे वळुन बघितले.. ससे काकु उभ्या होत्या... त्यांचे निळसर डोळे.. वेगळ्याच भावनेने चलाख.. कृर की वेदना... काही कळल नाही असे चमकत होते..
त्या विचित्र वातवरणात उगाच काही न सुचुन मी बोलुन गेले.. " मुलगी ना तुमची "
" हो, मुलगीये माझी.. " अस त्या बोलल्या खर आणि किल्लिसाठी हात पुढे करतांना त्यांच्या चेहर्‍यावर मी तीथुन लगेच निघुन जावे हा.. भाव मला स्पष्ट दिसला....!!!
क्रमश्:


Chinnu
Wednesday, November 29, 2006 - 11:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विषामृत.. लहानपणी हा शिवाशिवीचा खेळ खुपदा खेळायचो आम्ही!
दीर्घकथा लिहायचा मानस दिसतोय. येवु द्या पुढे!


Dineshvs
Wednesday, November 29, 2006 - 11:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा, छान रंगत येतेय.
चिन्नु, तो खेळ आम्हीहि खेळायचो.


Fulpakhru
Wednesday, November 29, 2006 - 3:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा छान चालु आहे. लवकर लवकर लिही

Lampan
Wednesday, November 29, 2006 - 11:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगं किती हळु हळु लिहितियेस !!! हात चालव कि जरा ( हाताबरोबर डोकही चालवावं लागतं असा dialogue नको टाकुस ह्यावर )

Kukku
Thursday, November 30, 2006 - 3:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा लवकर लवकर लिहि. फार सुदर कथा आहे

Srk
Thursday, November 30, 2006 - 4:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा, वाचतांना काटा आला सरकन. आम्हीही विषामृत खुप खेळायचो.

Sashal
Thursday, November 30, 2006 - 12:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा, सॉरी हं, तू एव्हढी छान गोष्ट लिहित आहेस पण वाचताना विचित्र वाटतं .. कुठेही मध्ये '....' देतेस त्यामुळे वाक्यं तुटल्यासारखी वाटतात ..

मी कुठला तरी एक हिंदी सिनेमा बघितला होता ज्यात शक्ती कपूर की तत्सम कोणत्यातरी actor चं एक character दाखवलं होतं .. तो बोलताना असं मध्ये मध्ये कुठेही उचकी लागल्यासारखं बोलायचा .. त्याची आठवण आली ..


Asmaani
Thursday, November 30, 2006 - 2:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरंच लोपा, अशी मधेच टिंबं नको टाकत जाऊस. मधेच लिंक तुटल्यासारखी होऊन रसभंग होतो. रागवू नकोस हं! आणि पटकन टाक ना पुढची कथा! उत्सुकता फार वाढलीये!

Maku
Thursday, November 30, 2006 - 11:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोनिच क पुर्न करत नहि आहे कथा.

Asmaani
Monday, December 04, 2006 - 9:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा, काय झालं? दमलीस का विषामृत खेळून? अगं येऊ दे ना पुढचं लवकर!




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators