Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
विषामृत...

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » मार्गशीर्ष » कथा कादंबरी » विषामृत... « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through December 04, 200620 12-04-06  9:23 am

Lopamudraa
Monday, December 04, 2006 - 10:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाहि ग दमली लिहिण्याची practice करत होते..
आधी सगळ्यांना धन्यवाद. तुमच्या प्रतीक्रियांनी (पहिलिच )कथा लिहायला प्रोत्साहन मिळाले.


Manishalimaye
Monday, December 04, 2006 - 11:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ए लोपा लिही ना ग पुढचं लवकर.

Rupali_rahul
Tuesday, December 05, 2006 - 1:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा, अगं लिहि कि पटपट. वाट बघुन दमलोय आम्ही आत्ता...

Lampan
Tuesday, December 05, 2006 - 3:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुढची कथा मी लिहु का

Patilchintaman
Wednesday, December 06, 2006 - 2:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा कथा चांगली जमू लागली आहे. तिकडे गावाकड्ची १ ली गोष्ट संपली. दुसरी लवकरच. फक्त रोमन ते देवनागरी कसं करु ते सांग ना! हे फार अवघड वाटतं.

Lopamudraa
Wednesday, December 06, 2006 - 4:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिंतामण देवनागरीतुन लिहायला दुसरा कोणताच उपाय नाही. हे शुध्द लिहायला देवनागरीतुन कसे लिहावे
हा हितगुज वरचा टाॅपिक वाच.
नाहितर बरहा हा font download करुन घे.
मलाही खरतर ट्याइपायचा कंटाळा येतो म्हणून चुकापण जास्त होतात.
मंडळी very very sorry सोमवार्शिवाय लिहायला जमणार नाहिये. कारण माझा tutar मानगुटीवर बसलेला आहे assingment साठी.
पण पुढच्या आठवड्यात नक्कि लिहिन.


Sahi
Wednesday, December 06, 2006 - 1:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटायला लागले आहे कि ह्या लेखक मन्ड्ळीसाटी एखादी सोय हवी की जेथे ह्यान्ना त्यान्च्या कथान्चे भाग सवडीनी लिहिता आणी स्टोअर करता येतील.कथा पुर्ण ज़ाली की पब्लीश बटन दाबायचे की आम हितगुजकरान्ना अखन्ड वाचता येतील. माज़्या ओनलाईन क्लासमधे टर्म पेपर साठी ही सोय आहे

Asmaani
Wednesday, December 06, 2006 - 2:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो ना सही! अगदी सहमत आहे मी मार्गशीर्ष महिन्यात तर एक से एक interesting कथा चालू आहेत. रोज आपले सकाळी उठले की दात सुद्धा न घासता मी आधी मायबोली ला log in करते. आणि पुढे काही progrress दिसली नाही की निराश होते.

Prajaktad
Monday, December 18, 2006 - 6:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा इतकी चांगली सुरवात करुन मधेच गायब???...लिही पुढचा भाग पट्पट

Dineshvs
Monday, December 18, 2006 - 11:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sahi एकदम योग्य सुचना. अश्या उत्कंठावर्धक कथा, एका दमातच वाचायला मिळाल्या पाहिजेत.

Lopamudraa
Tuesday, December 19, 2006 - 5:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी ही तीथुन झटकन वळले, घरी आले तेव्हा माझ्या मनात वेगळीच उगाच्चच अस्वस्थता पसरली होती.
ससे बाईंची मुलगी अशी कशी?.. लग्न नाही झालेले कि सासरच्या त्रासाला कन्टाळुन घरी आलेली आहे?.. की कुठल्या असाध्य आजारान पिडलेली आहे? असंख्य प्रश्न डोक्यात धिंगाणा घालु लागले.
काही घरं बघितल्यावर वेगळीच जाणीव देतात तस ते घर मला पहिल्यापासुन उदास वाटत आल. व्हरांड्याच्या बाजुला अर्धवट बांधकामातुन उरलेले दगड वीटा.. पडलेले, त्यातुन आता आडदांड्पणे झुडप उगवलेली, बागेत कुणी फ़िरकतांना दिसत नसे. तणही खुप माजलेले व्हरांड्याला जांभळा रंग दिलेलेआ तर घराला लालसर तपकिरी, रेलिंग आणि खिडक्यांच्या ग्रिल ला पिवळाधमक... काहीतरीच रंगसंगती......
" जाताजाता मला कोपर्‍यावर भाजिवाल्यांच्या गाडीजवळ सोड..!!! " वैजयताकाकु तयार होत्या.. निघाल पाहिजे वेळ झाली.. की activaa var साडी आवरत दिमाखात बसायला काकुंना खुप आवडते, आता काकुंना आमच्या सोबत रहायला ४ वर्ष तरी झालीत थोड्या शहरी पण होतायेत त्या आता.. मगाच्या प्रसंगावरुन मात्र मला.. त्यांना त्या साखर घ्यायला गेल्या तेव्हा काय झाले हे विचारल्यावाचुन राहवले गेले नाही.
" बाई ग तेजु..!! इकडुन light चालु होता बरका.. तिकडे गेली तर अंधार गुडुप, दारात जाउन बघते तर..टाळा लागलेला.. म्हटल इतक्यात बाहेर पण गेलीत मंडळी..?
वळली तर धपकन आवज आला घरातुन म्हटल मांजर नाहीतर कुत्र असेल पाठोपाठ विवळ्ण्याचा पण आवाज आला आता म्हंत घराला तर टाळ हाये कुत्रच असेल मांजर थोडीच आस विवळत.., पण त्या आवाजन लयी भ्याले बाई जोरात चालायला लागले नी त्या.. उखडलेल्या फ़र्शा नी पसार्‍याला जाउन धडपडले बाई.. गुढग फ़ुटल माझं, रात्रीची उगिच गेले, थरकच भरल बघ मला त्या आवाजान... ! तुझ्याकडं दवा नाही मागितली सपडल ते लाउन घेतल उगाच म्हणली असती रात्रीच्या का.. धडपडायला गेल्या तिकडं म्हुन..., तो आवज लयी इचित्र होता पन..! बास इथेच थांबव ही बाई जरा चांगल्या भावात भाजी देते मी तीच्याकडुनच घेते आजच्याला गवार चालेल का तुला न जावईबापुंना, पोरींसाठी भेंडी घेती "
यावर हो म्हणा किंवा नाही म्हणा काकुंनी अजुन गवार भेंडीवर १० वाक्य तरी म्हटली असती म्हणुन फ़क्त " निघाले " म्हणत मी माझी activaa वळवली तर एक scooty वाली मला येउन धडकली. ही भाजीवाल्यांची गर्दी ना साधी two wheelar काढणं मुश्किल असते यातुन.. काकु मात्र स्कूटी वालिला काय कस काय? असा हात करत होत्या.. त्या बयेन गाडी थोडी बाजुला काढुन माझ्याकडं पाहुन खांदे उडवले जशी काही सगळी चुक माझीच आहे आणी ती निघुन सुध्दा गेली
" अग हीच तर ससे बाईंची मुलगी! " ...
" काय..? " काकुंच्या बोलण्यावर माझा आ वासलेला तसाच राहिला..
म्हणजे मी जीला ससेबाईअंची मुलगी समजत होते ती आणी काकु जिच्याबद्दल बोलत होत्या ती दोन्ही मुली वेगवेगळ्या होत्या.. !!!
(क्रमशा:-)


Robeenhood
Tuesday, December 19, 2006 - 6:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा खूपच उत्कंठावर्धक!!

लोपे भयकथा लिहितेस काय धारपांसारख्या?

(खलनायकी पात्राना नगर जिल्ह्यातील आडनावे का म्हणून? सासरकडची म्हणून की काय? ए. भा. प्र. )


Dineshvs
Tuesday, December 19, 2006 - 12:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा, सगळी लिहुन मग परत एकदा सलग पोस्ट कर ना. आम्ही थोडे दिवस वाट बघु.

Psg
Wednesday, December 20, 2006 - 12:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो लोपा, मस्त लिहत आहेस, एकदम उत्कंठावर्धक- पण सलग PC वर लिही आणि एकदम पोस्ट इथे, किंवा इथेच रोज लिही, पण सातत्याने लिही..
मस्त कथा जमलीये आत्तापर्यंत.. शेवटपर्यंत वाचायला आवडेल ही कथा :-)


Srk
Thursday, December 21, 2006 - 5:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काही बोलायाचे आहे पण (कथा संपल्याशिवाय) बोलणार नाही.

Lopamudraa
Thursday, December 21, 2006 - 7:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो दिनेशदा एकदम लिहिते पण आता सुट्ट्या सुरु झाल्या कस जमेल कोण जाणे...
srK बोलुन टाक काय बोलायचे ते... कथेसाठी सुचना अस्लेल तर mail केली तरी हरकत नाही...


Srk
Sunday, December 24, 2006 - 12:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा, अगं मधे ईतके दिवस वाट पाहुन अंगावर आलेला काटा गळुन गेला होता, पण हा भाग वाचुन परत मजा आली. मात्र आता पटापट लिही. प्लीज.

Gajanan1
Saturday, December 30, 2006 - 11:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता सुट्ट्या सुरु झाल्या.. कसे जमणार लिहायला.....

... म्हणजे office मध्ये बसुन कथा post करत असता की काय!! :-)

खूप छान आहे कथा....






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators