R_joshi
| |
| Sunday, November 26, 2006 - 11:23 pm: |
| 
|
जो, शलाका फार छान मिलिंद तु कसलि टेस्ट घेतो आहेस? तुझ्या डोळ्यात पाहिले मला मी न दिसले अश्रुंच्या संतत धारेत बहुतेक मी ही वाहुन गेले. प्रिति
|
Daad
| |
| Monday, November 27, 2006 - 12:45 am: |
| 
|
आहा!! हो रे.... हसराच होता माझाही! पण अश्रूंत न विरघळणारा मुखवटा तुला कुठे मिळाला? -- शलाका
|
Daad
| |
| Monday, November 27, 2006 - 12:48 am: |
| 
|
इथल्या खिडकीतून पाहिलेत खूप पावसाळे यावेळी मात्र... खिडकीच वाहून गेली... -- शलाका
|
Jo_s
| |
| Monday, November 27, 2006 - 1:36 am: |
| 
|
आता सगळीच मनं,डोळे इतके आटलेत म्हणूनतर अश्रूस्पेशल मुखवटे आम्ही बनवलेत घेता का घेता? पाहीजे तो मिळेल प्रसंगानुरूप, हवेतेवढेच, अश्रू तो ढाळेल हो, हल्ली त्यालाही पैसे पडतात फायदा नसेल तर तिथे अश्रूही अडतात सगळ्या प्रकारचे अश्रू आमचेकडे मिळतील त्याच्या साठी त्यांचे रिमोटही मिळतील वैयक्तीक दु:खासाठी घळाघळा आसपासच्यांसठी थोडे कमी ढाळा सामाजीक प्रश्ण? फक्त डोळे पाणावतील लुच्चे असाल तर मगरीचेही मिळतील अजूनही आहे बरीच व्हरायटी फक्त तुम्ही मागायची खोटी बालकांच्या डोळ्यांतून म्हणे पडतात निर्मळ मोती अशीही एक डिमांड पुर्वी आली होती माफ करा, आमचेकडे तेवढीच कमी आहे हां पण खात्री बाळगा बाकी साऱ्या्ची मात्र हमी आहे बाकी साऱ्या्ची मात्र हमी आहे सुधीर
|
R_joshi
| |
| Monday, November 27, 2006 - 4:00 am: |
| 
|
सुधीर अश्रुंचे अप्रतिम वर्णन केलेस. फारच छान. शलाका तु ही छान लिहिलेस.
|
R_joshi
| |
| Monday, November 27, 2006 - 4:11 am: |
| 
|
मुखवट्यांचे काय भावनांन प्रमाणे ते हि बदलता येता अश्रु जरि कधी प्रामाणिक असले तरी मुखवट्यांमुळे ते 'नकलि' वाटतात. एखादा मुखवटा कधी खरही बोलत असतो पण सर्वांनाच पटत नाही मुखवट्यांच्या दुनियेत हे असेच घडत असते. प्रामाणिकपणा ही इथे खोटा ठरत असतो मुखवट्यामुळे प्रत्येकजण 'नकलि' वाटत असतो. प्रिति
|
मुखवट्यांमागील सत्य कोणी जाणिले??? अंतर्मनातील दु:ख कोणी जाणीले??? रुप...
|
Daad
| |
| Monday, November 27, 2006 - 5:34 pm: |
| 
|
सुधीर, 'अश्रूस्पेशल मुखवटे ' छानच. कवितेच्या BB मध्ये टाका ना! प्रिती, रूप मस्त!
|
Jo_s
| |
| Monday, November 27, 2006 - 11:22 pm: |
| 
|
धन्यवाद प्रिती आणि दाद सुरुवातीला फक्त पहील्या ४ ओळी लिहीणार होतो. पण मग एकदम लिहीतच सुटलो.
|
R_joshi
| |
| Tuesday, November 28, 2006 - 5:47 am: |
| 
|
माझी सावली ही मज न ओळखे का मानते मी स्वत:इतके परके मानते
|
R_joshi
| |
| Tuesday, November 28, 2006 - 6:04 am: |
| 
|
अबोल शब्दांचे अर्थ ओठांनाही उलगडत नाही धुंद एकांत रात्रित मनाला आवरल जात नाहि जवळ तु नाहिस हे जरी सत्य असल तुझ्या आठवणिंपासुन मनाला आवरल जात नाहि इतकी दुर जाशिल अस स्वप्नातही वाटल नव्हत एकटा मी या जगति मनाला हे पटत नाहि मन माझे तुझ्याशिवाय आता राहत नाहि विलिन तुझ्यात होण्यापासुना मनाला आवरल जात नाहि प्रिति
|
वैयक्तीक दु:खासाठी घळाघळा आसपासच्यांसठी थोडे कमी ढाळा>>... khup chaan .. priti tu pan chaan lihileyas... shalaakaa tar prashnach naahii..
|
सापेक्षतेच्या झाकणाखालून ते थुंकतात माझ्या चेह-यावर मुसळधार.. कारण चेह्-यावर मुखवटे लावून मी फ़िरत नाही त्यांच्यासारखा नागडा! ---मयूर
|
Meenu
| |
| Wednesday, November 29, 2006 - 11:18 pm: |
| 
|
अजुनही त्याची वाट पहात .. ओठंगुन ती, उभी उंबर्याशी .. अजुन, उंबरा ओलांडायचे, धैर्य कुठे तिच्यापाशी ...?
|
R_joshi
| |
| Wednesday, November 29, 2006 - 11:24 pm: |
| 
|
स्वत: पालवायचे ठरवल्यावर आत्मविश्वास जागा होणारच पलवित नव्या पालविसम तो बहरत जाणारच. प्रिति
|
R_joshi
| |
| Wednesday, November 29, 2006 - 11:28 pm: |
| 
|
मी एकटी उभी उंब-यापाशी अन वाट हि दुर जाते अनोळखि ह्या वाटेवरुनी येईल कधि ओळखिचे नाते... प्रिति
|
.... अनोळखि ह्या वाटेवरुनी येईल कधि ओळखिचे नाते... केवळ अप्रतिम...
|
कोमात गेलेल्या पापणीखालून अश्रुंचा जन्म व्हावा... तसं तुझं जिवंतपण, आणि जिवंत डोळ्यात विस्तव भडकावा.. तसं माझं मरण... -मयूर.
|
R_joshi
| |
| Thursday, November 30, 2006 - 4:13 am: |
| 
|
डोळ्यातुन विस्तव भडकला तर तो आगिला जन्म देतो मरणाच्या वाटेवर असतानाही माणुस नव जन्माचे स्वप्न पाहतो. प्रिति
|
गर्भस्थांच्या स्वप्नामध्ये माझा जन्म झाला होता, वास्तवाच्या वाटेवरून अंत जवळ आला होता. ----मयूर
|