|
Psg
| |
| Tuesday, November 28, 2006 - 6:09 am: |
| 
|
"हा बघ नवा Dinner Set.. Treo चा आहे, १८ नग आहेत, २५०० पडले.. " मधुनी casually सांगीतलं.. "२५००?? इतके?? " अमितचे डोळे विस्फ़ारले आणि आवाज चिरकला.. "अरे इतके लागणारच की.. तरी मी La Opala च घेतला नाही.. त्याला सहज ५००० पडले असते.. आणि मी विचारलं होतं की तुला फोनवर.. लक्ष कुठे होतं तुझं??" झालं!! हा प्रश्न आल्यावर अमितची सपशेल शरणागती! अमित एक हुशार, कर्तबगार, स्मार्ट असा मुलगा होता.. त्याबरोबरच थोडा वेंधळाही होता. एकाच वेळी अनेक गोष्टी करायची आपल्यामधे क्षमता आहे असा समज होता त्याचा. या भरात काय व्हायचं की त्या सगळ्याच गोष्टी काहीकाही वेळा अपूर्णं रहायच्या आणि मग एकदमच सगळ्या अंगावर धावून यायच्या.. मग याचीही धावपळ सुरु.. म्हणजे एकाच वेळी ऑर्कुटवर टवाळक्या करायच्या, त्याच वेळी टीम मधल्या ज्युनिअरचे appraisal करायचे, yahoo messenger वर गप्पा हाणायच्या, कॉफी प्यायची, एका कानात गाणी आडळत असायची आणि दुसरा कान मधू फोनवर जे बडबडत असायची ते ऐकायचे काम करायचा!! यात मग कॉफी गार व्हायची, appraisal मधे काय लिहायचे कळायचे नाही, ऑर्कुटवर आपण नक्की कोणाशी काय बोलतोय उमजायचं नाही आणि मधूचे फोनवर सत्राशेसाठ प्रश्नं! मग कशीबशी कॉफी गिळायची, मधूच्या सर्व प्रश्नांना 'हो' म्हणायचं, ऑर्कुटवर साईन आऊट व्हायचं आणि नीटपणे appraisal कडे वळायचं. पण हा उत्साह हातातले महत्त्वाचे काम संपेपर्यंत किंवा मार्गी लागेपर्यंतच टीकायचा.. appraisal झालं, किंवा code मधे सुधारणा करून झाल्या की अस्वस्थ व्हायचा हा.. मग पुन्हा yahoo, msn, orkut सुरू! यात तो मधूला नक्की कशाकशाला 'हो' म्हणलाय हे त्याच्या लक्षात यायचं नाही आणि वरच्यासारखे प्रसंग निर्माण व्हायचे.. हेच कशाला, तो मधूला लग्नालाही 'हो' असच म्हणाला होता!! मधु, म्हणजे मधुरा त्याची मैत्रिण होती, गोड होती, आवडायची त्याला. तिलाही तो. त्याच्या वेंधळ्या स्वभावाची तेव्हा तिला थोडी थोडीच कल्पना होती. अमित या नोकरीत चांगला स्थिरावला होता. हे सगळे वरचे उद्योग सुरू केले होते नुकतेच. मधु त्याच्या ग्रूपमधे होती. ते नियमीतपणे भेटायचे, फोनही चलू असायचेच. मधुला अमित आवडायचा, पण हा बाबा काही पुढचे पाऊल टाकायला तयार नाही. त्याला ती आवडते हे तिलाही कळले होतेच एव्हाना. मग अडखळायचे कशाला? तिने एक दिवस त्याला फोन केला. अमित नेहेमीप्रमाणे ४ उद्योगात होता.. मधूनी normal च सुरुवात केली.. अमित 'हो', 'हो ना', 'हं' अश्या टाईपची उत्तरं देत होता. मधूनच एखादं वाक्य टाकत होता आणि मधूच्या संभाषणाची गाडी भरधाव सुटत होती.. आणि अचानक मधुनी बाँब टाकला.. "अमित, मी तुझी सहधर्मचारिणी झाले तर तुला आवडेल का?" सहधर्मचारिणी!!! च्यायला.. हे काय असतं? अमितची दांडी गुल! त्याला झेपलाच नाही मधुचा प्रश्न.. पण तिलाच कसा अर्थ विचारणार ना.. गूगल कशासाठी असतं? त्याने सर्च मारला.. हा शब्द काही सापडला नाही, पण 'धर्म'चा अर्थ, इंग्रजी स्पेलिंग असल्यामुळे 'अचार'चा अर्थ असे अनेक ऑप्शन त्याला मिळाले. मग त्याच्या 'तल्लख' मेंदूने फ़ोड केली- 'सह' म्हणजे बरोबर.. हा शब्द त्याला माहित होता सहकुटुंब या शब्दामुळे.. धर्म म्हणजे देवधर्म वगैरे, म्हणजे आपल्या दृष्टीने देवळात जाणे, आणि चारिणी म्हणजे असेल असलच काही चरणांशी म्हणजेच पायांशी संबंधित! हां.. असं असेल की 'देवळात तू जेव्हा जाशील तेव्हा मी तुझ्याबरोबर येऊ का?' च्यायला असं विचारत्ये होय ही.. अमितला सुटल्यासारखं झालं.. "होऽऽऽऽ. का नाही? अगं नाहीतरी मला एकट्याला बोरच होत असतं आजकाल. बिन्धास्त!" "अय्या!" मधू लाजलीच. हे इतकं सहज होईल असं वाटलं नव्हतं तिला.. "अरेच्च्या लाजतेस काय? तू खास मैत्रिण ना माझी.. तुला का आणि कशाला नाही म्हणीन मी!" अमितचा पतंग उडत होता.. इतक्यात यहूवर जुने मित्र आले conference करायला..मधूला त्याने कटवले आणि तो तिकडे रमला.. रात्री बाबांचा फोन! "चिरंजीव! कळलं आम्हाला.. हॅहॅहॅ" बोंबला! काय कळलं नक्की यांना आणि हे हसत का आहेत असे? अमित पुन्हा एकदा गोंधळला.. त्याने एक 'हो का' चिकटवले.. बाबाही सुटले.. "अरे त्यांचा फोन आला म्हणून समजले. नाहीतर तू कधी सांगणार होतास? लग्न झाल्यानंतरच का? छान आहे हो मुलगी. आईलाही पसंत आहे तुझ्या एकदम. आम्ही परवा निघतोय इथुन. आम्ही आलो की त्यांना बोलावू आपल्याकडे आणि सगळं final करू.. चालेल ना? पुनर्विचार वगैरे करायचा नाही ना? आणि नकोच ते. चांगलं स्थळ आहे, आता मागे पहाणे नको, काय?" अमितला सगळेच गूगली जात होते, पण 'स्थळ' या शब्दावरून आणि बाबांच्या बोलण्यावरून त्याला अंदाज आला की च्यायला आपणच आपले लग्न ठरवले आहे आणि आपल्याला आठवत का नाहिये?? आई-बाबा परवा येत आहेत, त्या आधी तरी आठवायला पाहिजे! ये कब हुआ, कैसे हुआ?? वाट.. वाट लागली सगळी.. आपण नक्की कोणाला काय प्रॉमिस केलेय? इतक्यात आई आली फोनवर.. "अमित, तुझ्या लग्नाचे मोठे टेन्शन गेले हो! मधुराला पाहिलीये की आम्ही. मागच्या वेळी आम्ही आलो होतो तेव्हा आली होती घरी. सुरेख आहे आणि सुशीलही. थोडी खमकी वाटली, पण तुला आणेल मार्गावर. पसंत आहे.. तुला येताना बेसनाचे लाडू आणते.. तीही खाईल आणि तिला कृतिही सांगीन, म्हणजे तुला तसेच मिळतील खायला नेहेमी. करेल ना रे ती?" आयला! मधू! हुश्श्श! चालेल, मधू चालेल.. पण आपण मधूशी लग्न कधी ठरवल?? हां.. ते सकाळच 'धर्म' प्रकरण असणार! तर मुळात यांचं लग्नच हे असं ठरलेलं. अमितला मनोमन पटत होतं की असे ४ ठिकाणी हात घालू नयेत. त्याने भलते घोळ होऊ शकतात. पण म्हणतात ना.. कळतं पण वळत नाही.. मधूला त्याच्या या सवयीची कल्पना होती, पण ही सवय तिच्या उपयोगाची कशी ठरेल हे तिला अचानकच कळले.. झाले काय, लग्नाला तीन महिने झाले असतील.. मधूला आईची फ़ारच आठवण येत होती, आणि मैत्रिणींची, गप्पांचीही.. पण अमित तिला आईकडे रहायला जायला परवानगी देत नव्हता.. मी एकटा पडीन, माझे 'सगळेच' हाल होतील असं emotional blackmail करून तिचे मन द्विधा केले होते. इतक्यात मधूच्या आईचा फोन आला की मधूची आत्या येतीये रहायला, आत्तेबहिण आणि भाऊही यायचे आहेत, तर तूही ये ना ४ दिवस.. मधूला आता राहवले नाही.. तिने अमितला फोन केला.. त्यावेळी अमितचा बॉस आला होता आणि त्याला अजिबात वेळ नव्हता. एक तर काम करावे लागत होते, चॅट बंद होते, browsing करून कंटाला आला होता, डेडलाईन होतीच.. वैतागला होता बिचारा.. त्यात मधूचा फोन! बरं मधू फोनवर पटकन उरकायची नाही, अघळपघळ गप्पा.. मुद्यावर येणार नाही.. झालं सुरू आत्या पुराण, तिच्या मुलांचे कौतुक.. मग मला बोर होतय.. तु म्हणत होतास ना की आजकाल तू कोमेजल्यासारखी दिसतेस.. तर आत्याला भेटले की कसं बरं वाटेल, जाऊ का? अमितच लक्षं नव्हतच नेहेमीप्रमाणे, पण मधूनी काहीतरी प्रश्नं विचारला आहे आणि आपल्याला उत्तर द्यायचे आहे हे जाणवले त्याला.. 'हो जा जा, जाऊन फ़्रेश होऊन ये हं' असे मोठ्या मनानी त्याने तिला कटवले.. मधूचा विश्वासच बसेना.. हा समोर विचारलं की नाही म्हणतो, पण फोनवर 'हो' म्हणतो हे त्या चतुर बायकोच्या लक्षात आले. पडत्या फ़ळाची आज्ञा प्रमाण मानून ती ताबडतोप आईकडे रवाना झाली..जाताना अमितला चिठ्ठी लिहून गेली मुद्दाम.. 'तू म्हणलास म्हणून मी आईकडे रहायला जात आहे ४-८ दिवस.. एक किल्ली शेजारी ठेवली आहे. रात्री शेजारच्या काकू डबा देतील तो नीट खा हं, माझी काळजी करू नकोस!' अमित हे वाचून चाटच पडला.. त्याने ताबडतोप मधूच्या सेलवर फोन लावला.. "ए मे कधी तुला म्हणला रहायला जा म्हणून? मी म्हणल जा.." "जा काय, ते मी जातेच की अधून मधून.. असं काय रे, मी तुला specific विचार्लं होतं की आत्याला भेटायला जाऊ का? आणि तू हो म्हणलेलास.. तुला आठवत नाही का? लक्ष कुठे होतं तुझं?" अमित निरुत्तर! मग मात्र मधूला नॅक कळली.. सरळ सांगून जर अमितला काही पटत नसेल, उगाचच आखडूपणा करत असेल तो, तर त्याच्या घाईच्या वेळेत त्याला फोन करायचा, त्याचं फ़ारस लक्ष नाहिये असा अंदाज घ्यायचा आणि आपलं काम करून घ्यायचं.. नवीन पडदे शिवायचेत, थोऽऽडे महाग आहेत, पण काय हरकत आहे करायला, घर छान दिसेल.. फोनवर विचारा.. दिवाळीला छोटा दागिना करायचाय.. मान्य की सोनं महाग आहे, पन हौसेचे हेच दिवस आहेत ना.. करा फोन, लग्नाचे मानपान करायचय, लोकं जेवायला बोलवायची आहेत, आपण कुठेतरी उपस्थिती लावायची आहे, सिनेमा, नाटक पहायचे आहे.. सगळे फोनवरच!! आणि दुर्दैवानी जेव्हा जेवा अमित लक्ष देऊन ऐकायचा मधूचे बोलणे तेव्हस विशेष काही नसायचेच, सहजच फोन असायचा.. तेव्हा तो स्वत:ला बोल लावायचा की काय ही, मधू काय कामं करून घेण्यासाठीच फोन करते का आपल्याला.. आणि जेव्हा 'सहज' फोन असेल असं वाटून तो अर्धा कान तिला द्यायचा तेव्हा १०० टक्के मधू कशाचीतरी परवानगी त्याच्याकडून घेणार.. हा नंतर पस्तावणार आणि तिचं पेटंट वाक्य ऐकणार- 'तुझं लक्ष कुठे होतं' आणि गप्प बसणार.. पण त्याच्या लक्ष न देण्यानी खरच काही बिघडत होतं का? मधू सगळच मस्त मॅनेज करायची..वाट्टेल त्या, अवाजवी, अवास्थव इच्छा नसायच्या तिच्या.. पण त्यासाठी तिने थोडी कळ काढणे, हळूच विचारणे, अमित कसा वेंधळा आहे आणि आपणच त्याला सहन करू शकतो या गैरसमजात रहाणे, आणि तिचं ते लटक्या रागानी विचारणे..' तुझं लक्ष कुठे होतं?' हाय! अमित या सगळ्यावरच जाम फ़िदा होता.. त्यांचा संसार त्याच्या वेंधळेपणामुळे आणि तिच्या हुशारीमुळे व्यवस्थित सुरु होता
|
Himscool
| |
| Tuesday, November 28, 2006 - 6:32 am: |
| 
|
पुनम योग्य प्रतिक्रिया सुचते आहे पण इथे टाकण्यासारखी नाही
|
Asmaani
| |
| Tuesday, November 28, 2006 - 9:45 am: |
| 
|
सही गं पूनम मस्तच!
|
अच्छा अच्छा.. आलं लक्षात!!
|
Prajaktad
| |
| Tuesday, November 28, 2006 - 3:11 pm: |
| 
|
पुनम toooooo... good हं!
|
'सह' म्हणजे बरोबर.. हा शब्द त्याला माहित होता सहकुटुंब या शब्दामुळे.. धर्म म्हणजे देवधर्म वगैरे, म्हणजे आपल्या दृष्टीने देवळात जाणे, आणि चारिणी म्हणजे असेल असलच काही चरणांशी म्हणजेच पायांशी संबंधित! हां >> LOL
|
हं..... आलं आलं आमच्याही लक्षात आलं! 
|
Chyayla
| |
| Tuesday, November 28, 2006 - 10:50 pm: |
| 
|
पूनम.. एकदम सही आवडला तुझा लेख... मधे मधे "च्यायला" शब्द आला म्हणुन म्हटल चला असली च्यायल्यानी पण प्रतिक्रिया द्यायला पाहिजे. अजुन लिही... नशीब चारीणी चा सम्बन्ध चरण्याशी नाही लावला
|
Shonoo
| |
| Tuesday, November 28, 2006 - 11:33 pm: |
| 
|
पूनम मस्तच. अशी सगळी शिक्रेट सांगून टाकायची नाहीत बाई! तरी बरं आमच्या कडे हितगुज वाचणारी मी एकटीच :-)
|
Meenu
| |
| Tuesday, November 28, 2006 - 11:45 pm: |
| 
|
हं idea मस्तच आहे पुनम
|
Maku
| |
| Tuesday, November 28, 2006 - 11:57 pm: |
| 
|
पुनम मस्त आहे . माज़्या बहिनिचा नवरा पन सेम आहे. तिने वाचले तर हसुन वेदि होइल. खरेच छान लिहिले आहे.
|
पूनम,यात काही अनुभवाचे बोल आहेत असा मला दाट संशय येत आहे. confirm करू का खरं काय ते?
|
Deepstambh
| |
| Wednesday, November 29, 2006 - 2:25 am: |
| 
|
वा सहीऽऽऽऽ.. अखिल मायबोली महिला संघटनेच्या नेत्या सौ. पूनम यांचा विजय असो... बरं झालं सांगीतलंस ते.. पुढच्या वेळी काळजी घेऊ..
|
हां हां असं झालं होय ? तरी म्हटलं " मधू " गप्प गप्प का असतो !!!!
मस्त !!!
|
पूनम, once again cute लेख.
|
Athak
| |
| Wednesday, November 29, 2006 - 5:32 am: |
| 
|
ह्म्म असं असत होय , आल आल आमच्या लक्षात सुखी संसाराची गुरुकिल्ली
|
Chinnu
| |
| Wednesday, November 29, 2006 - 11:11 am: |
| 
|
.... .... .... ....
|
Panipuri
| |
| Wednesday, November 29, 2006 - 2:26 pm: |
| 
|
poonam, good one !! 
|
Manuswini
| |
| Wednesday, November 29, 2006 - 4:19 pm: |
| 
|
पूनम झकास.. गं आवडले आपल्याला चतुरपणा, अगं मिल्याने वाचले तर ही ट्रीक नाही वापरता येणार बघ हं
|
Manuswini
| |
| Wednesday, November 29, 2006 - 4:28 pm: |
| 
|
पूनम तुझा तो मधला para अगदी सेम सेम मी मधेच याहु,मधेच माय्बोलि,मधेच फोन तसेच इथे कामं चालतं पण फरक हाच की आपल्याला कुठले फोन येत नाहीत. पुन्हा एकदा,पण आवडला हा लबाडपणा
|
|
|