|
Maitreyee
| |
| Wednesday, October 04, 2006 - 9:06 am: |
| 
|
शोनू, interesting आहे कथा!
|
Bee
| |
| Thursday, October 05, 2006 - 1:03 am: |
| 
|
शोनू, झाला वाचून नविन भाग. खरच interesting होत आहे कथा..
|
Arch
| |
| Thursday, October 05, 2006 - 3:50 pm: |
| 
|
शोनू, हा कोणत्या कथेचा स्वैरानुवाद आहे का?
|
Shonoo
| |
| Thursday, October 05, 2006 - 9:50 pm: |
| 
|
अनुवाद नाही बुवा. सर्व माझ्याच कल्पनेचा खेळ आहे. अनुवाद असेल असं का वाटलं? इंग्रजी शब्द फार होतायत का?
|
Shonoo
| |
| Thursday, October 05, 2006 - 10:39 pm: |
| 
|
'मला कल्पना आहे की मी तुला अगदी आयत्यावेळी विचारतेय. तुला अगोदर काही कल्पना पण दिली नाही मी, चुकलंच माझं" खुर्चीत धप्पकन बसता बसता जुलिआ म्हणाली. " या वर्षी माझा thanksgiving साठी काही करायचा मूड नाही. आजोबा गेल्यापासून खरं तर माझा उत्साह ही कमी होत चाललाय. त्यांना जेवढं कौतुक होतं Thanksgiving चं तेवढं आताशा कोणाला उरलं नाही. तर यावर्षी मी आणि जेफ तुमच्या कडे आलो तर चालेल का? तू काहीतरी घरगुती indian पदार्थ कर. मला आईकडे जाता येईल खरं तर. पण माझा मूड नाहीये. I feel like I have nothing to be thankful for this year. " बोलता बोलता डोळे पण भरून आले. नाहीतरी जुलिआ कडे आमंत्रण नाही म्हणजे आम्ही घरीच जेवलो असतो त्यादिवशी. अमेरिकेत आल्यापासून thanksgving ला मी जुलिआ च्या घरी गेले आहे. सुरुवातीला तिच्या आजोबांच्या घरी, तिचं लग्न झाल्यानंतर तिच्या घरी. आता ती काही कोणाला बोलावणार नाही म्हणते तर तिलाच आपल्या घरी बोलवावं. मुलांनी टर्कीचा आग्रह केलाच तर जुलिआ लाच मदतील बोलवता येइल. शिवाय जेवणाच्या निमित्ताने जेफशी पण भेट होईल. हे सर्व प्रकरण सुरू झाल्यापासून जुलिआ शीच निवांत पणे बोलण. कठीण होऊन बसलं होतं. जेफशी फोनवर काय एक्-दोन वाक्यं बोलली गेली असतील तेवढीच. मी माझ्या नेहेमीच्या पद्धतीने let me check with the Boss वगैरे काही डायलॉग टाकले नाहीत. सरळ " It'll br our pleasure. Consider yourselves invited " म्हणून टाकलं. पुढचा अर्धा पाऊण तास मग मेनू ठरवण्यात गेला.
|
Shonoo
| |
| Sunday, October 08, 2006 - 8:46 pm: |
| 
|
Shameless plug for Maayboli / Recipe BB ommitted after much deliberation :-)
|
Shonoo
| |
| Sunday, October 08, 2006 - 9:10 pm: |
| 
|
मला बुधवार पासूनच रजा होती. पण जुलिआला बुधवारी पण काम करायला लागणार होतं. त्यामुळे लागणारं सर्व सामान बुधवारीच आणून ठेवायचं काम माझ्या कडे होतं. शनिवारी सकाळपासून मंगळवारी संधयाकाळी मी ऑफ़िस मधून निघेपर्यंत असंख्य इमेल आणि IM मेसेजेस पाठवले तिने फुलं कुठे चांगली आणि त्यातल्या त्यात स्वस्त मिळतील, चांगलं चीझ कुठून घ्यावं, तिने सांगितलेले पदार्थ किंवा ब्रॅंड नाही मिळाले तर त्यांच्या जागी दुसरं काय मिळेल, कुठल्या दुकानापाशी पार्किंग मिळणं अशक्य आहे, त्यासाठी काय ट्रिक करावी लागेल इ.इ. शेवटी मी तिला म्हटलं ' तुझा जीव सगळ्या या तयारीत अडकलेला आहे तर मग तूच तुझ्या घरी का नाही करत?' दोन्-तीन मिनिटे माझ्या कडे डोळे वटारून पाहून सुद्धा मी काही घाबरत नाही म्हटल्यावर म्हणाली ' OK, I'm backing off on the suggestions right this minute. आणि खरंच दिलेला शब्द पाळला. बुधवारी मी मुलांना घेऊनच बाहेर पडले आणि सगळं शॉपिंग, मुलांच्या आवडिच्या रेस्टॉरन्टमधे जेवण वगैरे उरकून येईपर्यंत एकही फोन नाही की घरी आल्या आल्या मेसेजेस पण नाहीत. दुसर्या दिवशी ती लवकरच येणार होती. तिने यायच्या अगोदर फक्त घराची साफ़सफ़ाई करणे येवढंच काम बाकी होतं माझ्या वाटचं. सकाळी आल्या आल्या ती स्वैपाकाचा ताबा घेणार, मला तर सोडाच माझ्या घरच्या सर्वांना कामाला जुम्पणार आणि दोन वाजेपर्यंत ठार वेडं करणार सगळ्यांना! तिच्याघरच्या Thanksgiving ला दर वर्षी जाऊन हे रुटिन आता आम्हाला सगळ्यांना पाठ होतं. पण एकदा सर्व जण जेवायला बसले की मग खर्या अर्थाने Thanksgiving सुरू होईल याचीही तितकीच खात्री. उत्कृष्ट स्वैपाक, जेफच्या कलेक्शन मधल्या वाईन्स आणि जमलेल्या सगळ्यांनी या वर्षी कशा कशा बद्दल thankful असायला पाहिजे यावर जुलिआ चा एकपात्री प्रयोग. सासर माहेरचे नातेवाईक, माझ्या सारखी मित्रमंडळी सर्वांची टिंगळ टवाळी असलेलं तिचं हे भाषण ती जवळ जवळ महिनाभार आधी तरी लिहित असते असा आमचा सर्वांचा अंदाज आहे.
|
Raina
| |
| Wednesday, October 11, 2006 - 5:31 am: |
| 
|
शोनू- मस्तं. नियमीतपणे वाचते आहे- आणि पुढच्या भागाची वाट पहाते आहे.
|
Shonoo
| |
| Wednesday, October 11, 2006 - 10:19 pm: |
| 
|
दिवाळी अंकासाठी काहितरी लिहायचा प्रयत्न करतेय त्यामुळे जुलिआला थोडी विश्रांती........
|
Shonoo
| |
| Sunday, October 15, 2006 - 10:10 pm: |
| 
|
अपेक्षेप्रमाणे सकाळी सकाळीच बेल ठणठणली. तर जुलिआ आणि जेफ दोघेही आले होते. खरंतर वाईन कुठल्या सर्व्ह करायच्या हे ठरवणे आणि जेवणाच्या वेळेस त्या वाईन किंवा इतर ड्रिंक्स सर्वांना देणे हे जेफच मुख्य काम. शिवाय ठेवणीतली भांडी कुंडी, काटे चमचे, प्लेटस काढून जेवणाचे टेबल सजवणे. त्यावर जो काही center piece जुलिआ ने निवडला असेल तो स्थानापन्न करणे, प्रत्येकाच्या पानाजवळ योग्य ते नाव लिहून कार्ड लावणे इत्यादी त्याच्या मते Apprentice to Martha Stewart अशी कामं त्याच्यावर ती लादतेच. पण या सगळ्यासाठी त्याला इतक्या लवकर आणण्याची गरज नव्हती. पण माझ्या प्रश्नार्थक चेहर्याकडे दुर्लक्ष करून दोघेही भराभर गाडीमधून सामान सुमान आणू लागले. सरते शेवटी डोनट चा मोठा बॉक्स आणि कॉपीचा पुठ्ठ्याचा बुधला घेऊन जेफ आत आला तोवर दोघेही फार गारठले होते. वाफाळता कॉफीचे मग हातात घेऊन जेफ डोनट खायला वळला तोपर्यंत जुलिआ ने सर्वांना ऑर्डर द्यायला सुरवात केलीच. जेफने 'आता यातून कोणाची सुटका नाही' असा चेहरा केला. पण जास्त काही न बोलता तो कामाला लागल. मी आणलेलं सामान जुलिआने तपासून पाहिलं आणि ती ही स्वैपाकाच्या तयारीला लागली. पुढचे काही तास इतके धावपळीत गेले की मी मुलांचा नाश्ता, आंघोळी वगैरे उरकेपर्यंत ओव्हन चालू झाले होते. दोन प्रकारचे mashed potatoes तयार झाले होते. पंच ची तयारी झाली होती. माझा नवरा आणि जेफ मिळून अपेटायझर ची तयारी करत होते. त्या दोघांची ओळख माझ्या आणि जुलिआ मुळे झालेली. पण बाकी मैत्रीचे समान धागे नाहीत त्यांच्यात. जेफला आइस हॉकी, बेसबॉल मधे चिकार इन्टरेस्ट. सगळ्या टीम्सचे स्टॅटिस्टिक्स तोन्डपाठ. कोण कोच चांगला, कोण वाईट, कोण वशिल्या ने टिकून आहे सर्व माहीत. त्या उलट माझा नवरा - " yankees म्हणजे बॉस्टनची टीम ना? त्यांचा Quarteback कोण आहे?" असं विचारायला कमी करणार नाही. पण क्रिकेट, टेनिस आनि सॉकर हे रात्र रात्र जागून पाहील. शिवाय जेफला गॉल्फ चं अतोनात वेड. आठवड्यातून तीन ते चार वेळा तो गॉल्फ खेळतो. नवरा बायको सुट्टीत कुठे बाहेर गावी गेले तरी जिथे चांगलं गॉल्फिंग आहे तिथेच जातात.
|
Ashwini
| |
| Wednesday, October 18, 2006 - 12:11 pm: |
| 
|
>>>त्यांचा Quarteback कोण आहे? LOL
|
Jara patpat lihi na plssssss.. utsukta farach tanali jatye...
|
Shonoo
| |
| Wednesday, October 18, 2006 - 11:09 pm: |
| 
|
माझ्या वाट्याला फक्त टेबल सजवण्याचं काम होतं- पण ते मुलांना मदतीला घेऊन! त्यामुळे ते सुद्धा नीट पार पडेल की नाही याची मलाच शंका होती. पण दोघांनीही जुलिआ ला इम्प्रेस करायचा चंग बांधला होता. तिने एका कागदावर प्रत्येक प्लेस सेटिंग ला काय काय आणि कुठे ठेवायचं याचं चित्र काढून दिलं होतं अगदी रेड वाईनच्या ग्लास च्या जागी लाल ठिपका, व्हाईट वाईन च्या ग्लासला तसलाच पांढरा ठिपका, मग तो दिसावा म्हणून त्याच्याभोवती काळी किनार असल्या बारकाव्यांसहितचा तो कागद बघून मार्था स्टुअर्ट पण धन्य झाली असती. दोघेही अगदी एका रेषेत प्लेट ठेवून त्याखाली किती अंशांवर ग्लासं ठेवावी याची चर्चा करत सगळी मांडामांड करत होते. त्यांची कामं सुरळीत चालली आहेत म्हणून मी माझा मोहरा अपेटायझर च्या दिशेने वळवला. नवर्याला आणी जेफला काही मदत हवी असेल तर बघावं नाहीतर जुलिआ कडे कामांची लिस्ट असणारच. नवरा आणि जेफ चं काम पण व्यवस्थित चालू होतं. जेफ ला कित्येक वर्षांची सवय होती त्यामुळे जुलिआ ला त्याच्याकडे फारसं लक्ष द्यावं लागत नव्हतं.
|
Shonoo
| |
| Wednesday, October 18, 2006 - 11:18 pm: |
| 
|
कामं करता करता दोघे इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होते. पण दोघांनाही एकमेकांच्या आवडीच्या खेळांबद्दल फारशी माहिती नाही. काही जाणून घेण्याची इच्छा ही नाही. त्यामुले गाडी लगेच बिझिनेस, स्टॉक मार्केट, इकॉनॉमी असल्या विषयांकडे वळली. जेफच्या कामाशी निगडीत विषय असल्याने तो अगदी रंगात येवून गप्पा मारत होता. बोलता बोलता गाडी जेफच्या कम्पनीतील वरिष्ठांशी झालेल्या मतभेदांवर आली. जुलिआने कधी न सांगितलेले तपशील त्याच्या कडून ऐकायला मिळाले. मोठ्या इन्व्हेस्टमेन्ट बॅंकांमधले Analyst वेगवेगळ्या कंपन्यांचा अभ्यास करून त्या कंपनीचा स्टॉक घ्यावा किंवा घेऊ नये या बाबतचे rating प्रसिद्ध करतात. शिवाय एकंदरीत ती कंपनी ती इन्डस्ट्री या बाबतही संशोधन करून White papers इत्यादी लिहितात.
|
Shonoo
| |
| Tuesday, October 31, 2006 - 10:31 pm: |
| 
|
जेफच्या कंपनीत आणि त्यासारख्या इतर कंपन्यांमधे वेगवेगळ्या इंडस्ट्री चा अभ्यास करणारे स्पेशालिस्ट असतात. त्यांच्या लेखांना, त्यांनी दिलेल्या मतांना फार वजन असतं. त्यांच्या एखाद्या शेर्याने मोठाल्या कंपन्यांचं धाबं दणाणून जातं. त्यांनी आपल्या कंपनी बद्दल चांगलंच लिहावं, काही कमी-जास्त लिहू नये असा कंपन्यांचा, त्यांच्या बोर्ड मेम्बरांचा जोरदार प्रयत्न असतो. पण अशा Analyst लोकांनी नि:पक्षपाती राहून, तटस्थ पणे मते मांडावीत अशी जनतेची अपेक्षा असते. त्याकरता वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे कायदे आहेत. न्यु यॉर्क सारख्या राज्यातले Attorney general या बाबतीत फार दक्ष आहेत. त्यामुळे Analysts च्या कामात, त्यांच्या संशोधनात पारदर्शकपणा असणं महत्वाचं आहे. काही वर्षांपूर्वी एका मोठ्या कंपनीच्या analyst च्या वतीने YMCA ला काही मिलियन डॉलर्स ची देणगी देण्यात आली होती त्यावरून फार मोठं वादळ उठलं होतं त्याची पण इत्थम्भूत माहिती दिली जेफ ने. असे प्रकार छोट्या मोठ्या प्रमाणावर होत असतात आणि सर्वांनाच कायद्याच्या कचाट्यात पकडता येत नाही. पण कधी कधी असे मोठे घोटाळे झाले की लोकांचं लक्ष तिकडे वेधलं जातं आणि मग बारीक सारीक गोष्टी पण नको तितक्या तपासून बघितल्या जातात. साध्या साध्या गोष्टींचा कीस पाडला जातो. रोजचं काम करणं कठीण होऊन बसतं. सर्व investment बॅन्कांना लोकांचा विश्वास अतिशय महत्वाचा असतो. एखाद्या कंपनीची अशी बदनामी झाली की बाकी बॅंका लगेच आपण कसे त्यातले नाही हे सिद्ध करायच्या मागे लागतात. अगदी एखाद्या कादम्बरीत शोभतील असे किती किस्से सांगत होता. त्याच्याच कंपनीत काम करणार्या एक्- दोघांनी एका बायो टेक कंपनी बद्दल काही संशोधन केलं होतं आणि जेफ ने त्यात त्यांच्या काही चुका दाखवून दिल्या होत्या. त्या कंपनीचे जे काही प्रॉडक्टस होते त्यांचं भवितव्य फार उज्ज्वल आहे असं त्या दोघांचं म्हणणं होतं. त्यांच्या मते एक दोन वर्षात त्यांच्या दोन नवीन ड्रग्ज ना FDA मान्यता देईल आणि मग एखादी मोठी फार्मा कंपनी ते ड्रग्ज विकत घेईल वगैरे. जेफचं मत होतं की हे ड्रग्ज इतक्या लवकर मान्यता प्राप्त करू शकणार नाहीत.
|
Prajaktad
| |
| Thursday, November 09, 2006 - 11:44 am: |
| 
|
शोनू छान लिहते आहेस...पुढे लिही लवकर..
|
Shonoo
| |
| Sunday, November 12, 2006 - 2:21 pm: |
| 
|
टी व्ही वर किंवा पेपरात काही बातम्या येतात तेव्हढीच आमची ऐकीव माहिती या सर्व विषयांबद्दल. पण जेफ अतिशय सोप्या भाषेत, सरळ समजाऊन सांगत होता. आम्ही दोघे नवरा बायको अगदी लक्षपूर्वक ऐकत होतो. आतापर्यंत त्यांच्या केसच्या संदर्भात जुलिआ कडून किंवा क्वचित प्राध्यापक महोदयांकडून ऐकलं होतं तेव्हढंच. आज पहिल्यांदा जेफ कडून त्याची बाजू ऐकायला मिळत होती. फार्मास्युटिकल कम्पन्यांचा कारभार, त्यात चालणारं संशोधन, सगळ्या कामात वरवर न दिसणारा पण पदोपदी जाणवणारा profit, profiTability चा प्रभाव, वेगवेगळे अन्तर्राष्ट्रीय कायदे, कम्पन्यांची एकमेकांशी चाललेली चढाओढ, ख्यातनाम संशोधकांच्या लहरीपणाचे किस्से- अगदी एखाद्या चित्रपटात शोभून दिसतील अशा गोष्टी सांगत होता. त्याच्या कम्पनीच्या बोर्ड ऑफ़ डिरेक्टर्स पैकी एक दोघांचे त्या बायोटेक कम्पनीशी लागेबांधे होते. त्यांनी जेफला आधी आडून आडून आणि मग प्रत्यक्षच सांगितलं होतं की त्याने त्या बायो टेक कम्पनी बद्दल काही प्रतिकूल लिहू नये. पण हा तत्वाला चिकटून राहिला. जेंव्हा जेफ ने आपली मत जाहीर करण्याच्या चंग बांधला तेंव्हा ते डिरेक्टर्स भडकले आणि त्यांनी जेफला कामावरून काढून टाकायचं ठरवलं. त्याच्या बरोबर काम करणार्या दोन तीन बायकांना त्याच्या विरुद्ध Sexual Harassment ची तक्रार करायला सांगून पाहिलं. त्या सर्वांनी ठामपणे नकार तर दिलाच उलट परत अशी गळ घातल्यास वर्तमानपत्रांकडे जाण्याची धमकी दिली. पैशाच्या गैर व्यवहाराचा प्रश्नच नव्हता. जेफच काम तर चोख होतंच पण तो सर्व व्यवहारांच्या नोंदी पण अगदी काटेकोरपणे ठेवत असे. त्यामुळे अफरातफरीचा आरोप ठेवायला पण जमेना.
|
Shonoo
| |
| Sunday, November 12, 2006 - 9:47 pm: |
| 
|
जेफचं बोलणं ऐकता ऐकता वेळ कसा गेला ते कळलंच नाही. दोन वाजल्या पासून पाहुणे यायला सुरुवात होणार. जुलिआ च्या प्लॅन प्रमाणे एक वाजेपर्यंत सर्व तयारी पूर्ण व्हायची. पण सर्व जण अगदी भराभर आवरत होते. त्यामुळे तिचा १२:५५ चा बझर वाजायच्या अगोदरच सर्वांचं तिने नेमून दिलेलं काम सम्पलं होतं. पटापट एकेक सॅंडविच खाऊन सगळे जण कपडे बदलायला गेले. मी माझं सगळं आवरून, मुलांना तयार करून खाली येईपर्यंत जेफ आणि जुलिआ दोघे खाली येऊन फायरप्लेसपाही बसले होते. सर्व तयारी झाल्यानंतर आणि पाहुणे यायच्या आधीची जी काय चार दोन मिनिटं मिळतात त्या वेळात जुलिआ नेहेमी घरच्या लोकांना Thanks म्हणून घेते. हा तिचा जुना रिवाज. आजोबांचे दोन्ही हात आपल्या हातात धरून ती अगदी मनापासून त्यांचे, आणि त्यांच्या सारखे आजोबा दिल्या बद्दल परमेश्वराचे आभार मानत असे. मग घरात असतील त्या सर्वांना hug करून, पाठीवर thump करून, त्यांचे आभार मानत असे. पण हे फक्त घरात असतील त्यांनाच. आलेल्या पाहुण्यांकरता तिचं खास भाषण असे. त्यात उल्लेख झाला म्हणजे येणारे पाहुणे धन्य होत! आता सुद्धा ती जेफशी हलक्या आवाजात काहीतरी बोलत होती. म्हणून मी पण काही बोलायला गेले नाही. स्वैपाकघरात जाऊन परत एकदा सर्व गोष्टींवर नजर टाकावी म्हणून मी आत वळले तेव्हढ्यात तिनेच पाहिलं आणि पटकन उठून माझ्या बरोबर आत आली. आम्हा दोघींच्या पाठोपाठ नवरा पण आला. त्याला बघून म्हणाली ' एक तरीपाहुणा आल्याशिवाय चव पहायला म्हणून सुद्धा काही मिळणार नाही बरं. उगाच इथे घुटमळू नकोस. जेफ ला जाऊन विचार. तिकडे एखादं ड्रिन्क मिळेल.' 'ड्रिन्क मिळेल' म्हटल्यावर स्वारी कशाला स्वैपाकघरात थाम्बेल? लगेच जेफने आणलेल्या वाईन्सच्या दिशेने वळला तो. तेव्हढी सांधी साधून जुलिआने माझे हात धरले. आता ही मला पण आजोबांना देत असे तसे धन्यवाद देणार की काय? हिला माहित आहे असलं काही बोललेलं मला आवडत नाही. मला एकतर अनिवार रडू तरी येइल किंवा वेड्या सारखं हसू तरी. हे असं आपल्या माणसांचे आभार मानणे, त्यांना ' माझं तुझ्यावर किती प्रेम आहे' वगैरे सांगणे हे मला फक्त कथा कादम्बर्यातून आणि नाटक सिनेमातून ठीक वाटतं. प्रत्यक्षात या सगळ्या शब्दात न सांगता येणार्या भावना आहेत. बोलून दाखवून त्यांचं मोल कमी होतं असं माझं मत मी तिला दर वर्षी thanksgiving, Christmas, Mother's Day अशा वेळी ऐकवत आलेली आहे. मग आता मधेच हे काय? पण काही न बोलता तिने नुस्तं माझ्या खान्द्यावर क्षणभर डोकं टेकवलं आणि आवाज न करता Thanks म्हणून परत बाहेर गेली. हे सर्व इतक्या पटकन झालं की ती गेल्यावर देखील दोन-चार क्षण मी तिथेच उभी होते.
|
Malavika
| |
| Wednesday, November 15, 2006 - 12:05 pm: |
| 
|
शोनू पुढे काय झाले? लवकर लिही ना. मला तुझे लिख़ाण खूप आवडते. उत्सुकता लगून राहिली आहे.
|
KHoopach SuNdar....PuDHe Kay? I eager to know the rest of the story
|
|
|