|
Shonoo
| |
| Monday, December 18, 2006 - 10:24 pm: |
| 
|
कन्या कुमारीची ती romantic पण करूण कथा आणि शिवाय आपल्या खंडप्राय देशाचे अतिदक्षिणेचं टोक! किती महत्वाचं ठिकाण? जुलिआ ला माहीत आहेत माझी मतं. किम्बहुना माझ्या कडून ऐकूनच तिने 'कन्याकुमारी' तिच्या must see लिस्ट वर घातलं होतं. इतक्या सुंदर ठिकाणी जाउन मनातली किल्मिषं, चिंता, बारीक सारीक संसारी व्याप या सगळ्यांचा माणसाला विसर पडावा. निसर्गातलं अखिल मानवजातीतलं भव्य, दिव्य, उत्कट जे काही त्याची अंशत: तरी प्रचीती यावी असं ठिकाण. तिथे हे नवरा बायको काही फडतूस कारणावरून भांडण करून आले होते. मला भयंकर राग आला होता दोघांचा. पण आपल्या देशात ते पाहुणे आहेत, परके आहेत. आपल्या शिवाय त्यांच्या ओळखीचं कोणी नाही. शिवाय अजून दोन दिवसात सगळेच इथून निघणार आहोत. विमानात काढता येईल काय खरडपट्टी काढायची ती. असा विचार करून गप्प बसले. रेस्टॉरन्टमधे जाऊन पोचेतो जुलिआ बरीच निवळली होती.
|
Shonoo
| |
| Wednesday, December 20, 2006 - 10:55 pm: |
| 
|
मंडळी: आता पुढचे चार आठवडे ( २४ डिसे. ते २० जाने) भारतात असणार. गोष्ट लिहिण्याइतका वेळ न मिळण्याचीच शक्यता जास्त. परत आल्यावर सवडीने पूर्ण करीन. प्रतिसादांबद्दल आणि उत्तेजनाबद्दल सर्वांना धन्यवाद. इथे म्हणतात तसं If I don't see you before then, Happy Holidays and a wonderful new year to all of you.
|
Manya2804
| |
| Thursday, December 21, 2006 - 8:39 am: |
| 
|
मेधाताई, मुंबईत असाल, आणि तुम्हाला वेळ मिळाला तर नक्की भेटू...
|
Sakhi_d
| |
| Friday, January 05, 2007 - 11:39 pm: |
| 
|
मेधा लवकर या....... आणि पटपट कथा पुर्ण करा....
|
शोनू कथा फ़ारच सुंदर आहे. मी आजच पहीला भाग वाचला पण नंतर तिथेच थांबण शक्य नव्हत.त्यामुळ्ये सगळच वाचुन संपवल खरच खुप छान लिहील आहेस. लवकर परत ये आणि पुढचा भाग टाक. Have a nice Trip
|
Shonoo
| |
| Sunday, January 28, 2007 - 9:08 pm: |
| 
|
त्या दिवशी जेवण नेहेमी प्रमाणे बराच वेळ चाललं. जुलिआ आणि जेफ दोघेही बरेच निवळलेले होते. त्यामुळे त्यांनी पण जेवणात अगदी मनापासून भाग घेतला. लस्सी, शहाळी आणी जलजीरा पासून अगदी रेस्टॉरंटच्या बाहेरच्या पानवाल्या कडून मघै जोडी पानापर्यंत सर्व काही खाऊन पाहिलं दोघांनी. जेफची तर तम्बाखू पण खाऊन पाह्यची तयारी होती. पण घरच्यांनींच त्याला विरोध केला. परत येताना पुन्हा आम्ही दोघीच रिक्षाने आलो. पण जुलिआच्या सगळ्या तक्रारी सम्पल्या होत्या. प्रवास सम्पत आला. लवकरच घरी परत जायचं. इथं इतकी ठिकाणं पाहिली, इतक्या लोकांच्या ओळखी झाल्या. परत कधी इथे येणं होईल की नाही अशा सगळ्या विचारांनी ती जरा गलबलून गेली होती. 'संस्कृती, संस्कृती म्हणतात ते पुस्तकातून वाचून कळत नाही. त्या करता प्रत्यक्ष जाऊन राहून अनुभव घ्यावा लागतो. तुम्ही कसे सर्वस्वी अपरिचित देशात जाउन राहता आणि आपला जम बसवता नवलच आहे!' म्हणाली. तरी बाई तुमचा देश अशाच लोकांनी वसवलेला आहे हे विसरू नकोस म्हटल्यावर हसली. ' आता ते पायोनियर स्पिरिट राहिलं नाही. आता जिथे जातो तिथे Pizzaa Hut आहे की नाही याची चौकशी करून्च मग अमेरिकन लोक प्रवासाला निघतात.'
|
तुम्ही लेखक मंडळी आपल्याला खूप demand मिळावी म्हणून असे ४४ ओळीचे भाग लिहिता का ????
|
Sakhi_d
| |
| Wednesday, January 31, 2007 - 12:41 am: |
| 
|
P_sahasrabudhe तुम्ही बरोबर बोलता आहात. खरच हे लोक जरा जास्तच वेळ घेताहेत. नाहीतर Admin ने नियमच केला पाहिजे पुर्ण कथाच पोस्ट करायची.......... अरे किती अंत बघणार....???
|
Shonoo
| |
| Sunday, February 04, 2007 - 10:05 pm: |
| 
|
जानेवारीच्या तिसर्या शनिवारी परत घरी येऊन पोचलो. आणि लगेच सोमवार पासून मुलांच्या शाळा, माझी आणि नवर्याची नोकरी यात इतके गर्क झालो की बास. घरची महिन्याभराची तुम्बलेली कामं, भारतातून आणलेल्या वस्तू ज्याच्या त्याला पाठवणे, मुलांच्या शाळेचा बुडलेला अभ्यास पुरा करून घेणे इत्यादी सर्व स्थिर स्थावर होईपर्यंत व्हॅलेन्टाईन डे येऊन ठेपला. जुलिआ आणि जेफ दर वर्षी घरी कपल्स पार्टी करतात या दिवशी. जेफ च्या मते अशा मोठ्या सणांच्या वेळी रेस्टॉरंटमधे जाण्यात काही अर्थ नसतो. आमच्या लग्नाच्या अगोदर आणी सुरुवातीची काही वर्षे आम्ही अगदी नेटाने एखाद्या महागड्या, प्रसिद्ध रेस्टॉरंट मधे जात असू. पण हळू हळू अनुभवाने आम्हाला जेफचं म्हणणं पटू लागलं होतं. प्रत्येक ठिकाणी गर्दी फार, सर्व्हिस अगदी बेकार आणि स्पेशल्स च्या नावाखाली आपल्याला काय हवं ते नेमकं त्या दिवशी नसणार. त्यामुळे आम्ही गेली काही वर्षे त्यांच्याघरीच जातो आहोत. दोघांना जेवण्या-खाण्याची अमाप हौस. शिवाय जेफ चं वाईन कलेक्शन ही वाखाणण्याजोगं. अगदी लक्षात रहाण्यासारख्या पार्ट्या असत. या वर्षी अजून तरी तिचा काही निरोप आला नव्हता. माझ्या नवर्याने पण 'जुलिआकडची पार्टी कॅन्सल असेल तर आपल्याला Chinese take out करावं लागेल. इतक्या उशीरा कुठल्याही रेस्टॉरंटमधे जागा मिळणार नाही' वगैरे सांगून टाकलं होतं. बारा तारीख उजाडली तरी माझ्या इ मेल आणि फोनवरच्या निरोपांनाही तिच्याकडून काही प्रत्युत्तर नाही. मग मी काळजीत पडले.
|
Milindaa
| |
| Monday, February 05, 2007 - 1:28 pm: |
| 
|
शोनू, असे छोटे छोटे भाग टाकण्यापेक्षा जर ३-४ भाग एकत्र करुन टाकलेस तर वाचायला जास्त बरे वाटेल असे माझे मत आहे.
|
Zakasrao
| |
| Monday, February 05, 2007 - 10:52 pm: |
| 
|
मिलिंदाला अनुमोदन. थोडी लिंक लागेल व्यवस्थित.
|
Shonoo
| |
| Tuesday, February 06, 2007 - 9:00 am: |
| 
|
मंडळी 'संसार संगे बहु शिणले मी ' अशी अवस्था आहे सध्या. HG वाचायला सुद्धा वेळ मिळत नाही फारसा. आणि थकून्-भागून टाइपताना मूडही लागत नाहीये. आता लवकरच पूर्ण करीन. नक्की!
|
Milindaa
| |
| Tuesday, February 06, 2007 - 10:29 am: |
| 
|
शोनू, मला तेच सांगायचं होतं की तुला वेळ होत नसेल हे कळतं आहे पण जेव्हा वेळ होईल तेव्हा एकदम असे ४-५ भाग एकत्र टाक म्हणजे काहीतरी वाचल्याचं समाधान मिळेल
|
Shonoo
| |
| Sunday, February 11, 2007 - 6:11 pm: |
| 
|
तेरा तारखेच्या सकाळी फोन आला. इतक्या सकाळी, धांदलीच्या वेळी कोणाचा असेल बरं अशा काळजीतच फोन घेतला. ' आज कसं ही करून लंच ला भेटूया. मला तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचंय. कॅम्पसवर आलीस की लगेच मला कळव तुला कधी जमणार आहे ते' इतकं घाईघाईत सांगून मी काही विचारायच्या आतच फोन ठेवला सुध्दा जुलिआने. नवर्याच्या चेहर्यावर भलं थोरलं प्रश्नचिन्ह. 'जुलिआ चा होता. लंच ला भेटूया म्हणाली' मी सांगितलं 'I don't have a good feeling about this. ' म्हणाला. माझ्या ही मनात नसत्या शंका कुशंका दाटल्या होत्या. पण तेवढं सगळं बोलायला वेळ नव्हता. ऑफ़िसमधे येईपर्यंत ऑफ़िसच्या फोनवर पण जुलिआचा मेसेज होताच. वर्गाच्या वेळा, विद्यार्थ्यांच्या भेटण्याच्या वेळा या सगळ्यांमधून लंचला जास्त वेळ काढायला काही जमणार नव्हतं. फारतर जो च्या ट्रक वरनं काहीतरी आणून ऑफ़िसमधे बसून खाता आलं असतं. मी तिला तेवढं कळवलं तशी मला म्हणाली ' मीच आपल्या दोघांचं जेवण जो कडनं घेऊन तुझ्या ऑफ़िसमधे येईन. ' दोघींकरता सॅन्डविचेस आणि कोकचे मोठ्ठाले पेले घेऊन जवळ जवळ धापा टाकतच जुलिआ माझ्या ऑफ़िसमधे आली. माझं सॅँडविच माझ्या पुढ्यात ठेवलं आणि लगेच बोलायला सुरुवात. आम्ही भारतातून परत आल्यानंतर कोर्टातल्या केसचं गाडं जरा हळू हळूच चाललं होतं. दोन्ही कडच्या वकिलांनी प्रत्येक वेळी नवीन तारीख मागीतली होती. मधे फक्त एकदा ज्या साईटस बघितल्या बद्दल जेफच्या कम्पनीने त्याला काढलं होतं त्या सगळ्या साइटस ने त्यांचे रेकॉर्डस कोर्टात सादर करावेच लागतील एवढा एकच निर्णय काय तो जज महाशयांनी दिला होता. जुलिआच्या मते त्या सगळ्या केसमधे हा सर्वात महत्त्वाचा निर्णय होता. आता त्या साईट्सवरून त्यांचे रेकॉर्डस आले की जेफ च्या कम्पनीतल्या इतर लोकांनी पण त्या साईटस कधी, कितीदा, किती वेळ पाहिल्या हे शाबीत करता येणार होतं. त्या अनुशंगाने तिने परत कोर्टाकडे अर्ज केला की eBay, Amazon, Itunes अशा काही नामवंत साइटस कडूनही याच प्रकारची माहिती मिळावी. त्याला मात्र कोर्टाने अनुमती नाकारली होती. मागच्याच आठवड्यात तिने हीच मागणी परत वेगळ्या स्वरूपात केली होती. यावेळी तिने म्हटलं की या इतर कंपन्यांनी सर्व तपशीलवार माहिती न देता, गेल्या वर्षभरात जेफच्या कम्पनीतून रोज किती लोक, किती वेळ त्या साइटस वर जात होते याची माहिती कोर्टात सादर करण्यात यावी. असं केल्याने कुठल्याही एका व्यक्तीबद्दलची माहिती लोकांपुढे न येता साधारण त्या कंपनीतून किती लोक Amazon अथवा eBay वर जात होते हे कळेल. तरी Google आणि इतर Search Engines तिने मुद्द्दाम तिच्या विनंतीतून वगळले होते. ' या सर्व घडामोडीं मुळेच तू इतकी बिझी होतीस की काय? किती दिवस झाले तुझा पत्ता नाही. इमेल पाठवली त्याला उत्तर नाही. फोनवर निरोप ठेवले त्याला काही परत फोन नाही. तुझं चाललंय तरी काय? उद्या व्हॅलेंटाईन डे त्याकरताही तुझा काही निरोप नाही?' अगदी भडिमारच केला मी तिच्यावर. 'मला माहीत आहे. माझं चुकलंच. पण मुख्य गोष्ट अजून सांगितलीच नाहीये मी तुला. मला जरा जेवू दे तो पर्यंत तू सांग तुझं काय चाललंय ते.' घ्या आता! मी काय सांगणार? काय नवीन चाललं होतं माझं? मागच्या दोन्-तीन सेमिस्टर्सना शिकवलेलेच विषय, विद्यार्थी नवीन तेव्हढाच काय तो फरक. बाकी दोघांच्या नोकर्या, मुलांच्या शाळा, अभ्यास, अभ्यासेतर उचापत्या, आजारपणं सर्व काही मागील पानावरून पुढे चालू! मी तिला नेहेमीप्रमाणे माझा ' सेम हाउस, सेम स्पाऊस' डायलॉग टाकायला सुरुवात केली. तर तिने खाता खाता, हातानेच 'पुरे आता' अशी खूण केली. मी आता तिला काय तपशील सांगू असा विचार करत होते. क्षणभरात मला म्हणाली ' Don't ever complain about it! . सेम स्पाऊस आहे, तो सेमच रहायला तुलाही हवाय आणि त्यालाही! तुम्ही किती नशीबवान आहात तुम्हाला माहित नाही'
|
Shonoo
| |
| Sunday, February 11, 2007 - 9:23 pm: |
| 
|
तिच्या आजोबांच्या पिढीत सुद्धा सर्वच लग्नं काही म्हणावी तशी टिकली नव्हती. तिचे आजोबा- आजी मायनॉरिटीतच होते दोघांचंही पहिलंच लग्न आणि तेही Death do us part पर्यंत टिकलेलं. त्या पार्श्वभूमीवर जुलिआ ला भारतीय जोडप्यांबद्दल अतोनात आदर. Arraanged लग्नं असून सुद्धा टिकतात, टिकवून ठेवतात हे तिला अनाकलनीय वाटत असे. तिच्या स्वत:च्या आई-वडिलांचा अनुभव तिला सर्व अमेरिकन लोकांचा प्रातिनिधिक अनुभव आहे असंच वाटत असे. Same mom, same Dad असली बहीण भावंडं दिसली की तिला भयंकर कुतूहल असायचं. 'अमेरिकेत सुद्धा एकच लग्न करून जन्मभर बरोबर राहिलेली जोडपी आहेत ग' म्हटल्यावर 'There must be something wrong with either of them' म्हणत असे. त्यामुळे तिने मला असं बोलणं अनपेक्षित नव्हतं. पण ती ज्या त्राग्याने म्हणाली त्याने मी चमकलेच.
|
are wa aaj ekdam barach lihila ki... good caary on 
|
Ek_mulagi
| |
| Monday, February 12, 2007 - 9:34 am: |
| 
|
Shonoo, I like your writing style. Please continue writing. I am reading....
|
Abhijat
| |
| Thursday, March 01, 2007 - 2:10 am: |
| 
|
एका वर्षाची गोष्ट? छे छे, गोष्टीचं एक वर्ष!
|
Runi
| |
| Friday, March 09, 2007 - 6:04 pm: |
| 
|
अभिजात, खरय तुझे.... शोनु लिही ना लवकर ही कथा, मला खुप आवडली आहे आणि मी किती तरी दिवसांपासुन वाट बघतेय पुढच्या भागांची. रुनि
|
Shonoo
| |
| Wednesday, March 14, 2007 - 10:23 pm: |
| 
|
खरं तर मी तिला पूर्वी कित्येकदा भारतातील सर्वसाधारण शहरी, मध्यमवर्गीय लोकांच्या लग्ना बद्दल सांगितलं आहे. लग्ना अगोदरच्या काळात एकमेकांशी, एकमेकांच्या कुटुम्बीयांशी फारशी ओळख सुद्धा नसते. अगदी कॉलेजात असताना प्रेमात पडून लग्न केलेल्या जोडप्यांना सुद्धा संसार कशाशी खातात ते माहित नसतं! आई वडिलांच्या छायेत राहून, त्यांनी दिलेल्या पैशातूनच सिनेमा पाहणे बाहेर खाणे आणि एकमेकांना गुलाबी कागदात बांधलेल्या भेटी देणे ही प्रेमाची रीत. एकमेकांचे विचार किती जुळतात किंवा जुळत नाहीत, आवडतं आईसक्रीम आणी आवडते हिरो हिरोइन सोडल्या तर इतर आवडी- निवडी काय हे काहीही माहिती नसतं. बर्याचदा तर असली काही मतं form व्हायच्या अगोदरच लग्न झालेलं असतं. मग 'आमच्यात असलं काही नसतं' हा मन्त्र सतत म्हणत्-ऐकत संसार सुरू होतात. अगदी प्रेम नसतंच असं काही नाही. पण ते शब्दातनं सांगणं दूरच. क्वचित प्रसंगी कृतीतूनही दिसू नये अशीच खबरदारी जास्त घ्यावी लागते. त्यात भर घालायला आप्तेष्ट असतातच. 'अमका म्हणजे बायकोच्या ताटाखालचं मांजर आहे' किंवा 'तिला दिवसभर नवर्याच्या पुढे पुढे करण्याखेरीज दुसरं काही येत नाही' असले शेरे सर्वांच्या परिचयाचे असतात. रोजच्या संसाराच्या धबडग्यामधे आपुलकी टिकवणं मुश्किल, तिथे प्रेमं टिकवायला कोणाला फुरसत असते? Valentines Day किंवा एकमेकांचे वाढदिवस वगैरे आजकालची फॅडं आहेत्- पण मुलांच्या, संसाराच्या जबाबदार्या वाढल्या की ही सगळी सोंगं वठवणं जमत नाही. मला कधी कधी वाटतं की अगदी अशा भोसले आणि आर डी सुद्धा काय दिवसभर गाणी म्हणत बसले असते का? त्यांना सुद्धा संसाराच्या जबाबदार्या असतीलच ना. पण जुलिआ ला एकटिलाच नव्हे तर तिच्या सारख्या अनेक अमेरिकन बायकांना हे everlasting love चं फार खूळ! मासिकातून, पुस्तकातून, बायकांच्या साठी असलेल्या वेब साइटवरून हे everlasting love कसं साध्य करावे याचे पाठ गळत असतात.
|
Shonoo
| |
| Wednesday, March 14, 2007 - 10:36 pm: |
| 
|
'10 signs he is cheating' , 5 ways to keep the spark going in your marriage' या किंवा असल्या मथळ्याचे लेख प्रत्येक मासिकाच्या प्रत्येक अंकात असतात. बरं 'नवरा फार मोठ्याने घोरतो' किंवा ' बायकोचं गरोदरपणात वाढलेलं वजन कमी नाही झालं' अशा कारणांवरून घटस्फोटही होतच असतात. मग त्या ' till death do us part ला काय अर्थ? आणि त्या आणाभाका घेताना भरमसाट खर्चाचे सोहळे कशाला? लहान मुलांना वाढवताना जसं जसं मूल मोठं होईल तस तसं आपली मुलाला शिकवण्याची, शिस्त लावण्याची, अगदी लाडकरण्याची पध्दत सुद्धा बदलतेच की? मग नवराबायकोचं नातं कायम नूतनपरिणीत जोडप्या सारखं कसं राहील? त्यात संसाराच्या अनंत, अटळ कटकटी येणारच. पण जुलिआला माझी मतं पटत नाहीत. मग आज ती चक्क माझ्या 'सेम हाउस सेम स्पाउस' चा हेवा करतीय की काय?
|
Shonoo
| |
| Wednesday, March 14, 2007 - 10:58 pm: |
| 
|
त्या केसच्या संदर्भात कुठल्या कम्पन्यांकडनं काय काय रेकॉर्डस मागवता येतील, सर्वसाधारण कम्पन्या कसल्या प्रकारची माहिती ठेवतात, लोकांची प्रायव्हसी जपून सुद्धा आपल्याला नक्की काय माहिती मिळू शकते या दृष्टीने जुलिआ बर्याच लोकांशी बोलली होती. युनिव्हर्सिटीच्या कामाच्या निमित्ताने, Conferences मुळे जुलिआच्या बर्याच वेगवेगळ्या कम्पन्यांमधे ओळही होत्या. शिवाय आमच्या युनिव्हर्सिटीची मुलं बरेच ठिकाणि होती. जवळ जवळ सगळ्या Ph D आणि मास्टर्स करणार्या विद्यार्थ्यांशी जुलिआ ओळख ठेवून होती. त्यातल्या एकाने जेफच्या केसबद्दल वाचून जुलिआला फोन केला होता. मग तिला प्रत्यक्ष भेटून त्याने संगितलं होतं की तो एका 'तसल्या' साइटवर वेब मास्टर म्हणून काही काळ काम करत होता. तिथल्या त्याच्या सहकार्यांनी त्याला unofficially सांगितलं होतं की जेफ त्या साइटवर गेली काही वर्षे पैसे भरून मेम्बर होता. हे ऐकल्यावर त्या विद्यार्थ्याने इतरही तसल्या साइटच्या वेब मास्टर्स कडे चौकशी केली होती. आणि त्यातल्या अजून एक दोघांनीही त्याला तेच सांगितलं होतं. या केसमधे जुलिआने जर 'तसल्या' वेब साइटचे पण रेकॉर्ड मागितले तर तिचीच पंचाइत होईल. म्हणून त्याने हे सर्व तिच्या कानावर घातलं होतं. हे ऐकल्यावर मला काय बोलावं हेच कळेना. दोनचार मिनिटं मी गप्पच होते. मग विचारू की नको अशा संभ्रमात शेवटी मी विचारलंच ' तू जेफला विचारलंस का? तो काय म्हणाला?'
|
Saanchi
| |
| Thursday, March 15, 2007 - 6:04 am: |
| 
|
खुपच छान चालू आहे कथा. Pऊथचे वाचायची उत्चुकता आहे
|
R_joshi
| |
| Thursday, March 15, 2007 - 6:23 am: |
| 
|
शोनू किती वाट बघायला लावलिस. आता लवकर टाक पुढचे भाग.
|
|
|