|
मुंभाई .. सूज्ञ आहात . लवकर कळलं नाहीतर लहान मुलांसारखं माझी कविता का छान नाही म्हणून धाय मोकलून रडणारे इथे कमी नाहीत . तुम्हा कवितेतलं बरंच कळतं असं दिसतंय पण राहवत नाही म्हणून सांगतो स्वातीने लिहीलेली गझल नव्हती
मी वैभव जोशी . सर्वांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणे आणि फक्त प्रेम ह्या विषयावर कविता लिहीणे एवढंच करतो मी . बाकी ओळख होईलच . मला तर तुम्ही already अतिपरिचित वाटत आहात . आपलं जमणार . अरे हां ... पुष्पगुच्छ राहिलाच . अहो काय झालं दिवाळीत एकाला दिला होता त्याने परतच नाही दिला . चालेल ना ?
|
निनावी ... तुझ्या आग्रहाखातर .... कबीर .... मनात ओंकार नाद जागावयास थोडा उशीर झाला जसा जसा जागला तसा रंध्र रंध्र माझा फकीर झाला कधीच नाही सुटावयाचा असा कुठे मोहपाश आहे ? मलाच ती गाठ शोधण्याचा कधी पुरेसा न धीर झाला असे कसे जाणले न मुक्ती सुखासुखीही मिळून जाते सहज तुझे नाव घेतले , श्वास श्वास हा बेफिकीर झाला पदोपदी भास होत आहे , जणू तुझा स्पर्श होत आहे सदेह भेटायला तुला भक्त हा खरोखर अधीर झाला मला न पर्याय राहिला ! लेखणीस केले तुझ्या हवाली तुला न पर्याय राहिला ! शब्द शब्द माझा कबीर झाला
|
Daad
| |
| Sunday, November 19, 2006 - 5:26 pm: |
| 
|
शब्द हवे आहेत........ वैभव जोशी यांच कौतुक करायला, थोडे नवीन आणि वेगळे शब्द हवे आहेत"
|
Mrinmayee
| |
| Sunday, November 19, 2006 - 7:33 pm: |
| 
|
वैभवा, नावाजण्यास 'कबीरा' मम शब्द हे अधूरे मग तूच सांग तुजला अभिप्राय काय द्यावा?
|
Daad
| |
| Sunday, November 19, 2006 - 8:04 pm: |
| 
|
गजलेसारखं काहीतरी लिहिण्याचा पहिला प्रयत्न! हात धरून पैलतीराला लावणारी (आपली) माणसं इथे आहेत म्हणूनच.....!! मनापासून शिकण्याची इच्छा आहे, तेव्हा या "कवितेवर" जरूर लिहा ही विनंती. बेईमानी मी, लळा लावी कशाला तेग शपथेची गळा लावी कशाला काजळी पणत्या, सुकी वृंदावने मागता भिक्षा अशा गावी कशाला दंश सुगंधी मी, विखारी शस्त्र नाही जखम असली चिघळती व्हावी कशाला कोरडे रडणे, कशा खोटे उसासे दार उघडे या! अता चावी कशाला टाळली नव्हती कधी निद्रा क्षणाची पापणी स्वप्नांची भिती दावी कशाला ओंजळीतिल मोगरा आताच दे गंधाळण्याचा वायदा भावी कशाला -- शलाका
|
Sarang23
| |
| Sunday, November 19, 2006 - 10:18 pm: |
| 
|
वैभव... मक्ता आवडला... शलाका.. बेईमानी मी, लळा लावी कशाला गागागागा गा लगा गागा लगागा (२३ मात्रा) तेग शपथेची गळा लावी कशाला गाल ललगागा लगा गागा लगागागा (२२ मात्रा) मतल्यात एक मात्रा कमी आहे... आणि लावी कशाला हा रदीफ असून लळा, गळा असे काफिये मतल्यात योजलेले आहेत, त्यामुळे पुढे फळा, मळा असेच काफिये यायला हवेत... मतल्यात असा बदल केला तर मात्र ते बसतय... बेइमानी मी लळा लावी कशाला तेग शपथेची, गळा लावी कशाला मग मीटर गालगागा गालगागा गालगागा होते, पुढेही तेच आले पाहिजे... पहिल्या प्रयत्नाबद्दल शुभेच्छा... आणखी छान लिहिशील
|
अहो जोशी पुष्पगुच्छ नाही दिलं तरी चालेल मला. तुमचे शब्दच फ़ुलासारखे वाटतात मला. इथे स्वाती आणि मुंभाई अशा दोन व्यक्ती आहे, तुम्ही पुढल्या वेळी पुर्ण नावानी माझा उल्लेख करा अशी मी नम्र विनंती करते. स्वाती, कविता छान हं.
|
सारंग ... फोनवर चर्चा झाली तेव्हा तर बरेच शेर आवडले होते ... असा अचानक बदल कसा काय झाला ? अर्थात ते मह्त्त्वाचं नाहिये .. बाकीच्या शेर मध्ये मीटर , भाव , अर्थ , काय काय मिसिंग आहे ते इथेच कळवणार का ? म्हणजे " अं हं .. वो बात नही .. " असं नको .. प्रॉपर डिसेक्शन्च करू म्हणजे सगळ्यांचाच फायदा होईल मृण्मयी , शलाका धन्यवाद . शलाका आपल्या रचनेवर विचार करून मेल करतोय
|
Sarang23
| |
| Monday, November 20, 2006 - 12:17 am: |
| 
|
श्वापद जाणले मी ते न माझे गाव होते... जेथल्या नात्यास नुस्ते नाव होते... शेकडो वेळा कळ्या कोमेजलेल्या... शेकड्याने मोडलेले डाव होते... कैकदा राजा भिकारी जाहलेला... आपल्यांनी साधलेले डाव होते... जेथल्या काट्यांवरी मी प्रेम केले... आज तेथे पाकळ्यांवर घाव होते... लाज होती लक्तराने झाकलेली... अन चढ्या बोलीत त्यांचे भाव होते... ती न होती माणसे माणूसकीची... श्वापदांनी आणलेले आव होते... एकट्याने चालताना जाणले मी... काळजाने सोडलेले ठाव होते... सारंग
|
Sarang23
| |
| Monday, November 20, 2006 - 12:28 am: |
| 
|
अरे... माझी दाद चुकली का? पण मी अस कुठेच म्हटलं नाहीये की बाकी आवडलं नाही... मुळात तू भलताच धाडसी आहेस... ते मीटर कसलं अवघड आहे... तिथेच तुला १०० मार्क! आणि गझल दाखिली आहे... म्हणून तर आणखी खास झाली आहे... मैफिलीसाठी नाहीये ही गझल हे तर कबूल ना? पण मला जो मक्ता ऐकवला होतास त्यात आणि यात बदल वाटला म्हणून दाद फक्त मक्त्याला दिली... I hope everything is clear now...
|
वा!! वैभव, "असे कसे जाणले न मुक्ती सुखासुखीही मिळून जाते सहज तुझे नाव घेतले , श्वास श्वास हा बेफिकीर झाला" "मला न पर्याय राहिला ! लेखणीस केले तुझ्या हवाली तुला न पर्याय राहिला ! शब्द शब्द माझा कबीर झाला " खास आहेत.आणि महत्वाचे म्हणजे खरे आहेत.. तुझे सर्व शब्द खरेच कबीर झाले आहेत. . दाद..मल मीटर,वृत्त यातले काही कळत नाही.त्यामुळे मी फ़क्त भावच बघते,[तसेही कळाले असते तरी भावालाच मी अधिक महत्व दिले असते, भावाशिवाय कविता म्हणजे आत्म्याशिवाय देह,मग तो देह कितीइही सुंदर असुदे अर्थहीनच.]. "काजळी पणत्या, सुकी वृंदावने मागता भिक्षा अशा गावी कशाला "ओंजळीतिल मोगरा आताच दे गंधाळण्याचा वायदा भावी कशाला".. खूप सुंदर. सारंग, मतला अधिक आवड्ला. 'ती न होती माणसे माणूसकीची... श्वापदांनी आणलेले आव होते...".. ह्म्म.. छानच गुरु लोकांनी नेहमी असे disection करावे ही विनंती..म्हणजे आम्हालाही ज्ञान मिळत राहील..
|
Shyamli
| |
| Monday, November 20, 2006 - 2:23 am: |
| 
|
असे कसे जाणले न मुक्ती सुखासुखीही मिळून जाते >>> क्या बात है वैभव!!.... .. .. .. .. .. काजळी पणत्या, सुकी वृंदावने मागता भिक्षा अशा गावी कशाला >>> खरच.... पटल एकदम सारंग, मस्तच
|
धन्यवाद मित्रांनो सारंगा ... अरे तसं नाही .. मला खरंच वाटलं कुठे improvement ला वाव आहे की काय असे . गझल मैफ़लीसाठी नाही हे खरंय पण कधी संधी मिळाली तर ते ही करून बघू या . काय म्हणतोस ? तुझी गझल सही आहे मित्रा . एक न एक शेर . त्यातही मला लाज होती लक्तराने झाकलेली... अन चढ्या बोलीत त्यांचे भाव होते... ती न होती माणसे माणूसकीची... श्वापदांनी आणलेले आव होते... फार आवडले
|
जियो, वैभव!!!! ' शब्द शब्द माझा कबीर झाला..'!! खरंच झालाय. सॉरी लोक्स, आज तरी बाकीच्या नवीन कविता नाही वाचू शकत. त्यावर अभिप्राय ( कदाचित) उद्या.
|
Sarang23
| |
| Monday, November 20, 2006 - 7:14 am: |
| 
|
अरे improvement ला वाव असता तर त्याच वेळी आपले बोलणे झाले असते... गझल दाखिली आहे म्हणजे विरोधाभास नसूनही सरळ हृदयात शिरते... हे महत्वाचे! आणि आणखी एक... ते मीटर फार आवडले! या मीटरचा फारसा वापर नाही पाहिला रे... (वैभव आणि स्वाती, उदाहरण माहीत असल्यास सांगा) बहुदा कुसुमाग्रजांनी केला असावा कुठे तरी अस वाटतय, पण sure नाही... आणि बदलाला किंवा improvement ला वाव म्हणत असशील तर... कधीच नाही सुटावयाचा असा कुठे मोहपाश आहे ? इथे बघ काही करता येतय का... थोडा सहजपणा वाढेल अस काही... अन्यथा हेही छानच आहे... मलाच पुरेसा न धीर झाला... म्हटलं तर मोहपाश आहे ऐवजी मोहपाश होता असं हव का? एक शंका... आणि भूतकाळ आणि वर्तमानकाळ दोनींना संबोधून म्हणायच असेल तर असतो असं आलं पाहीजे... असं वाटतं... आणि शलाकाला मेल करण्याऐवजी इथेच प्रतिक्रिया टाकली तर सगळ्यांनाच शिकायला मिळेल... काय?
|
" कधीच नाही सुटावयाचा असा कुठे मोहपाश आहे " हे त्रिकालाबाधित सत्यसारखं आलंय .. उदा - जगी सर्वसुखी असा कोण आहे मीटरचं सांगायचं तर कै. सुरेश भटांची मनाप्रमाणे जगावयाचे ... किंवा मी एक लिहीली होती तसे म्हणाया समोर अगदी समोर होते बरेच रस्ते परंतु काही न बोलले अन निघून गेले पुढेच रस्ते लगालगागा x ४ आहे . शलाका यांना मेल पाठवतो म्हट्लं कारण नीट वाचून व्हायची आहे . लिहीन इथेच वेळ मिळाला की
|
Jayavi
| |
| Monday, November 20, 2006 - 11:29 am: |
| 
|
वैभवा, तुला साष्टांग दंडवत रे! कसं रे हे उतरतं तुझ्या लेखणीतून....... ! तुझी कुठलीही रचना असो..... एकेक ओळ, एकेक शब्द एक विलक्षण उंची गाठतो. तिथपर्यंत आम्हाला स्वप्नातही जाता येत नाही रे. मग फ़क्त वेगवेगळ्या शब्दांचा आधार घेऊन तुझं कौतुक करायचा दुबळा प्रयत्न करतो आम्ही. तुझ्या काव्यप्रतिभेला माझा मानाचा मुजरा वैभव!
|
Paragkan
| |
| Monday, November 20, 2006 - 12:24 pm: |
| 
|
wah .. vaibhav aani sarang .. khaasach !
|
Chinnu
| |
| Monday, November 20, 2006 - 3:32 pm: |
| 
|
मंडळी झक्कास चाललय. अजुन असच येवु द्या. मुहुर्त पाहतांना मांडवात तुला थोडा सुवास दरवळला तुझ्या गजर्याचा ... " मोगर्याच्या कळ्या आहेत मुक्याच पण सुवास किती बोलका! " असं तुच म्हणायची तेव्हा ... आकाशभर पसरुन चांदण्या किती खळाळुन हसायच्या तुझ्या डोळ्यात - ".... ए पुरे आता! शब्दांचे वैभव सांभाळुन ठेव बघ कधीतरी अपुरं पडेल हं तुला" किती खरं होते ते .. "........ अरे हे रे काय? " तुझा प्रश्न रेंगाळुन राहिला भरुन आलेल्या डोळ्यात माझ्या रिकाम्या हातात भेट म्हणुन माझं मन आणल होतं ना पण काय उपयोग? माझ्या स्वप्नफुलांची गाठ सोडवत तु कधीच मुहुर्त साधला होता..
|
Daad
| |
| Monday, November 20, 2006 - 11:35 pm: |
| 
|
सारंग, thanks खरंच. तुमची 'श्वापद' - 'ती न होती माणसे माणूसकीची... ' फरच छान! मृ, thanks heaps , गं वैभव, इथेच दे तुझी प्रतिक्रिया. सगळ्यांनाच फायदा होईल. चिन्नु, मुहुर्त सगळी कळली नाही. पण, एक एक कल्पना आवडल्या- 'मोगर्याच्या कळ्या आहेत मुक्याच ....'
|
|
|