|
Ashwini
| |
| Thursday, November 16, 2006 - 3:49 pm: |
| 
|
स्वाती, काय लिहीलं आहेस ग. केवळ महान. वैभव, मस्त. प्रसाद, तुझी गझल टाक ना please .
|
Daad
| |
| Thursday, November 16, 2006 - 5:24 pm: |
| 
|
सारंग, 'पुरा जाहला आज 'सारंग'* वेडा असे मंद गंधाळणे सोड आता' - क्या बात है! 'व्हावे मुक्त देऊनिया एकरकमीच प्राण' व्वा!! वैभव, गजल सम्मेलन गाजवल्याचा वृत्तांत इथे तर वाचलाच. पण, सांगायची गोष्ट म्हणजे, श्री. भीमरावांनी तुमचा आवर्जून उल्लेख केला एक आवडता कवी म्हणून!! (वयाचं माहीत नाही पण) एक दर्दी म्हणून सांगते जीते रहो!! असेच लिहीत रहा... तुमचा हा शब्द फुलोरा, ह्याचं रोपण इथे नाही, तिथे वर झालंय...... तुम्हाला नुसतं शिंपायचय... स्वत:साठी, आमच्यासाठी!!! नीरज - 'प्रतिभाही काळवंडून गेली, अशी...' सुंदर कल्पना, छान!! स्वाती, आह! - प्रपात झेलुन कडे मिरविती तडे तसे मिरवावे मीही ? अप्रतिम, प्रश्नच नाही.... काय लिहितेस, गं? छ्छे, एकदम तिरमिरून जायला झालं!
|
Paragkan
| |
| Thursday, November 16, 2006 - 8:43 pm: |
| 
|
wah swati .. khaasach ! पण ते 'प्रपात झेलुन ..' मध्ये गडबड आहे. 'कडे' कसे प्रपात झेलतील? कड्यावरून तर प्रपात खाली झेप घेतील ना ? ... एक प्रामाणिक शंका. न पटल्यास दुर्लक्ष्य करणे.
|
स्वाती ..... अप्रतिम !!!!!
|
धन्यवाद, दोस्त्स. पराग, दुर्लक्ष काय!! पण प्रपात ' खाली' म्हणजे कुठे पडतो? कडे फोडूनच मार्ग काढतो ना? - प्रामाणिक उत्तर. न पटल्यास दुर्लक्ष करावे.
|
Chinnu
| |
| Thursday, November 16, 2006 - 10:48 pm: |
| 
|
स्वाती, खुप खुप सुंदर! शब्द नाहीत ग माझ्यकडे... अप्रतीम, सुंदर, अजुन काय म्हणु? सारंगा वृतांत पोस्टल्याबद्दल तुमचे फ़ार फ़ार अभार.
|
Jayavi
| |
| Thursday, November 16, 2006 - 11:43 pm: |
| 
|
स्वाती, तुला मनोगतावर सुद्धा प्रतिक्रिया दिलीये...... पण इथे सुद्धा रहावलं नाही म्हणून देतेय प्रतिक्रिया.... स्वाती...... तू फ़ार फ़ार सुरेख लिहितेस गं. एक एक ओळ अगदी आत जाऊन भिडते! आपण तर पुरे फ़िदा तुझं लिखाण असंच बहरत येवो(जावो लिहिणार होते... पण ते आमच्यापर्यंत यावं म्हणून येवो )
|
हं ... हे खरंय जया ... मी आज जुने अर्काईव्ह्ज काढून वाचत बसलो तर स्वातीने अलिकडे खूपच कमी पोस्ट केलेलं आढळलं .. इतक्या संवेदनशील कवियत्रीला रोज काही ना काही सुचत असणारच आणि लिहीलं जात असणारच ... मग आपण असा काय अपराध केलाय की ते पोस्टलं गेलं नाही असं वाटलं ....
स्वाती तुझ्यापेक्षा ती निनावी बरी होती
|
Psg
| |
| Thursday, November 16, 2006 - 11:59 pm: |
| 
|
वॉव स्वाती. एकदम भिडली कविता.. आवडली!
|
Sarang23
| |
| Friday, November 17, 2006 - 12:21 am: |
| 
|
सगळ्यांचा आभारी आहे... वा! स्वाती... खासच! आणि मी हे कायमच म्हणतोय की निनावीच बरी होती
|
Sarang23
| |
| Friday, November 17, 2006 - 12:44 am: |
| 
|
हलकेच घ्या (हझल) हलकेच घ्या म्हणालो "ताणून द्या!", म्हणालो पहिलीच वेळ तुमची; "थोडीच प्या", म्हणालो! मीही तयार आहे!!! "घेऊन या!", म्हणालो फुटल्या चुकून प्लेटा... "देऊ नव्या!", म्हणालो थापा अफाट तुमच्या! मीही "खर्या!!!", म्हणालो आले 'कवी' पळा हो! "भेटू उद्या", म्हणालो! उद्धार का कुळाचा? "या तर शिव्या", म्हणालो बरळून फार गेलो... "सोडून द्या!", म्हणालो! पणत्या चिकार झाल्या; "कंदील न्या", म्हणालो!
सारंग
|
Meenu
| |
| Friday, November 17, 2006 - 12:50 am: |
| 
|
सारंग कंदील न्या म्हणायचं आणि पणतीच द्यायची .. हे बरं नव्हे .. मस्तच पण हज़ल .. स्वाती, वैभव तुम्हाला काय प्रतिक्रीया द्यायची सारखं सारखं छान सुंदर, अप्रतिम म्हणुन कंटाळा आला. फारच शिळे अर्थहीन वाटायला लागलेत ते शब्द त्यामुळे त्याव्यतिरीक्त काही प्रतिक्रीया असेल तरच देईन. खरच स्वाती अजुन लिही की गं पटापटा ..
|
" जमलीय का ? " म्हणाला झटक्यात " छ्या ! " म्हणालो हलकेच घे रे बाबा
|
Nakul
| |
| Friday, November 17, 2006 - 2:39 am: |
| 
|
मस्तच रे सारंग !!
|
Dineshvs
| |
| Friday, November 17, 2006 - 3:06 am: |
| 
|
स्वाती कविता म्हणुन छान, पण परागची शंकाहि बरोबर आहे. वहत्या नदीला पुढे जायला मार्ग मिळाला नाही तर तो प्रपात वरुन उडी मारेल. ( पुढे धबधब्यामुळे तो कडा झिजेल, आणि धबधबा मागे सरकेल. ) पण वाहती नदी मात्र, जर खाली जमीन मऊ लागली तर जमिनीला भेग पाडत जाईल जसे ग्रॅंड कॅनियनला झालेय. बघ तुला म्हणालो होतो ना मी रुक्ष माणुस आहे. तु कर हवे तर दुर्लक्ष पण आम्ही नाही करणार.
|
स्वाती मस्तच.. माझीही वैभव सारखीच तक्रार आहे... लवकर लवकर लिहित जा...!!!
|
Sarang23
| |
| Friday, November 17, 2006 - 3:41 am: |
| 
|
पण दिनेशदा, माझीही एक शंका... त्या प्रपाताला अडथळा म्हणून जर खुप मोठे खडक येत असतील, तर तो वरून उसळून खाली यायच्याऐवजी हळू हळू का होईना पण ते फोडूनच पुढे जाणार ना...?
|
वा!! काय बहरात आलिय मैफ़िल. वाचून धन्य धन्य झाले. नितांत सुंदर!यावर बोलायला दुसरे शब्दच नाहीत माझ्याकडे. वैभव,प्रसाद,सारंग,स्वाती सगळेच अप्रतिम.. निरु.. अश्रूही महाग झाली अशी व्यथा कल्पना आवडली.
|
मला तरी योग्य वाटतंय .. दिनेश झिजणार्या कड्यांवर तडे नसतील का ?
|
Shyamli
| |
| Friday, November 17, 2006 - 4:38 am: |
| 
|
सारंग, मस्त रे मजा आली गुर्जी, झटक्यात छ्या म्हणालो....
|
|
|