Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 16, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » कार्तिक » काव्यधारा » कविता » Archive through November 16, 2006 « Previous Next »

Sarang23
Wednesday, November 15, 2006 - 12:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

    सोड आता!

मला पाहुनी टाळणे सोड आता!
जिवाला असे जाळणे सोड आता!

जगाची कशाला तुला काळजी ही
मिठीतून ओशाळणे सोड आता...

जुने टाळुनी थांबलो सोबतीला
सखे आसवे ढाळणे सोड आता...

तुझा वर्ण लाजून झाला गुलाबी
गुलाबावरी भाळणे सोड आता!!

तुझ्या अंतरी जे मला ते कळाले
तरी मौन सांभाळणे सोड आता!

समोरी मला पाहुनी बोलते ना
अवेळी टिपे गाळणे सोड आता!

अशी स्पंदनांची नको तार छेडू
कथा तीच हाताळणे सोड आता!

तुझा श्वास हा दर्वळे भोवताली
सखे मोगरा माळणे सोड आता!

अता राहिलो ना सखे वेगळाले
स्वतःलाच न्याहाळणे सोड आता!

पुरा जाहला आज 'सारंग'* वेडा
असे मंद गंधाळणे सोड आता!


सारंग

* = भुंगा


Aaftaab
Wednesday, November 15, 2006 - 12:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अस्मानी, सारंग, देवा, वैभव
सर्वाना धन्यवाद.
बुजुर्ग लोकांचा अभिप्राय आला आणि धन्य झालो
-रवि


Kmayuresh2002
Wednesday, November 15, 2006 - 1:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग,गझल सही रे..

तुझ्या अंतरी जे मला ते कळाले
तरी मौन सांभाळणे सोड आता! ...

तुझा श्वास हा दर्वळे भोवताली
सखे मोगरा माळणे सोड आता! .....

हे दोन शेर मस्तच रे...

Meenu
Wednesday, November 15, 2006 - 1:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापरे देवा, वैभव, सारंग .. महान आहात ... फारच छान लिहीलत लोकहो ..

अरे गज़ल फक्त गज़ल सम्मेलनातच ऐकवायची असं कुठे आहे .. तु वैभव, प्रसाद, देवा गज़ल ऐकवणार असाल तर आपणच एक मस्त सम्मेलन करु या की आपल्या सर्वांसाठी


Sarang23
Wednesday, November 15, 2006 - 2:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मयुरेश, मीनु धन्यवाद...
तुझी कल्पना छान आहे! आपण यावर एक चिंतन बैठक आयोजीत करू या शनिवारी... संभाजी पार्कमध्ये...
( गिरीराज अधक्ष म्हणून मिळेलच :-) )


Vaibhav_joshi
Wednesday, November 15, 2006 - 8:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मित्रांनो ...
सारंग मस्त !! you are surpassing yourself everyday


Paragkan
Wednesday, November 15, 2006 - 11:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

good one sarang!

एकच शेर जरा out of place वाटला - 'अशी स्पंदनांची...'

Swaatee_ambole
Wednesday, November 15, 2006 - 11:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Keep it up, सारंग. :-)
( पण ' सोड आता' सोड आता! )
गालगागा तुलापण आवडतं का? येऊ दे की मग एखादी त्यात.

देवा, स्तुत्य प्रयत्न आहे. उर्दूप्रचूर शब्द मात्र फार आले असं वाटलं. :-)


Vaibhav_joshi
Thursday, November 16, 2006 - 1:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवाण घेवाण

जरा कुठे दिवसाचे
झाले फेडुनिया ऋण
सांज उंबर्‍यात उभी
पुन्हा हात पसरून

पुन्हा श्वास घ्यावे काही
काही श्वासांना देऊन
पुन्हा एकसारखे हे
जिणे असून नसून

किती वर्षे चाललेली
अशी देवाण घेवाण
व्हावे मुक्त देऊनिया
एकरकमीच प्राण


Shyamli
Thursday, November 16, 2006 - 1:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्या बात है!!!
अगदी अगदी,
पण हे अस शब्दात मांडायला आम्हाला कधि जमणार.....?
बहोत बढीया...

सारंग,
आवडली गझल खास तुझ्या स्टाईलची

मीनु तु हे सम्मेलन वगैरे ईथे बोलु नको हां मार खशील नाहितर......


Sarang23
Thursday, November 16, 2006 - 2:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा! वैभव बहोत खुब!
माझा एक शेर आठवला...

का जखमा छोट्या मोठ्या?
वर्मावर घाव बसावा!

बहोत खुब...!


Meenu
Thursday, November 16, 2006 - 4:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुन्हा श्वास द्यावे काही
काही श्वासांना देऊन >>> वैभव . . . .???

Manya2804
Thursday, November 16, 2006 - 4:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जखमा कश्या सुगंधी झाल्यात काळजाला
केलेत वार ज्याने तो मोगरा असावा....

(इलाही जमादार)


Vaibhav_joshi
Thursday, November 16, 2006 - 4:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनू typo होती . थॅंक्स

Lopamudraa
Thursday, November 16, 2006 - 4:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


किती वर्षे चाललेली
अशी देवाण घेवाण
व्हावे मुक्त देऊनिया
एकरकमीच प्राण >>>>>Chaane vaibhav..


Niru_kul
Thursday, November 16, 2006 - 4:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सजा....

जिला कधीही पालवी फुटणार नाही, अशी आशा मिळाली....
व्याकुळतेची परिसीमा भासेल, अशी दशा मिळाली....

स्वप्नांचे उभारलेले डोलारे, क्षणात उध्वस्त झाले;
मनातच गुदमरून जाईल, अशी विराणी कथा मिळाली....

भ्रमाच्या मोहक धुक्यातून, आणलो गेलो भानावर मी;
प्रतिभाही काळवंडून गेली, अशी वेदनेची प्रभा मिळाली....

थकलो मी, खचलो मी, अस्मितेला माझ्या तडा गेला;
अश्रुही झाले महाग, अशी निराळी व्यथा मिळाली....

काय गुन्हा झाला माझा, अजुनही न कळले मजला;
मृत्युनेही व्हावे लाजिरवाणे, अशी एकाकी जगण्याची सजा मिळाली....


निरज कुलकर्णी.




Suruchisuruchi
Thursday, November 16, 2006 - 5:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

priya maaybolikar ho...baalkavinchya kavitanchya avit madhuryachi godi jastit jasta lokanna gheta yavi yasathi mi orkut war ek community open keli ahe....balkavinchya kavita...aaplyaala mahit aslelya kavita tethe post karavyaa hi vinanti

Swaatee_ambole
Thursday, November 16, 2006 - 9:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवाण घेवाण सुंदर आहे, वैभव. :-)

Swaatee_ambole
Thursday, November 16, 2006 - 2:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकदाच...

एकदाच, पण असा भेट की वीज जशी झाडास भेटते
मरणांतीही उरेल स्मरणी, आलिंगन दे असे पेटते

एकदाच कर दंश असा की रक्ताने लाली विसरावी
जहर पसरता नसांत हिरवी जहाल धुंदी फक्त उरावी

एकदाच कर ह्रदय मोकळे, नकोस ठेवू मनात काही
प्रपात झेलुन कडे मिरविती तडे तसे मिरवावे मीही

एकदाच ये माझ्यामध्ये रसरसून तू असा, असा की
फळात अमृत भरता उरतो गंध फुलाचा केवळ बाकी

एकदाच समवेत तुझ्या क्षणमात्र जगावे, उधळुन जावे
मृतवत जितके श्वास ओढले, देणे त्यांचे फेडुन जावे...


Shyamli
Thursday, November 16, 2006 - 2:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रपात झेलुन कडे मिरविती तडे तसे मिरवावे मीही>>>
एकदाच समवेत तुझ्या क्षणमात्र जगावे, उधळुन जावे
मृतवत जितके श्वास ओढले, देणे त्यांचे फेडुन जावे...>>>
wow
सहिच ग आवडल एकदम....




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators