| | Sarang23 
 |  |  |  | Tuesday, November 14, 2006 - 12:43 am: |       |  
 | 
 वा! आफताब छान कल्पना...
 
 
 | 
| | Meenu 
 |  |  |  | Tuesday, November 14, 2006 - 1:40 am: |       |  
 | 
 जर ...  तर
 
 पुन्हा पुन्हा मनात, डोकावतो विचार
 काय होईल जर  ...  समांतर असलेले
 पुन्हा कधी झाले, आपले मार्ग एक तर  ..
 वठवु का सोंग न पाहिल्याचं
 टाळण्यासाठी परस्परांना
 अन जावु का चुकवुन नजर ..?
 कि मोकळेपणी भेटु आपण
 विसरुन सारी कटुता आणी
 नजरेत घेऊन मायेचा सागर  ..?
 प्रेमानी बोलु की पुन्हा दोष देऊ
 की नुसतेच निशब्द होऊन
 हात हातात घेऊ  ...
 कधीतरी होऊ परस्परांचे
 असं अबोल वचन देऊ  ...
 पुन्हा पुन्हा मनात, डोकावतो विचार
 काय होईल जर ......  तर
 
 
 | 
| | Meenu 
 |  |  |  | Tuesday, November 14, 2006 - 1:57 am: |       |  
 | 
 तुझ्या मौनाचं मला
 भाषांतर करुन देईल
 असा कुणी दुभाषा शोधतेय  ...
 त्याच्यासाठीच फक्त मी
 दिवसाला दिवस जोडतेय  ...
 आत्ता तरी हेच खरय
 बाकी अर्थ कळल्यावर येतीलच
 की उसवता जोडलेले दिवस  ...
 
 श्यामले तुझ्या मौनाची भाषांतर या झुळुकवरुन सुचलं
 
 
 | 
| | Sarang23 
 |  |  |  | Tuesday, November 14, 2006 - 1:57 am: |       |  
 | 
 वाईच्या गझल सम्मेलनाचा थोडक्यात वृत्तांत ता. ४ आणि ५ नोव्हेंबर २००६
 
 वाईच्या गझल सम्मेलनाचा थोडक्यात वृत्तांत द्यावा हे बरेच दिवस डोक्यात होतं; पण वेळच मिळत नव्हता. शेवटी आज योग आला...
 
 आणि इथे सांगण्याच्या दृष्टीने शेवटचा दिवसच महत्वाचा होता...
 
 खरं तर वाईच्या सम्मेलनातला शेवटचा दिवस गाजवला तो आपले गझलकार कविमित्र वैभव आणि प्रसाद यांनी!
 
 सुरुवात झाली ती प्रसादच्या सलामीच्या षटकारानेच!
 
 मराठीत इस्लाहची  ( परिष्करणाची )  गरज आहे की नाही या विषयावर विषयाला न धरून महाचर्चा चालू होती त्याविषयी प्रसादने अतिशय सुंदर शाल जोडी देऊ करून उपस्थित सर्व रसिकांची मनं जिंकून घेतली!  ( जोरदार टाळ्या... )
 
 प्रसाद :  मी प्रसाद शिरगावकर, पुणे येथून आलोय!  ( हे सांगण्याची काही गरज आहे का? पुढे जे बोलणार आहात त्यावरून लहान मुलगा देखील सांगेल तुम्ही पुण्याचेच आहात! )  इस्लाहची गरज आहे की नाही यावर मी एवढच म्हणेन की इस्लाहमुळे परिसंवादाचं रुपांतर मुशायर्यात करता येतं!  ( जोरदार हशा आणि टाळ्या... )
 आता ही संधी मिळालीच आहे तर मी ही इस्लाहचं उदाहरण देऊ इच्छितो...
 आयुष्यात एकदाच आदरणीय सुरेश भट यांना भेटायची संधी मिळाली... त्यावेळी मी त्यांना जी गझल ऐकवली होती ती अशी...
 
 झेलावयास माझी छाती तयार आता!
 घाला नव्या दमाने तुमचे प्रहार आता!!
 ( टाळ्याच टाळ्या... अगदी सचीन खेळतोय आणि पब्लीक वेडी झालीये असच वाटत होतं! आणि ते खरही आहे म्हणा, स्वतः सुरेश भटांनी नावाजलेला शेरही त्या तोडीचाच असणार!! )
 आणि या पुर्ण गझलेत फक्त या शेरावर सुरेशजींनी मला इस्लाह दिली ती अशी...
 गावात चोरट्यांच्या दिवसा उजेड नाही
 सुर्यही जरासा झाला हुशार आता!
 
 हा मुळ शेर...
 
 आणि...
 
 गावात चोरट्यांच्या दिवसा उजेड नाही
 सुर्यही कुठेसा झाला फरार आता!
 
 हा सुरेशजींनी इस्लाह केलेला शेर...
 
 ( खरं तर दोन्ही शेर तितकेच बोलके आहेत. असं सांगता येणारच नाही की कुठला शेर जास्त चांगला आहे )
 
 प्रसादने माझ्या शेजारी बसल्यावर हळूच कानात सांगितलं... एक तास झाला नुस्तं ऐकतोय आणि एक वाक्य पण नाही टाकायच म्हणजे काहीतरीच...  ( मान गये... नुस्त बोलायचय अस म्हणून जर प्रसादराव असं काही बोलणार असतील तर मग इतर वेळी काय?! )
 
 कसाबसा  ( नेहमीप्रमाणे कुठलेही निष्कर्ष न काढता )  परिसंवाद संपला  ( संपवला )
 
 त्यानंतर अतिशय गोड आवाजान कुणीतरी मुशायर्याला प्रारंभ केला... काय गोड आवाज म्हणून सांगू... त्यांचे नाव बहुतेक सौ. देशपांडे असावे, कारण ओळख करुन दिल्यावर बहुतेकांचा हिरमोड झाल्याचे माझ्या चाणाक्ष नजरेतून सुटले नाही
   
 आपले मित्र श्री. वैभव जोशी यांनी आधीच  selection committee शी चर्चा करून आपला नंबर पुढे करून घेतला.  ( पुणेकर असल्याचा फायदा झाला हे वेगळं सांगायला नकोच! )
 
 आपला मंजूळ आवाज शक्य तितका मंजूळ करत त्या सुत्रसंचालिकेने गझलकार वैभवराव यांना गझल ऐकवण्यासाठी पाचारण केले.
 
 सुत्रसंचालिका :  पुणे तिथे काय उणे... अशा या पुण्यातून आले आहेत श्री वैभव जोशी. त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर...
 
 भावनांचा मांडला बाजार नाही;
 शब्द माझा एवढा लाचार नाही! टाळ्या...
 
 जन्मतः मृत्युस मी पत्ता दिलेला
 आजही मी लावलेले दार नाही! पुन्हा पुन्हा टाळ्या...
 
 तोपर्यंत इकडे श्री. राम पंडीत यांनी स्मृतीचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन वैभवरावांच स्वागत केलं...
 
 मग कळत-नकळत सगळी सुत्रे वैभवरावांनी हातात घेतली...
 
 वैभव :  पहिल्यांदाच गझल सम्मेलनात आलो, खर तर इथे आलो तेंव्हा अशी चर्चा चालू होती की प्रेम या विषयावर काहीही ऐकवायचं नाही... तर त्यासाठी हे दोन शेर...
 
 ते म्हणाले,  " प्रेम अमुचा विषय नाही "
 मी म्हणालो,  " का? तुम्हाला हृदय नाही?? "
 
 टाळयांसाठी पुढचे काही सेकंद गेले...
 
 एकदा तुही भिडव डोळे जगाशी
 रोज झुकणे पाप आहे विनय नाही!
 
 पुन्हा टाळ्या आणि वा! वा!! वा!!! चे चित्कार!
 
 मग प्रस्थापितांचा आव आणुन ( आपण मैफिल मारली आहे याची जाणिव झाल्यावर )  वैभवरावांनी एकवार सगळीकडे कटाक्ष टाकून गझलेला सुरुवात केली... तेही पुणेरी शालजोडीतले वाक्य फेकूनच...
 
 आता प्रेमाव्यतिरीक्त सादर करतोय! जोरदार हशा...
   
 ( याचं शिर्षक आहे... अवशेष )
 
 घडवू पिढी वगैरे किरकोळ स्वप्न होते
 त्यांच्या पुढ्यात त्यांचे गंभीर प्रश्न होते...!
 ( वा! वा!! आणि टाळ्या चालुच असतील त्यामुळे त्याचा सारखा सारखा उल्लेख टाळतो )
 
 घ्यावी उधार कोणी कोणाकडून लज्जा?
 सारेच भ्रष्ट होते, सारेच नग्न होते!
 
 ( वा! बहोत खुब! ही माझी दाद... )
 
 वेशीपल्याडचे तर नव्हते कृतज्ञ, सोडा...
 वेशीअल्याडचेही झाले कृतघ्न होते!!
 ( हा शेर बहुदा जड गेला असावा... )
 
 आणि शेवटचा शेर सादर करतोय... खास भीमराव दादांसाठी...!
 अवघ्या चराचराने लुटला सुगंध ज्याचा
 ते झाड चंदनाचे जळण्यात मग्न होते!
 
 वा!!! वैभवराव उठले... मैफील खिशात गातली; आणि दादांच्या पाया पडायला निघून गेले!
 तरीही टाळ्या चालूच होत्या...!
 
 खर तर मी अजूनही या गझलेतून सावरलेलो नाहीये!
 आपल्यासारख्या ( म्हणजे आपण सगळे )  चाहत्यांसाठी मी वैभवरावांना खास विनंती केली आणि पुर्ण गझल मागून घेतली ती इथे देत आहे...
 
 अवशेष
 
 घडवू पिढी वगैरे किरकोळ स्वप्न होते
 त्यांच्या पुढ्यात त्यांचे गंभीर प्रश्न होते...!
 
 घ्यावी उधार कोणी कोणाकडून लज्जा?
 सारेच भ्रष्ट होते, सारेच नग्न होते!
 
 हे कोण वीर आले? सत्कार हा कुणाचा??
 गेले कुठे जयांनी केले प्रयत्न होते?!
 
 वेशीपल्याडचे तर नव्हते कृतज्ञ, सोडा...
 वेशीअल्याडचेही झाले कृतघ्न होते!!
 
 प्रांतागणिक विखुरले तुकडे हजार ज्याचे
 माझ्याच चेहर्याचे अवशेष भग्न होते!
 
 अवघ्या चराचराने लुटला सुगंध ज्याचा
 ते झाड चंदनाचे जळण्यात मग्न होते!
 
 ज्या वीजा घेऊन येणार्या पिढ्यांशी आदरणीय सुरेशजी बोलत होते; त्या म्हणजे प्रसाद आणि वैभव तर नसतील?!!!
 
 आपला
 सारंग
 
 
 | 
| | Meenu 
 |  |  |  | Tuesday, November 14, 2006 - 2:10 am: |       |  
 | 
 वा सारंग वृतांत सुंदरच आणी धन्यवाद आम्हाला संम्मेलनाला प्रत्यक्ष असल्याचा आनंद या वृतांतातुन दिल्याबद्दल  ..
 प्रसाद आणी वैभव तुमचं दोघांच मनःपुर्वक अभिनंदन  ..
 मला इस्लाह आणी परीष्करण दोन्ही शब्द कळले नाहीत रे सारंग
 
 
 | 
| | Shyamli 
 |  |  |  | Tuesday, November 14, 2006 - 2:19 am: |       |  
 | 
 वा सारंग!!!
 मस्तच, मजा आली ,
 धन्यवाद...
   
 सारंग,तुझी गझल कुठे आहे?
 अभिनंदन वैभव, प्रसाद
   
 मीनु
   
 
 | 
| | Sarang23 
 |  |  |  | Tuesday, November 14, 2006 - 3:45 am: |       |  
 | 
 शामली, मी गझल सादर केली नाही...
   बुजुर्ग कवीने शागिर्दच्या गझलेत सुधारणा करणे म्हणजे इस्लाह... त्याचं मराठी रुपांतर म्हणजे परिष्करण...
 
 
 | 
| | Aaftaab 
 |  |  |  | Tuesday, November 14, 2006 - 4:02 am: |       |  
 | 
 इथे मायबोलीवर रोज वाचतो आणि आस्वाद घेतो ते आपले लाडके कवी ग़ज़ल संमेलनासारख्या ठिकाणी जाऊन बाजी मारून आले, याचा खूप अभिमान वाटतो..
 वैभव, प्रसाद.. एकदा संजीव अभ्यंकर साठी पु. ल. म्हणाले होते "मी ह्याला काही पदवी वगैरे देणार नाही, पण आणखी काही वर्षानी 'संजीव अभ्यन्कर' हे नावच पदवीसारखे भासेल"
 मला अस वाटतं की पु. ल. तुमच्याबद्दलही असेच म्हणाले असते आज..
 All the Best  आणि अशाच जबरी कविता, ग़ज़ला आम्हाला ऐकवत रहा..
 "अवघ्या चराचराने..." अत्त्युच्च!!!
 
 
 | 
| सारंग, सविस्तर वृत्तांत लिहील्याबद्दल धन्यवाद. तू का नाही सादर केलीस म्हणे गज़ल? आणि प्रसाद शिरगावकरांनी कुठली केली ते नाही लिहीलंस.
 
 वैभव, ही(सुद्धा) गज़ल अप्रतिम आहे! एक एक शेर म्हणजे लिमिट आहे!!
 तुझ्यामुळे गज़ल  ( वाचाय)ची गोडी लागली मला.  ( हे म्हणजे जवळपास आईनस्टाईनकडून रिलेटिविटी शिकण्यासारखंच आहे!)
 खुद्द त्या क्षेत्रातल्या थोर लोकांकडून तुझी वाहवा झाली याचा खूप आनंद झाला. हे आज नाही उद्या होणारच होतं. व्हायला हवंच होतं. शुभेच्छा!
 ( उद्या तू  ' मोठा माणूस' झालास की आम्ही आमची ओळख आहे असं सांगून फुशारक्या मारू शकू!)
   
 
 | 
| | Dineshvs 
 |  |  |  | Tuesday, November 14, 2006 - 12:35 pm: |       |  
 | 
 वा, सारंग वृतांताने सगळा मुशायरा डोळ्यासमोर उभा केलास.
 
 
 | 
| सारंग  ...  तू गज़ल मागितलीस तेव्हा मागेपुढे फारतर एक दोन ओळी लिहीशील असं वाटलं होतं ...  असो  ...  तुम्हा सगळ्यांचेच मनःपूर्वक आभार पण हे इतकं काही तिकडे घडलं नाही  .  म्हणजे मैफ़ल मारणे वगैरे खूप मोठ्ठे शब्द आहेत आणि सारंग ने केवळ अतीव प्रेमापोटी ते लिहीले आहेत .  शिकायला मिळालं हेच खूप झालं  ..  आपण हा विषय इथेच थांबवू आणि कविता /  गज़ल लिखाणाकडे वळू .
 
 एक गज़ल सारंगसाठी पोस्ट करतोय  ..
 
 जाता जाता एक खुलासा  ...  पुणेकरांनी घाई करून नंबर आधी लावून घेतला कारण मुंबईकर सारंग यांना निघण्याची घाई होती
 
   
 आणखी एक  ..  आफ़ताब कविता आवडली  .  मस्त कल्पना आहे .  शलाका मृद्गंधा म्हणते त्याप्रमाणे काही काही कल्पना आणि शब्दवापर मस्त
 
 
 | 
| माहीत नाही  ....
 
 चाललो मी एकटा कोठे ?  मला माहीत नाही
 राहिला मागे कधी तो काफ़ला माहीत नाही
 
 पावसाला बोललो  " ती यापुढे येणार नाही "
 गाव दुष्काळी कसा हा जाहला माहीत नाही
 
 घाव त्यांचे पोचले  !  मी धाडली होती फुलेही
 वार का चाणाक्ष त्यांना वाटला माहीत नाही
 
 आजही नित्यापरी मी छेडतो तारा मनाच्या
 रे तुम्ही केव्हा गळा हा कापला ?  माहीत नाही
 
 दूरवर सर्वत्र होती मित्रदेशांचीच राज्ये
 अश्व यज्ञाचा कुणी हा रोखला  ?  माहीत नाही
 
 
 | 
| सारंगसाठी गज़ल? मग आम्ही अभिप्राय द्यायचा की नाही?
   
 व्वा!! सुंदर!!  ( मला अप्रतिम म्हणून कंटाळा आला. आणि दुसरा तेवढा दमदार शब्द सुचत नाहीये!  masterpiece  ला मराठीत काय म्हणतात?)
   
 
 | 
| | Nakul 
 |  |  |  | Tuesday, November 14, 2006 - 8:15 pm: |       |  
 | 
 वैभवशेठ, सुरेख गज़ल. पावसाला बोललो ... शेर खूपच आवडला.
 [मला मात्रा वृत्त कळतात अशातला भाग नाही]
 
 
 | 
| सारंग
 
 वृत्तांत छान लिहिला आहेस (जरा जास्तच रंगवला आहेस!)
 
 या सगळ्यात वैभवच्या गझलेनी बहार आली हे तेवढं खरं....
 
 ( BTW  त्या बाईंनी 'सौ' देशपांडे सांगितलेलं मी ऐकलं नाही! अरे अरे अरे... )
 
 
 | 
| | Devdattag 
 |  |  |  | Tuesday, November 14, 2006 - 10:30 pm: |       |  
 | 
 वैभव क्या बात है.. जबरीच
 आफ़ताब.. कल्पना मस्त.. आवडली
 
 
 सांगतो तुला मला का ठेंगणे अस्मान झाले
 सांग आहे कुणी का मजपरी धनवान झाले
 
 कोण तो आहे मला का काफिर म्हणूनी टाळतो
 हाय ती दिसली अन पुन्हा खुदाचे ध्यान झाले
 
 स्मरते आहे मला ती रात्र अजुनही आगळी
 झालो तिचा असा मी नि सोयरे अंजान झाले
 
 काय त्या डोळ्यात होती बेहोशी जादुभरी
 विसरलो मीही सुरांना अन शब्दही म्यान झाले
 
 संमतिने तिच्याच आता जीव आहे जायचा
 अस्तित्व माझे माझ्या कलिजात मेहमान झाले
 
 सांग तु वेगळे असे का त्या खुदाचे वागणे
 जन्मले कित्येक आणि कित्येकही बेजान झाले
 -देवदत्त
 
 
 
 
 | 
| | Smi_dod 
 |  |  |  | Tuesday, November 14, 2006 - 10:34 pm: |       |  
 | 
 वेदना
 
 एक हळवं फ़ुलपाखरू
 मध टिपता टिपता
 अचानक हळवं झालं
 दुखावल का मी या फ़ुलाला
 म्हणुन कासाविस झालं
 वेदना त्याची
 अश्रुचा कण होउन
 फ़ुलांवर उतरली
 फ़ुल शहारलं
 अंगोपांगी थरथरलं
 फ़ुलपाखराची वेदना लेवुन
 स्वतःच कोमेजलं
 फ़ुलपाखरु मग
 अजून अजून हळव झाल.....
 पाकळ्यांमधे फ़ुलाच्या त्या
 आतल्या आत घुसमटल
 
 स्मि
 
 
 | 
| | Shyamli 
 |  |  |  | Tuesday, November 14, 2006 - 10:51 pm: |       |  
 | 
 वा! स्मि छानच ग!
 गुरुजी गझल मस्तच
 छानच रे देवा, जमायला लागल तर......
   
 
 
 | 
| वैभवा,गझल मस्त रे... बर्याच दिवसांनी तुझी गझल वाचली
   
 देवा,लगे रहो... आता गझल प्रकारात पण झंडे गाडणार का?बहोत खुब
   
 सारंग,गझल संमेलनाचे वर्णन सहीच रे.. वैभवा,तुझी त्यातली गझल खल्लास रे...
   
 
 | 
| | Sarang23 
 |  |  |  | Tuesday, November 14, 2006 - 11:56 pm: |       |  
 | 
 वा!!! वैभवा... क्या बात है! गालगागा ची मजा काही औरच... काय स्वाती खरं ना!
 अग आणि ती फक्त माझासाठी असती तर त्याने मला फोनवरही ऐकवली असती... ती आपल्या सगळ्यांसाठी आहे...
 
 खरं तर मी आणि प्रसाद उशीराने गेल्यामुळे गझल ऐकवायची संधी गेली... हरकत नाही परत आहेच की पुण्याला सम्मेलन पुढच्या वर्षी!
 
 आणि हो आणखी एक... प्रसाद आणि वैभव, त्या वृत्तांतात काहीही अतिशयोक्ती नाहीये... जे वाटलं, पटलं ते टाकलं!
 
 आणि ही माझी पण एक गझल...
 
 
 |