|
Dhund_ravi
| |
| Thursday, November 09, 2006 - 11:15 pm: |
| 
|
पुर्वी त्याची कविता खुप अल्लड होति ………. जणु रंगपंचमीच असायची हल्ली भटकायची कुठेतरी अंधारात मुक्यानी ………. त्याच्या ओठात कमीच असायची रातराणी तिनी केंव्हाच सोडली ………. आत बाभाळीची सावली गाठली होती परवा म्हणे खुप दिवसांनी तिला ………. त्याची कविता भेटली होती त्याच्या वर्षावाकरता ती नेहमिच झुरायची ………. आता स्पर्शाकरतही हरलिये गंध उडलेल्या गज-यासारखी ………. त्याची कविता आता उरलिये स्वत:च्याच डोळ्यातल्या पुरात ती कधी वहुन गेली ………. कधी वणवा होऊन पेटली होती परवा म्हणे खुप दिवसांनी तिला ………. त्याची कविता भेटली होती त्याच्या विरहच्या काट्यांनी, फाटलेला पदर सांभळत ………. ती स्वत:च ऊर झाकत होती त्याच्या एकटं असण्याचं, कधी तिच्या’ नसण्याचं ………. ओझं घेऊन वाकत होती तिच्या पदराला सुरांच भान नव्हतं ………. आणि शब्दंची साडी विटली होती परवा म्हणे खुप दिवसांनी तिला ………. त्याची कविता भेटली होती परवा म्हणे त्याच्या मावळत्या क्षितिजावर ………. दोघी समोरासमोर आल्या आणि आठवणींचा पाऊस बरसवत ………. दोघी ओल्या चिंब झाल्या ती हुंदका मुठीत घट्ट दबत ………. नखशिखंत शहारली तेंव्हा आपल्या फाटलेल्या पदरानी, तिचे साठलेले डोळे पुसत ………. त्याची कविता तिला म्हणली त्याच्या डोळ्यातली वीज मझ्या घरवर पडलिये ………. तुझ्या डोळ्यात का पाणी आहे मला कळत नाही तु तर त्याच्या पापण्यांवर राहतेस, ………. जो त्याच्या डोळ्यात बुडाला त्याचं घर जळत नाही मी त्याच्या डोळ्यातच काय, ………. त्याच्या मनात, श्वासात, विश्वासातही नाही तु त्याच्या स्वप्नात नाहीस ………. म्हणुन मी त्याच्या भासातही नाही तु त्याच्या एका क्षणात नव्हतीस ………. त्या क्षणी त्याचं हसणं ओठातुन गळालं त्याच्या डोळ्यातला थेंब माझ्या झोपडीवर पडला ………. आणि घरटं माझं जळालं मझ्या उध्वस्त घराची शपथ आहे तुला ………. तुझ्या घरात मला जागा दे माझ्या फाटलेल्या पदरातलं आभाळ शिवायला ………. तुझ्या पापण्यांचा रेशीम धागा दे ह्यावर ती कवितेला म्हणाली तुझ्या विटलेल्या साडीचा तुझ्या देहालाच शाप आहे ………. माझा तर आत्माच विटुन गेलाय त्याच्या डोळ्यातला थेंब तुझ्या घरट्यावर पडण्याआधी ………. माझे हसणारे ओठ मिटुन गेलाय माझ्या पापण्यांच्या धाग्यांनी तु काय पदर शिवणार ………. माझ्या पापण्यांवर फक्त आग आहे माझ्या मुठीत शहारलेला हुंदका नाही ………. माझ्या उध्वस्त घराची राख आहे काल म्हणे कोणाला तरी ………. त्या एकमेकांसोबत दिसल्या होत्या त्याच्या मावळत्या क्षितिजावर दोघी ………. घर बांधत बसल्या होत्या ………. धुंद रवी
|
Meenu
| |
| Friday, November 10, 2006 - 12:16 am: |
| 
|
वा रवी सुंदरच .. ..
|
Krishnag
| |
| Friday, November 10, 2006 - 1:02 am: |
| 
|
क्षण!!!!! काही क्षण भिजलेले आसवांच्या दवात काही क्षण सुकलेले विरहाच्या उन्हात काही क्षण हरवलेले आठवणीच्या भोवर्यात काही क्षण तरंगलेले भावनेच्या कमलदलात काही क्षण पेटलेले उद्वेगाच्या अंगारात काही क्षण शमलेले मायेच्या ओलाव्यात काही क्षण धावलेले भविष्याच्या वेधात काही क्षण थांबलेले भुतकाळाच्या विळख्यात काही क्षण जागलेले निराशेच्या तमात काही क्षण निजलेले आशेच्या किरणात काही क्षण झिंगलेले मानाच्या वर्षावात काही क्षण थिजलेले अपमानाच्या बर्फात काही क्षण रडलेले बोचर्या पराभवात काही क्षण हसलेले बहु प्रतिक्षित यशात सारे क्षण माझे साठवलेत मनाच्या कप्प्यात शिदोरी ह्याच क्षणांची आयुष्याच्या प्रवासात किशोर
|
वाह ! मस्त जमलिये मैफ़ल .. कविता तर छान आहेतच पण श्यामली , लोपा , मीनू देवा तुम्हा लोकांचा गझल लिहीण्याचा प्रयत्न खरंच कौतुकास्पद आहे .. मला स्वतःला ह्या काव्यप्रकाराचं फार अप्रूप आहे .. प्रत्येक शेर मध्ये नियम सांभाळून एक एक कविता जिवंत करणे ही खायची गोष्ट नाही .. इथे गझल पोस्ट करणारे स्वाती , सारंग , प्रसाद ह्यांना हीच विनंती आहे की त्यांनी येणं थांबवू नये
|
कवितेतली कविता ... माध्यान्ह कलता कलता आला , म्हणाला " ऐकवा ना नवीन काहीतरी " मी म्हटलं " ऐक ! कवितेचं नाव आहे " खेळ " चला मार्ग झाले निराळे म्हणावे फुकाचेच सारे जिव्हाळे म्हणावे नको काळजी काळजाची मुळी अन नको भावनांचे उमाळे म्हणावे ' कसे व्हायचे रे ?' नको शब्द तोलू पुन्हा व्यर्थ चर्चा पुन्हा तेच बोलू जुन्या स्पंदनांनी नव्याने भुलावे ' निघे पाय कोठे ' तुला मी म्हणावे क्षणांचा क्षणांशी जरा मेळ झाला कुणी जिंकले , हारले , खेळ झाला ' अरे वेळ झाला ' मला तू म्हणावे ' खरे ! वेळ झाली ' तुला मी म्हणावे ..... काही न बोलता भरल्या डोळ्यांनी निघून गेला .... जरा वेळाने ' काय भरून आलंय अचानक ' म्हणत बायको उठून आली '" कुणी आलं होतं का ? बोलण्याचे आवाज येत होते " " हो " " कोण होतं ?" " पाऊस ......"
|
Meenu
| |
| Friday, November 10, 2006 - 3:42 am: |
| 
|
मेळ .. डोक्यात कसल्याश्या ओळी घोळत होत्या .... संध्याकाळचा स्वयंपाक, मुलाचा अभ्यास, आवराआवर ... जेवणं अन मागची सारवासारव, झालं एकदाचं सारं काही ... अन कवितेची वही उघडली, पण त्यात उद्याच्या दिवसाची सावली दिसली पडलेली सकाळची शाळा, स्वयंपाक, ऑफीसचीही गाठायची वेळ म्हणलं नाही बाई जमायचा आपला मेळ परत एकदा वही पेन उचलण्याआधीच मिटली ....
|
Sarang23
| |
| Friday, November 10, 2006 - 4:15 am: |
| 
|
धुंद रवी... क्या बात है... बहोत खुब! फार आवडली! वैभवा... पाऊस ही कविता चर्चेसाठी घ्यायला माझी काही हरकत नाहीये! उद्याच बसू मग!! क्या पंच है यार!!! मिनू, छान! नावात काय आहे?! शेक्सपिअर... असं वाटलं वाचून
|
Niru_kul
| |
| Friday, November 10, 2006 - 9:18 am: |
| 
|
पांथस्थ... सूर्य पुन्हा आज, क्षितीजावर सांडलेला... खेळ संध्याकाळचा, पुन्हा अर्धाच मांडलेला... डोळ्यात उतरूनी आले, नभ वळवाच्या थेंबांचे; पुन्हा समुद्रवारा, पदराशी बांधलेला... व्याकुळ मनाच्या ओठी, गीत अधुर्या श्वासांचे; निखळत्या ह्रदयाचा सांगडा, अश्रुंनी सांधलेला... दाटलेले कारुण्य, डोळ्यांत माझिया; वेदनेचा काफिला, रक्तात पांगलेला... तुडवते स्वतःला रोज, पायवाट ही झिजलेली; मी विराणा पांथस्थ, सावलीत थांबलेला...
|
Chinnu
| |
| Friday, November 10, 2006 - 9:40 am: |
| 
|
रवी, खुप भावपुर्ण कविता लिहीलीत. काल तुमची दाद पण छान होती. मीनु, मस्त ग. किस्ना छान आहेत क्षण तुझे. निरु, क्षितीजावर सांडलेला सुर्य वाह, मस्त. वैभवा, नाविन्यपुर्ण प्रयत्न छान जमलाय.
|
वैभव, ' कवितेतली कविता' अप्रतीम आहे. आशय आणि मांडणी दोन्ही. विशेषतः मुक्तछंद आणि वृत्त ( भुजंगप्रयात?) अश्या पद्धतीने वापरल्यामुळे सुंदर परीणाम साधला आहे. ' अरे, वेळ झाला... खरे.. वेळ झाली..!!' ... हे तूच लिहावंस!! गज़लच्या बाबतीत ' खायचं काम नाही' म्हणालास ते अगदी खरं आहे. माझी क्वचितच हिंमत होते तिच्या वाटेला जायची. वाचक म्हणून माझाही आवडता काव्यप्रकार आहे तो. ( किंवा तुझ्या गज़ला वाचून आवडता झाला आहे असं म्हणता येईल.) सारंग, ' उछ्वास' आवडली. ( शब्द नक्की उच्छवास असा आहे की उछ्वास?) निरू, पांथस्थ मधे छान प्रतिमा वापरल्या आहेत तुम्ही. लोपा, सुरुंग लागून उध्वस्त झालेलं भावविश्व विकायला काढलं म्हणजे काय ते कळलं नाही मला. तसंच तो सुरुंग लावणारेच बोली लावताहेत ती कश्याची? मीनू, जेव्हा सुचते तेव्हा या सगळ्याला न जुमानता उतरतेच ना कागदावर?
|
वा!!! लोपा,मस्तच जमलीये.. गझल नसली तरीही मला गझले इतकीच आवडली, देवा.. अप्रतिम.. रवी.. खूपच सुंदर... त्या दोघी त्याच्या मवळत्या क्षितीजावर घर बंधताना.. क्या बात है!! वैभव,कवितेतली कविता खूप सुंदर आहे.. "वेळ झाला आणि वेळ झाली" .. स्वाती म्हणते त्याप्रमाणे हे तूच लिहावे. सारंग.. उच्छ्वास खास आहे मीनू,अग रोज असे करु नकोस पण, आम्हाला वाचायच्या आहेत तुझ्या कविता.. किशोर, क्षण सुरेख आहेत. निरू,पांथस्थ.. मस्त "तुडवते स्वतःला रोज, पायवाट ही झिजलेली; मी विराणा पांथस्थ, सावलीत थांबलेला...".. खरंच खूप आवडल्या या ओळी..
|
Smi_dod
| |
| Friday, November 10, 2006 - 11:48 pm: |
| 
|
व्वा सहि...सगळे अगदी बहरात आहेत रवि सुरेख वैभव...केवळ अप्रतिम.....सुन्दर!! सारन्ग... अगदि पटले बघ किशोर...क्षण खूपच छान आहेत निरु, पांथस्थ....आवडली... अजून येउ द्यात...
|
Daad
| |
| Sunday, November 12, 2006 - 10:54 pm: |
| 
|
रवी, खूप खूप सुंदर कविता त्या दोघी.... पाण्यातला रस, सुवर्णाची कांती, साखरेतली गोडी काढली तर काय राहिलं? तशी त्याच्या कवितेतली ती!! त्या दोघींना हे कळलेलंच नाही... फार फार सुंदर मांडलंय. किशोर, क्षण आवडली. वैभव, कवितेतली कविता... पावसाने भरल्या डोळ्यांनी निघून जाणे... हे असलं काही तुम्हीच लिहू जाणे.... छानच मीनू, असं कितिदा आपण भरलं मन आपल्यापाशीच ठेवतो?... पण स्वाती म्हणतेय तशी कधी कधी अगदी न जुमानता उतरतेच.... कधी नुसतीच मनाच्या अंगणात तर कधी चक्क कागदावरही. निरू, 'सूर्य पुन्हा आज क्षितिजावर सांडलेला'... आवडली कल्पना
|
Daad
| |
| Sunday, November 12, 2006 - 10:55 pm: |
| 
|
मी तुला.. मी तुला बाहूत घ्यावे, कवळावे जैसे शब्दाने, अर्था आकळावे मी तुला अंजुळीत झेलावे, हुंगावे जैसे गंधाने, फुलानेच धुंद व्हावे तू मला परिधान अंगांगी करावे जैसे चंद्राने चांदण्यामाजी नहावे तू मला गजलेपरी मैफिलीत गावे जैसे षड्जाने, गंधारा गुणगुणावे -- शलाका
|
Devdattag
| |
| Monday, November 13, 2006 - 12:39 am: |
| 
|
लोकहो थँक्स.. वैभव मल माहित होतं की ही गज़ल नाहिये.. पण म्हंट्ल सगळे नियम नसेनात का थोडे नियम पाळायला काय हरकत आहे?.. आणि कवितेत जर का गेयता आली तर ती भावते अस माझं मत आहे.. एक ना एक दिवस गज़ल लिहिता येइलच म्हणा, जास्त ओढाताण न करता शब्दांची..
|
Princess
| |
| Monday, November 13, 2006 - 1:08 am: |
| 
|
माझ्या आयुष्याचा कोरा कागद दिला मी तुझ्या हाती, वाटल होते, प्रेमाची कविता लिहिशील तू त्याच्यावरती... पण कितीतरी दिवस तो कागद तसाच पडुन होता तुझ्या टेबलवर आज ना उद्या लिहिशील तू या एका आशेवर त्या दिवशी तू हातात घेतले तेव्हा किती हरखला, आता प्रेम कविता लिहिशील या विचारात हरवला पण लिहितांना मनासारखा शब्द नाही तुला सुचला, म्हणुन तु तो चोळामोळा करुन फेकला... आयुष्याचा कोरा कगद ना आता कोरा राहिला प्रेम कविता नाहीच... प्रेमाचा एक शब्दही नशीबी नाही आला पुनम
|
दाद............ केवळ अप्रऽऽऽऽऽऽऽति.ऽऽऽऽम!! काय एकेक कल्पना आहेत...शब्दाने अर्थ,फ़ुलाने गन्ध,चन्द्राने चान्दणे,षड्जाने गन्धार अनुभवणे..वा!! एकेक कल्पना लाखाची आहे ग.. पुनम, त्याने लिहिली नसली तरी तू लिहिलसच की.. .. हृदयस्पर्शी.
|
Aaftaab
| |
| Monday, November 13, 2006 - 4:44 am: |
| 
|
ती कौतुकाने न्याहाळते लेकराच्या शांत तेजस्वी मुद्रेकडे पण तिला राहून राहून खटकत राहत वाटत राहतं... त्या शांत चेहर्यामागचं मन खिन्न आहे.. कुठेतरी काहीतरी बिनसलं आहे... उगाच नाही एवढा खुलत जाणारा चेहरा, पार हिरमुसत जातो... एवढा एवढासा होतो.. कधी कधी तर स्वारी रात्र रात्र परततच नाही आईच मन मग चिंता करत बसतं 'काय करत असेल बाळ माझं?.. कुठल्या चटक चांदणीनं मोहात तर नाही ना पाडलं त्याला?.." नाना शंका, एक ना अनेक.... मग तिच्या काळजालासुद्धा ओहोटी लागत जाते.. एकदा असाच हिरमुसलेला परत आलेला असता.. आईने विचारलेच.. "बाळा असा काय रे नाराज आहेस? चेहर्यावर पहा तुझ्या चिन्तेच्या किती छटा आहेत? आपल्या आईला नाही सांगणार कारण?" त्यानेही मग मोकळं केलं मन... "आई, तू जेवढे प्रेम माझ्यावर करतेस, तेवढेच प्रेम बाबा का नाही करत? का माझी नजरानजर होताच कुठेशी निघून जातात? का.. का...?" आईला उलगडा झाला म्हणाली... "अरे वेड्या, त्यांचं कामच तसं आहे.. सगळ्या जगातला अंध:कार दूर करायचं आणि त्यांच्या कामाच्या वेळाही तशाच.. पण बाळा, तुझ्याकडे लक्ष नाही असं मात्र नाही बरं.. माझ्या डोळ्यात पाहून बघ तुझ प्रतिबिम्ब.. अरे तुझ जे तेज आहे, ते त्यान्च्यामुळेच आहे, त्यान्च्या तुझ्यावरच्या प्रेमामुळेच आहे.." तात्पुरतं का होईना.. शंकानिरसन झालं... आणि धरतीमातेकडे पाहून चंद्र किंचित हसला
|
Asmaani
| |
| Monday, November 13, 2006 - 8:33 am: |
| 
|
आफताब, खूपच सुंदर! खूप छान कल्पना!
|
खूप दिवसानी परत आलोय.
|
|
|