|
Smi_dod
| |
| Tuesday, November 07, 2006 - 11:05 pm: |
| 
|
संवाद.... खूपदा संवाद विसंवाद होतो मग बसते तुझाच विचार करत सुचवावे काही,बोलावे काही हट्ट ही करावा तर बघुया करुया चा तुझा घोष खट्टावते मन बैचेन होते मग सगळ्या आठवांनी आता बोलयचेच नाही ठरवते मनोमन जेवलीस कि नाही अजून म्हणुन आठवण केलेला फोन....... रुसल्यावर रागवल्यावर झालेली तुझी कासाविशी तडफ़डवते मला.... मी न बोलती झाल्यावर नजरेतली ती व्याकुळता रागवावेसे वाटत नाही पण परत..... तुझे तसेच वागणे घुसमटवते मला... सततच हा लपंडाव अस्वस्थ करून जातो परत परत नजरे समोर तुच तरळत असतोस तुझे बोलणे ते दिलखुलास हसणे हे फ़क़्त तुझ्यासाठीच ग म्हणणे विरघळवते मला तुझ्यात आणि मग येतो माझा मलाच राग.. तुला दुखावल्याबद्दल... स्मि
|
Chinnu
| |
| Tuesday, November 07, 2006 - 11:37 pm: |
| 
|
स्मि, पिंपळपान गोड आहे ग. सारंग, वादे ऐवजी वायदे बर दिसेल का? पारिजाताने अलगद सांभाळणे मस्त! धरा कोरडी अन डोळे वाहतात, सहीच जयु!
|
Psg
| |
| Wednesday, November 08, 2006 - 12:01 am: |
| 
|
स्मि, खूप छान लिहिली आहेस 'संवाद'.. आवडली
|
आपल्या सर्वांच्या अभिप्रायांबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक आभार...
|
प्राण ओसरायचाच आज ना उद्या प्राण ओसरायचाच आज ना उद्या देह हा जळायचाच आज ना उद्या वात थोडकी तसेच तेल थोडके दीप मंद व्हायचाच आज ना उद्या घे गड्या, फुलून घे, वसंत दाटला... हा ऋतू सरायचाच आज ना उद्या आवरावया हवीस प्यास चातका मेघ ओसरायचाच आज ना उद्या मोजलेस तू मनात आकडे किती अर्थ शून्य व्हायचाच आज ना उद्या घट्ट सोबती असो तुझा कुणी किती हात तो सुटायचाच आज ना उद्या भासते तुझेच गीत गुंजते नभी सूर हा विरायचाच आज ना उद्या
|
Paragkan
| |
| Wednesday, November 08, 2006 - 12:33 am: |
| 
|
wah prasad ... !!
|
Psg
| |
| Wednesday, November 08, 2006 - 12:53 am: |
| 
|
prasad, back with a BANG मस्त! फ़ारच छान, दोन्ही गझल्स.. अगदी अर्थपूर्णं, पण साधंसोपं!
|
Meenu
| |
| Wednesday, November 08, 2006 - 1:26 am: |
| 
|
अहा प्रसाद अगदी सुंदर .. खुप छान
|
Jayavi
| |
| Wednesday, November 08, 2006 - 1:54 am: |
| 
|
दोस्तांनो, इतक्या सुरेख प्रतिक्रियांबद्दल मनापासून आभार स्मि, मस्तच गं! अगदी मनातलं ओळखल्यासारखं लिहिलंस गं! प्रसाद, ही गझल पण छानच! ए, पण थोडी नकारात्मक आहे का रे?
|
Devdattag
| |
| Wednesday, November 08, 2006 - 2:21 am: |
| 
|
प्रसाद मस्तच आहे गझल.. मला हरिहरनची 'झूमले हस बोलले' गझल आठवली..
|
Lopamudraa
| |
| Wednesday, November 08, 2006 - 7:06 am: |
| 
|
भावविश्व चढवते फ़ुल मी माझ्याच प्रतिमेला स्वप्नांच्या कळ्यांचे निर्माल्य रोज प्रवाहाला..! मौनाच्या घरात आतला आवाज साथीला भिंतीवरी त्याच्या आक्रोश रेखाटलेला...! आठवणीतला देह पहिल्या स्पर्शात मोहरलेला जाणवतो आज फ़क्त अंगावर काटा शहारलेला..! हसणं जमुन आलं आता चेहरा सरावला खुलण्याचा पर्याय मात्र कायमचा बंद झालेला..! शिकलेच जेव्हा येउ लागले..व्यथेलाही गावयाला तोल जाता जाता स्वताला.. सावरायला..! विसरले तुला मी असे लागले होते ठसायला तारांबळ उडाली जेव्हा पापणी लागली बुडायला..! आज नक्की शोधेन म्हणते नविन पत्ता मिळालेला कधीतरी असाच जुन्या आठवणीत हरवलेला..! ठरवुन काढले मी भावविश्व माझे विकावयाला. बोली चढवु लागले ज्यांनी सुरुंग होता लाविलेला... !!! (गझल नाहिये मला मात्रा मोजता येत नाहित. )
|
Chinnu
| |
| Wednesday, November 08, 2006 - 9:15 am: |
| 
|
आता चेहेरा सरावला... जुन्या आठवणीतला पत्ता.. लोपा, खुप छान ग. प्रसाद, सुंदर लिहिलस.
|
Jayavi
| |
| Wednesday, November 08, 2006 - 9:47 am: |
| 
|
लोपा, फ़ारच सुरेख झालीये!
|
Dineshvs
| |
| Wednesday, November 08, 2006 - 11:04 am: |
| 
|
लोपा भाव महत्वाचा. मला नाही वाटत वृत्त वैगरे एवढे महत्वाचे आहे. अगदी शेरच आठवायचा तर दावा था जिन्हे हमदर्दीका, खुद आके न पुछा हाल कभी मेहफीलमे बुलाया है हमपे, हसनेको सितमगारोंकि तरह. हा आठवतोय.
|
Ashwini
| |
| Wednesday, November 08, 2006 - 11:15 am: |
| 
|
प्रसाद, भासते तुझेच गीत गुंजते नभी मस्त. लोपा, छान आहे. जयवी, सुंदर कविता.
|
हे कवितांच जग किती सुंदर आहे... ह्या छान जगासठी तुमच्या प्रत्येकाचेच आभार... ........ आणि मनापासुन कौतुकही लिहित रहा... कुणीतरी तुमच्या शब्दांवर जगत असेल... धुंद रवी...
|
Sarang23
| |
| Thursday, November 09, 2006 - 2:18 am: |
| 
|
उच्छवास कडवे घोट घेत घेत संध्याकाळच्या श्वासांशी गप्पा मारताना एक विनंती केलीच मित्रांनो..., आयुष्यभर कर्जमुक्त जगलो... जातानाही कुठलेच कर्ज नकोय... म्हणून... फक्त एक करा जीव तेवढा उच्छवासावाटेच जाऊ द्या! म्हणजे मिळवलं... सार्थक झालं... सारंग
|
चिनु, जया,अश्विनी आणि दिनेशदा.. thank you !!!
|
Ashwini
| |
| Thursday, November 09, 2006 - 11:44 am: |
| 
|
कशी जगते तुझ्याविना तुला कळले ना, असा रडशील तू स्वतःला कधी ना माफ करशील तू येणार नव्हतास कधी आयुष्यात माझ्या जर स्वप्नांचा गुलदस्ता घेउन पहाटेच्या वळणावर का उभा होतास तू? मी ती स्वप्ने स्विकारली अन् तुलाही खरे मानले तुला शोधण्यासाठी अवघे जग पछाडले पण कुठेही नव्हतास तू सांग तुला कुठे पाहू? कसा स्पर्श अनुभवू? जीवघेणा आयुष्यभराचा विरह तुझा कसा साहू? सांगू शकशील तू?
|
Daad
| |
| Thursday, November 09, 2006 - 4:36 pm: |
| 
|
स्मि, संवाद वादातीत आहे ;)... छानच! प्रसद, 'प्राण ओसरायचाच आज ना उद्या ' - फार फार आवडली. अगदी आवडल्या म्हणून काहीच ओळी निवडता येत नाहीयेत सगळ्याच अप्रतिम! लोपा, - 'ठरवुन काढले मी भावविश्व माझे विकावयाला. बोली चढवु लागले ज्यांनी सुरुंग होता लाविलेला' - क्या बात है! सारंग, संध्याकाळच्या श्वासांशी गप्पा मारताना? वाह!
|
|
|