|
इतकंही सळसळत येऊ नकोस की माझ्या जिवाशी खेळ होईल पण इतकंही मुरडत येऊ नकोस की भेटेपर्यन्त जायची वेळ होईल... इतकंही केस झटकु नकोस की बेभान रात्रीला जाग येईल इतकंही छान लाजु नकोस की कळ्यांना स्वत्:चाच राग येईल... इतकंही खट्याळ हसु नकोस की तुझ्या हसण्यात जीव अडकुन जाईल इतकंही मोहक चिडु नकोस की मोहाचा वणवा भडकुन जाईल... इतकंही गोड दिसु नकोस की जो पाहील तो कवी होईल कारण एखादा कवी कामातुन गेला तर त्याचा धुंद रवी होईल…. धुंद रवी
|
आपल्या अभिप्रायांबद्दल मनपूर्वक धन्यवाद...
|
Hi, This is something I want to say.. तुझ्या आठवणी गोळा करुन ठेवल्या मनाच्या कप्प्यात पण तू मात्र राहिलास माझ्यातच कुठं तरी.. तुझं नाव घेत नाही आता मी तो हक्कच कुठं राहिला आता पण तरी तुझं नाव रेगाळतं श्वासात कुठेतरी तुला साद घालावीशी वाटते परत बोलवावंसं वाटतं पण माझं डोरलं माझी वाट अडवतं..... आज अशी तडफ़डतीये मी तू मात्र सोडवलस स्वत्:ला मी मात्र अजून तशीच तळ्घरात कोन्डलेली.....
|
Niru_kul
| |
| Monday, November 06, 2006 - 8:50 am: |
| 
|
माझे मृत्यूपत्र.... मी मेल्यावर, माझ्यासाठी कुणी रडू नये... फुलांच्या भाराखाली, प्रेत माझे मढू नये... रचावी मजसाठी, साध्या कष्ठांचीच चिता; चंदनाचा सहवास, मला कधी घडू नये... घडावी मोकळ्या कुरणात, मला मोक्षप्राप्ती; मजसाठी स्मशानाची पायवाट, कुणाच्या पायाखाली पडू नये... उडावी खुल्या हवेत, माझ्या राखेची वावटळं; माझ्या अस्थी कुठल्याही, नदीतळाशी सडू नये... मी गेल्यावरही रहावे, सगळ्यांनी आनंदात; माझ्या नसण्याने कधीही, कुणाचे काही अडू नये... मी मेल्यावर, माझ्यासाठी कुणी रडू नये...
|
Ashwini
| |
| Monday, November 06, 2006 - 9:39 am: |
| 
|
प्रसाद, सुरेख रे. एकदम खास. देवदत्त, तुझी पण गझल छान आहे.
|
Dineshvs
| |
| Monday, November 06, 2006 - 11:50 am: |
| 
|
माझ्या कवि मित्रानो आणि मैत्रीणीनो. हा लेख अवश्य वाचा. विनोदी असला तरी त्यात बरेच तथ्य आहे असे नाही वाटत ? http://loksatta.com/daily/20061105/hs04.htm
|
Chinnu
| |
| Monday, November 06, 2006 - 4:03 pm: |
| 
|
प्रसाद, मजा आली. पण ताल का नुसतेच सांभाळायचे? या ऐवजी ताल का नुसता सांभाळायचा? असे हवे होते की काय, असं वाटले.
|
Asmaani
| |
| Monday, November 06, 2006 - 9:41 pm: |
| 
|
धुंद रवी... नेहमीप्र्माणेच खूप सुंदर!
|
Smi_dod
| |
| Monday, November 06, 2006 - 11:42 pm: |
| 
|
पिंपळपान!!!! लहानपणापासुन जपलेले जाळीदार पिंपळपानाचे स्वप्न..... साकारलेच नाही कधी खूप पिंपळपाने ठेवली पुस्तकात उत्सुकतेने,उत्कंठेने परत परत न्याहाळली पण ते जाळीदार,झोकदार पान कधी झालेच नाही कंटाळुन मग कधीच बघितले नाही काल अचानक पुस्तकातुन त्या ते नाजुक जाळीदार पान पडले....... आयुष्यभर ज्याच्याशोधात होते ते असे अचानक गवसले स्मि
|
Shyamli
| |
| Monday, November 06, 2006 - 11:46 pm: |
| 
|
वा!! स्मि, छानच .. ..
|
Jayavi
| |
| Tuesday, November 07, 2006 - 2:01 am: |
| 
|
प्रसाद......... मान गये उस्ताद!! जबरदस्त! धुंद रवी..... क्या बात है! देवा...... मस्तच रे! स्मि........ सुरेख! श्यामली, लोपा, चिन्नु, मीनु, कुठे आहात?
|
Daad
| |
| Tuesday, November 07, 2006 - 2:08 am: |
| 
|
बापरे, छान छान कवितांचा नुसता पूर येऊन गेलाय... मी कोरडीच राहिले!! मीनू स्मृतिदिन अगदी भिडलं मनाला स्मि, 'माझ्यातली....मी..!!!! ' खूप विचार करायला लावणारी, सुन्दर. 'पिंपळपान!!!!' ही छानच. प्रसाद, 'प्राण थोडासा जळावा...' एकदम झकास. 'ठेवली खाली जरा मी लेखणी वादळालाही विसावा लागतो! '.... खरच वादळासारखी झेपावलेली गज़ल... पण लेखणी खाली ठेवू नका... लिहित रहा!! धुंद रवी, क्या बात है! हर एक कल्पना शब्दचित्र उभी करते गोड आहे.
|
Jayavi
| |
| Tuesday, November 07, 2006 - 2:45 am: |
| 
|
चित्रकविता मधे तुषारचा "हळवा पाऊस" बघून सारखा मनात तोच हळवा पाऊस घोळत होता. शेवटी तो पाऊस असा बरसला तुझा हळवा पाऊस आज आठवतो मला चिंब सरीनं तयाच्या आज भिजवतो मला कधी बरसणं तुझं रिमझिम अलवार नखशिखान्त भिजते त्यात मी रे हळुवार कधी तुफ़ानी कोसळ गरजत बरसत कधी झिम्माड झिम्माड द्वाड प्रीत फ़ुलवीत आता कधी रे येशील मनी सारखा सवाल घन दाटता नभात पुकारते वेडी प्रीत तुझ्याविना हा पाऊस आसू आणतो डोळ्यात धरा कोरडी कोरडी परी डोळे वाहतात. जयश्री
|
Shyamli
| |
| Tuesday, November 07, 2006 - 3:02 am: |
| 
|
wow खरच, जया खरच सुचत होतं बरच काही पण उतरत नव्हत बघ
|
Smi_dod
| |
| Tuesday, November 07, 2006 - 3:08 am: |
| 
|
धन्स.... श्यामली, मृदगंधा, जयावि, दाद जया....सुरेख...!!
|
Sarang23
| |
| Tuesday, November 07, 2006 - 3:17 am: |
| 
|
वा जयश्री!! क्या बात है!!!
|
Sarang23
| |
| Tuesday, November 07, 2006 - 3:51 am: |
| 
|
पारिजात कालचे वादे फुलांनी पाळले होते हात माझे मोगर्याने जाळले होते! सांत्वनासाठीच भेटायास ती आली; पण अबोलीला तिने कवटाळले होते! एवढे गोंजारले मजला गुलाबाने; अंग सारे शेवटी रक्ताळले होते! मी निरोपाच्या क्षणीही हासलो होतो! अन फुलांचे ताटवे ओशाळले होते!! शापितागत जन्मलो, जगलो असा येथे पारिजाताने जरी सांभाळले होते... सारंग
|
Dineshvs
| |
| Tuesday, November 07, 2006 - 11:28 am: |
| 
|
प्रसाद, छान आहे कविता.
|
प्रसाद, छान आहे गज़ल. >>> ही कशी प्रीती? असे नाते कसे? रोज प्रेमाचा पुरावा लागतो! छान आहे. सारंग, रक्ताळायला काय झालं एकदम? >> मी निरोपाच्या क्षणीही हासलो होतो! अन फुलांचे ताटवे ओशाळले होते!! आवडलं.
|
Daad
| |
| Tuesday, November 07, 2006 - 7:05 pm: |
| 
|
स्मि, पिंपळपान खूप आवडलं. म्हटलं तर शब्दचित्र, म्हटलं तर खूप खोल अर्थ!!... त्याहूनही विचार करायला लावणारी कविता....... जयश्री, किती वेगळे शब्द, सुन्दर शब्द, - 'कधी झिम्माड झिम्माड द्वाड प्रीत फ़ुलवीत ' मस्त!! सारंग, पारिजात छानच. मलाही स्वाती सारखंच 'मी निरोपाच्या क्षणीही हासलो होतो! अन फुलांचे ताटवे ओशाळले होते!! ' आवडलं.....
|
|
|