|
Dineshvs
| |
| Friday, November 03, 2006 - 12:25 pm: |
| 
|
मीनु मला सगळ्यात जास्त जाणवलं ते ईतक्या वर्षानंतरहि दुःख असे मुकाट गिळावेच लागतेय ते थेट त्या घरात जाऊन, नमस्कार करण्याचे स्वातंत्र्य आजहि नाही ते. श्यामली, काहितरी चुकतय एवढं नक्की. परत एकदा लिहुन बघ.
|
Chinnu
| |
| Friday, November 03, 2006 - 6:02 pm: |
| 
|
मीनु, excellent गद्य कविता! अश्विनीला आणि दिनेशदांना अनुमोदन. अप्पा, ती आणि सर्वच अजुन त्याचे अस्तित्व सांभाळुन आहेत. Great! श्यामली, मला तर काही वावग वाटलं नाही ग. मी फ़क्त जगण्यास, या जिण्याला ह्या एकाच ओळीला थोडी अडखळले, बस.
|
Smi_dod
| |
| Friday, November 03, 2006 - 10:37 pm: |
| 
|
धन्स..मृदगंधा,श्यामली,वैभव... मीनु दिनेशदांना अनुमोदन... श्यामली... छाने
|
Smi_dod
| |
| Friday, November 03, 2006 - 11:56 pm: |
| 
|
माझ्यातली....मी..!!!! अशीच रहा नेहमी शांत टवटवीत आरस्पानी... खूप फ़रफ़टलीस माझ्यासोबत सैरभैर,दिशाहिन काट्याकुट्यांतुन खूप भरकटलो आपण पण आता विसाव थोडीशी मार्ग सापडलाय फ़क़्त पोहोचण्याचा अवकाश आहे जाउ या सावकाश काय घाई आहे.... मग बदलतील आपल्या दिशा आपले मार्ग... तु अमर आत्मा मी नश्वर देह दुवा आपल्यातला एकच तो म्हणजे मन... आत्म्याचे मन आणि देहाचे पण...
|
मीनू.. चटका लावला अगदी,आणि अश्विनी आणि दिनूदादांना अनुमोदन. लोपा.. "प्रतिमाही तुझी विरघळतसे"....जिव्हारी लागलेल्या जखमा श्यामली..मलाही काही गडबड वाटली नाही,जगन्याला आणि जिण्याला थोडे बदलता आले तर बदल..पण काही गरज नाही वाटत.कविता सुरेख आहे. स्मि... खूप सुंदर आत्म्याचा,देहाचा मनातून संवाद.. तुकारामांचा अभन्ग आठवला.. "रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग.. अंतर्बाह्य जग आणि मन.." पण तू हे युद्ध किती सहजतेने घेतले आहेस... अगदी सुरेख चित्रन केले आहेस.. "दुवा आपल्यातला एकच तो म्हणजे मन... आत्म्याचे मन आणि देहाचे पण... "...या ओळी तर कळस आहेत. सध्या माझी हिच परिस्तिथी आहे.
|
Dineshvs
| |
| Saturday, November 04, 2006 - 12:30 pm: |
| 
|
Smi अगदी माझे तत्वज्ञान आहे हे.
|
Niru_kul
| |
| Sunday, November 05, 2006 - 9:46 am: |
| 
|
लवकरच.... असचं, तुझ्या घरवरून जाताना..... नजर आपसुकच वळली, तुझ्या खिडकीकडे..... माहीत होतं, दिसणार नाहीस तू तरी..... शेवटी सवय कधी मोडत नाही हेच खरं.... आणि मग आठवले मला ते जुने दिवस.... सोनेरी पंखांचे सोनेरी क्षण.... मी पण वेडा हरवलो पुन्हा तुझ्या आठवणींमध्ये.... आणि चालत राहीलो सावकाशपणे, तापलेल्या रस्त्यावरून... डोळ्यात दाटलेल्या पावसासकट... आणि तू... तू मात्र असशील आता त्या स्वर्गातल्या महालात.... खिडकीत बसून माझीच वाट बघत.... मोजत असशील तारका वेळ घालवण्यासाठी... नेहमीप्रमाणेच... अगं वेडे... तू या जगातून गेली असलीस तरी, माझ्या मनात तू सदैव अमर आहेस... आणि मी पण येतोच आहे.... लवकरच..... तुझ्या भेटीला....
|
प्राण थोडासा जळावा लागतो... प्राण थोडासा जळावा लागतो... मीलनासाठी दुरावा लागतो! ताल का नुसतेच सांभाळायचे? सूरही राणी जुळावा लागतो... ऊब येण्याला जरा घरट्यामध्ये जीव सारा अंथरावा लागतो... रंगते ना काव्य शाईने गड्या दर्दही थोडा झरावा लागतो! राज्य जिंकायास का शस्त्रे हवी? फक्त चरखा चालवावा लागतो! पाकळ्या मिटल्या जरी माझ्या तरी हाय, भृंगांना सुगावा लागतो... प्रेम करतो मी पतंगासारखे सिध्द करण्या जीव द्यावा लागतो ही कशी प्रीती? असे नाते कसे? रोज प्रेमाचा पुरावा लागतो! ठेवली खाली जरा मी लेखणी वादळालाही विसावा लागतो!
|
Zaad
| |
| Monday, November 06, 2006 - 1:09 am: |
| 
|
प्रसाद, कळस गाठला आहेस! केवळ अप्रतिम!! ऊब येण्याला जरा घरट्यामध्ये जीव सारा अंथरावा लागतो... व्व्व्व्वा!!!
|
Shyamli
| |
| Monday, November 06, 2006 - 1:20 am: |
| 
|
आहाहा!!! क्या बात है प्रसाद..... एकेक ओळ उच्च स्मि सहिच
|
जबरदस्त !!! मित्रा एक न एक शेर खालिस सोना है
|
Yog
| |
| Monday, November 06, 2006 - 1:46 am: |
| 
|
प्रसाद मस्तच रे... वैभव, प्रसाद, email बघा रे. 
|
Meenu
| |
| Monday, November 06, 2006 - 2:00 am: |
| 
|
प्रसाद वैभवला अनुमोदन .. जबरदस्त
|
प्रसाद,.. उच्च!! अप्रतिम!!! सुरेख!! नीरु,... छान
|
Devdattag
| |
| Monday, November 06, 2006 - 2:20 am: |
| 
|
क्या बात है प्रसाद.. सहिच.. एक नंबर ऐसे नसे सदा जगाला दु:खात पाहिले मी झाले आहे अताशा न आरशात पाहिले मी तो पहा भृंग वेडा फिरूनी जळात येतो आसनास वैभवीच्या वणव्यात पाहिले मी का चित्कार केविलवाणा आला तुमच्या कानी सापास ढोलीमधल्या घरट्यात पाहिले मी अंधार काय म्हणूनी त्यांनी उगाच प्यावा ते दीप त्यांच्या मनीचे बेड्यात पाहिले मी कोण म्हणतो या जगी ते देवाचे असणे नाही रे बंदिस्त काल त्याला दगडात पाहिले मी
|
Shyamli
| |
| Monday, November 06, 2006 - 2:25 am: |
| 
|
वाहव्वा देवा एकदम गझल, क्या बात है!
|
प्रसाद खुप छान... अप्रतीम... !!! देवा मस्त सुंदर..!!! क्या बात है..
|
Sarang23
| |
| Monday, November 06, 2006 - 3:43 am: |
| 
|
वा! क्या बात है प्रसाद!!
|
Devdattag
| |
| Monday, November 06, 2006 - 3:48 am: |
| 
|
श्यामलि, लोपा धन्स.. गझल?? (विचारमग्न चेहरा) मला मात्रा मोजता येत नाहीत..
|
Niru_kul
| |
| Monday, November 06, 2006 - 4:58 am: |
| 
|
जखम.... हळूवार तुझ्या स्पर्शाने, माझी जखम पुन्हा फुलली.... अन पुन्हा एकदा माझी भावना, वेदनेच्या पाळण्यात झुलली.... किती जपलं होतं मी या जखमेला.... आर्त मनातून येणार्या आक्रोशासकट.... गिळले होते ते दाटुन आलेले हुंदके.... सहन केल्या होत्या त्या मरणप्राय यातना.... आणि मग.... मला सवय झाली या सगळ्याची.... पण... हळूहळू ही जखम बरी होऊ लागली.... मग उगाचच मी या जखमेला टोचायचो, केवळ तुझी आठवण यावी म्हणून.... त्यामुळे ही जखम नेहमीच ओली रहायची.... खपली न चढता, तशीच भळभळून वहायची.... मग ती वेदनाही मला अवीट गोड भासायची.... माझ्या हळव्या मनाची, भावना ती जपायची.... पण शेवटी तिला खपली चढली... वास्तवाचे भान ठेवून, जखमेवर ती मढली.... मग वेदना नाही, यातना नाही, जीवन सुखावह झालं.... आणि आज.... आज अचानक, अनपेक्षितपणे तू समोर आलीस.... विझलेल्या भावनांना पुन्हा सुलगावून गेलीस.... फाटली माझी जखम पुन्हा, अन वाहू लागली भळभळ; तुझ्या मळवटातील कुंकवाप्रमाणे लालभडक होऊन....
|
|
|