सारंगची माफी मागून त्याच्या ह्या मस्त गज़लचं हे विडंबन. ( खरंतर हा माझा प्रांत नव्हे.. विडंबन हाही, आणि सुरापान हाही.) सख्या, थांब ना, झोकणे सोड आता असे झोकुनी झिंगणे सोड आता!! न हातात प्याला तुला नीट धरवे किती फोडले!! फोडणे सोड आता!! अरे हा महामार्ग.. येथे पसरशी? वहाने वृथा अडवणे सोड आता कसा तू निपजलास दिवटा, कळे ना पुरे रे, दिवे लावणे सोड आता तुझे बोलणे ना समजते कुणाला नको ओरडू.. बरळणे सोड आता..!!
|
Sarang23
| |
| Wednesday, November 01, 2006 - 12:01 am: |
| 
|
हे हे हे सही आहे... पण इथे का? विडंबन मध्ये का नाही?
|
Meenu
| |
| Wednesday, November 01, 2006 - 12:46 am: |
| 
|
वा स्वाती मस्त मजा आ गया .....
|
स्वाती,सहीच गं... पण सारंग म्हणतोय तसं हे विडंबन bb वर हलव बघु.
|
फर्स्ट क्लास ... कधी टाकलीस ? म्हणजे इथे कधी टाकलीस !!!
|
काफ़ि ( या ) बदलून प्रयत्न करतोय माफी असावी
सखीचे असे ऐकणे सोड आता नवी बाटली तू पुन्हा फोड आता किती बाटल्या अन किती ही तयारी नको ऐनवेळीच हिरमोड आता नको बोलते तर अजुनीच प्यावी जिरव तू तिची रे जरा खोड आता तिला हात लावायच्या सोड गप्पा असो तू चिकन तंगडी तोड आता कडू घोट जाता कडू शब्द विरले कटू सत्यही जाहले गोड आता जशी रात गेली तशी बात गेली क्षमा मागुनी तू दुवा जोड आता
|
Meenu
| |
| Wednesday, November 01, 2006 - 4:49 am: |
| 
|
वैभव मस्त रे .. .. ..
|
Lopamudraa
| |
| Wednesday, November 01, 2006 - 4:57 am: |
| 
|
स्वाती.. वैभव.. .. ... ... ... ...
|
धन्यवाद, दोस्त्स. विडंबनाचा बीबीच नाहीये या महिन्यात उघडलेला. आणि नवीन thread पण सुरू करता येत नाहीये तिथे. म्हणून इथे टाकली. वैभव, सहीच!!
|
Chinnu
| |
| Wednesday, November 01, 2006 - 9:39 am: |
| 
|
वहाने वृथा अडविणे सोड आता.. स्वाती, शब्दाशब्दात लय आहे! वाचुन कुणी झिंगले नाही तर नवल! वैभव, किती बाटल्या, अरे बापरे!!
|
Shyamli
| |
| Wednesday, November 01, 2006 - 2:26 pm: |
| 
|
ओय, ये क्या हो रहा है!!! धमाल केलिये दोघांनीही अगदी
|
Daad
| |
| Wednesday, November 01, 2006 - 8:32 pm: |
| 
|
झक्कास म्हणजे झकासच! स्वातीताई, वैभव.. क्या बात है!!
|
Jayavi
| |
| Friday, November 03, 2006 - 4:31 am: |
| 
|
मिल्या, तुझे "गड्याचे श्लोक" आहेत ना....... त्याला प्रत्युत्तर म्हणून हे घरच्या राणीचे श्लोक ;) राणीचे श्लोक मना सज्जना रोज उशीरा उठावे येता परी जाग लोळत रहावे बकाल्यात नव्-या पिटाळा दुधाला फ़र्मान सोडा चहाचे तयाला पितांना चहा जीभ सोडावी सैल दहादा म्हणावे नव-यास बैल सदा सर्वदा त्यावरी खेकसावे गुलामा कधी तोंड उघडू न द्यावे पगारास त्याच्या हिसकून घ्यावे थोडेच पैसे खर्चास द्यावे दुस-याच दिवशी यादी करावी तयाची त्वरेने खरेदी करावी घरी पोचता तू खरेदी करूनी बघावी खरेदी फिरुनी फिरुनी शेजारच्या त्या हॉटेल मधूनी मागवावे जेवण फ़ोनवरुनी हे सगळं केल्यामुळे माझा संसार कसा अगदी सुरळीत चाललाय. कसा नेटका आज संसार माझा कसा साजिरा तो पतीदेव माझा म्हणूनी सदा पूजिते मी वडाला मिळू दे पती हाच सावित्रीला ह्या. जयश्री कुवेतला "बकाला" म्हणजे Daily need corner सारखं दुकान. मिल्याच्या त्या गड्याच्या श्लोकांची लिंक कोणाला देता येईल का?
|
पितांना चहा जीभ सोडावी सैल दहादा म्हणावे नव-यास बैल >>>>>. ..
,
|
Meenu
| |
| Friday, November 03, 2006 - 5:19 am: |
| 
|
वा सहीच लिहीलं आहेस गं
|
Shyamli
| |
| Friday, November 03, 2006 - 5:33 am: |
| 
|
 ध मा ल .. .. .. .. ह ह पु वा
|
Milindaa
| |
| Friday, November 03, 2006 - 7:31 am: |
| 
|
स्वाती, विडंबनाचा बीबी विनोदी साहित्या मध्ये असतो असे वाटते आणि तेथे नवीन बीबी उघडण्याची सोय आहे
|
करेक्ट ... मी ही तेच म्हणणार होतो ... हे लोक इथे का लिहीतायत ?
|
Asmaani
| |
| Friday, November 03, 2006 - 8:57 am: |
| 
|
स्वाती वैभव आणि जयावी......कहर करताय! वैभव, जुगलबन्दी सहीच!
|
केला केला thread सुरू. हा बघा इथे.
|