Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
काहीच्या काही कविता ...

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » कार्तिक » काव्यधारा » काहीच्या काही कविता « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through November 03, 200620 11-03-06  9:07 am

Mrinmayee
Friday, November 03, 2006 - 9:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती, वैभव तुम्हा दोघांचे तळीराम काव्य एकदम झकास!! अगदी AA च्या मीटींगमधे वाचण्याजोगे!!
जयु, सुखी संसाराची गुरुकिल्ली खासच! :-)


Devdattag
Sunday, November 05, 2006 - 10:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


कितीदा सांगितलं तुला
असं ठळक अक्षरात लिहू नकोस
पुसायला त्रास होतो
बघ.. फुटली ना पाटी..


Devdattag
Sunday, November 05, 2006 - 11:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


आजच्या या भकास रात्रीनंतर
जमतील हे चंद्र तारे उद्या याच आकाशात
कशासाठी ते त्यांनाही माहित नाही
कदाचीत गप्पा मारायला
कदाचीत परवाचे प्लान्स ठरवायला
मी ही येइन..
उद्याची स्वत:ची अशी रात्र जगायला


Jo_s
Monday, November 06, 2006 - 12:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती छान आहे,
वैभव जबरीच
जयावी hhpv (माझ्याकडे अस नाहीये ते बरय)
देवा खासच

सुधीर

Meenu
Monday, November 06, 2006 - 4:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ए देवा सुंदर रे .. लय दिसानी आला तर फार्मात हाय जनु

Chinnu
Monday, November 06, 2006 - 4:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा एकदम मस्त रे!

Devdattag
Monday, November 13, 2006 - 12:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जगाच्या रीतीप्रमाणे वागतो ऐसे नव्हे
रोज त्या देवास काही मागतो ऐसे नव्हे

सोडले आहे कुणी का चंद्रावरी भाळणे
पाहण्या त्यालाच आम्हि जागतो ऐसे नव्हे

मानतो आम्ही जरासे चालतो मागे पुढे
ओढणे आम्ही जगाचे वाहतो ऐसे नव्हे

वागणे नेत्यापरीही वाटते अमुचे जरा
शब्द रातचा सकाळी स्मरतो ऐसे नव्हे

निजण्या आम्हास आता रे वाटही चालते
बिछानाच रोज आम्हा लागतो ऐसे नव्हे

वाटते सर्वांप्रमाणे तसे अमुचेही वागणे
रोज ऐसे योग्यापरी रे भासतो ऐसे नव्हे
-देवदत्त


Shyamli
Monday, November 13, 2006 - 11:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा छान आहे रे
पण इकडे का



Devdattag
Tuesday, November 14, 2006 - 10:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थँक्स श्यामली.. तिकडे मस्त जमलिये मैफ़िल



Lopamudraa
Wednesday, November 15, 2006 - 5:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वागणे नेत्यापरीही वाटते अमुचे जरा
शब्द रातचा सकाळी स्मरतो ऐसे नव्हे>>>>.. best.. सगळ्याच ओळी.. एकाहुन एक मस्त.. !!!




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators