|
Sarang23
| |
| Thursday, November 02, 2006 - 11:38 pm: |
| 
|
समस्त मायबोलीकरांसाठी... घे भरारी सुर्य असा का पुन्हा उगवतो अंधाराच्या पोटी? कारण कविता जन्मुन जाते नक्षत्रांच्या ओठी! कुठे आंधळा प्रवास होतो जगण्याचे गाणे! ठेचाळुनही हासत हासत पुढेच चालत जाणे! शब्द संपले म्हणुनी कोठे भाव हरपती वेड्या, युगायुगांची अक्षय नाती इथेच जमती वेड्या! नशीब म्हणजे लुळा पांगळा खेळ संचितांचा! उत्कट दुर्दम इच्छाशक्ती हरपुन बसलेल्यांचा!! म्हणून माझी एक प्रार्थना त्या देवीच्या चरणी, कधी न येवो वेळ कराया शब्दांची मनधरणी! सरस्वतीने ठरवून द्यावे तुझे नेमके स्थान, तुझिया प्रतिभेलाही लाभो उत्कंठेचे दान!!! सारंग
|
हो हो करते सगळ्यांना mail मीनू,..सही आहे...पण प्रश्न एव्हढ्या सहजतेने सुटतात?हा एक मोठा प्रश्न आहे. निरज.. कारे स्वप्न बघायची सोडू नकोस बाबा खुप सुंदर english poem आहे मदर तेरेसांची ती ही mail करते..सगळ्यांनाच.. स्मी,... " शब्द नव्हे हे... ही तर माणसेच शब्दांमधुन व्यक्त होणारी शब्दांच्या आड असलेली".. खरच सुरेख.. सारंग,.. सुर्य असा का पुन्हा उगवतो अंधाराच्या पोटी? कारण कविता जन्मुन जाते नक्षत्रांच्या ओठी! .. वा!! आणि धन्यवाद..
|
Shyamli
| |
| Friday, November 03, 2006 - 1:23 am: |
| 
|
जपायला हवे शब्दांपासुन ओळखायला हवे शब्दांना पण माणसे ओळखताना केलेल्या चुका टाळायला हव्यात शब्दांना ओळखताना>>>> wow स्मि... सहिच पटल एकदम... सारंग, सगळीच कविता आवडली मस्तच
|
Niru_kul
| |
| Friday, November 03, 2006 - 1:25 am: |
| 
|
एक प्रेयसी पाहिजे...... एक प्रेयसी पाहिजे, पावसात चिंब भिजणारी; अन मलाही तिच्यासोबत, भिजायला लावणारी. एक प्रेयसी पाहिजे, फुलपाखरांमागे धावणारी; फुलांचे सारे रंग उधळत, झाडांमागे लपणारी. एक प्रेयसी पाहिजे, मुग्धपणे हसणारी; माझ्या बाहूपाशात, अलगद येऊन बसणारी. एक प्रेयसी पाहिजे, कशीही दिसणारी; पण मनाने मात्र, अप्रतिम सुंदर असणारी. एक प्रेयसी पाहिजे, जिवलग मैत्रीण असणारी; आमच्या नाजुक नात्याला, हळुवारपणे जपणारी. एक प्रेयसी पाहिजे, माझ्या भावना जाणणारी; मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी. एक प्रेयसी पाहीजे, प्रेमाला प्रेम समजणारी; सुखा-दुःखात माझ्या, तन्मयतेने साथ देणारी. एक प्रेयसी पाहीजे........ मिळेल का अशी?
|
Meenu
| |
| Friday, November 03, 2006 - 1:26 am: |
| 
|
स्मृतिदिन दुपारची वेळ, सगळं आवरुन बाहेर पडण्याच्याच, तयारीत आहे मी खरं तर. तरीही कुठे तरी काळजाचा ठाव घेताहेत, तुझ्या घरातुन ऐकु येणारे मंत्रस्वर. रस्त्यावरचे दिवे लागलेत नुकतेच, म्हणजे ही आपली नेहमीचीच वेळ. मी आप्पाच्या चहाच्या दुकानात शिरले. आप्पानी खरं तर नुतनीकरणात, सगळं बदलुन घेतलय. तरीही आपलं ते कोपर्यातलं जुनं टेबल तसच ठेवलय. तेच टेबल, त्याच खुर्च्या मला पाहताच आप्पानं स्वतः, फडका मारला टेबलावर तो तेवढा आता थकलाय जरासा. केसातही काळ्या रंगाची, जराशीच झाक राहीलीये. आप्पानी आणुन ठेवलेत, दोन कटींग ग्लासातुन. विचार करता करता, कितीतरी वेळ निघुन गेला. आपल्या गप्पांमधे व्हायचा तसाच, पहिला चहा गार होऊन गेला. सवयीप्रमाणे आप्पानी दुसरा, गरम चहा आणुन ठेवला. कटींग संपवुन मी उठले, पाचच नाणं टीप म्हणुन ठेवुनच....... आप्पानीही जपुन ठेवलं, त्याच्या ठेवणीच्या बटव्यात ते अकरावं नाणं.... तुझ्या घरावरुन जाताना, सवयीप्रमाणेच नजर वळली तिकडे. तुझ्या हार घातलेल्या फोटोपुढे, कीतीतरी उदबत्त्या दरवळत होत्या.....
|
Meenu
| |
| Friday, November 03, 2006 - 1:42 am: |
| 
|
स्वाती सहज नाव छान आहे गं धन्यवाद ... सारंग, मृदगंधा, वैभव प्रतिक्रीयांबद्दल धन्यवाद .. स्वाती समिक्षा सुंदर सारंग घे भरारी मस्तच
|
Sarang23
| |
| Friday, November 03, 2006 - 1:55 am: |
| 
|
ओह मीनू... काय कविता आहे! फक्त ते अकरावं नाणं ऐवजी दहावं किंवा तेरावं नाणं जरा अजुन परीणामकारक वाटलं असतं... अर्थात हे काही तितकं महत्वाच नाही... कविता केवळ सुंदर आहे...! वाचून काटा आला! पुन्हा पुन्हा वाचतोय... निरु तुझे विचार आवडले... माझ्या शुभेच्छा आहेत तुला अशी प्रेयसी मिळावी म्हणून!
|
Jayavi
| |
| Friday, November 03, 2006 - 4:35 am: |
| 
|
सारंग.... सही आहे रे तुझी भरारी मीनू...... काय लिहितेस गं तू...... खरंच काटा आला गं!
|
Shyamli
| |
| Friday, November 03, 2006 - 4:51 am: |
| 
|
मीनु..... .. .. .. !!!
|
स्मि .. छान कविता सारंग .... सही !!! मीनू .... मस्त कन्सेप्ट . मला अकरावं नाणं म्हणजे तो जाऊन अकरा वर्षे झालीत असा अर्थ समजला ... कारण त्या शिवाय आप्पा म्हातारे कसे होणार ? चू.भू.दे.घे.
|
Meenu
| |
| Friday, November 03, 2006 - 5:43 am: |
| 
|
धन्यवाद श्यामली, जयावी, सारंग, वैभव .. वैभव बरोबर रे तो / ती जाऊन अकरा वर्ष झाली आहेत ... आप्पा म्हातारा झालाय ... आणी म्हणुनच सारंग अकरा किंवा तेरा घेणं महत्वाचं नाही वाटलं कारणं त्या दिवसांना महत्व आहे वर्षांना नाही. अकरावं श्राद्ध चालु असणार त्याच्या / तीच्या घरी सकाळी
|
नुसतेच... कुणीतरी हरवले आयुष्यातुन.. सापडत नाही दिवसाची वात विझली.. काळोखात चेहरे दिसत नाहीत.. शोधुन झाले सारीकडे.. ओळखीचा सुर नाही.. पहिल्यासारखा आता राहिला नुर नाही.. उत्तर माहित आहे.. प्रश्नांनीच गोंधळले आहे.. भरल्या ओंजळीतुन झिरपतसे क्षण भंगुर जीवन तसे सारखे काहितरी उणे भासे.. हाकेला होकार नाही नुसताच भास घुमे.. प्रतिमाही तुझी स्वप्नातुनी आता विरघळतसे..!!!
|
सुर्य असा का पुन्हा उगवतो अंधाराच्या पोटी? कारण कविता जन्मुन जाते नक्षत्रांच्या ओठी!>>. छाने सारंग सध्या एकदम जोरात..., मीनु स्मृतीदिन मस्त निरकुल.. जरुरत है.. सख्त जरुरत है..
|
Shyamli
| |
| Friday, November 03, 2006 - 7:21 am: |
| 
|
होऊनी तटस्थ वारा गंधास वाहते मी जगण्यास या जिण्याला का आयुष्य मानते मी हरवली मातीत केंव्हाच त्या वाटेस शोधते मी सलत्या जखमेतला का फिरुनी काटाच शोधते मी जळणार ज्या चितेला का सरणात शोधते मी झाली केंव्हाच मृगया का तीरास शोधते मी जाणिवा जिवंत तरीही का आतुन गोठते मी का माणसात तरीही देवास शोधते मी वसते उरी तुझ्या तरिही का वनवास भोगते मी का मैफिलित सार्या मजलाच शोधते मी श्यामली!!
|
Shyamli
| |
| Friday, November 03, 2006 - 7:24 am: |
| 
|
हे कायतरी सुचलय जसं आलय तसच टाकतीये गडबड वाटतीये जरा पण कुठे नेमक ते कळत नाहीये गुरु लोक्स जरा बोलो नावही सुचत नाहीये 
|
Sarang23
| |
| Friday, November 03, 2006 - 7:28 am: |
| 
|
पण मग तो / ती फक्त त्याच्या / तिच्या श्राद्धाच्या दिवशीच त्या आप्पांकडे चहा प्यायला जातो / जाते किंवा फक्त त्याच दिवशी टीप देतो / देते ( हे जास्त सांयुक्तिक नाही वाटल... ) अस कुठेतरी यायला हवं होतं. मी काढलेला अर्थ असा... ते रोज तिथे एकत्र बसायचे... भान विसरून ( ते दुसरा चहा ठेवण... ) आणि त्या धुंदीतून आताशा तो / ती बाहेर आले आहेत आणि मग त्याला / तिला त्या आप्पाच म्हातारपण जाणवू लागलं आहे... आणि तो / ती गेल्यापासून त्याची / तिची आठवण ताजी करण्यासाठी तो / ती तिथे येऊन तसाच वेळ घालवतात... तो आप्पा जो रोज स्वखुशीने ५ चे नाणे टीप म्हणून स्वीकारायचा तो ही त्याच्या / तीच्या जाण्याने हळवा झालाय... आणि ती नाणी तशीच विरक्तपणे बटव्यात साठवू लागलाय... गल्ल्यावर बसलेल्या व्यक्ती तशाही फार थोड्या गोष्टी खिशात टाकतात दिवस संपेपर्यंत... पण इथे तो आप्पा आवर्जून ते नाणे बटव्यात टाकत आहे... इथे त्याच्याही हळवेपणाचा एक पहिलू दिसतो... त्यामुळे मला तो त्याचा / तिचा १०वा किंवा १३वा असावा असं वाटलं... त्यामुळे ते त्याची / तिची आठवण ताजी करण्यासाठी दरवर्षी तिथे येण आणि टीप देण थोड खटकतय... पाहा विचार करून...
|
अग छान आहे मला तर आवडली पहिल्या ओळी तर खुप आवडल्यात..!!! नाव गुरु लोक्स सुचवतील..
|
रोज ५ रुपये टीप म्हणजे लै बिल झालं सारंगा !!!
|
सारंग, ' घे भरारी' अप्रतिम आहे. हल्ली काय ऐकत नाही!! मीनू, ' स्मृतीदिन'ची कल्पना आवडली.
|
Ashwini
| |
| Friday, November 03, 2006 - 11:19 am: |
| 
|
मीनू, स्मृतीदिन आवडली. मला तुझी ११ वर्षाची कल्पना thrilling वाटतेय. इतकी वर्षे झाली तरी ते दुःख्ख इतकं गहिरं आहे... तो घाव किती खोल असेल. इतका की त्याचे व्रण आजुबाजूच्या माणसांनीपण अजून सांभाळून ठेवलेत. वा!
|
|
|