Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 01, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » कार्तिक » काव्यधारा » कविता » Archive through November 01, 2006 « Previous Next »

Zaad
Tuesday, October 31, 2006 - 1:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मित्रान्नो.
वैभव, निर्भर खासच! कधीकधी असं मन मोठं करण्याशिवाय दुसरं काहीच उरत नाही हातात. पण तीदेखील मनाची एक समजूतच! :-)
आनंदयात्री, दोन्ही कविता खासच. दुसरी कविता एकदम जुन्या काळात घेऊन गेली!


Zaad
Tuesday, October 31, 2006 - 1:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती, तू दिलेलं नाव (पुढे चला!!) छानच! :-)

Sarang23
Tuesday, October 31, 2006 - 1:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

     सोड आता!

सखे बोल ना, लाजणे सोड आता
मनाने मने वाचणे सोड आता!

नको आर्तशी आळवू भैरवीला
तड्याने तडे जोडणे सोड आता!

तुझ्या पायवाटेवरी टाकलेली
फुलाने फुले वेचणे सोड आता!

दिवे दोन जैसे तुझे नेत्र राणी
दिव्याने दिवे लावणे सोड आता!

खुळा मी, खुळी तू, खुळे प्रेम... वेडे...
खुळ्याशी खुळे बोलणे सोड आता!!!


( जाती : भुजंगप्रयात )

सारंग


Vaibhav_joshi
Tuesday, October 31, 2006 - 2:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मित्रांनो
शलाका ... साजणी खूपच सही उतरलिये
आनंदयात्री ... मस्त शेवट खूप आवडला
मी आनंद ... मैफ़ल छान जमलिये
झाड ... काय बोलावे ... अप्रतिम
सारंग ... गझल खास आहे रे . दुसरा शेर कातिल आहे
मृद्गंधा ... खरंच हिंदी लिहून बघ ... तुझी आधीची पण खूपच मस्त होती ...
पूजा ... मला तीचे मनोगत जास्त आवडले
स्वाती ... समीक्षा झकास आहे ... तुझ्यामुळे सोप्या शब्दातही विठोबा असतो हे पुन्हा जाणवून गेलं .. शतशः धन्यवाद


Hems
Tuesday, October 31, 2006 - 3:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शलाका , काय गोड कविता आहे "साजणी "! खूप आवडले त्यातले शब्द आणि लय.
सारंग , गझल खास !
वैभव , " निर्भर " मधली सहृदयता भावली.


Mrudgandha6
Tuesday, October 31, 2006 - 5:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


हा काय प्रकार आहे?
शलाका मला तुझी "साजणी" कविता कुठेच दिसत नाहिय.. आधीच्या archieves मध्येसुद्धा..???

वैभव.. धन्यवाद.:-)

स्वाती,... हो मी बर्‍याचदा माझ्या हिन्दी-उर्दू गझलचे अनुवाद करते. आता उलट करुन बघते :-)

सारंग, गझल मस्तच आहे.. फ़ुलाने फ़ुले वेचने वा!!!



Dhund_ravi
Tuesday, October 31, 2006 - 6:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्याचा स्पर्श घेऊन रेंगाळणारा
परीकथेतला धुर
तिचा गंध आणि
त्यानी तिच्या केसात छेडलेले सतारीचे सुर

त्याच्या सोबतीत घुटमळणारा
गुलमोहराचा भास
तिच्या श्वासात विरघळणारा
रातराणीचा वास

तिनी ओढणीत बांधुन आणलेल्या
सायलीच्या ओल्या कळ्या
त्यानी वेचुन नेलेल्या
तिच्या गालवरच्या खळ्या


कोणीच नसताना आसपास
ते पावसाचं अवेळी येणं
भिजलेल्या श्वासांच ते
संधी साधुन घेणं

मग मोहच्या रानात
त्याचं तिला ओढणं
त्याच्या मिठीत गुदमरताना
तिचं बेचैन श्वास सोडणं

त्या छळणा-या संध्याकाळ
ते पहाटेचे त्रास
तिच्या ओढणीला येणारा
त्याच्या अस्तित्वाचा वास

ते धडधडते दिवस
त्या तडफ़डत्या रात्री
तो स्वत्:वरचा विश्वास
ति दुस-या बद्दलची खात्री

तिनी त्याच्या डोळ्यात पाहीलेलं
ते स्वप्नामधलं घर
त्याचं घरटं बांधणं
तिच्या नाजुक पापण्यांवर

ती सांभळणारी मैत्रीण
तो जपणारा मित्र
त्या कच-यानी कविता
ती ढिगांनी पत्र

ती दुख्:ची वादळं
ती स्वप्नांची पडझड
ते आधारचे हात
सुखात जगण्याची धडपड

ते बेधुंद बेभान बेफ़िकिर जगणं
दोघांनी क्षणोक्षणी आठवलय
एकमेकंच्या सोबतीत
दोघांनी खुप काही साठवलय

धुंद रवी




Rahul_1982
Tuesday, October 31, 2006 - 7:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाहवा! वाहवा!

तिनी त्याच्या डोळ्यात पाहीलेलं
ते स्वप्नामधलं घर
त्याचं घरटं बांधणं
तिच्या नाजुक पापण्यांवर

फ़ारच छान

धुंद रवी..
बेधुंद कवी..


Chinnu
Tuesday, October 31, 2006 - 7:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रवी, खुप छान लिहीलत प्रश्नच नाही. मला खालील ओळी जरा लयीत गडबड करत आहेत असे वाटले. जमल्यास थोडा बदल करा.

ते पहाटेचे त्रास
तिच्या ओढणीला येणारा
त्याच्या अस्तित्वाचा वास

तसा फार काही प्रॉब्लेम नाहीये!



Mi_anandyatri
Tuesday, October 31, 2006 - 7:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा!!!!!
धुंद रवी....
निवडुन इथे लिहू अशा ओळी नाही सापडत...संपूर्ण कविताच सुंदर आहे.. खरं तर सुंदर हा शब्द इथे अपुरा आहे...
लिहित रहा...


Zaad
Tuesday, October 31, 2006 - 8:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंगा, सहीच रे...
धुंद रवी, शब्दच नाहीत प्रतिक्रियेला!! केवळ अप्रतिम!!!


Niru_kul
Tuesday, October 31, 2006 - 11:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लक्षात असू दे!

मी पण होतो कधी सामन्यांतला, लक्षात असू दे!
मी पण होतो कधी चांगल्यांतला, लक्षात असू दे!

नव्हते माझे जीवन, इतकेही लाजिरवाणे;
मी पण होतो कधी सज्जनांतला, लक्षात असू दे!

सुर घसरले असतील माझे, आज या घडीला;
मी पण होतो कधी गाण्यार्‍यांतला, लक्षात असू दे!

शब्द साथ सोडून गेले, माझ्या नाजूक परिस्थीतीत;
मी पण होतो कधी राजा भावनांच्या राज्यातला, लक्षात असू दे!

विझूनी पूर्ण आता, जाहलो श्रांत मी;
मी पण होतो कधी जाळण्यार्‍यांतला, लक्षात असू दे!

निरज कुलकर्णी.


Hems
Tuesday, October 31, 2006 - 4:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृ -6 , अगं कार्तिकाची सुरुवातच शलाका च्या " साजणी " नं झालीय की ! इथे बघ :
/hitguj/messages/75/118605.html?1161880824


Swaatee_ambole
Tuesday, October 31, 2006 - 5:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग, ' सोड आता' सही आहे. त्याचं विडंबन
इथे टाकलंय.

Mrudgandha6
Wednesday, November 01, 2006 - 1:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


धन्यवाद हेम्स..

शलाका.. सुरेख अहे ती कविता :-)

धुंद रवी बर्‍याच दिवसांनी?. मस्त आहे कविता.. "केसात छेडलेले सतारीचे सूर".. छान कल्पना..

निरज.. मस्त आहे .." मीही होतो कधी सामन्यांतला लक्षात असू दे.."




Vaibhav_joshi
Wednesday, November 01, 2006 - 1:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोषवारा

कशी माझी कहाणीही मला ना सांगता आली
कुठे आरंभ झाला अन कशाने सांगता झाली

असू दे ना ! नको आता ! नको बोलूच तू काही
दुरावा सोसला नाही , पुरावा ओघळे गाली

मृदू संवाद येथे चालले पण अर्थ का सलती ?
जणू काटेच दडलेले मुलायम पाकळ्यांखाली

तुझ्यावाचून सरलेल्या ऋतूंचा गोषवारा हा
निशा अश्रूंमध्ये भिजली , उषा मौनामध्ये न्हाली

कळाया लागल्यापासुन मला कळलोच नाही मी
म्हणे मी जाणता झालो ! कधी अन कोणत्या साली ?

खरेतर ह्याचसाठी मी इथे ना बोललो काही
मला ठाऊक होते की इथे सत्यास ना वाली

कितीदा गाठशी मजला असे खिंडीमध्ये देवा
तुझ्या बुध्दीबळाच्या ह्या पुरे झाल्यात रे चाली


Mrudgandha6
Wednesday, November 01, 2006 - 1:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



"सवय"



"आता खरं तर याची सवय व्हायला नको का??"..
तेच स्वप्नवेडे डोळे
त्याच पालवणार्‍या आशा
तीच भंगलेली स्वप्ने अन
तशाच झालेल्या निराशा
"आता याची खरंच सवय व्हायला नको का??"
तेच खोलवरचे घाव
नव्याने मांडलेले जुनेच डाव
रोज रोज रचून सुद्धा
परत उद्ध्वस्त होणारे गाव
"आता याची खरंच सवय व्हायला नको का?"
तेच प्रश्न मी विचारलेले
तेच शब्द तू उत्तरलेले
तुला सर्वस्व देता देता
माझे काहीच न उरलेले
"आता याची खर तर सवय व्व्हायला नको का?"
फ़िरुन फ़िरुन तीच कहाणी
तेच डोळे तसेच पाणी
वेदनांनी छेडता हृदय
तीच उमटलेले दुःखी गाणि
"आता याची खरंच सवय व्हायला नको का?"
तीच जीइवघेणी धडपड
तीइच तगमग,तशीच तडफ़ड
तोच दिवा धीरगंभीर अन
जळ्लणार्‍या पतंगाची फ़ड्फ़ड
"आता खरंच याची सवय व्हायला नको का?"
तेच दुःख,तेच दुखणे
तेच सूर तेच तराने
त्याच कविता,तीच स्पंदने
कागद नवे पण शब्द पुराणे
"आता याची खरे तर सवय व्हायला नको का?"
तीच प्रिस्थीती,तेच जीणे
पुन्हा पुन्हा तेच वागणे
कळूनही न वळण्याचे
तेच ते जुने बहाणे
"आता खरं तर याची सवय व्हायला हवी ना??"
"आता या 'सवयीची सवय' व्हायला नको का?"
"याची 'सवय न होण्याची' सवय व्हायला नको का??"



Mrudgandha6
Wednesday, November 01, 2006 - 2:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


वैभव,.........
कुठले शेर खास म्हणुन लिहू सगळेच अप्रतिम!!..
गझल नितांत सुंदर आहे. शब्द अपुरे पडतील


Daad
Wednesday, November 01, 2006 - 2:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय म्हणू?
हल्ली खूप वेळच मिळत नाही, इथे यायला. मग, गडबडीने पानंच्या पानं प्रिंट करायची आणि वेळ मिळेल तशी वाचायची. मग "दाद"कधी द्यायची? मनापासून एका एका ओळीचं किंवा अगदी शब्दाचही कौतुक करावं अशा ताकदीनं लिहिलेल्या कविता... मग करावं लागतं ते "घाऊक कौतुक"..... पण आजच्या जगातल्या, घाऊक तिरस्कारापेक्षा बरं नाही का?
खूप छान लिहिताय सगळेजण... कुणाचींतरी संध्याकाळ हसरी करण्याचं पुण्यही मिळवताय, जाता जाता!!
-- शलाका


Niru_kul
Wednesday, November 01, 2006 - 7:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी स्वतःला कधी ओळखूच शकलो नाही....

आता असं वाटतं, की मी स्वतःलाच समजून घेऊ शकलो नाही....
मिटलेल्या पापण्यांवरची ओली स्वप्नं, कधी वेचुन घेऊ शकलो नाही....

फुलपाखरामागे वेडावून धावताना,
फुलांचे रंग जाणूच शकलो नाही....

भावनेच्या बंधात गुरफटून जाताना,
नात्यांचे स्पंद जपूच शकलो नाही....

माझ्या श्वासांची किंमत केलीच नाही कधी कुणी,
आणि माझे निश्वास मी कधी रोखूच शकलो नाही....

माझ्या फुटकळ आसवांना डोळ्यांत सजवताना,
वेदनेला माझ्या मी थोपवूच शकलो नाही....

मृत्यूवरही माझ्या, रडणारे आहेत मोजकेच,
चार हक्काचे जिवलग, मी कधी जमवूच शकलो नाही....

खरंच! मी स्वतःला कधी ओळखूच शकलो नाही....






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators