|
शलाका, लोपा, मीनू, सारंग, himscool , अस्मानी, स्वाती, परागकण, प्रतिक्रियांसाठी आभारी आहे. परागकण, दिनेश, मनावर घ्यायचा प्रश्नच येत नाही. उलट बरंच झालं, त्यातून मला या गज़लसाठी विषय मिळाला. सारंग, स्वाती, मीही लिहीताना ' अमुचा' पाशी अडलो होतो. पण मला त्यासाठी तितका परीणामकारक पर्याय सुचला नाही. सुचला किंवा तुम्ही सुचवू शकलात तर जरूर बदलू तो. आत्ता अपरिहार्य वाटल्यामुळे ' अमुचा'च ठेवत आहे. ( अपरिहार्य असल्याशिवाय वापरू नये अशीच चर्चा झाली होती ना?) सारंग, मलाही ' मैफ़िल' मध्ये नुक्ता का नाही लिहायचा ते कळलं नाही. मी काही दिवसांसाठी tour वर असणार आहे, इथे वारंवार येणं जमेल की नाही शंका आहे. तेव्हा पुढे चर्चा करायची असल्यास मला मेल करा.
|
VJ गज़ल खास. एकदा तूही भिडव डोळे जगाशी रोज झुकणे पाप आहे, विनय नाही हा शेर खूप आवडला
|
वैभव, एकदम झकास "अमुचा" ऐवजी "त्यांचा" कसं वाटेल ते म्हणाले "प्रेम त्यांचा विषय नाही" शेवट खूप छान.
|
Daad
| |
| Thursday, October 26, 2006 - 7:03 pm: |
| 
|
दिनेशदा, मी आधी सांगितल्याप्रमाणे, हे एक अगदी साधे शब्द चित्र आहे. एक मैत्रिण आपल्या सखीच्या सोबतीला आली आहे. नेहमी पहाटे उठून प्रात्:कर्मं करणारी आपली सखी, तिचा दूर गेलेला प्रियकर परत फिरला आहे..... तिला उठवताना सकाळच्या सगळ्या नादमय गोष्टी (धारा वाजणं, पक्षी कुलकुलून घरट्याबाहेर जाणं, जात्यावरल्या ओव्या, वासुदेव, ई.) - त्यांचं वर्णन. कशानं उशीर झाला त्याचं कारण - 'विरह'. आणि मग थोडी थट्टा...... जोजार हा शब्द मी अगदी अलिकडे कोल्हापूर जवळच्या एका खेड्यात ऐकलाय थोडसा 'वैताग' किंवा स्वाति ताईंनी म्हटल्याप्रमाणे इथे - 'कबाब मे हड्डी'. ओढणीचं म्हणाल तर खरं आहे.. मलाही खटकलाय... पण त्यावेळी शब्द सुचला नाही हे खर. - त्याऐवजी, 'नको भर्जरी पाटव... ' चालेल असं वाटतय. परत एकदा तुमच्या सगळ्यांचे आभार! चर्चा, सूचना महत्वाच्या आणि आवश्यक, सुद्धा! --शलाका
|
Bee
| |
| Thursday, October 26, 2006 - 10:45 pm: |
| 
|
स्वाती, ह्यापुर्वी मी कधी इथे कुणाच्या कवितांवर भाष्य केले नाही. तेंव्हा आता मी करीन अशी अपेक्षा करु नकोस. वैभवच्या कवितेत न कळन्यासारखे असे असते तरी काय.. तो दुर्बोध कवी वगैरे नाही आहे. त्याच्या कविता वाचल्याक्षणी कळतात इतकी साधी भाषा असते त्याच्या कवितांची. आता ही चांगली प्रतिक्रिया घ्यायची की वांगली हे तुम्ही तुमचे ठरवा.
|
शलाका,मस्तच ग वैभव,सुरेख गझल.. सर्वच शेर आवडले..
|
Bee
| |
| Friday, October 27, 2006 - 5:15 am: |
| 
|
वसंत सरुन गेल्यावर तरुची काया पालटते एक एक पान झडताना आठवण जुनी मोहरते आठवणींचं हे झाड खूप पोक्त झालं आहे अन् गाणार्या पक्ष्याला इथला वसंत अप्रिय आहे.. तरुतळी जमलेली पाने पाचोळा होऊन करकरतात निसटून गेलेल्या वसंताला डोळे सारखे आसूसतात..
|
Himscool
| |
| Friday, October 27, 2006 - 5:45 am: |
| 
|
बी एक चूक आहे ह्यात - पक्षी ह्या शब्दाचे रूप द्वितिया किंवा चतुर्थी विभक्ती प्रत्यय लागल्या नंतर पक्ष्याला असे होते... आणि एक शंका दुसर्या कडव्याच्या शेवटच्या ओळीतील अन् हा शब्द खटकतो आहे का?
|
Bee
| |
| Friday, October 27, 2006 - 6:05 am: |
| 
|
हिमांशू धन्यवाद! मी बदल केला आहे.
|
तुझ्या मझ्यात अंतर आहे अंतरा मधेच खरी ओढ असते कधी कधी याच अंतरा मुळेच पाणी साखरेहुन गोड असते.
|
Bee
| |
| Friday, October 27, 2006 - 7:28 am: |
| 
|
अमोल, खरयं! तू ही ४ळी झुळुक मधे लिहू शकतोस. ४ळ्यांसाठीच तो विभाग केलेला आहे.
|
Dineshvs
| |
| Friday, October 27, 2006 - 12:56 pm: |
| 
|
दाद, परत एकदा लिहितो. अगदी पहाटवेळी प्रियकराला भेटणे हि कल्पनाच मला रम्य वाटली. भैरवी रागात तशी एक आर्तता असते. अगदी पहाटे गायचा हा राग. त्यातल्या शब्दानी तो सुखदायी होतो वा दुःखदायी. ईथे कोणी संगीतातले जाणकार असतील, तर त्यानी हे काव्य, भैरवीच्या सुरावर म्हणुन बघावे.
|
Poojas
| |
| Friday, October 27, 2006 - 2:44 pm: |
| 
|
WHAT IS LOVE....??? COMPROMISE.....OR CONTINOUS ADJUSTMENT...!!! GOD KNOWS...................... BUT WHEN SOMEBODY IS IN 'LOVE'.... WANT TO MAINTAIN THEIR RELATIONSHIP IN THEIR OWN WAY...XPECTING A LOT FROM EACH OTHER.. !!!! THEN.. WHAT 'HE' / 'SHE' MUST BE FEELING.. माझा काव्यप्रयास...त्या दोघांच्या शब्दात........ '' त्याचं '' मनोगत :- गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस सोय म्हणून सहज असं तोडू नकोस.. रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस.. आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं.. तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस.. मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा.. समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे 'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे.. विश्वासाचे चार शब्दं..दुसरं काही देऊ नकोस जाणीवपूर्वक 'नातं ' जप.. मध्येच माघार घेऊ नकोस..!!!! '' ती '' चं मनोगत झालं तेवढं पुष्कळ झालं आता आपण माघार घेऊ.. काही सवयी मागे ठेवून आठवणींचा आधार घेऊ.. आपलं 'नातं ' कसलं होतं ते कधीच कळणार नाही.. माझ्यापुरतं माझं मन पुन्हा मागे वळणार नाही... कित्येक रात्री जागून काढल्या तुझ्या एका शब्दासाठी.. आता वाटतं उगाच घडल्या तुझ्या माझ्या भेटीगाठी.. सारं काही विसरून जाणं काही दिवस अवघड जाईल.. रितेपणात जगण्याची मग पुन्हा एकदा सवय होईल.. सुरुवात तूच केलीस पण.. शेवट मात्रं मीच करेन विसर विसर म्हटलं तरी पुन्हा पुन्हा तुला स्मरेन्… !!!!
|
Shyamli
| |
| Friday, October 27, 2006 - 2:50 pm: |
| 
|
आहा पूजा सहिच..... "त्याच्या" ओळी खासच तीपण ठिके.... पण हरलेली वाटते.... अस हरायला नको तीने.........
|
समीक्षा सुरुवातीची काही पानं चाळल्यावर चिडून गाथा मिटत ते म्हणाले, 'काय हो या कविता !! ना विषयात वैविध्य, ना मांडणीत ! शब्दसंपदा "विठोबा" या एकाच शब्दात संपते इतकी सुमार ! इंद्रायणीत या तरल्या याचं एकमेव कारण म्हणजे आशयघनताच नाही हेच असणार !! वर जिथे तिथे "तुका म्हणे.. तुका म्हणे.." म्हणून आपल्याच नावाचा उदो उदो !!!! अश्याने मराठी कवितेचं कसं होणार????'
|
पूजा खासच दोनिही कविता, मनाच ठाव घेतात दोनिही कविता....
|
Bee
| |
| Sunday, October 29, 2006 - 9:20 am: |
| 
|
ekdam kewaL aahe kawita, Swati!!!!! prachanD aawaDalee..
|
Bee
| |
| Sunday, October 29, 2006 - 10:33 am: |
| 
|
अलिप्तता.. चांदण्यांनी खच्चून भरलेलं आकाश अन् अढळ धृवाची अलिप्तता... पावलापावलागणिक माणसांची गर्दी इथे तिथे.. अगदी चोहीकडे त्यात एकटेपणानी वेढत जाणारी एक अनामिक हुरहुरणारी भिती अन् त्याहूनही पटीने अधिक कुणाच्या तरी सहवासाची! लखलखण्याची सर्व मौजमजा क्षणात सरते.. उरते फ़क्त अलिप्तता.
|
Bee
| |
| Sunday, October 29, 2006 - 10:57 am: |
| 
|
उमज.. तू कविता पाडलीस तेंव्हा न राहवून मी ग्रेस खाली ठेवले आरती प्रभुंना वंदन केले अन् कविवर्य कुसुमाग्रज आठवले.. यथाशक्ती रसग्रहण करताना रसस्वादाला दिशा मिळेना आशयातील तोचतोचपणानी करवादलेला जीव आवरेना.. समस्त संग्रहांना बिलगून काळीज कापत आसवे हनुवटीवरुन ओघळून सरसर घरंगळत गेली.. ओळीओळीतून उमजत गेले भावना माझीही तिच ती होती कविता मात्र दुसरी कुठली..
|
Daad
| |
| Sunday, October 29, 2006 - 6:01 pm: |
| 
|
पूजा, अगदी खरं खरं लिहिलंय, तूम्ही. सुंदर पकडले आहेत बारकवे. स्वाती ताई मस्तंच! बी, पहिली अगदी लगेच समजली आणि छानच आहे. पण, दुसरी समजली नाही. थोडं समजाऊन सांगाल? -- शलाका
|
|
|