Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 20, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » आश्विन » काव्यधारा » कविता » Archive through October 20, 2006 « Previous Next »

Asmaani
Thursday, October 19, 2006 - 3:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती, मृद्गंधा, वैभव, सारंग, लोपा, श्यामली, मनापासून धन्यवाद...
बाकी सगळ्यांच्याच कविता अप्रतिम आहेत. अगदी एक से एक!


Jo_s
Thursday, October 19, 2006 - 11:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्वाना दिवाळीच्या शुभेच्छा



Sarang23
Friday, October 20, 2006 - 12:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रांनो धन्यवाद...
स्वाती, तुझी भास खास ही दाद झकास आहे!:-)

आता त्या कडव्याविषयी...

पाण्यामध्ये खेळे पोर
चिखलाला लळा
कुण्या पायी जोडे आणि
कुण्या पायी खिळा

यातुन इतर कडव्यांप्रमाणेच नशिबाचा अनोखा खेळ मांडायचा प्रयत्न केला आहे...
पोर जरी पाण्यामध्ये खेळत असेल, तरी पाण्यापेक्षा चिखलालाच त्याचा लळा अधिक... कारण ज्याचे त्याचे नशिब...
आणि यालाच पोषक म्हणून पुढची ओळ... नशिबाची महती सांगणारी... की पाय तेच पण कुणाला खिळा तर कुणाला जोडा!

पटलं तर सांग...

मित्र बैरागी, स्मित स्वतःत कुठलाच जोडभाव घेऊन येत नाही... म्हणजे कोणी स्मित म्हटलं की मंद हसू असाच अर्थ होतो.
आणि कपटी, कावेबाज, छद्मी, निखळ, स्वच्छ, उदास, गाफिल, क्षणिक, निर्विकार, निरोगी, विजयी, पराभूत, प्रसन्न, निंदक, धुर्त, धोरणी, निरागस, निखालस, फसवे, भुरळ घालणारे आणि अशी अनेक विशेषणं लावली की त्या मुळ शब्दाचा हवा तसा वापर करता येवू शकतो असे वाटते. आता याच धरतीवर तुम्ही खळाळणारे हा शब्द वापरलात, त्याला हरकत काहीच नाही, पण मला पटला नाही एवढेच!
पण उपमा काय वापरायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, आणि अर्थ काढणे हा ज्या त्या वाचकाचा... नाही का?:-)

लिहित रहा हो... कोणाचाही विचार न करता... शेवटी प्रत्येक कवी त्याला जे वाटतं तेच लिहित असतो, त्यात दुसर्‍याला पटावेच हा अट्टाहास कशाला...?
म्हणजे तुमचा अट्टाहास आहे असही मला म्हणायचं नाहीये...
मी वैश्विक बोलतोय....
माझा आपला एक प्रामाणिक सल्ला समजा...

आम्ही आपले दाद देऊन मोकळे होतो...

कवि आरतीप्रभूंच्या म्हणण्याप्रमाणे...

हि निकामी आड्यता का?
दाद द्या अन शुद्ध व्हा!!!


Vaibhav_joshi
Friday, October 20, 2006 - 2:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दीपोत्सव ........

बायको म्हणाली
" दिवाळी आली आणायला हवेत डिझायनर दिवे "
मी म्हणालो
" इतकंच ना बोल किती अन कसले हवे "
अगं रोज दिव्यांच्या रोषणाईत वावरतो आम्ही
दिवे हातात घेऊनच गप्पा गोष्टी करतो आम्ही
तुला माहितीय ?
दिवे हातात घेऊन गप्प बसलं तर दीपस्तंभ म्हणतात
दिलेला दिवा घेतला नाही तर चढलाय दंभ म्हणतात
रुसलेल्या गाली सुध्दा अचानक पडते खळी
जेव्हा दिव्यांच्या उजेडात स्पष्ट दिसते कोपरखळी
वरकरणी दोन चारच डिझाईन्स दिसतील तुला
पण " उजेड पाडण्याच्या " पध्दती हजार
कुणी दिवे घेऊन बेजार तर कुणी देऊन बेजार
पाहुण्यांना कळतच नाही हा कसला दिव्य उजेड
इथल्या लोकांना दिव्यांच इतकं का वेड ?
एक दिवस असा जात नाही की झाली नाही रोषणाई
येईल त्याला सर्वप्रथम " दिवे लावण्याची घाई "
असं बावचळू नकोस , बुचकळ्यात पडू नकोस फार
एकच लक्षात ठेव इथल्या एकाही दिव्याखाली नाही अंधार
चल आज माझ्याबरोबर दिवे घ्यायला , दिवे द्यायला
खरा दीपोत्सव काय असतो ते मायबोलीवर बघायला
फार अवघड नाहिये ... सगळे आपलेच आहेत
आयडींवर जाऊ नको मागचे चेहरे माणसांचेच आहेत
म्हणून सांगतो तुला दिव्यांचं घेऊ नको टेन्शन
अग हे दिवेच होणार आहेत तुझं माझं खरं पेन्शन
लॉग इन कर आणि फक्त म्हण " HI मायबोली "
हजारो दिवे येतील आणि म्हणतील
" हाSSSSSSSSSSSSSय .... हॅपी दिवाली
"

HAPPY DIWALI



Shyamli
Friday, October 20, 2006 - 2:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे हे हे
हॅपी दिवाली गुर्जी



Psg
Friday, October 20, 2006 - 2:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

:-) मस्त वैभव! आवडली कविता, छान concept

Meenu
Friday, October 20, 2006 - 2:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त कि वो गुर्जी हॅप्पी दिवाळी आज जोडीनं आलात म्हंजी

Bairagee
Friday, October 20, 2006 - 2:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्र सारंग,

स्मितच कशाला तसा प्रत्येक शब्दच कुठलाही जोडभाव घेऊन येत नाही. तसा प्रत्येक शब्द नागडाच असतो. शब्दाची देहयष्टी, फिगर बघून आम्ही कवी त्याला अर्थाचे कपडे चढवत असतो, घालत असतो. (हे कपडे प्रत्येक वेळी विशेषणांचे असतील, असतात असे नाही.)
हुश्श.

स्वाती,
उत्तराची अपेक्षा ठेवली आहे.

आता माझे मौनव्रत.

हीरा वहां न खोलिये, जहां कुंजड़ों की हाट
बांधो चुप की पोटरी, लागहु अपनी बाट –


जय रामजी की.
बैरागी
कुंजड़ो की हाट- भाजीपाला विकणाऱ्यांचा बाजार.



Lopamudraa
Friday, October 20, 2006 - 4:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



बहरली आज सुवासिक जाई.
फ़ुले वेचण्या सख्यांची घाई
का.. ग..
पहाटेच लगबग तुझी आई..
अजुन तर झुंजुमुंजु नाही..!

शाळेला सुट्टी अभ्यासाला बुट्टी
पळाली पोरे तोडाया बोरे
आंबट चिंच, गोड पेरु..
झाडांना गेरु...
कसली ही सजावट..?

रंगली माडी.. रेशमी साडी,
दिव्यांची रंगत..,पोरांची पंगत..
रांगोळीची संगत निरांजन फ़ुलले..
गाली हसु खुलले..
सजनीने गजरे केसात माळले..

गंध दरवळला जीव हुरळला
कसली ही झळाळी...
धरतीच्या भाळी
कसला हा लखलखाट...
आली दिवाळी आली....!!!!

सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा..!!!


Sarang23
Friday, October 20, 2006 - 4:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभवा आणखी एक झाड लावले रे! सुरेख आहे...
राम राम बैरागी...
लोपा छान आहे... शुभ दिपावली!


Mrudgandha6
Friday, October 20, 2006 - 5:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


वैभव,लोपा मस्तच आहेत कविता :-)


Mrudgandha6
Friday, October 20, 2006 - 5:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


वैभव,लोपा मस्तच आहेत कविता :-)


Zaad
Friday, October 20, 2006 - 6:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद मंडळी.
स्वाती, या कवितेला तू दिलेलं नाव (सोनकेतकी) छान आहे!

सारंग, भास भिडली खरंच!
चिन्नु, लोपा, वैभव खूपच सुंदर!

सर्व मायबोलीकरांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!! :-)


Shyamli
Friday, October 20, 2006 - 9:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा वैशाली छान आहे दिवाळी
झालीये वाट्ट सगळी तयारी


Mrudgandha6
Friday, October 20, 2006 - 9:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


चिन्नु,..
"सुस्कारुन दिली जांभई
तुळशीपाशी दिवलीने
किरकिरले फ़ाटक थोडे
डोळे चोळले जाईजुईने "..

क्या बात है!! वा!!

सारंग..
कोण म्हणतं भासावर जगता येतं.. अप्रतिम आहे





Asmaani
Friday, October 20, 2006 - 9:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

HAPPY DIWALI वैभव! नेहेमीप्रमाणेच झकास!

Nilyakulkarni
Friday, October 20, 2006 - 10:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्वांना दिवाळीच्या मंगलमय शुभेछ्चा
वैभवा एकदम सहीच


Paragkan
Friday, October 20, 2006 - 11:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hehe .. good one vaibhav!

lopa: chhaan!

Swaatee_ambole
Friday, October 20, 2006 - 12:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, Happy Diwali सहीच!! मला आता दिवे देता घेताना नेहेमी या कवितेची आठवण होईल. ( आणि माझ्यावर तशी वेळ कितीदा येते माहीत आहे ना तुला?) :-)

सारंग, पटलं रे. छान आहे हा अर्थ. धन्यवाद.

बैरागी, तुमची
ही पोस्ट वाचत असताना, ती लिहीताना तुमच्या चर्येवर विषादपूर्ण स्मित आलं असेल की छद्मी, असं वाटून माझ्या चर्येवर खट्याळ स्मित आलं होतं. :-)
तुमची रिऍलिटी आणि माझं परसेप्शन यातलं अंतर बहुधा प्रकाशवर्षात मोजावं लागेल असंही वाटून गेलं.
पण इतके खट्याळ विचार मनात येऊनही मला काही तो खळाळ ऐकू आला नाही. :-)
मला वाटतं मी ' कुंजडोंकी हाट' वर जन्म काढल्यामुळे मला ह्या esoteric गोष्टी कळणं अवघड जात असावं. तेव्हा तुम्ही खुशाल माझ्या समजुतीच्या नावाने ' स्मितून' मोकळे व्हा कसे.
माझ्याकडून मी हा विषय संपवत आहे.

आणि तरीही, जाता जाता,
१. एका गोष्टीबाबत शंका राहू नये. ती कविता खूप सुंदर आहे.
एक ' खळाळणार्‍या'पाशी जरी मी वाचताना अडले, तरी ती मला खूप आवडली. ( म्हणून तर इतका विचार केला गेला.)

२. तुम्ही तुमची भूमिका समजावायचा खरंच आटोकाट प्रयत्न केलात. त्याबद्दल मनापासून धन्यवाद. त्यामागची कळकळ मला फार भावली. शब्द कुणीच lightly घेता कामा नयेत, साहित्याच्या प्रांतात वावरणार्‍यांना तर आपण लिहीलेल्या प्रत्येक शब्दाचीच काय पण विरामचिन्हाचीसुद्धा जबाबदारी वाटली पाहिजे, घेता आली पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. त्यामुळे तुमचे मुद्दे मला किंवा कोणाला पटोत, न पटोत, त्याबाबत आपल्याला वाटणारी तळमळ एकाच जातकुळीची आहे. म्हणून तुम्हाला भेटून फार आनंद झाला. :-)


Vinya
Friday, October 20, 2006 - 12:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ट ला ट, म ला म

मंदिरी प्रार्थना मोठी, तो कधीची करतो आहे
देवाचे लक्ष दिसेना, खरोखर जर तो आहे

स्वप्नात जिंकले होते, कधी त्याने आयुष्याला
हा डाव रडीचा हल्ली, तो सदैव हरतो आहे

कर्ज घेतले पुर्वी, जन्माला येण्याचे जे
हप्ते दिवस रात्रींचे, तो अजुनी भरतो आहे

मृत्यो कधी येशील, आक्रोश त्याचा मोठा
काळ बघा निष्ठूर, हळुहळू सरतो आहे





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators