Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
कविता

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » आश्विन » काव्यधारा » कविता « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through September 27, 200620 09-27-06  10:19 am
Archive through September 29, 200620 09-29-06  3:15 am
Archive through October 03, 200620 10-03-06  2:43 am
Archive through October 05, 200619 10-05-06  3:11 pm
Archive through October 09, 200620 10-09-06  8:44 pm
Archive through October 10, 200620 10-10-06  10:13 am
Archive through October 11, 200620 10-11-06  6:21 am
Archive through October 12, 200620 10-12-06  2:20 am
Archive through October 12, 200620 10-12-06  10:14 am
Archive through October 13, 200620 10-13-06  3:53 am
Archive through October 13, 200620 10-13-06  3:35 pm
Archive through October 16, 200620 10-16-06  12:37 am
Archive through October 16, 200620 10-16-06  10:08 pm
Archive through October 17, 200620 10-17-06  3:42 pm
Archive through October 18, 200620 10-18-06  11:32 am
Archive through October 19, 200620 10-19-06  5:27 am
Archive through October 19, 200620 10-19-06  1:59 pm
Archive through October 20, 200620 10-20-06  12:55 pm

Bairagee
Friday, October 20, 2006 - 2:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती,
तुमचा प्रतिसाद वाचून इथले मौनव्रत तोडतो आहे.उत्तरापेक्षा तुमचा प्रतिसाद निरवानिरवीचा असला तरी आवडला. माझ्या त्या प्रतिसादातल्या मुद्द्यांचा समाचार घ्याल अशी अपेक्षा होती.
"पण इतके खट्याळ विचार मनात येऊनही मला काही तो खळाळ ऐकू आला नाही. :-). मला वाटतं मी ' कुंजडोंकी हाट' वर जन्म काढल्यामुळे मला ह्या
esoteric गोष्टी कळणं अवघड जात असावं. "
हाहाहाहाहा. खरे असावें. पण तुमचा प्रामाणिकपणा आवडला एकंदर (असो हे माझे उत्तर ड्याम्बिस:-) आहे हे कबूल करतो.). मी आधीच स्मितून मोकळा झालो आहे. त्यामुळे बोलायला फारसं उरलेले नाही. (पण ह्यावरून एक कविता येते आहे.)
जाता-जाता जे सांगितले ते पूर्ण आधीच सांगून तुम्ही मोकळे व्हायला हवे होते. तुम्ही पहिल्या प्रतिसादात स्मितापुढे आणि खळाळण्यापुढे गेला नाहीत. आणि चर्चेची सुई तिथेच अडकली.असो
तसेच, तुम्ही मला प्रामाणिक सल्ला दिला नाही. हे चांगले केले नाही. :-)

गंभीरपणे:

"माझ्याकडून हा विषय संपवत आहे."
माझ्यासाठी संवाद महत्त्वाचा. माझ्याकडून हा "संवाद" मी खुला ठेवतो आहे.
"साहित्याच्या प्रांतात वावरणार् ०दयांना तर आपण लिहीलेल्या प्रत्येक शब्दाचीच काय पण विरामचिन्हाचीसुद्धा जबाबदारी वाटली पाहिजे"

"I don't write even an inconsiderate punctuation mark¨ नायपॉल बघा हेच म्हणतो.
असो. तुम्हाला भेटून मलाही आनंद झाला. इतरत्र भेटत राहूच, असे वाटते. सगळ्याच 'अप्रतिम', 'मस्त' कविता वाचू शकत नाहीत. पण तुमच्या कविता आवर्जून वाचत असतो.

जाता-जाता ग़ालिब:
तमाशाए-गुलशन, तमन्नाए-चीदन
बहार-आफ़रीनां गुनहगार है हम
हे वसंताच्या निर्मात्या (बहार आफ़रीनां)तू वसंत आणलास.
म्हणून ही बाग डोळे भरून बघावीशी वाटली. (तमाशा-ए-गुलशन)
म्हणून काही फुलं खुडावीशी वाटली. (तमन्ना-ए-चीदन)
आणि तरी आता तूच मला गुन्हेगार ठरवतो आहेस?
कळावे. कळवत राहावे.
बैरागी


Mrudgandha6
Saturday, October 21, 2006 - 4:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


बैरागी,
कवीत आणि वाचकांत असा [सं]वाद बर्‍याचदा होत असतो.. मग असे समजायचे..

"नाला-ए ज़न्जीर्-ए-मजनु अर्घनून्-ए आशिक़नस्त
झौक़्-ए आन अन्दज़ा-ए गोश्-ए उलुल्-अल्बाब नीस्त"..
आमिर खुस्रो

a request to all,please take it easy.
:-)




Bee
Saturday, October 21, 2006 - 11:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विन्या, तुझ्यासारख्या कमालीच्या अशक्य काव्यप्रेमीकडून खूप अपेक्षा आहेत स्वकवितेबद्दल :-)

Menikhil
Saturday, October 21, 2006 - 11:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज माझ्या देशात दिवाळी असेल जोरदार
रान्गोळ्यान्च्या रन्गात रन्गली असतील घरदार
आज माझ्या देशात खुलत असतील अनार
लक्श लक्श दिव्यान्नी आज देश माझा उजळणार

आज माझ्या देशातले लोक उठले असतील लवकर
पहाटेच्या अन्घोळी.....काटा फुलतो अन्गावर
आज माझ्या देशात हट्ट करत असतील पोर
"हजारचीच लड हवी! नाहीतर बोलणार नही, बघ बर!"

आज माझ्या देशात बनले असतील अनारसे
चिवडा लाडू करन्ज्या अन पूजेसाठी बत्तासे
आज माझ्या देशात अजोळी मजाच मजा
इवल्याश्या किल्ल्यन्वर बसतील शिवाजी राजा

आज माझ्या देशाला येत असेल का माझी अठवण?
लवन्गी लड लावताना अठवेल का माझे बालपण?
थरथरत्या हातात तडतडी फुलझड.....
अन "घाबरू नकोस" म्हणणारी घट्ट पकडण?

आज या देशात रोजच असे दिवाळी
लख्ख प्रकाश अन थन्डी 'कडक' हिवाळी
आज या देशात पक्वान्न अनेक घरोघरी
पण मायेनी वाढणारे हात नाही मझ्या घरी


Menikhil
Sunday, October 22, 2006 - 7:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दुबळा नाही मी, दु:खी होऊ नकोस एक क्शण
आजही विसरलो नाही मी तुझी शिकवण
पण चहुबाजुल आल होत एकटेपण
आणि ह्या भोवर्‍यात आली तुझी आठवण

फक्त इतकच होत आई
पुन्हा सान्गतो "मी दुबळा नाही"
काळे काळे ढग आले होते काही
पण डोळ्यात माझ्या मी पाणी आणल नाही

लढत राहीलो तू सान्गितल्या प्रमणे
बुद्धीच्या शस्त्राने अन निधड्या छातीने
झुन्जत राहिलो प्रयत्नान्च्या तलवारीने
आणि जिन्कली ही लढाई मानाने

आता दिवस राहीले आहेत काही
म्हणुन हा विरह सहन होत नाही
लवकर ने मज ओलान्डुन सप्तसागरही
हेच सान्गणे मानवाच्या 'उडण्यच्या' स्वप्नासही




Vinya
Monday, October 23, 2006 - 6:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, चांगले चुंगले खाण्याची आवड असणारा हा उत्तम स्वयंपाक बनवणारा असतोच अस नाही. बहुदा नसतोच. मी तरी नाही. असो. दिवाळीच्या शुभेच्छा.

निखिल, कविता आवडल्यात.


Bee
Monday, October 23, 2006 - 6:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hmmmmmmmmmmmmm...aapakee baatame dam hai :-)

tulahi diwaLeechyaa bharghos shubhechchha!




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators