|
झाड, सोनकेतकी छान आहे. मृद्गंधा, ' तू निघताना' आवडली. बैरागी, >>>> आणि तुम्हाला सहज आठवण झाली असावी नाही, सहज नाही, त्यात ' खळाळणारं हास्य' हे योग्य वाटलं होतं म्हणून झाली. प्रेरणेचा प्रश्नच नाही, तसं तुम्हाला का बरं वाटलं? माझ्या कल्पनेनुसार जे हसणं वाहत्या पाण्यासारखं, ध्वनित होतं त्याला खळाळणारं म्हणता येईल. स्मित हे (by definition) मूक असतं ना?
|
Sarang23
| |
| Thursday, October 19, 2006 - 6:44 am: |
| 
|
अस्मानी, झाड, बैरागी, मृ... एक से बढकर एक... छान आहेत सगळ्याच कविता!
|
धन्यवाद,..वैभव,झाड,स्वाती,सारंग बैरागी,तू अनादी आहेस.. अप्रतिम!!!
|
झाड, सोनकेतकी झकास. खरच गुलमोहरावर दिवाळी होतेय!
|
सर्व मायबोलीकरांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!!
|
Bairagee
| |
| Thursday, October 19, 2006 - 7:39 am: |
| 
|
धन्यवाद स्वाती, प्रेरणेचा प्रश्नच नाही, तसं तुम्हाला का बरं वाटलं? insinuate तुम्हाला करताना कष्ट होताहेत असं उगाच वाटलं. म्हणून .तुम्ही कविता डोळसपणे वाचता हे मात्र खरं. पण एक कळले नाही स्मित म्हटले की मूक असतेच अशी व्याख्या तुम्हाला कुणी सांगितली. तुम्ही कुठे वाचली. स्मित हसणे प्रकारात मोडते असे वाटते. (By the way, Smile पेक्षा छोटं Smile असतं त्याला Smilet म्हणतात. हा खास शेक्सपियरचा शब्द आहे.) तर डोळेही बोलत नाहीत. मग बोलके डोळे का असतात? कवींची पंचाईत! व्याख्या बघून कविता करायच्या. Poetry is basically beating around the bush. More esoterically, it is imparting some order, some form to unseemly chaos that lies within and within words. हुश्श.
|
Bairagee
| |
| Thursday, October 19, 2006 - 7:45 am: |
| 
|
उद्या दिवाळी आहे! बैरागी दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
|
Psg
| |
| Thursday, October 19, 2006 - 8:00 am: |
| 
|
बैरागी! छानच.. उच्च कविता!
|
Kiru
| |
| Thursday, October 19, 2006 - 8:33 am: |
| 
|
बैरागी, fantastic ! .. ..
|
बैरागी, insinuate ??? मी insinuate करत नसते. नाही कळलं तर सरळपणे शंका विचारते, आणि प्रश्नाला प्रतिप्रश्न ( उदा :" अशी व्याख्या तुम्ही कुठे वाचलीत?") न येता तितकंच सरळ उत्तर आलं तर बरं वाटतं मला. असो. तुम्हाला स्मितातून खळाळ ऐकू येत असेल, तर आनंदाची गोष्ट आहे. मला मात्र तश्या स्मिताची कल्पना करता आली नाही. पुढेमागे आली, तर तुम्हाला जरूर कळवीन. आता तसाच कीस काढायचा तर कविता कानाला ' गोड' कशी लागेल? हो ना? तुम्हाला पुढील काव्यप्रवासासाठी ( पुढील beating around the bush साठी असं म्हणणार होते..) शुभेच्छा. ( तुम्हाला शंका विचारलेल्या आवडत नाहीत असं दिसतंय, म्हणून विचारत नाही, पण मला खरंतर ' समन' म्हणजे काय ते कळलेलं नाही. तसंच ' फिलबदी'ही.) सर्वांनाच दिवाळीच्या शुभेच्छा!!
|
Chinnu
| |
| Thursday, October 19, 2006 - 10:14 am: |
| 
|
बैरागी, मीनु, झाड, Mg सुंदर लिहिताहेत सगळे. बैरागी, मलाही खळाळते स्मित खटकले थोडे, खळाळते हास्य बरे का त्यापेक्षा? बघा बुवा! सर्वांना दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा! तिची दिवाळी! आली पुन्हा दिवाळी प्रकाश लखलखत्या दिव्यांचा अंगणात रेंगाळले मन क्षणभर खुणावी आभास चाहुलीचा सौधात उभी पाउले झाला जीव थोडा थोडा मधुगंध उधळीत फ़िरतो रानवारा तोही वेडा! सुस्कारुन दिली जांभई तुळशीपाशी दिवलीने किरकिरले फ़ाटक थोडे डोळे चोळले जाईजुईने मग हळुच हलली पाउले गोळा करत आसुसले मन - हातात हात अन डोळ्यात डोळे आनंदरंगी उजळले आज दिवाळीचे क्षण!
|
Kiru
| |
| Thursday, October 19, 2006 - 10:23 am: |
| 
|
बाप रे!! दिवाळीच्या आतिशबाजीला सुरुवात झालीसे दिसते.. हल्ली आवाजाच्या फटाक्यांवर बंदी आहे. तेंव्हा शोभेच्या फटाक्यांवर भर द्यावा ही विनंती आपल्या सर्व कवी-कवयत्री, रसिकांना दिवाळीच्या भरपूर शुभेच्छा.. बैरागी, पण काही म्हणा.. swatI has a valid point here.
|
Sarang23
| |
| Thursday, October 19, 2006 - 10:24 am: |
| 
|
समस्त मायबोलीकरांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!! बैरागी... मलाही असच वाटत की स्मित खळाळणारं नसतं. ते मूक असतं कारण ऐकू येणारा कुठलाही आवाज त्यातून होत नाही... खळाळ हा मुळात उथळतेशी संबंधित शब्द आहे... कारण तो कुठल्याही गोष्टीचा अतिरेक दर्शवतो... आणि स्मित अगदी धिरगंभीर हो ना? स्मित हे फक्त बंद ओठांच्या हालचालींवर अवलंबूनही नसत... पुर्ण चेहरा त्यात महत्वाचा role play करत असतो... आपण चेहर्यावर स्मित पसरलं असं जेंव्हा म्हणतो, तेंव्हा आपले डोळेही बोलके झालेले असतात!!! ते हास्य डोळ्यांतुनही दिसतं म्हणजे जो उच्च प्रतीचा संवाद आहे तो इथे साधला जातो. मुळात आपल्याकडे मौखीक संवाद हा निकृष्ट मानला जातो... आणि हो... छोट्या smile ल आपल्याकडे मंद स्मित असं म्हणतात! काय खरं ना?
|
Sarang23
| |
| Thursday, October 19, 2006 - 10:29 am: |
| 
|
भास एखाद्या बकाल, उदास, मरगळीची - बुंथ ओढलेल्या संध्याकाळी; वर्हांड्यात पाय पसरून : उदास आभाळाकडे डोळे लावून हरवताच - अलगद, पुर्ण आत्मविश्वासाने, तू हात हातात घेतेस आणि सगळीकडे रानफुलाचा मत्त सुगंध पसरतो... रातराणीच्या अलवार, तरल सुगंधाप्रमाणे मला लपेटू पाहतेस! आणि सगळी मरगळ, सगळी उदासी क्षणात दूर होते... कोण म्हणतं माणूस भासावर जगू शकत नाही...? पण फक्त एका गोष्टीला जपाव लागतं; मनाला अधूनमधून बजवाव लागतं " हे सगळ खरं आहे... खरच... " आणि तरी फसतोच मी... मग त्या उदास संध्येला आणखीच भिकार बनवत जातं माझं उपेक्षित मन... तडफड तडफड नुसती... कोण म्हणत भासावर जगता येतं म्हणून...? सारंग
|
Chinnu
| |
| Thursday, October 19, 2006 - 10:35 am: |
| 
|
सारंग, तुझ्या गझलांप्रमाणेच, भास देखील आवडली. मनाला अधुन मधुन बजावावं लागतच!
|
Shyamli
| |
| Thursday, October 19, 2006 - 11:09 am: |
| 
|
वा!!! काय जोरदार दिवाळी चाललीये ईथे सहीच धमाल आली एकदम सगळ्याच कविता मस्त मजा येतीये वाचायला शिल्पा.......... सुरेखच MG राहुन गेलं आवडलं ग बैरागी.. टेलीफोनी आवडली पुजा......किती वाट बघायला लावलीस ग (इतका ऊशिर करतात का? वा!!) झाड, सोनकेतकी......क्या बात है मीनु...... बाजीप्रभु... चिनु........गोड कविता,हल्लि फारस लिहीत नाहीस पण का म्हणे? सारंग........भास अल्टी
|
वा सारंग, ' भास' खास आहे. चिन्नू, बरेच दिवसांनी? सुस्कारुन दिली जांभई, तुळशीपाशी दिवलीने किरकिरले फ़ाटक थोडे डोळे चोळले जाईजुईने छान आहे. डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं.
|
Bairagee
| |
| Thursday, October 19, 2006 - 12:16 pm: |
| 
|
धन्यवाद किरू, चिन्नू, मृद्गंधा. स्वाती, "Insinuate ??? मी insinuate करत नसते. " आपले हे उद्गार वाचू आपणांस मी दुखावले असावे असे वाटले. असे असल्यास माफी मागतो. पण एखाद्याची रिऍलिटी आणि माझे परसेप्शन यात बरीच तफावत राहू शकते. माझी गल्लत झाली आहे असे दिसते.तर ते जाऊ द्या. स्वाती, कीस कशाचा आहे आणि कसा काढण्यात येतो आहे ह्यावर इथे गोडपणा अवलंबून आहे. तर, त्या स्मिताबाबत माझी आणि तुमची मते जुळताना दिसत नाही. जुळावीच असे नाही. मी माझे शेवटचे मत मांडतो आहे. (शेवटचे म्हणजे अंतिम नव्हे )तुम्हाला माझे म्हणणे पटलेच पाहिजे असे माझा अट्टहास नाही. पण मला नक्की काय म्हणायचे आहे ते कळावे. स्मित ह्या शब्दाचा सरळ-साधा अर्थ आहे.गालातल्या गालात हसणे. दुय्यम अर्थ फूल उमलणे. स्मित हा हसण्याचाच प्रकार. स्मित ही हास्य रसातली पहिली अवस्था. स्मित, हासित, हास्य, अट्टहास ह्या त्या हास्यरसाच्या चार अवस्था.(म्हणजेच Smile to Hoarse Laughter)थोडक्यात, हसणे Generic आहे. आणि खळाळून हसणे हा वापर क्लीशे़ड, नेहमीचा आहे. लोकांना त्यांची सवय आहे. पण, स्मित कुमारिकेसारखं खट्याळ, चंचल, अल्लड असू शकतं. स्मितात पराभूताचा विषाद असू शकतो. (इंग्रजीत राय स्माइल असतं ना.) स्मित खलनायकासारखं कुटिल-छद्मी असू शकतं. हॅम्लेटच्या क्लॉडियससारखं--
O villain, villain, smiling, damned villain! My tables, my tables,—meet it is I set it down! That one may smile, and smile, and be a villain! स्मित एखाद्या सेवकासारखं आज्ञाधारक, लुब्रं-लाळघोटं असू शकतं. ह्या स्मिताला अनेक चेहरे आहेत. ते बहिरूपी आहे. त्यानं गंभीर असावं अशी सक्ती नाही. आणि म्हणूनच एखाद्या खट्याळ स्मितानं खळाळण्यात चूक केलीय असं मला वाटत नाही. तसेच चांदणे खळाळणाऱ्या स्मितात न्हाले तर अधिक बरे वाटते. हसण्यापेक्षा स्मित अधिक सौम्य आहे. मला चांदण्याला सौम्य ट्रीटमेंट द्यायची होती. असो. जेवढे शक्य आहे तेवढा कीस पाडून झाला. आता एवढे समजावूनही कुणाला खळाळणाऱ्या स्मिताची कल्पना करता आली नाही, झाली नाही तर स्मितायचे. (पण पुढे-मागे करता आल्यास जरूर कळवावे ) कळावे, कळवावे. सारंग, तुझ्या म्हणण्याप्रमाणे डोळ्यांतून "ऐकू येणारा कुठलाच आवाज" येत नाही म्हणून ते मूक असतात काय? नाही! तसेच स्मिताचे. तसेच, मंदस्मित म्हणजे स्मिलेट म्हणता येईल. पण चपखल आहे की नाही हे सांगता येत नाही. छोटं आणि छोटुकलं ह्यातला जो फरक आहे तो स्माइल आणि स्मिलेट मधे आहे. river and rivulet, star and starlet तसे स्माइल आणि स्मिलेट. पण मंदस्मित म्हणजे स्मिलेट हा पर्याय चांगला आहे. मौखिक संवादाचा मुद्दा वेगळा, परिघाबाहेरचा आहे. बैरागी हम फ़कीरों से जो चाहे दुआ ले जाये फिर ख़ुदा जाने किधर हम को हवा ले जाये जाता-जाता: तो शब्द सामन हवा होता. म्हणजे ऋचा गाणे. साम गाणे. फिलबदी म्हणजे तत्काळ. लगेच.
|
बैरागी तु अनादी आणी दिवाळी अप्रतीम. अनादी वाचतानाच मला त्या फुलांच्या गंधकोषी ची आठवण झाली.
|
Chinnu
| |
| Thursday, October 19, 2006 - 1:59 pm: |
| 
|
धन्यवाद श्यामली आणि स्वाती. हो ग, फार दिवसात लिहु लिहु करत आज कुठे पोस्टली कविता. शलाकाच्या सौधाने आणि बैरागीच्या दिवाळीने मला बरच पुश केलस वटतय! चित्रमय कविता मला फारशी जमत नाही. बस प्रयत्न करुन पाहु म्हणुन! तुमच्या प्रतिक्रियेमुळे दिवाळीचा आनंद नक्कीच द्विगुणीत झाला!
|
|
|