Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 19, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » आश्विन » ललित » जाते थे जापान पहुच गये चीन समझ गये ना.. » Archive through October 19, 2006 « Previous Next »

Lopamudraa
Wednesday, October 18, 2006 - 8:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नेहमी सारखी सकाळ होते.. आणि कधी वैतागने कधी आंनदाने कामाला लागायचे तर अचानक भटकायला निघते.. आता तसेच लिहायला घेतले..!
CD लावली रजनीगंधा.. ऐकायला.. तर लागले जाते थे जापान.. पहुच गये चिन.. मग अशावेळी माझाही बेत बदलायला निमित्त लागत नाही.
बर्‍याचदा विचार करुनही मी ठरवु शकले नाहिये.. माणसान खुप खुप व्यवस्थीत राहव का.. डायरितल्या नोंदीप्रमाणे..?
छान छान घर आवरता आवरता.. मधेच पसारा करण्याची लहर येते.. लहान मुलाला खेळण्याशी खेळता खेळता ते मोडायची हुक्की येते.. तसे मलाही बर्‍याचदा.. वाटते
एखाद्या दिवशी मस्त पैकि आवडीच काही करुन अशी यादी करते
८:००.......
९:००.........
ते २:००
५:००.......
ते ८:००
अशा सुव्यवस्थीत पणाच्या रणांगणावर उतरते.. मध्येच ते blue... blu days सारख वाटायला लागतं मग net सर्फ़िन्ग करुनही कंटाळा.. v&c वर जाउन झमेला करुन यायच.. ,फोनाफोनी करुन मागच्या मित्र मैत्रिणींशी.. " अरे यार जाने कहा गये वो दिन " ....... वगैरे वगैरे
मध्येच तो कागद दिसतो..
८:०० वाजता...
९:००.....
२:००.......
त्याचे १२ वाजल्याचे लगेच लक्षात येते..
सगळ काही बोंबललेल.. २:०० वाजुन गेलेले.. पळ आता म्हणत दिसेल ते आवरायच.. त्यात नवर्‍याची डायरी दिसली तर तोंड लपवावे.
हा माणुस नेहमी रोज " हे काम झाले... हे नाही
पुढच्या पानवर ते continue ..
meeting ... त्यातले
+ve point _ ve point... summary...
आवडलेले मुद्दे न आवडलेले मुद्दे!!
काय काय लिहित असतो त्याचा विचार न केलेलाच बरा.. well organised !!!
हा प्रयोग मी नोकरी करीत असत्तना करुन बघितलेला..
शेवटी माझ्या dictionary तला नियमीत चा अर्थ मी बदलुन टाकला.. मला जास्त स्वच्छंदी हाच शब्द आवडतो हे मी आता माझ्या मनाशी कबुल करुन टाकलेय...!!!
खुपदा market ला जाताना मला...
आज ह्या क्षणाला fineshade woods मधली दाट वस्ती कशी दिसत असेल ह्या वेळी?.... अस काहिस आठवत रानच्या हिरव्या भेटीसाठी मी व्याकुळ होते.. माझी चाकं विचार करेपर्यन्त fineshade च्या घनदाट राईत उभी असतात..
सकाळी सकाळी झिरझिरत्या.. धुक्यातुन झिरपणारे उन हिरव्यागार रंगातुन लाल तांबडी छटा autumn च्या आगनमाची वर्दी देत असते.ंइवांत नितांत हिरवे क्षण..
जीवाच जंगल करुन पुढच्या A 47 ला cross करता करता.. आज भाजी आणण must आहे हे डोक्यात असत..
रस्ता बदलताना चाकांची दिशा मात्र Barroowdon. च्या बाजुला वळलेली असते.. मी पण..
रस्त्याने निवांत दारा दारातली रंगीत झुळझुळ.. बघत न्याहाळत.. जात राहते..
नयी नयी पोषाके पहनकर मौसम आते जातेहै..

फ़ुल कहा जाते है
जब भी जाते है लौट कर आते है!!!
तसे इथली ना ना तर्‍हेची फ़ुले.. नेहमीच डोलत उभी असतात.
मी केव्हा हेलनच्या दारात जाउन उभी रहते मलाही कळत नाही.. ती नेहमीप्रमाणे घरात नसतेच (आईच्या भाषेत माझ्यासारखीच भटक भवानी) पण ममा.. रीचर्ड नाहितर पिटर असतोच आणि दारत मीठी मारुन.. नको नकोसे करणारा लांब केसांचा Scruffy असतोच.. नाहि भेटल तर भुंकुन अजुन नको नकोसे करतो..,
कॉफ़ी प्याल्यावर ममा बागेत एखादे नव्याने उमललेले फ़ुल दाखवायला नेतेच..
तीथुन माझी गाडी परत जपान आठवुन.. रस्त्याला लागते.. supermarket ..... आज कुठे जाव..??? Morrison म्हणत म्हणत मी परत चिन.. मी Tesco त शिरते.. ते tesco बर पडतं म्हणजे लगेच high street वर चक्कर मारता येतो..
mood बनानेकेलिये.. or मुड बिगडा है इसलिये.. मला shoppping आवडत.. (कारण द्या अस कुणी म्हणत नाही तरीही)
high street वर जर जळगावचे फ़ुले market or नगरचा mg raod आठवले तर गडबड होते..कानावर भारतीची हाक ऐकु येते.. shop मध्ये न शिरता.. मी चर्चच्या बाकावर जाउन बसते..!!! उगाचच समोरची गर्दी न्याहाळत.. आणि मग परत उगाचच feeling येते

और तो सब कुछ ठिक है लेकिन..
कभी कभी युही चलता फ़िरता शहर तनहा लगता है..!!!

कधी जास्त emotinal होउ लागले तर बिनधास्त पने समोरच्या सुंदर नजार्‍याला दोन टिपं स्वाहा करायची

रस्तो के नाम वक्त के चेहरे बदल गये...
अब क्या बताये किसको कहा छोड आये है..!!!

as usual आपली गाडी परत चिनला आल्याचे लक्षात येते आणि परत जपानचा रस्ता धरते..
आल्या क्षणाच्या नादी लागणं हे बरोबर नाही हे कळुन वळतं त्या दिवशी प्रचंड कामे उरकतात.. आयुश्यात सिध्दांत आहेत ते प्रत्यक्षात आणन्याची जिद्द आहे.. आपली स्वप्ने तर प्रत्येक ठिकाणी सोबत असतात
पण असेही दिवस जातात.. प्रत्येक दिवस वेगळ अस्तित्व ठेवुन.. जात असतो..
शेवटी प्रश्न उत्तरे आपल्या जीवनाचा भाग आहेत...

धुप मे निकलो घटाओ मे नहाकर देखो...
जिंदगी क्या चीज है किताबो को हटाकर देखो..

अशी ही जिंदगी " जाना था जापान पहुच गये चिन म्हणतच बघता येते..!!! "


Karadkar
Wednesday, October 18, 2006 - 10:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी पण अवस्था एकदम तुझ्या सरखीच!! स्वछंदी हा शब्द खुप आवडला :-)

आई मला लहरी मेहमूद म्हणायची ते आठवले :-)


Asmaani
Wednesday, October 18, 2006 - 11:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा, मलाही इथल्या रस्त्यांवर पुण्याचा लक्ष्मी रोड बाजीराव रोड वगैरे आठवतात ग!

Chafa
Wednesday, October 18, 2006 - 1:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त लिहिलंय लोपमुद्रा!

Kedarjoshi
Wednesday, October 18, 2006 - 1:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

v&c वर जाउन झमेला करुन यायच>>>>

हं.
मस्त लिहिलेस.


Kshipra
Wednesday, October 18, 2006 - 2:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा, मस्त लिहील आहेस. काही ठराविक गोष्टी सोडल्या तर मलाही orgainised रहायला आवडत नाही. ' दोन टिप स्वाहा ' सही. कराडकर, ' लहरी मेहमूद ' :-)

Chinnu
Wednesday, October 18, 2006 - 2:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा ते ८, ९, .. २ आणि नवर्‍याची डायरी!! अगदी अगदी!!! :-)

Kmayuresh2002
Thursday, October 19, 2006 - 12:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा,सही लिहीलयस आणि अगदी खरं की बर्‍याच वेळा कितीही प्लॅनिंग केले असले तरी त्यावेळी जो काही मुड असतो त्यानुसारच गोष्टी घडतात:-)

Psg
Thursday, October 19, 2006 - 12:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा, फ़ारच छान, अगदी मनापासून लिहिलेस.. could relate to everything! :-)

Seema_
Thursday, October 19, 2006 - 1:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा मस्तच लिहिलयस . आवडल एकदम .
माझे विचार तर मिनिटा मिनिटाला change होत असतात . स्वच्छंदीपणाचा कहर आहे मी बहुदा

Raina
Thursday, October 19, 2006 - 3:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्तं लिहिलय लोपा. खूप आवडलं.

Rupali_rahul
Thursday, October 19, 2006 - 3:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>डायरितल्या नोंदीप्रमाणे..?
छान छान घर आवरता आवरता.. मधेच पसारा करण्याची लहर येते..<<<< अगदी अगदी त्यामुळे आई जाम वैतागते.... खण आवरता आवरता मी माझी स्लॅम बुक उघडून वाचु लागते आणि परत तसाच पसारा रहातो...

Shyamli
Thursday, October 19, 2006 - 4:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ए वैशाली, माझी डायरी नेली का ग तू?

नाव द्यायला गाण पण सही निवडलयस
एकदम perfect
छानच


Lopamudraa
Thursday, October 19, 2006 - 5:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सीमा, चिनु,पूनम,क्षिप्रा,श्यामली,मयुरेश,
रुपालि,अस्मानी,चाफ़ा,केदार,रैना..धन्यवाद सगळ्याना...
कराडकर.. आजी सुध्दा मला लहरी मेहमुद म्हणायची ग..!!!


Hems
Thursday, October 19, 2006 - 5:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त लिहिलयस लोपा ! शीर्षकही जाम आवडलं !!


Ganeshbehere
Thursday, October 19, 2006 - 5:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपाताई, लहि भारि लिहिलेस. येऊ द्या आजुन...... काहि तरि नविन

Princess
Thursday, October 19, 2006 - 6:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा, काय मस्त लिहिलय ग. तुला मज्जा माहितीय का... मी पण अगदी अशीच आहे. खुप ठरवुन्ही मला असे छान plan नाही करता येत आयुष्य. मी पण तसेच लिहिते ना कितिदा ८, ९.... २...४...पण कधीच नाही जमत मला लिहिलय तसे वागायला. याउलट माझा नवरा... अगदी तुझ्या नवर्‍या सारखा. सगळे काही well planned म्हणजे ना कधी मी अशीच लहरी मेहमुद प्रमाणे त्याला विचारणार " आज आपण असे करुया का रे?" " नाही नाही माझी office activity scheduled आहे त्या वेळात, असे उत्तर मिळते. अगदी २/ २ weeks प्लान केलेले असतात त्याने. बरे ते असो... मला तर हे तु मलाच बघुन लिहिलय असे वाटले:-) आणि माझ्यासारखी स्वच्छंदी लोक आहेत हे बघुन आनंद झाला

Lampan
Thursday, October 19, 2006 - 6:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगदी झकास !!
असंच जगायला पाहिजे ..
' मी माझ्या मर्जीप्रमाणेच जगणार ' बाकी सगळं गेलं तेल लावत
ह्याचा अर्थ काटेकोर जगतात ते स्वच्छंदी नसतात असा नाही .. तसं जगणं हा त्यांचा स्वच्छंदीपणा


Giriraj
Thursday, October 19, 2006 - 6:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मायबोलीवर आले म्हणजे सगळे स्वच्छंदीच आहेत की!
लोपा,मस्त लिहिलेस!:-)


Aditih
Thursday, October 19, 2006 - 8:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किती सुंदर वर्णन केलं आहेस लोपा तु!! अगं मी पण Uk मधेच आहे surrey county मधे woking ला.

और तो सब कुछ ठिक है लेकिन..
कभी कभी युही चलता फ़िरता शहर तनहा लगता है..!!!
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
अगदी जाम तुझ्यासारखंच होतं ग माझं..मेरे दिल की बात कह दी.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators