|
Asmaani
| |
| Wednesday, October 18, 2006 - 12:07 pm: |
| 
|
मंडळी, तुमच्यासारख्या दिग्गजांपुढे माझी कविता ठेवण्याचे धाडस करतेय घनगर्द सावल्यांची आहे समोर दाटी का वाटते तरीही ती काहिली हवीशी! नजरेसमोर आहे हसरे अथांग नीर का वाटते जिवाला तृष्णा तरी हवीशी! खुणवीत पावलांना विस्तीर्ण राजमार्ग का वाट नागमोडी मज वाटते हवीशी! आहे उभे समोरी जोडून हात सौख्य का वाटते तरीही अतृप्तता हवीशी!
|
अस्मानी, छान. बाकी, या प्रश्नाला उत्तर असतं तर काय हवं होतं!! तुझी कविता वाचून माझी एक जुनी चारोळी आठवली, ती टाकत्ये. कशी लागे तृषा ही मृगजळाची या मना कसे क्षितिजास मी कवटाळण्या जातो पुन्हा कसे अप्राप्य ते सारे हवेसे वाटते कसे गारूड करती जीवघेण्या यातना..
|
बैरागी, बरेच दिवसांनी? ( बैराग्यांना असे प्रश्न विचारतात का?) >>>> अजून बोलायचे तुझ्याशी बरेच आहे मनातले, पण.. लगालगागा.. कसलं गोड लागतंय कानाला.. वा! पण स्मित खळाळणारं कसं असेल? वैभवच्या परवाच्या ' ती मुक्त खळाळत हसते तेव्हा..' ची आठवण झाली.
|
Bee
| |
| Wednesday, October 18, 2006 - 11:05 pm: |
| 
|
म्रुदगंधा, खूपच छान आणि ओघवती झाली आहे कविता..
|
काय एकेक कविता पोस्ट झाल्या आहेत दोन दिवसात .......... छान !!! मृद्गंधा , श्यामली , दाद , अस्मानी , सारंग , पूजा , मीनू , बैरागी धन्यवाद अश्या कविता इथे लिहील्याबद्दल ... मज़ा आ गया ....
|
Meenu
| |
| Thursday, October 19, 2006 - 12:54 am: |
| 
|
बाजीप्रभु आपणही असतो बाजीप्रभु, कधी तरी..... सापडतोच खिंडीत आपणही, एकदा तरी.... गोळा होतात पंचप्राण कानात, ऐकायाला ईशार्याच्या तोफेचा नाद प्राण असेतोवर, आला ईशारा, तर ठीक आहे नाहीतर............
|
Bairagee
| |
| Thursday, October 19, 2006 - 2:07 am: |
| 
|
धन्यवाद स्वाती. "पण स्मित खळाळणारं कसं असेल?" हा तुमचा प्रश्न कळला नाही. मगं कसं हवं होतं? संततधार, मुसळाधार हवं होतं काय? कृपया सूचना कराव्यात वैभवच्या परवाच्या ' ती मुक्त खळाळत हसते तेव्हा..' ची आठवण झाली. गतसालीच्या शारदीय चांदण्यात झालेल्या एका लांबलचक सुदूर संभाषणाबद्दल झालेली एक फिलबदी कविता आहे. मी माझ्या प्रेरणा लपवून ठेवत नसतो आणि तुम्हाला सहज आठवण झाली असावी. पण तुमच्या कानाला 'लगालगागा, लगालगागा' गोड लागले. हेही नसे थोडके
|
Zaad
| |
| Thursday, October 19, 2006 - 2:12 am: |
| 
|
आज खूप दिवसांनी ही कवितांची वही उघडली. आठवतं, याच वहीत तू एकदा सोनकेतकीचं फूल ठेवलं होतं? त्याचा सुगंध आता पानापानांमधून पसरला होता आणि माझ्या कवितांची सगळीच्या सगळी अक्षरं त्या सुकलेल्या फुलात जाऊन बसली होती....
|
आहा ! झाड .... its a beauty
|
Zaad
| |
| Thursday, October 19, 2006 - 2:27 am: |
| 
|
वैभव धन्यवाद! मंडळी, गेल्या दोन दिवसातली प्रत्येक कविता सुंदर आहे, सलामीच्या कविता पण जोरदार आहेत! मायबोलीवर खरी दिवाळी साजरी होत आहे!
|
सर्वांचेच मनपूर्वक आभार.. वा!! मीनू,.. सुंदर..दोन्हीही कविता.. हं..इशारा आला नाहीतर..?? अस्मानी,... "खुणवीत पावलांना विस्तीर्ण राजमार्ग का वाट नागमोडी मज वाटते हवीशी! ".. वा!!.. या प्रश्नाचं उत्तर सापडले तर जरुर कळव.. बैरागी,.. टेलीफ़ोनी.. अप्रतीम..
|
झाड, " आणि माझ्या कवितांची सगळीच्या सगळी अक्षरं त्या सुकलेल्या फुलात जाऊन बसली होती.... ".. किती सुंदर लिहलय.. वा.......!!!!!!!!!!!!
|
तू निघताना... किती किती स्वप्ने पाहिली होती मी.. तू आलास की.. काही व्यक्त काही अव्यक्त, बोलत बसायचं.. कधी हसायच तर कधी उगाचच रडायचं.. असं बोलायचं अन तसही बोलायचं काही.. तू निघतो म्हणशील तेव्हा.. तुला जाऊच द्यायचं नाही.. तू आलास अन लगेच निघालासही.. या अपुर्या क्षणांत मग भेटायचं राहूनच गेलं.. ओठांवर साचून राहिले शब्द बोलायचं राहूनच गेलं.. वाटलं पकडावा तुझा हात अन चिडांव थोडं, "तुझे हे नेहमीचंच"म्हणत रडावं थोडं.. पण, बुद्धी भलतीच विचारी.. म्हणालि.. "असं का करतात वेडे..?? निरोप देताना हसावे थोडे.." मग,दाटून आलेला गळा, तरीही,घातला बांध मनाला.. हसत निरोप देत हलवत राहिले हाताला.. तू दूर जाईपर्यंत हसू मावळू दिलं नाही.. डोळ्यांतले पाणी पापण्यांनाही कळू दिले नाही.. अस्वस्थ मनाने.. माघारी फ़िरले तेव्हा.. अंगणभर.. प्राजक्ताचा सडा पडला होता.. तू निघताना.. तो ही बहुदा.. मुक्यानेच रडला होता...
|
Bairagee
| |
| Thursday, October 19, 2006 - 3:11 am: |
| 
|
तू आहेस अनादी, तू आहेस अनंत कधी बसच्या तुटलेल्या पत्र्यात, (कधी कडेला, तर कधी रस्त्यांत) कधी गावकुसांबाहेर,कधी वस्त्यांत कधी डबाबंद वातानुकूलित सदनिकांत, कधी आतबाहेर तापलेल्या टिनपट झोपड्यांत, कधी लॉनदार बंगल्यातील छानदार व्हरांड्यात; कधी अँटेनात, कधी केबलांच्या मांज्याच्या ट्रॅपज़ीत कधी बाहेरील उकिरड्यातील कॉज़्मप़ॉलिटन कचऱ्यात, उकिरड्याबाहेरील अस्पृश्य केळीच्या सालात; कधी सिग्नलवर सुटलेल्या गर्दीत, कधी नग्न, कधी वर्दीत कधी लीन दीन, कधी उर्मीत. कधी हवेच्या ओंजळीत मिटलेल्या धुळीत, आणि कार्बनमोनॉक्साइड ओकणाऱ्या सायलेन्सरच्या ओठात कधी इंजनच्या पोटात; कधी पानठेल्यावरील "श्रद्धा आणि सबुरीच्या" लाकडी चौकटीत, आणि त्यावरील प्लास्टिक लॅमिनेशनमध्ये, कधी फुलचंदच्या चुन्यात कधी पिचकारीत, कधी थोटकात कधी राखेत; माझ्यातील मूलद्रव्ये झाली आहेत जिवंत, माझ्यातील अणूरेणू पिंगा घालत करताहेत सामन, "तू आहेस अनादी, तू आहेस अनंत" ............................. बैरागी
|
का वाटते तरीही ती काहिली हवीशी!>>>>>. अस्मानी... तुझ्या नावाईतकीच सुंदर आहे...!! त्याचा सुगंध आता पानापानांमधून पसरला होता झाड.. नाजुक आणि हळुवार.. मस्त!!! मृ अग काय हे.. भरभरुन काव्यवाचनाचा आंनद देतेय.. thanks बैरागी कविता छाने.. माग्ची कविता दिसली नाही तुमची...!!!
|
Bairagee
| |
| Thursday, October 19, 2006 - 3:41 am: |
| 
|
टेलिफ़ोनी दवात भिजल्या तृणावरी चालतोय मी नग्न पावलांनी भल्या पहाटे जणू चांदणे टिपूर तुझिया खळाळणाऱ्या स्मितात न्हाते असेच वाटे ... तुडुंब कोलाहलात माझ्या, सुदूर संभाषणात मी शोधतो तुझी चंद्रकोर येथे अजून बोलायचे तुझ्याशी बरेच आहे मनातले पण उतावळे मन चकोर येथे ... बैरागी
|
लोपा,.... धन्यवाद.. तुम्हा सर्वांचा आदर्श समोर आहे ना....
|
मृद्गंधा ... " तू निघताना " अप्रतिम आहे ... फार फार आवडली . बैरागी .. " तू अनादी ... " विषय , मांडणी , शेवट ... केवळ सुंदर
|
Zaad
| |
| Thursday, October 19, 2006 - 4:37 am: |
| 
|
मृद्गंधा, लोपा धन्यवाद! मृद्गंधा, कविता फारच सुंदर... शेवट तर अप्रतिम! बैरागी, टोपणनावाला साजेशी आहे कविता! समन चा अर्थ नाही समजला.
|
Poojas
| |
| Thursday, October 19, 2006 - 5:27 am: |
| 
|
प्रतिक्रिये बद्दल सर्वांना धन्यवाद स्वाती... तू सुचवलेल्या सुधारणेचा मी निश्चितच विचार करेन मला ही पटलं ते thanks 4 the suggestion .. बाकी.. दिवसें दिवस गुलमोहोर्’ अधिकाधिक प्रगल्भ होत चाल्लाय.. खूपच सुरेख लिहितायत सगळेच जण. मला ना..प्रतिक्रीया द्यायला शब्दच सुचत नाहीयेत.. !! ‘ अप्रतिम केवळ.. ‘अप्रतिम….’
|
|
|