|
Daad
| |
| Tuesday, October 17, 2006 - 7:17 pm: |
| 
|
आभार, सगळ्यांचेच! आनंद, 'महावस्त्र आणि एक विणावे...' खूपच सुंदर! मृ तुझ्या सगळ्याच कविता छळतात... सारंग, - ही कटाक्षांना तुझ्या माझी विनंती; काळजाचा वेध घेणे थांबवावे! - छानच. बी, रानजाईचा शृंगार अप्रतिम
|
Sarang23
| |
| Tuesday, October 17, 2006 - 11:18 pm: |
| 
|
धन्यवाद मित्रांनो!
|
Sarang23
| |
| Wednesday, October 18, 2006 - 12:16 am: |
| 
|
गुन्हा कुणी तरी वाहु केली फुले कुणा तरी; आणि मग झाले पुन्हा दुःख भरजरी. ढग दाटु आले जेंव्हा पापण्यांच्या दारी, - हसुनिया पुढे गेली पंढरीची वारी. पाण्यामध्ये खेळे पोर चिखलाला लळा. कुण्या पायी जोडे आणि कुण्या पायी खिळा! पचवून दुःख सारे हसती जाताना; आणि कोणी गहीवरे गुणगुणताना. एवढेच सत्य आहे सोपे अन साधे; नेम नाही काळाचा हा कधी डाव साधे. कुणी जळे त्याचा येई चंदनी सुवास, पावसात भिजे कोणी धुराचा आभास. म्हणून रे ठेव तुझी फुले तुझ्यापाशी, कोमेजून जाती येथ अक्षरांच्या राशी... पाण्यामध्ये डोकावून पाहु नको पुन्हा; डहुळला डोह, झाला फार मोठा गुन्हा! ( छंद : उपजाती ) सारंग
|
Shyamli
| |
| Wednesday, October 18, 2006 - 12:25 am: |
| 
|
कुणी जळे त्याचा येई चंदनी सुवास, पावसात भिजे कोणी धुराचा आभास.>>>>> वा वा खासच........
|
सगळ्यांचेच मनपूर्वक आभार आनन.द,..माहवस्त्र छानच..आणि ते विणण्याची आता खरेच गरज आहे.. bee रानजईचा शृंगार चानच.. सारंग, "कुणी तरी वाहु केली फुले कुणा तरी; आणि मग झाले पुन्हा दुःख भरजरी.".. क्या बात है..!! वा!"
|
Kshipra
| |
| Wednesday, October 18, 2006 - 1:26 am: |
| 
|
दाद, सारंग, मृ, आनंद सुरेख. सारंग दुसरी कविता पहिले कडवे झकास
|
माझ्या "उघड तुझ्या गाभार्याचे दार" या कवितेबाबतीत्त खूप जण्नांना प्रश्न पडले आहेत.. ही कविता नक्की भक्तीरसातील आहे की प्रेमरसातील..??.. ही कविता प्रेमभक्तीची आणि भक्तीप्रेमाची आहे..त्या दिव्य स्तरावरच्या भावनांची आहे.. . तिसर्या कडव्यात शृंगार आला आहे पण, तो दिव्य स्तरावरचा आहे..भौतिक जगतातला नाही.. मीरा व्यवहारिकदय्ष्ट्या कधीच कृष्णाला भेटली नव्हती पण,तीच्या कवितेतही श्रुंगार येतोच.. तुकारमही म्हणतात तसे "बळियाचा अंगसंग झाला आता.." हा शृंगार म्हणाजे आत्म्याचे मिलन असते.. म्हणले तर भक्ती,म्हणले तर प्रेम..माझ्या दृष्टीने प्रेम आणि भक्तीत काहीच फ़रक नाही.. ही कविता मीरेचीही आहे,राधेचीही.. आणि जगद्गुरु तुकारामांचीही.. मीरा आणि राधा एकच आहेत.. ही श्रीचैतन्यप्रभूंनी वर्णन केल्याप्रमाणे..एक "विप्रलंभसेवाच आहे" म्हणजे विरह भावनेतून केलेली प्रेमभक्ती.. शलाकाच्या कवितेतीलच भावना इथे वेगळ्या स्वरुपात, प्रार्थना रुपात लिहली आहे..
|
Sarang23
| |
| Wednesday, October 18, 2006 - 3:29 am: |
| 
|
मृद्गंधा, कानन म्हणजे निबीड, घनदाट अरण्य... उदा : माझिया नयनांच्या... या गाण्यामध्ये, अपर्णा तप करते काननी असा उल्लेख आहे... म्हणजे जंगलात वैगरे... मग तू कानन म्हणजे अंधार या अर्थी वापरलय का? इथे उजळूदे हृदयीचे कानन कसं वाटेल? कवितेचा एकूण भावार्थ आवडला...!
|
सारंग.धन्यवाद.. अर्थ सांगितल्याबद्दल. मला तरी कानन म्हणजे अन्धकार हाच अर्थ माहित आहे,नव्हे तसा अनेक ठिकाणि वापरलेला पाहिलाय. कधी कधी होवू शकते असे...शन्द वेगळे पण त्यातून अर्थ वेगळे वपरात येतात.. घनदाट अरण्य म्हणजे तरी काय असते..जिथे प्रकश पोहचत नाही..आणि सर्वत्र अन्धकारच असतो... असाच अर्थ मला अभिप्रेत होता.. तरीही मी चुक केली आहे,अता edit करु शकत नाही... पण इथून पुढे तरी ती होणार नाही..ज्ञानात वाढ झाली..त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद सारंग 
|
भरतं.. रात्र होताच, उगवावं चान्दणं.. तितक्याच सहजतेने अंधारुन आलं की जाग्या होतात, तुझ्या आठवणी.. नकळत ओलावतात पापण्या अन उसळू लागतं पाणी.. कोण म्हणतं.. चन्द्र उगवल्यावर, फ़क्त समुद्रालाच भरतं येतं..?
|
Meenu
| |
| Wednesday, October 18, 2006 - 4:52 am: |
| 
|
वा मृदगंधा .. कोण म्हणतं चंद्र उगवल्यावर फक्त समुद्रालाच भरतं येतं ..? मस्त गं
|
Jo_s
| |
| Wednesday, October 18, 2006 - 5:00 am: |
| 
|
सारंग गुन्हा केवळ अप्रतीम मृदगंधा भरत छानच सुधीर
|
Poojas
| |
| Wednesday, October 18, 2006 - 6:00 am: |
| 
|
'' ध्येयं ...'' ठरव एकदा शांतंपणे जगण्यामागचा हेतू काय.. दिशाहीन भटकायचं.. जगण्यासाठी ध्येयाशिवाय..?? अस्तित्वाची जाणीव काय.. सावलीसुद्धा करुन देते.. पण अंधाराच्या खोल गर्तेत अंधाराची होऊन जाते.. अशावेळी दिव्यासारखं फक्त एकदा जळून बघ.. तुझं स्वत्वं नक्की मिळेल मागे-पुढे वळून बघ.. कुणीच नसतं कुणाचं आपली आपण चालत रहा.. कर्तृत्वाच्या बळावरती संकटांना झेलत रहा.. ठेच लागेल जखम होईल वेळेसरशी भरुन येईल.. व्रण मागे ठेवून जाईल त्याचीसुद्धा सवय होईल.. स्वत्:वरती विश्वास ठेव खंबीरपणे पाऊल टाक.. निर्णयाशी ठाम हो वास्तवाचं भान राख.. स्पर्धा कर वार्याशी प्रवाहात ये.. सोडून काठ.. जमिनीवरती पाय रोवून आकाशाची उंची गाठ.. ध्येयासक्त आशावाद जेव्हा इतका दृढ होईल.. तुझ्या नकळत तुझं ध्येयं तुझ्यासमोर उभं राहील.. उणीवांना श्रेयं मिळेल जाणीवांना मिळेल न्याय.. म्हणून म्हणते ठरव एकदा जगण्यामागचा हेतू काय.. दिशाहीन भटकू नकोस जगताना ध्येयाशिवाय.... !!!!
|
पुजा, केवळ अप्रतीम... "उणीवांना श्रेयं मिळेल जाणीवांना मिळेल न्याय.. म्हणून म्हणते ठरव एकदा जगण्यामागचा हेतू काय"..व्वा!!
|
Sarang23
| |
| Wednesday, October 18, 2006 - 6:59 am: |
| 
|
श्यामली, मृ, क्षिप्रा, सुधीर धन्यवाद. मृद्गंधा, तुझं स्वागत आहे आणि भरतं छान आहे! क्या बात है! पुजा ध्येय केवळ सुरेख आहे...! खुप सकारात्मक... छान! कानन : आपल्या सगळ्यांसाठीच हि माहिती... बर्याच जणांना माहितही असेल कदाचीत... कानन म्हणजे स्वर्गातील उद्यान असाही अर्थ होतो... म्हणून काननबाला चा अर्थ अप्सरा होतो... स्वर्गातील उद्यानात राहणारी बाला!!!
|
Meenu
| |
| Wednesday, October 18, 2006 - 7:38 am: |
| 
|
चकवा जीव खाऊन धावतेय मी, धोकादायक ते वळण, टाळु पहातेय मी. पण अचानकच, लागणारं प्रत्येक वळणच धोकादायक होतय. तो परीक्षा पहातोय, त्याचं काय जातय? फिरुन फिरुन आयुष्य, त्याच वळणावर येतय.
|
Sarang23
| |
| Wednesday, October 18, 2006 - 7:58 am: |
| 
|
चकवा छान आहे मिनू.
|
मृदंगन्धा.. काय म्हणु अप्रतीम.. भरत.. आलं अगदी..!!! सारंग गुन्हा सुंदर आहे.. आवडली!!!काननचा अर्थ पण छान सांगितलास.. बर झाल.. कळले नविन अर्थ पूज.. best ...!!! खुप आवडली.. चकवा छाने मीनु..!!!
|
Kiru
| |
| Wednesday, October 18, 2006 - 11:29 am: |
| 
|
क्षिप्रा.. पुनरागमन दणकेबाज.. फुलपाखरु आवडलं. पण आता पुन्हा कोषात जाऊ नकोस. 'एकट्याने जागण्याचा छंद जडता चांदण्या रात्री मला भेटून जावे' क्या बात है!!!.. व्वा!! गुन्हा ही आवडली. लिहीत जा रे सारंगा.. मस्त लिहितोस.. मृद्गंधा.. 'भरतं' खुप छान उतरलीये. पूजा!!, 'ध्येय' निव्वळ अप्रतीम.. 'पावरीशी शीळ सांगे, 'रुक्मिणीचा नाथ, रथ जोडुनिया थांबलाहे, चलतेस का ?' दाद.. वाचताना अंगावर रोमांच उभे राहिले. आणखी काय लिहू?
|
मृद्गंधा, भरतं आवडली. चांदण्याइतक्या सहज उगवणार्या आठवणी.. वा! पूजा, बरेच दिवसांनी दर्शन? सुरेख लिहीलंयस गं. फक्त मला असं वाटलं की ' जाणीवांना मिळेल श्रेय, उणीवांना मिळेल न्याय' असं जास्त बरोबर वाटलं असतं का? उणीवांना श्रेय हे कळलं नाही नीटसं. सारंग, ' गुन्हा' आवडली. खूप छान विचार आहे. ' कुणीतरी वाहू केली फुले कुणातरी..' सुंदर आहे. फक्त शेवटच्या कडव्यात पहिल्या दोन ओळी आज्ञार्थ आल्यावर शेवटच्या दोन ओळी भविष्यकाळात (संभाव्य) यायला हव्या होत्या असं वाटलं. म्हणजे उदाहरणार्थ ' डहुळेल डोह, असा करू नको गुन्हा' असं? तसंच पाण्यामध्ये खेळे पोर चिखलाला लळा. कुण्या पायी जोडे आणि कुण्या पायी खिळा! ह्यातल्या सुट्या सुट्या कल्पना छान आहेत, पण कडव्याचा एकूण अर्थ मला नीट कळला नाही.
|
|
|