Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 16, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » आश्विन » काव्यधारा » कविता » Archive through October 16, 2006 « Previous Next »

Meenu
Monday, October 16, 2006 - 12:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्यावरचा राग मात्र अजून गेलेला दिसत नाही तुझा...>>> मृदगंधा असं अजिबात नाहीये गं ..!! मी नक्की सांगु शकते तुला ..

सर्वांनाच प्रतिक्रियांबद्दल आभार ..

आणी टवका म्हणजे छोटासा तुकडा ..


Bhramar_vihar
Monday, October 16, 2006 - 12:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुमच्या सर्वांच्या कविताच छान नसतात तर त्यावरचि चर्चाही तितकीच रंजक आणि उदबोधक असते! तुम्हा सर्वाना सलाम!

Sarang23
Monday, October 16, 2006 - 1:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शलाका, उस्ताद म्हणजे माझा काही संबंध नाही, पण तरीही...
तू त्या गझलेचं मीटर बरोबर लिहिलं आहेस. लघू गुरू नाही...
उ र ले म्हणजे ल ल गा...
लघू गुरु लिहिण्याची गरज अक्षरगण वृत्ताच्या वेळी पडते...
पण मात्रा वृत्तात मात्रा फक्त मोजतात त्यांचे तिन तिन समान गट करत नाहीत... त्यामुळे तु लिहिलेल बरोबर आहे..


Sarang23
Monday, October 16, 2006 - 1:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

 बरेच झाले!

बरेच झाले म्हणायचे;
तरी जरासे कण्हायचे!

बघून झाले भले बुरे;
अता कशाला फसायचे?

नको कुणाचे उणेदुणे;
हसून सारे पहायचे!

उरीच राहो उरातले;
उगी कुणाला कळायचे!

कणाकणाने जळूनही;
मरून अंती जळायचे!


सारंग


Mrudgandha6
Monday, October 16, 2006 - 1:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनू,
"मृदगंधा असं अजिबात नाहीये गं ..!! मी नक्की सांगु शकते तुला .."
मलाही माहित आहे ग..:-)

आणि, बदललेली "मुखवटा" छान झालीय.पण, मला असे वाटते की..
दुसर्‍या ओळीतील "तेव्हा नवा होता" हे नकोच..त्या ऐवजी पाचव्या ओळीतच "तेव्हा" हा शब्द जोडून दे..म्हणजे "तेव्हा नविन होता ना..!!"
कारण, पुन्हा पुन्हा "नविन होता" हा श्ब्द आला तर त्याचे गांभिर्य तेव्ह्ढे रहात नाही,वाचणार्‍याला एकदाच झटका द्यायचा.. so , एकदाच लिही..त्याने त्याचा गहिरेपणा वाढेल..:-)



Shyamli
Monday, October 16, 2006 - 2:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्या बात है सारंग
आवडली, छानच


Meenu
Monday, October 16, 2006 - 2:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृ done and thanks !!!

Mrudgandha6
Monday, October 16, 2006 - 2:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


सार.ग,
"बरेच झाले" मस्त आहे.

"कणाकणाने जळूनही;
मरून अंती जळायचे!"..वा!!!खुप सुंदर...


Harshu007
Monday, October 16, 2006 - 3:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"स्वप्न "
जिवनात प्रत्येक स्वप्न
साकार होत नसत
पण या वेड्या मनाला
त्यावेळी कळत नसत
प्रयत्न केल्यावर काहीही
अशक्य नाही हे जरी
खर असल तरी स्वप्न
शेवटी पाहण्यावर असत
म्हणून वास्तविकता समजुन
स्वप्नात रमाव
नाहीतर मग स्वप्न
साकार झाल नाही म्हणून
कूडत कूडत जगाव
पण तसल्या जगण्यापेक्षा
विचार करून वागाव
आत्मविश्वासाने पाउल उचलून
ध्येयाकडे चालाव आणि
वास्तविकतेचा विचार करून
स्वप्न साकार कराव


Vaibhav_joshi
Monday, October 16, 2006 - 3:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बोलून गेलो ....

बोलून गेलो ... चुकले असावे
काही शब्द खोल खोल रुतले असावे
पण सांग मला तू
त्या पारदर्शी शब्दांना अर्थ नव्हता ?
स्वच्छ आरसा समोर धरण्याचा
प्रयास अगदीच व्यर्थ नव्हता !!!
कदाचित प्रतिबिंब जरासे
गढूळ उमटले असावे
बोलून गेलो ... चुकले असावे

एक प्रयास होता ...
सत्याच्या उजेडात भेटायचा
आजवर किर्र काळोखात
प्रत्येकजण आपला वाटायचा ...
तरी अनोळखीच राहिलो कारण
उजेड सहन न होऊन
तू डोळे मिटले असावे
बोलून गेलो ... चुकले असावे

किती सहज फिरली पाठ
काही न बोलता ...
तुटली संभाषणाची गाठ
काही न बोलता ....
आता बोलणेच अवघे .. गौण होत आहे
कसा कल्लोळ उरीचा .. मौन होत आहे
बहुधा तुझ्या मौनाने
शब्द माझे लुटले असावे
बहुधा कर्ज माझेही
पुरेसे फिटले असावे
बोलून गेलो ... चुकले असावे


Daad
Monday, October 16, 2006 - 4:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृ... माणूस(२), आता छानच

हेम्स,
कधीकधी शब्द फुटतात
तेव्हा तीच कविता शोधतअसतात ... सुंदर

मीनु समई आणि मुखवटा दोन्ही सुंदर. मला मुखवटा जास्त आवडली! विशेषत: -
आता विरलाय जरासा अन
खरे भावही , गळतात त्यातुन हल्ली
जरासाही धक्का लागला की ,
उडतो टवका हल्ली
क्या बात है!
वैभव, माणसे... छानच. ही सुद्धा २४ मात्रातच का? आणि मिटर? गा गा ल गा ल गा गा च का? please let me know . माझ्यासाठी ती दादर्‍यात चाललीये.
नुसतंच 'बोलून गेला' नाहीत...... बरच काही छान बोलून गेलात?
न बोलण्यापेक्षा बोलणं बरं. नाहीतर हितगूज ची ही BB , एक पाखरं नसलेल्या झाडासारखी केविलवाणी व्हायची.

सारंग, .... खरं खरं सांगयचं तर, हे explanation देऊन तुम्ही माझी विकेट घेतलीय. आता अक्षरगणवृत्तावर प्रकाश टाकोन म्या पामरास धन्य करावे.
सारंग, कणाकणाने जळूनही;
मरून अंती जळायचे!
व्वा...!





Mrudgandha6
Monday, October 16, 2006 - 4:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


दाद,धन्स ग..

हर्शू.. छान आहे..

वैभव,..
"बोलून गेलो.." केवळ अप्रतीम!! पहिल्या पासून शेवटपर्यंत..एक एक शब्द न बोलताही बरेच काही बोलून गेला..आणि त्यात त्या शब्दांचे काहीच चुकले नाही..तुझ्या प्रतिभेला साष्टांग दंडवत माझे..!


Shyamli
Monday, October 16, 2006 - 10:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कधी कधी

एखादं पुस्तक वाचता वाचता
गुंतून जातो आपण
त्यातल्या पात्रात स्वतःला पाहतो.....
अगदी फार हळवं होऊन कासावीस होतो तर
कधी मोहरूनही जातो

आणि..............
पुस्तक संपत वाचून ......
अचानक,
प्रचंड पोकळी......
काहीशी तगमग.......
उलघाल.....

मग.............
आपण बजावतो स्वतःला
संपलीये कथा.......
आणि बंद केलंय पुस्तक,
....................
त्या पुस्तकाला थोपटतो जरासं
आणि हळूच बाहेर पडतो त्यांतून
...................
होतं असं .....कधी कधी!

श्यामली!!!


Mrudgandha6
Monday, October 16, 2006 - 10:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


वा!!!!!!!!!
श्यामली...........
"मग.............
आपण बजावतो स्वतः:ला
संपलीये कथा.......
आणि बंद केलंय पुस्तक,
....................
त्या पुस्तकाला थोपटतो जरासं
आणि हळूच बाहेर पडतो त्यांतून
...................
होतं असं .....कधी कधी!".क्या बात है:-)



Sarang23
Monday, October 16, 2006 - 11:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्या बात है! वा!!!
त्या पुस्तकाला थोपटणे... सुरेख!


Kiru
Monday, October 16, 2006 - 11:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आ.. हा!! क्या बात है.. श्यामली!!
होतं खर असं.. बर्‍याचदा..


Chinnu
Monday, October 16, 2006 - 1:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा वा श्यामली! मस्त!

Dineshvs
Monday, October 16, 2006 - 2:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली छान. आता फक्त पुस्तकाचे नाव सांगुन टाक बरं

Daad
Monday, October 16, 2006 - 9:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली, किती छान गं? सार्‍या असोशीने वाचणार्‍यांचा अनुभव लिहीलास. आयुष्याच्या अनेक गोष्टींतून इतकच सहजपणे, स्वत:ला हज्जारदा बजावून सुद्धा नाही बाहेर पडता येत.... कारण आपणच एक गोष्ट असतो....... आपल्याला लिहिणारा दुसराच कोणीतरी आणि वाचणारा तिसराच पुन्हा!! असो....

आता एका वेगळ्याच विषयावरची एक कविता

नामे त्याच्या गंधाळले, उमळले श्वास कळे
वेचुनिया सारे, हार गुंफतेस का?

भवसागरा सामोरी, साधनेच्या सौंधावर
त्याच्यासाठी ओठंगून, थांबतेस का?

तन-मनाच्या शीवेशी, झांजझांज येईवेरी
उन्मनीशी रासक्रीडा, खेळतेस का?

पावरीची शीळ सांगे, 'रुक्मिणीचा नाथ, रथ
जोडुनिया थांबलाहे, चलतेस का?'

-- शलाका



Chinnu
Monday, October 16, 2006 - 10:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शलाका, शब्द अपुरे पडतील माझे, किती सुंदर लिहीलेस! तन-मनाच्या शीवेशी, वाह वाह!
चलतेस का? अगदी एका पायावर ग! :-) शब्द फार गोड वाटलेत तुझे.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators