|
Swara
| |
| Wednesday, October 04, 2006 - 5:34 pm: |
| 
|
किती गोड कविता जयावी! हिमांशू, छान आहे कविता.
|
Jayavi
| |
| Thursday, October 05, 2006 - 9:27 am: |
| 
|
दिनेश, स्वरा......... Thank you!
|
Supermom
| |
| Thursday, October 05, 2006 - 9:56 pm: |
| 
|
जयु, कित्ती गोड कविता ग. माझ्या लेकीला पाठ करवून साभिनय म्हणायला शिकवायचा विचार करतेय.
|
जयवि, खरच छान आहे. आताच print करुन ठेवतो. २ वर्षानी कामाला येईल!
|
Jayavi
| |
| Saturday, October 07, 2006 - 1:41 am: |
| 
|
supermom अरे वा......! भ्रमरा...... अरे तोपर्यंत अजून काही कविता येतील पर्यांच्या राज्यातून मनापासून आभार!
|
Bee
| |
| Monday, October 09, 2006 - 1:02 am: |
| 
|
असे म्हणतात प्रत्येक प्रसूती स्त्रीसाठी तिचा एक नविन जन्म असतो. आईला तिचा जन्मदिवस माहिती नाही, शाळेत तर ती गेलीच नाही तेंव्हा दाखलाही नाही. मुलांना वाटतं आईचाही वाढदिवस साजरा व्हावा. ह्यावर एक उपाय म्हणून, जो माझा तोच आईचाही जन्मदिवस म्हणून आम्ही साजरा करतो. जेंव्हा दोघांच्या वयांची बेरीज १०० झाली तेंव्हा काय घडले ते मी इथे व्यक्त केले आहे. ही कविता मायबोलिवरील समस्त आयांना सप्रेम भेट :-) व्याकुळ डोळ्यात साठलेले काळजीचे आभाळ लपवून आई मला चंद्र दाखवी कुशीत तिच्या जोजवताना, असे कैक चन्द्र उगवले अन् कैक चंद्र मावळले सरता सरता आमचे आयुष्य बेरजेला शंभर झाले, 'जिवेत शरदः शतम्' म्हणताना आई थोडी गंमत करते तुझे तीस, माझे सत्तर शंभर शरद पाहिले म्हणते शरदाचं गव्हाळ चांदणं दरसाल पिठासारखं सांडतं नभात चांदवा तोच असतो मायलेकांचं फ़क्त वय वाढतं..
|
Jayavi
| |
| Monday, October 09, 2006 - 1:17 am: |
| 
|
बी, खूप सुरेख! फ़ार फ़ार आवडली रे!
|
Kandapohe
| |
| Monday, October 09, 2006 - 6:33 am: |
| 
|
बी मस्तच आहे कविता. फक्त ते 'जोजवताना' थोडी गडबड करते आहे असे माझे मत. काहीच्या काही मधे का टाकलीस?
|
Chinnu
| |
| Monday, October 09, 2006 - 12:10 pm: |
| 
|
बी, डोळे पाणावले बघ आईच्या आठवणीने!
|
बी कविता छान आहे.
|
Ashwini
| |
| Monday, October 09, 2006 - 10:10 pm: |
| 
|
बी, सुंदर आहे कविता.
|
Bee
| |
| Tuesday, October 10, 2006 - 2:03 am: |
| 
|
तुम्हा सर्वांन्चे मी मनापासून आभार मानतो.
|
Paragkan
| |
| Tuesday, October 10, 2006 - 10:54 am: |
| 
|
Good one Bee !!
|
Hems
| |
| Tuesday, October 10, 2006 - 12:59 pm: |
| 
|
बी , कविता छान आहे ! पण बीबी चुकला का रे बी तुझा ?
|
Asmaani
| |
| Tuesday, October 10, 2006 - 4:52 pm: |
| 
|
बी, ही इतकी छान कविता "काहीच्या काही " आहे होय रे? "काहीच्या काही"च तुझं!
|
Arch
| |
| Tuesday, October 10, 2006 - 4:58 pm: |
| 
|
बी, आवडली हं कविता. सुरेख आहे. कांदा म्हणतो तस, कुशीत तिच्या घेऊन कस वाटत जोजवतानापेक्षा?
|
Meggi
| |
| Wednesday, October 11, 2006 - 11:39 am: |
| 
|
बी, फार सुरेख कविता..
|
Mrinmayee
| |
| Wednesday, October 11, 2006 - 5:35 pm: |
| 
|
ह्या कवीतेबद्दल थोडसं बॅकग्राउंड ओळखीच्या एका कन्येचं लग्न 'एकदाचं' झालं. एकदाचं म्हणण्याचं कारण तिच्या आईच्या शब्दात, " हिनी जवळपास ६० स्थळं नाकारलीत. आम्ही आईवडिल त्रस्त झालोय. हिचं शिक्षण बेताचं. नोकरी करायला आवडत नाही. घरात इकडची काडी तिकडे करत नाही. फक्त टी व्ही बघते दिवसरात्र. आणि सोफ्यावर बसून आज्ञा करते 'हे कर खायला'. सगळं जमवलंय लग्नासाठी. हिला फ्लॅट पण घेऊन देउ. पण आता हिनी चांगली मुलं नाकारणं बंद करावं. काय करायचं? लवकर लग्न ठरो म्हणजे मिळवलं!" "फिटे अंधाराचे जाळे' च्या चालीवर्: उठी लवकर बाळे, आता नाही आवकाश पुसु नको बाई प्रश्ण, "सांगा कशास कशास".... वय झाले लग्नाजोगे, देखी बोहोल्याच्या वाटा शोधु 'बकरा' चांगला, करी मायेचा जो साठा पैसा लावीन मी बाई तुझ्या घरास घरास... फोटो काढून ये सोने, सोडी कपाळीच्या आठ्या जमवीले सोने नाणे, जमविल्या पेले वाट्या 'लेक ऐन विशीतली' सांगु वरास वरास... सासरी तु जाशी जेव्हा, ऊर भरून येईल वडे, भजी आणी पुर्या आता कोण गं खाईल कोच, सोफे आणि खुर्च्या वाटतील ओस ओस...
|
Meenu
| |
| Thursday, October 12, 2006 - 4:23 am: |
| 
|
रात्र एक रात्र कोळोखी, उजेडाला पारखी प्रकाशाच्या दिवसाची, तीला यायची आठवण सारखी .. दिवसाला भेटायला, रात्रभर धावली कशीबशी एकदाची , मिटण्याआधी डोळे , ती दिवसाला भेटली ... आता मात्र बिचारी , फारच थकली पटकन झोपली , दिवसानीच प्रकाशाची , तीला चादर घातली ...
|
म्रु, मस्तच ग. छान च जमलीये जयु, cute च खुप गोड आहे कविता
|
|
|