Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 16, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » आश्विन » काव्यधारा » कविता » Archive through October 16, 2006 « Previous Next »

Kmayuresh2002
Friday, October 13, 2006 - 9:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभवा,गझल निव्वळ अप्रतिम रे..

त्यांच्यासवे असूनी माणूस राहिलो मी
मी टाकले असेही कोड्यात माणसांना...

अहाहा!! काय सुरेख लिहीले आहेस रे शेर!!!

Dineshvs
Friday, October 13, 2006 - 9:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दोन्ही गझला मला एकाच मुडच्या वाटल्या.
पारगकणाचे निरिक्षण बरोबर आहे, बेळगाव आणि कोल्हापुरची मराठी माणसे अजुनहि असा शब्दप्रयोग करतात. पण तरिही हा शब्दप्रयोग अलिकडचा आहे. मी कोल्हापुरची भाषा गेली ३० ते ३५ वर्षे ऐकतोय.
अलिकडे त्यानीहि शुद्धतेचा ध्यास घेतलाय. ( न्हवं हा, शब्द हद्दपार झालाय ) पण त्यांच्या शुद्धतेच्या कल्पना वेगळ्या आहेत.


Vaibhav_joshi
Saturday, October 14, 2006 - 12:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग ...
राग मानायचा प्रश्नच येत नाही .. हसत खेळत चर्चा चालू आहे .

उरले उरात काही आवाज चांदण्यांचे
आकाश तारकांचे उचलून रात्र गेली

२४ मात्रांची अप्रतिम गझल . गा गा ल गा ल गा गा मीटर. तुझ्या म्हणण्यानुसार " र " दीर्घ म्हणतात आशाताई ? मग एक मात्रा वाढली ? मग लघू कुठला केला compensation म्हणून ? ( तसं तर उरले मधला ले जास्त ओढलाय ताईंनी तिथे दोन मात्रा वाढायला हव्यात ) उच्चाराप्रमाणे ठरवून काव्य लिहीता येतं ? माझ्यामते कुठल्याही संगीतकारासमोर काव्य ठेवा आधी तो तुमची रचना बघतो जर ती पर्फेक्ट मीटर मध्ये बसत असेल तर वादच नाही नसेल तर लघू गुरू ऍडज़स्ट केला जातो पण हे लिहून झाल्यानंतर.
ढळढळीत उदाहरण संदीप खरे चं " अताशा असे हे मला काय होते ". भुजंगप्रयात वृत्त .. ल गा गा ल गा गा मीटर . मग मला सांग " कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते " . ह्यातला " णी " हा र्‍हस्वच येतो .. आणि सलिल च्या गाण्यात ऐक . तो त्याला दीर्घ करू शकत नाही . its a compromise त्याच्याच तुलनेत " णी " दीर्घ कसा लागतो हे ऐकायचं असेल तर अरुणभैय्यांच्या आवाजातलं " डोळ्यात सांजवेळी आणू नकोस पाणी " ऐक . हरकत नाही .. त्याने सलिल च्या गाण्याच्या सौंदर्याला काहीही बाधा आलेली नाहिये पण म्हणून उद्या जर कुणी म्हणणार असेल की र्‍हस्व मनात ठेवून कागदावर दीर्घ लिहीला तर ती धूळ्फेक आहे . त्याच जागेवर त्याच वृत्तात रामदास " मना सज्जना भक्ति पंथेचि जावे " भक्ति मधला ति प्रामाणिकपणे र्‍हस्व लिहीतात ... मी परवाच कुणालातरी बोललो " घालिन लोटांगण " मधला ली तुम्ही दीर्घ लिहायला हवा पण लिहूही शकत नाही आणि म्हणूही शकत नाही . अर्थातच हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे . काही जण म्हणतील इतकं काय त्यात ! पण ही कळकळ आहे इथे चर्चा घडावी म्हणून .

स्वाती ... ओरिजिनल नावाने असं विनयशीलच वागायला हवं असं काही आहे का ? पण हे खरंय की मायबोलीवरच्या एका वर्षाच्या प्रवासात खूप शिकायला मिळालंय . तेव्हा सारंग , प्रसाद , कुमार , ह्यांच्या गझल वाचून बिचकायला व्हायचं , आता वर्गात उभं राहून शंका विचारता येतात .
:-)

मृद्गंधा ... " आता " मस्त आहे . चर्चेमुळे कुणाच्या कवितेकडे दुर्लक्ष होता कामा नये .


Psg
Saturday, October 14, 2006 - 1:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव!!! काय अभ्यास आहे तुझा! सुरेख विश्लेषण केलं आहेस..

मृद्गंधा, 'आता' छान आहे..


Mrudgandha6
Saturday, October 14, 2006 - 2:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


धन्यवाद वैभव, psg ,जयावी,श्यामली..

छान चालू आहे चर्चा..खुप शिकायला मिळतेय...


Meenu
Saturday, October 14, 2006 - 4:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समई

सांजावलं की ,
माझ्यातल्याच ठीणगीनं
मी समई लावते .....
अन मागते तिच्याकडे शक्ती
शांतपणे तेवत राहण्याची
अन विझण्याचिही ,
तेल संपल्यावर .......


Meenu
Saturday, October 14, 2006 - 4:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुखवटा

मुखवटा नविन करुन घेईन म्हणतेय ..
तसा हाही छानच होता , हम्म तेव्हा नवा होता
हास्याची लकेर कशी ठसठशीत होती ,
रंगातुनही प्रसन्नता ओसंडत होती ,
नविन होता तेव्हा ......... आता विरलाय जरासा
आता विरलाय जरासा अन
खरे भावही , गळतात त्यातुन हल्ली
जरासाही धक्का लागला की ,
उडतो टवका हल्ली
मग उघड्या पडतात .....
मग उघड्या पडतात , आतल्या जखमा अन वणही
नविनच करुन घेईन म्हणते .... मुखवटा ....


Mrudgandha6
Saturday, October 14, 2006 - 5:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनू........
दोन्ही कविता..केवळ अऽऽऽऽऽप्रऽऽऽऽतीऽऽम!!!


Himscool
Saturday, October 14, 2006 - 10:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनु, दोन्ही कविता एकदम सही आहेत.. त्यातही मला मुखवटा जास्तच भावली...

Dineshvs
Saturday, October 14, 2006 - 11:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनु, मला समई जास्त आवडली.

Jayavi
Saturday, October 14, 2006 - 11:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनू............. अगं काय गं! दोन्ही कविता एकदम कातील! आपण तर पुरे फ़िदा :-)

Chinnu
Saturday, October 14, 2006 - 2:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अतिशय सुंदर कविता मीनु. समई समई सारखीच आणि मुखवटा चटका लावणारी आहे.
ए टवका म्हणजे काय ग? ओरखडा का?


Shyamli
Saturday, October 14, 2006 - 3:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनु
समई, आणि मुखवटा दोन्ही आवडल्या

वैभव, निनावी आणि सारंग
खरच तुम्ही लोक चर्चा करता म्हणुन आमच्या सारख्यांच्या पदरी चार शब्द पडतात.............
नाहीतर गझल म्हणजे "जगजीत सिंग किंवा" फारच झालं तर "गुलाम अली"एवढच समजत होत ईतके दिवस



Lopamudraa
Sunday, October 15, 2006 - 12:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली.. अगदी... मनातल सांगितलस..!!! चिनु.. तुला टवकाचा अर्थ पाठवलाय.....मीनु, मलाही समई जास्त आवडली..!!!.....


Vaibhav_joshi
Sunday, October 15, 2006 - 2:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनू ... मस्त !!!

समईची कन्सेप्ट superb आहे आणि कमी शब्दात प्रभावी झालिये ...

मुखवटा सुध्दा ... पण मुखवटा मध्ये शब्दांची प्लेसमेंट आणि presentation मध्ये जरा घाई झाली असं वाटलं ... बघ पटतंय का ...

" हम्म तेव्हा नवा होता "
हे स्वगत दाखवण्यासाठी किंवा खंत दाखवण्यासाठी जो " हम्म ' आलाय ना तो टाळता आला असता . कविता प्रेझेंट करताना ही ऍडिशन घेतली जाऊ शकते . हे स्वगत आहे हे पहिल्या ओळीनेच establish होतंय .
आता त्या " ह्म्म " वर इतका राग का ? तर तिथे कवितेचा प्रवाह अडतो . दुसरं असं की आपण ज्या टोन मध्ये " हम्म " लिहीतो तोच वाचणार्‍याचा टोन असेल ह्याची खात्री देता येत नाही म्हणून लिखाणात " ह्म्म " ला अगदी पक्का अर्थ येत नसेल तर टाळावा .

हास्याची लकेर कशी ठसठशीत होती ,
रंगातुनही प्रसन्नता ओसंडत होती ,
नविन होता तेव्हा .........

इथे नवीन होता तेव्हा .. हे repeat झालंय . ( आधी पण येऊन गेलंय ) तर त्याला डेप्थ देण्यासाठी

हास्याची लकेर कशी ठसठशीत होती ,
रंगातुनही प्रसन्नता ओसंडत होती ,
नविन होता ना !!!
त्या " ना " मुळे वाचकाशी बोली भाषेत संवाद साधत आपण त्याला मुखवट्याच्या एक एक characteristics वर AGREE करत नेतो आणि पकड घट्ट होते , असं काहीसं वाटून गेलं .

'" हल्ली " चा दोन वाक्यात वापर मस्त त्यामुळे वाचक यमकांनी कनेक्ट होत जातो आणि कविता वृतांतात्मक होत नाही .. " आता विरलाय जरासा " आणि " मग उघड्या पडतात " ही वाक्य कविता " म्हणताना " दोनदा घ्यायच्या क्षमतेची आहेत पण लिहीताना टाळता आली असती ...

ह्या आणि अश्या भरपूर गोष्टी माझ्याही कवितेतून येत असणार पण त्यांच्याकडे तितक्या त्रयस्थपणे पाहताच येत नाही .. तुझ्या कवितेबद्दल लिहीताना स्वतःलाही बजावणं होतंय आणि basically कविता आवडल्या त्यातली दुसरी खूपच चांगली होता होता थांबली म्हणून लिहावसं वाटलं ...
at least " चला पोस्ट झाली " म्हणून वही मिटण्याआधी एकदा तरी विचार करशील . i am sure about it
:-)


Mrudgandha6
Sunday, October 15, 2006 - 4:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


वैभव,..
काय मस्त चर्चा केली आहे. सूचनाही छानच..
माझ्यावरचा राग मात्र अजून गेलेला दिसत नाही तुझा...:-( कारण,मला कधीच सूचना मिळत नाहीत,इथे खरेतर व्याकरण्दृष्ट्या अशुद्ध आणि बर्‍याच अपरिपक्व कविता असतात माझ्या :-(...मलाही शिकायला आवडते..
तुमच्या परिसस्पर्शाने शब्दांचेही सोने होते,जरा आमच्या कवितेचेही सोने होवू द्या, so मार्गदर्शनाची वाट पहातेय सर्वांच्या.. सूचनांचे हार्दिक स्वागत आहे..:-)


Jayavi
Sunday, October 15, 2006 - 10:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, किती सुरेख सूचना केल्या आहेस रे! खरंच खूप काही शिकण्यासारखं आहे तुझ्याकडून.

Sarang23
Sunday, October 15, 2006 - 11:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभवा. उगाच त्या मोठ्या लोकांच्या पंगतीत मला का बसवतोस?:-)
आता तुच तुझा पहिला परिच्छेद नीट वाचतोस का? मला जरा गल्लत वाटली इतकंच. जसं की पाणी... संदीपच्या कवितेचं उदाहरण
कवितेत मुळ शब्द शुद्ध स्वरूपात लिहून तो उच्चाराप्रमाणे लघू गुरू करायची सोय आहे... आणि तसा नियमही आहे... संदर्भ कै. मो. रा वाळिंबे मराठी व्याकरण...
राहता राहिलं माझ्या ओरिजनल पोस्ट केलेल्या गझलेविषयी...

ती अजूनही तितकीच निखळ गझल आहे असं एकंदर पुनर्वाचनावरून मला जाणवलं.

उरते न हाती काही; येई तसाच जाई...
तरीही उगीच माज चढलाय माणसाला...

री जर उच्चाराप्रमाणे लघू घेतला आणि ज जर उच्चाराप्रमाणे गुरू घेतला तर मात्रा समान राहतात आणि लिहिल्याप्रमाणे मोजून जरी घेतल्या तरी समान येतात... मला मिटरमध्ये म्हणायलाही काही गडबड वाटत नाहीये!

आता सुचवलेला बदल पहा

उरते न हाती काही; येई तसाच जाई...
का माज हा तरीही चढलाय माणसाला...

इथे अर्थाच्या दृष्टीने पहायचं झालं तर माझ्या शेरात उगीच हा शब्द त्या माजाचा फोलपणा अजून वाढवतोय... असं नाही वाटत का?

निनावी... तुला योग्य
spirit चा प्रश्न का पडला?
असो...
आता तुझ्या म्हणण्याप्रमाणे...
बर्‍याच मोठमोठ्या कविंनी आ ऐवजी अ वापरला आहे वृत्त जमवण्यासाठी, पण तसं टाळता येत असेल तर प्रत्येक कवी तो प्रयत्न नक्कीच करेल, पण माझा मुद्दा हा की प्रयत्न का करायचा?
मराठीत बरेच शब्द आ ऐवजी अ घालून लिहिण्याची पद्धत आहे, त्यामुळे आ मध्ये जे शब्द मिळणार नाहीत ते कृपया अ खाली पहावेत संदर्भ शब्दरत्नाकर...
असा वापर चुकीचा असता, तर गुरुवर्य आपटे साहेबांनी त्याचा तसा उल्लेख नक्कीच केला असता!!!
हे म्हणजे असं झालं की बर्‍याच मोठमोठ्या कविंनी चांगल्या कविता लिहिल्या आहेत, मग आपण थोड्या खराब का लिहू नये :-)

आता... म्हटला बद्दल :
अरे तुला वशा नाही बोलला... वशा जोशी रे..
हो म्हटला होता खरा... म्हटला होता...

संदर्भ... मी आणि माझा शत्रुपक्ष... पु. ल. देशपांडे
आणि आणखी बरेच संदर्भ देता येतील...
वैभव... तुला एव्हाना तुझ्या पोस्टमधली गल्लत कळाली असावी...
एखाद्या कवितेमध्ये आणि च्या णि वर दाब येऊन ति गुरू होत असेल तर त्याला आणी असं लिहिण चुक की बरोबर??? अर्थात चूक, पण मात्रा मोजताना त्या णि च्या २ मात्रा मोजायच्या... हो ना...
उदा :

असे ऊन आणि अशी काहिली;
कुठे दूर गेली तुझी सावली!


निनावी, लघू गुरु उच्चारानुसार ठरतात हे कबूल! पण बर्‍याचदा शब्द जसे लिहिले जातात तसे लिहून त्यांचा उच्चार सोयीनूसार केला जातो...
वाचनात अशा अनेक छान छान गोष्टी आल्या आहेत की अनेक उदाहरणे देता येतील... पण या चर्चेतून मुळ गझलेच्या अनुभूतीकडे दुर्लक्ष झालं हे जाणकारांना जाणवून द्यावसं वाटत...
नाकापेक्षा मोती जड...!!! :-)

आणखी एक... महत्त्वाचं...
काही लोकांना असंही वाटत असेल की वैभवने माणसे गझल टाकली म्हणुन मीही माणुस ही गझल टाकली, मला इथे एकच म्हणावसं वाटतं...

यथा काष्ठं च काष्ठं च समेयातां महोदधू|
समेत्य च व्यपेयातां तद्वत भूत समागमंम्||

याचा अर्थ...

दोन ओंडक्यांची होते सागरात भेट;
एक लाट फोडी दोघा पुन्हा नाही गाठ -
क्षणिक तेवी आहे बाळा, मेळ माणसाचा
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा...
ग. दि. मा. :
जरी एका सुभाषितावर ही कल्पना बेतली असली तरी त्यांची महानता कमी होत नाही!
अशी अनेक उदाहरणं देता येतील...
झुमका गिरा रे...
इथे झुमका ची बुगडी आणि बरेलीच सातारा टाकलं की सांगत्ये ऐका मधली लावणीच ऐकायला मिळेल.... :-)
पण तरीही गदीमा महान आहेत!!!


Daad
Monday, October 16, 2006 - 12:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

post1

Meenu
Monday, October 16, 2006 - 12:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


वैभव सुंदर सुचना आहेत तुझ्या ..

सर्वांनाच कदाचीत त्या बदलानंतर ही कविता कशी होईल ते वाचायला आवडेल म्हणुन ते बदल करुन परत टाकतेय

मुखवटा

मुखवटा नविन करुन घेईन म्हणतेय ..
तसा हाही छानच होता ,
हास्याची लकेर कशी ठसठशीत होती ,
रंगातुनही प्रसन्नता ओसंडत होती ,
तेव्हा नविन होता ना!!!
आता विरलाय जरासा अन
खरे भावही , गळतात त्यातुन हल्ली
जरासाही धक्का लागला की ,
उडतो टवका हल्ली
मग उघड्या पडतात .....
आतल्या जखमा अन वणही
नविनच करुन घेईन म्हणते .... मुखवटा ....





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators