Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 13, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » आश्विन » काव्यधारा » कविता » Archive through October 13, 2006 « Previous Next »

Lopamudraa
Friday, October 13, 2006 - 4:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृ.. तुझ्या आणि सगळ्यांच्याच प्रतिक्रिया बघ.. शलाका...,सारंग.. निनावी.. मीनु..,किरु,हेम्स,चिनु....आनी वैभव तर आहेच..!!! फ़ार सुंदर,.. प्रतिक्रियेत अजुन एक कविता करतात सगळे.. मी आपली दिग्गजांमध्ये येउन मध्ये मध्ये करुन जाते.. कधीतरी..!!!

Princess
Friday, October 13, 2006 - 4:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृदगंधा... जबरदस्त कविता ग. आणि तू दवबिंदु होय..????
लोपासाठी मात्र अनुमोदन, आपल्या दोघीसारख्या खुप शिष्या असतील तिच्या कदाचित.:-)
माणुस २ चालेल की... कोष पेक्षा तेच जास्त समर्पक वाटतय.
पुनम


Mrudgandha6
Friday, October 13, 2006 - 4:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


princess धन्स ग...माणूस[२] ठेवलेय ग..

स्वप्नांना जगाच्या वाटेने नेण्याची "जिच्यात" हिम्मत आहे तिच्या शिष्या खुप असणारच ग.. इथे आणखी एक..सगळे दिग्गज आहेत पण,फ़ळांनी डवरलेल्या झाडासारखे.. अगदी विनम्र..पाहून खुप आनंद होतो मला..


Jayavi
Friday, October 13, 2006 - 4:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृ..... अ प्र ति म!

Vaibhav_joshi
Friday, October 13, 2006 - 4:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्वांचे मनःपूर्वक आभार ...

हेम्स .. .. कधीकधी शब्द फुटतात
तेव्हा तीच कविता शोधत असतात!
अगदी अगदी ... मस्त !!!

मीनू ... छान ... मला मागच्या दिवाळी अंकातली माझी रात्र अन दिवस ही कविता आठवली .. आठवण्याचं कारण म्हणजे फ ने काढलेलं अतिशय समर्पक आणि सुंदर चित्र ... असो ..

मृद्गंधा ... माणसाचे काही नवे रंग दिसले ... काही काही कल्पना अगदीच novell आहेत . good one


Vaibhav_joshi
Friday, October 13, 2006 - 4:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणसे ...

मी शोधतोच आहे डोळ्यांत माणसांना
अन आणतोच आहे गोत्यात माणसांना

वस्तीस वाटले ती मतमोजणी असावी
मोजून चालले ते पैश्यात माणसांना

आता कधी , कुठेही लढण्यास सिध्द झालो
घेऊन हिंडतो मी भात्यात माणसांना

आश्चर्य काय ह्यांचे प्रतिबिंब स्वच्छ नाही
बघतात माणसे ही पाण्यात माणसांना

घेण्यास श्वास थोडी जागा हवी जिवाला
बांधायचे कशाला नात्यात माणसांना ?

त्यांच्यासवे असूनी माणूस राहिलो मी
मी टाकले असेही कोड्यात माणसांना

ओळख म्हणून उरली ही राख दंगलीची
मी स्पष्ट पाहिलेले पलित्यात माणसांना

दगडामध्येच होते दर्शन तुझे अताशा
कंटाळलास का रे इतक्यात माणसांना


Bhramar_vihar
Friday, October 13, 2006 - 4:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, सुरेख गज़ल! मायबोलीचे सभासद असण्याचा (तुम्ही सर्व) मला अभिमान आहे!

Sarang23
Friday, October 13, 2006 - 4:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणूस आणि माणसे... क्या बात है...!

त्यांच्यासवे असूनी माणूस राहिलो मी
मी टाकले असेही कोड्यात माणसांना

आहाहा... टच!!!

दगडामध्येच होते दर्शन तुझे अताशा
कंटाळलास का रे इतक्यात माणसांना

व्व्हा!!!


Meenu
Friday, October 13, 2006 - 4:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गुर्जी म्या पामरानी काय तुमची तारीफ करावी. वैभवा अप्रतिम रे केवळ ..

आता कधी , कुठेही लढण्यास सिध्द झालो
घेऊन हिंडतो मी भात्यात माणसांना

वाह वा क्या बात है .. छे असं काय आवडलं सांगायचं तर संपुर्ण गज़लच ईथे कॉपी करायला हवी ..


Mrudgandha6
Friday, October 13, 2006 - 5:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


वैभव,
..........................
............................
...........................
................

"त्यांच्यासवे असूनी माणूस राहिलो मी
मी टाकले असेही कोड्यात माणसांना"..........

दगडामध्येच होते दर्शन तुझे अताशा
कंटाळलास का रे इतक्यात माणसांना
...........
कळाले असेलच...काय म्हणायचेय ते... शेवटच्या कडव्याने मात्र अजुन एक शेर आठवला...पूर्ण आठवल्यावर लिहीनच...



Lopamudraa
Friday, October 13, 2006 - 5:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्यांच्यासवे असूनी माणूस राहिलो मी
मी टाकले असेही कोड्यात माणसांना >>>>>>>..
सुंदर मस्त आहे....!!!


Psg
Friday, October 13, 2006 - 5:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, उच्च आहे कविता! खूप खरं बोललास.. :-)

Shyamli
Friday, October 13, 2006 - 8:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृदगंधा....... आवडली ग सुरेख रचना

वैभव,वेगळ ते काय लिहीणार मी बापडी.....

उच्च!!!!!


Sarang23
Friday, October 13, 2006 - 8:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझीही एक माणसावरची माणसाने लिहीलेली माणसासारखी गझल... :-)

         माणूस

माणूसही नकोसा झालाय माणसाला
भलताच रोग ऐसा जडलाय माणसाला!

मेल्यावरी अम्हाला देईल कोण खांदे?
हा प्रश्नही अताशा पडलाय माणसाला!

उरते न हाती काही; येई तसाच जाई...
का माज हा तरीही चढलाय माणसाला...

घडतात रोज वार्‍या पापामुळे जगाच्या -
वनवासही पुरेसा घडलाय माणसाला!

एका क्षणात होते धुळधाण जीवनाची;
अभिमान हा अवास्तव नडलाय माणसाला!

हे आपलेच आता धरतात वैर अपले;
अपलाच बाण वर्मी बसलाय माणसाला!

तो देवही जगाची पाहून रीत न्यारी,
"रे मी खरेच चुकलो...", म्हटलाय माणसाला!!!


सारंग


Vaibhav_joshi
Friday, October 13, 2006 - 9:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग ... छान म्हणून मोकळा होणार होतो पण तुझा फोन आला नीट बघ रे म्हणून आणि कविता , गझल च्या बाबतीत असं नुसती नजर टाकून निघून जाणं कधी जमलंय का आपल्याला ? त्या निमित्ताने चर्चा घडतीय हे काय वाईट आहे ? आता काही शंका प्रांजळपणे मांडतो

माणूसही नकोसा झालाय माणसाला
भलताच रोग ऐसा जडलाय माणसाला!

मस्त ...
अलामत मतल्यातच भंग झाल्याने पाय मोकळा झाला आहे

मेल्यावरी अम्हाला देईल कोण खांदे?
हा प्रश्नही अताशा पडलाय माणसाला!

सुंदर ... अम्हाला चा अ लघू करणं टाळता आला असता का ? म्हणजे आताशा हा शब्द अताशा असा लिहीला तरीही खटकत नाही पण अम्हाला च्या बाबतीत ते म्हणता येईल का? सर्वांच उत्तर एकजात हो असेल सुध्दा पण हा प्रश्न मला नेहेमीच पडत आलाय ... माझ्या शिक्षणाचा एक भाग म्हणून विचारला आहे

उरते न हाती काही; येई तसाच जाई...
तरीही उगीच माज चढलाय माणसाला...

इथे मात्र " हाती " हा वृत्ताप्रमाणे , मात्रांप्रमाणे लघू येतोय ते नक्की टाळता आलं असतं . तेच सानी मिसर्‍याच्या बाबतीत झालंय ... मीटर गंडलंय " माज " च्या इथे ..
उदा .. का माज हा तरीही ...
असं ?

हे आपलेच आता धरतात वैर अपले;
अपलाच बाण वर्मी बसलाय माणसाला!

परत तेच . "अपले " असा शब्द आहे का ? अशी शन्का आहे माझ्या मनात ... कदचित इतरांनाही असेल म्हणून विचारतोय .. तुझ्याकडे अश्या शब्दवापरांची उदाहरणे असतात .. शिकायला मिळतं

परवा एका गझल्तज्ञाने " अपुले " हा शब्द सुध्दा चूक आहे असं समजावून सांगितलं . " आपले " किंवा " आपुले " हेच योग्य आहे असं म्हणे

तो देवही जगाची पाहून रीत न्यारी,
"रे मी खरेच चुकलो...", म्हटलाय माणसाला!!!

" तो असे म्हणतोय " किंवा " त्याने असं म्हट्लंय " हे ऐकिवात आहे ... " तो अस म्हट्लाय " असं येऊ शकतं का ?

हे सगळं गझल चांगली आहे पण आणखी होवू शकते कदाचित गडबड झाली ... काम झालं नाही असं वाटलं म्हणून शंका उपस्थित केल्या ... उत्तराची वाट पाहतो




Mrudgandha6
Friday, October 13, 2006 - 9:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



आता..

आता..
ताटव्यातले फ़ुल,
मला बोलावत नाहीत..
बेधुन्द करणारा गन्ध,
आता भुलवत नाही..
ते मात्र उमलते पुर्वीसार्खेच...
डोलते,झुलते पुर्वीसारखेच...
अजूनही मला पाहून हसते हळूच..
माझी नजर वळत नाही..
हं,फ़ुलाला मात्र कळत नाही...

आता...
काटा कधीच..
मला जाचत नाही...
करतो वार खुप पण,
मला बोचत नाही..
तो रुततो पुर्वीसारखाच..
शत्रुत्व निभावतो पुर्वीसारखाच..
मला काहीच फ़रक पडत नाही..
हे काट्याला काही कळत नाही..

आता...
शरदाचा चन्द्रही..
मला खुलवत नाही..
माझ्या मनीचा अन्धार,
आता उजळत नाही..
चन्द्रही पुर्वीचाच.. अन..
चान्दणे ही पुर्वीसारखेच..
पण मन हे थंड,
आता हुर्हुरत नाही..
हे चंद्राला मात्र कळत नाही..

आता...
बेभान नदी..
मला वाहवत नाही..
समोरचे भोवरेही,
आता भिववत नाहि..
पोहता येते पुर्वीसारखेच..
बुडणे तर हातातच असते..
मी बुडतही नाही,वाहातही नाही..
नदी,भोवर्‍यांना हे कळत नाही..

आता,
कविता तशी..
झंकारत नाही,
शब्द उध्ळतात खुप,
हातीच येत नाहीत..
वादळे उठतात पुर्वीसारखीच,
सरी कोसळतात पुर्वीसारख्याच,
कागद मात्र भिजत नाही,
हे त्या सरींना कळत नाही..

आता..
हे मला असे काय होतेय..???
मन हसत नाही..
अन रडतही नाही..
हसले,रडले कितीदा मी,
दुनियेशी झगडले कितीदा मीच,
जीवंत झरा असा
आटलाच कसा??
किती भक्कम होता स्तंभ
तो तुटलाच कसा??
धडधडतेय पुर्वीसारखा...
पण हा हृदयीचा दिवा
आता विझतही नाही,अन जळतही नाही..
आणि हे कुणालाच कळत नाही..
आता कुणालाच कळत नाही..














Swaatee_ambole
Friday, October 13, 2006 - 9:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हेम्स, सुंदर आहे कविता. मला खूप आवडली.

सारंग, वैभवला अनुमोदन.

वैभव, ' माणसे' अप्रतिम! सगळेच शेर!!
तंत्र आणि मंत्र - दोन्ही हात जोडून उभं आहे.

शलाका, तुला ' दाद' हा आय डी घ्यावा हे कस सुचलं? तू खरंच चालती बोलती दाद आहेस. तुझ्या कविता ही पण आयुष्याला दिलेली, नव्हे गेलेली दादच वाटते. आणि प्रतिक्रिया तर.. ही वृत्ती हरवू देऊ नकोस. नशीबाने मिळते.


Sarang23
Friday, October 13, 2006 - 1:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावी, तुझं अनुमोदन नक्की कुठल्या कुठल्या गोष्टींना आहे? :-)

वैभव, पहिली शंका होती - अम्हाला बद्दल...
मग अम्ही चार किरणांची ही आस का धरावी? इथे अम्ही च काय? हा प्रश्ण सुटला की बाकी सगळं, म्हणजे अता किंवा अपला हे सगळे
doubts clear होतील:-)
आता शेवटचा शेर...
तो म्हणाला... ही वाक्यरचना बरोबर आहे का?
मला १००० टक्के त्यात काहीही चूक वाटत नाही...
राग नको मानू, पण तुझा शेवटचा मुद्दा काही पटला नाही...
तो शेर एकदम बरोबर आहे...

वैभव आभारी आहे... उरते न हाती काही या शेरातली गल्लत ( क्लिष्ठपणा ) मान्य...

तुझ्या म्हणण्यानुसार बदल करतो मुळ शेरात...

आणि हो अपुले किंवा अम्ही चा वापर टाळता आला असता नक्कीच, पण तुला फोनवर बोललोच आहे...

एक गोष्ट महत्वाची की उच्चाराप्रमाणे मात्रा मोजत असशील, तर उरते मध्ये र दिर्घ येइल आणि हाती मधला ती गुरु असूनही लघू होईल... म्हणजे मात्रा समान राहिल्या...
जसं आशा भोसले म्हणतात... उरले उरात काही...
इथे उरलेतल्या र मध्ये अ ही जोडला जातोय, त्यामुळे तो लघू नाही... पण हे सगळं उच्चाराप्रमाणे...:-)

आधीच ठरवायचं मात्रा उच्चाराप्रमाणे की लघू गुरु नियमाने मोजायच्या आहेत... मग गल्लत होत नाही.. जशी वर झाली...:-)

आता जाणकारांनी बोलावं काय ते...:-)



Swaatee_ambole
Friday, October 13, 2006 - 1:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> निनावी, तुझं अनुमोदन नक्की कुठल्या कुठल्या गोष्टींना आहे?
सारंग, वैभवच्या त्या संपूर्ण पोस्टला माझं अनुमोदन आहे. त्यातल्या प्रत्येक मुद्द्याला, मांडलेल्या प्रत्येक मताला आहे.
त्याची मतं नेहेमीच अभ्यासपूर्ण असतात, आणि तो स्वतः सुंदर आणि निर्दोष गज़ल लिहीतो, या दोन कारणांसाठी मी त्याच्या मतांचा नेहेमीच आदर करते.

पण अनुमोदन त्यासाठी आंधळेपणाने दिलेलं नाही, गज़ल वाचताना माझंही तेच मत झालं म्हणून द्विरुक्ती टाळण्यासाठी दिलं.
ही सगळी चर्चा तू योग्य spirit मधे घेतोस, घेशील याची खात्री वाटली म्हणून दिलं.
मलाही यातून शिकायला मिळेल म्हणून दिलं.

अम्ही, अपले असे शब्द बरेच मोठमोठे कवी वृत्तासाठी वापरतात हे जरी खरं, तरी बरेचदा ते टाळणं अशक्य नसतं हे ही खरं. मग आपण तसा निदान प्रयत्न तरी का करू नये? आणि ' तो असं म्हटलाय' हे तर मला(ही) अगदीच चूक वाटतं. कदाचित काही भागातल्या बोलीभाषेत असं म्हणत असतीलही, पण पूर्ण गज़ल ज्या भाषेत लिहीली आहेस, त्याच्याशी ते विसंगत आहे.

अरे, पोस्ट एडिट झाली वाटतं?
' उरले उरात काही' मधे र दीर्घ होत नाही. आणि माझ्या माहितीप्रमाणे लघू गुरू हे उच्चारानुसार ठरतात. खरंतर उच्चार ' हाति' ( ति र्‍हस्व) होत असताना दीर्घ ' ती' लिहीणंच मुळात चूक आहे. देवनागरी हे phonetic script आहे. म्हणजे जसा उच्चार तसेच लिहीले जातात ( जायला हवेत) शब्द.


इच्छुकांसाठी, Phonetic Script बद्दल अधिक माहिती
इथे आहे.

Paragkan
Friday, October 13, 2006 - 3:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

vaibhav ... gazal khaas re !

sarang: इतर तांत्रिक गोष्टींबद्दल माहीत नाही पण 'तो म्हटलाय' बद्दल .... त्यात काही 'चूक' आए असं मला नाही वाटत (कदाचित 'पुणेरी मराठी'त ते 'चूक' असेलही) :-) पण ते जरा विचित्र वाटतंय हे खरच. 'म्हटलाय' हे अगदी कोल्हापूर, निप्पाणी, बेळगाव कडचं बोलणं झालं.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators