|
Kiru
| |
| Thursday, October 12, 2006 - 11:06 am: |
| 
|
ओ.. हो..! सगळेच सुटलेत.. अप्रतीम लिहितायत.. सारंग.. 'जणू धुक्यात चांदणेच अंथरायचे' यातली तुझी 'भावना' खूप आवडून गेली रे.. शब्दप्रभू... 'पोर्ट्रेट' आणि 'घडी' दोन्ही निव्वळ अप्रतीम.. मीनू.. 'राहून गेलं' खरच विचार करायला लावते. 'सुरकुत्या' ही आवडली. 'जखम' आंत कुठेतरी असलेली जखम पुन्हा ताजी करुन गेली. आता सुकायला थोडा काळ जावा लागेल बहुदा... सुंदर! स्वाती.. 'स्तब्ध' अफाट..!! पहिल्या चार ओळी वाचेपर्यंत OK होतो. शेवटच्या दोन ओळी वाचल्यावर.. एकदम खलास!!
|
Jayavi
| |
| Thursday, October 12, 2006 - 2:10 pm: |
| 
|
स्वाती, स्तब्ध वर काय बोलायचं गं.......!! तुस्सी ग्रेट!
|
Swara
| |
| Thursday, October 12, 2006 - 2:19 pm: |
| 
|
केदार जोशी धन्यवाद. edit करते लगेच. My God , सही कविता public .
|
Chinnu
| |
| Thursday, October 12, 2006 - 2:31 pm: |
| 
|
लोपे, बदललेली वाट आणि काय काय जमवणे, दोन्हही छान आहेत! वैभव पोर्ट्रेट सुंदर काढलेस! सारंग, कसला ध्यास लागलाय तो, लक्षण काही ठीक दिसत नाहिये!!
|
का? तु समोर असुन तुझा शोध घेते.. तु बोलत नाही तरी मी सुरवात का करते? तु हाक दिली नाही म्हणुन मी निघते... थोडं पुढे गेल्यावर मागे वळुन का बघते? तु समोर आल्यावर चेहरा कोरा ठेवते.. नजरेचा गुंता एकटीच सोडवत का बसते? तुझ्याशी हसता हसता स्तब्ध होते... जागेवर आहेत ना आसवं म्हणुन तपासुन का बघते? तुझी नजर कधी कधी अनोळखी होते.... तरी तुझ्या स्वप्नाना मी ओळख का देते? रोज तुझ्यावर खुप खुप रागवते.... आज नक्की रुसायचे म्हणत तुला का मनवते.....???
|
स्वाती स्तब्ध छानच आहे... मीनु सुरकुत्या जखम एकदम मस्त वैभवा अप्रतिमच
|
Daad
| |
| Thursday, October 12, 2006 - 8:28 pm: |
| 
|
स्वस्थपणे बसून गेल्या दोन दिवसांत भन्नाटलेल्या कविता, काही कवितांची जुगलबंदी वाचली! बोलायला शब्द नाहीत कुणाकुणाचं कौतुक करायचं? 'पण जग स्वप्नांच्या वाटेने जात नाही म्हणुन.. ' - लोपा, किती सुंदर कल्पना आहे? असंही बदलता येतं? झाड, होय! बिंबाळ हे 'बिंब' याच अर्थी घ्यायच. मीनु, तुझ्या एक एक कल्पना वाचून, भंजाळायला होतं. गुलाम, राहुन गेलं, सुरकुत्या, जखम...... सगळ्याच झकास! स्वर, अंतस्थ म्हणजे, तो आत स्थित आहे असा आणि अगदी चपखल वापरला आहे! सुंदर! वैभव, काय म्हणू? पोर्ट्रेट, घडी केवळ अप्रतीम! स्वाती ताई, स्तब्ध अगदी भावली. किती थोडक्या शब्दांत माणसाच्या असण्याचं आणि असूनही नसण्याचं चित्रं उभं केलय? असं तिथे असंणं, तिथे असून नसणं किंवा कुठेतरी नसूनही असणं हा कलावंताच्या "कलावंत" असण्याचा अविभाज्य भाग आहे! इतरांच्या बाबतीत त्याला "वेंधळेपणा" म्हणतात ;) लोपा, - 'का?' - सुंदरच - "तुझी नजर कधी कधी अनोळखी होते.... तरी तुझ्या स्वप्नाना मी ओळख का देते? " - मस्तच! --शलाका
|
Sarang23
| |
| Thursday, October 12, 2006 - 11:19 pm: |
| 
|
वैभव, पोर्ट्रेट आणि घडी खासच! निनावी... क्या बात है!!! रागदारी ऐकताना जसं गायकाने तानांवर ताना घेउन शेवटी जसे अलगद नजाकतीने गाण्याचे शब्द ओढावेत तसं वाटलं. बढीया!!! सगळेच काय लिहितायत सहीच!!! मीनू... जखम... काय लिहू??? कहर आहे... एक नंबर!!!
|
Hems
| |
| Friday, October 13, 2006 - 12:50 am: |
| 
|
मीनू ," गुलाम " छान. वैभव ," घडी " आवडली. स्वाती , " स्तब्ध " अप्रतिम आहे. माझी काहीशी याच विषयावरची एक कविता पेश करायचं धाडस करतेय... कविता, उतरली नाही शब्दात ती, अश्रूतून निथळली, न्हाऊ घालत मनाला.. कविता, उमटली नाही शब्दात ती, मूकपणे उजळली जागं करत जगण्याला .. कधीकधी शब्द फुटतात तेव्हा तीच कविता शोधत असतात!
|
Psg
| |
| Friday, October 13, 2006 - 1:55 am: |
| 
|
मीनू, सुटली आहेस! सगळ्या कविता आवडल्या.. वैभव, घडी!! स्वाती !!!!!
|
Meenu
| |
| Friday, October 13, 2006 - 1:59 am: |
| 
|
स्वाती स्तब्ध साठी वैभवला अनुमोदन it is really worth waiting.. प्रतिक्रीयांसाठी धन्यवाद सगळ्यांनाच ... रात्र रात्र कधी कधी अगदी केविलवाणी होते काळामिट्ट अंधार पाहुन जीवाचं तिच्या, अगदी पाणी पाणी होतं "निघालास पण आत्ताच तर भेटलो आपण.. अजुन किती तरी बोलायचय रे" पुन्हा पुन्हा दिवसाला जणु विनवत राहते रात्र कधी कधी अगदी केविलवाणी होते
|
आज्जे,जखमा आणि गुलाम सुरेख.. वैभवा,पोट्रेट आणि घडी मस्तच स्वाती,स्तब्ध सुंदर
|
वा!!! सगळंच अप्रतिम स्वाती,..."स्तब्ध" वाचुन मी अगदी स्तब्धच झाले..किती सुरेख चितारलय एखाद्या कविची "अस्तित्व" शोधने.. वैभव...घदी आणि पोर्ट्रेट दोन्ही केवळ अप्रतिम..पण मला घडी जास्त आवडली.. मीनू,सगळ्याच अप्रतिम ग...,राहून गेले सुरकुत्या,पण जखम कळस आहे..खुप सुरेख.. लोपा, "जागेवर आहेत ना आसवं म्हणुन तपासुन का बघते? " हं............................. हेम, "कविता, उतरली नाही शब्दात ती, अश्रूतून निथळली,"........ काय सुंदर लिहलय....... princess ....किती छान प्रतिक्रिया... newton चे नियम आठवला लोल वैभवच्या कविते एव्हढाच तुझा अभिप्राय अप्रतिम ग.... तु सुदामा तरी असशील ग..पण मी तुम्हा सर्व प्रतिभावंताच्यासमोर म्हणजे समुद्रासमोर एखदा दवबिन्दू....
|
अग आई ग...काय हे???????? एक अभिप्राय लिहावा आणि तो post करेपर्यन्त आणखी सु.दर लिहावे का..???? मीनू,रात्र...सुरेख........माझ्या "शबभर"या गझलेची आठवण झाली..
|
माणूस[२] कोश पांघरून स्वतभोवती बसला आहे माणूस माणसाकडूनच किती..किती फ़सला आहे माणूस.. दर क्षणाला मुंग्यांप्रमाणे वाढ्णार्या संख्येत सांगा कुणाला एकतरी का दिसला आहे माणूस? जनावरेही जिथं करतात प्रेम उत्कटतेने माणसांवरच घाव घालत का बसला आहे माणूस? निपचीत पडून आहेत पेटीत गारूड्यांचे साप उच्चांक मोडून त्यांचा इतरांस डसला आहे माणूस...
|
Aaftaab
| |
| Friday, October 13, 2006 - 3:06 am: |
| 
|
जबरदस्त कविता आहे मृ शीर्षक 'माणूस' जास्त समर्पक वाटेल असे मला वाटते.
|
Meenu
| |
| Friday, October 13, 2006 - 3:21 am: |
| 
|
मृदगंधा आफताबला अनुमोदन गं ..... दोन्ही वाक्यांसाठी .. बदल की गं शीर्षक .. बाकी जबरदस्तच ..
|
Devdattag
| |
| Friday, October 13, 2006 - 3:28 am: |
| 
|
मीनु, वैभव, निनावि, मृदगंधा, वैशाली, हेम्स सगळ्यांच्याच कविता सही.. मृदगंधा तुमच्या इतर कवितांपेक्षा ही कविता अगदी वेगळी आहे..
|
अप्रतीम.. मृदगन्धा... !!!! तुझ्याइतके छान लिहिता यायला हवे... आणि प्रतिक्रियाही देता यावी
|
आफ़ताब,मीनू,लोपा,देवा..प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.. लोपा, हे तू बोलते आहेस..झाले म्हणजे.... अग मी तुझ्याकडुन शिकतेय... मीनू,आफ़ताब.. माणूस दिले असते शिर्षक पण या आधीच एक "माणूस" नावाची दुसरी कविता आहे माझी आणि हो...ती मी मध्येच इथे टाकली होती.मलाही जरा खटकत होते पण इलाज नव्हता... असो मी तिला माणूस 2 असे शिर्षक देवू का???
|
|
|