|
शलाका ... तो फॉर्म खूप आवडला .. विशेषतः प्रत्येक कडव्याच्या शेवटी जे " कसा सावरी " आलंय ना ? ते . good one मीनू ... कविता सुचण्याच्या process वर खूप काही लिहीता येण्यासारखं आहे नाही ? आत्ता तुझी कविता वाचताना कधीतरी लिहीलेली एक कविता आठवली .. पोस्ट करतो
|
पोर्ट्रेट ... कविता ... खरं सांगू ? असं डोळे मिटून बसलं की दिसू लागतं मला .... हिरवंगार रान ... त्याला चुंबायला ओणवलेलं काळंशार मळभ अन दूर दूरवरून , श्वेतवस्त्रांत , रंगसंगतीचा तोल सांभाळत अल्लडपणे धावत येणारी तू .... मग ते मळभ अलगद डोळ्यात उतरतं अन पुढचं काही काही आठवत नाही मला पाऊस थांबतो तेव्हा मात्र समोरच्या कागदावर एक पोर्ट्रेट असतं ... पावसात भिजणार्या माझ्या कवितेचं
|
Shyamli
| |
| Thursday, October 12, 2006 - 4:25 am: |
| 
|
.. .. .. .... .. .. good one , आवडल.... ...
|
Meenu
| |
| Thursday, October 12, 2006 - 4:55 am: |
| 
|
वैभव छान .... ही बघ अजुन एक .. याच विषयावर राहुन गेलं ...... मला वाटलं लिहु या त्याचं मनोगत ... जातीव्यवस्थेमुळे भरडलेल्या त्याचं , वाटलं मांडावं स्वगत .. मी उभी राहीले होऊन महार , ब्राह्मण सारे समोर उभे , करत होते माझ्यावर प्रहार माझी सावली पडल्याने बाटत होते ते .. मी करते ती सारी कामंही ' क्षुद्र ' म्हणत होते ते .. बरोब्बर , हीच ती वेळ आहे संतापायची आता मला संताप येईल अन उमटेल शब्दातुन तावातावानं मांडीन मी ते एका काव्यातुन त्याच वेळी .... त्याच वेळी , माझ्या शिक्षणानं घात केला त्या उच्चवर्णीयांचं मला हसु आलं अज्ञानावर त्याच्या मला , ' फक्त ' हसु आलं अन त्यांच्या वेडेपणाकडे मी चक्क दुर्लक्ष केलं ... शेवटी त्याचं दुःख मांडायचं राहुन गेलं माझ्या कवितेतुन ...
|
Princess
| |
| Thursday, October 12, 2006 - 5:18 am: |
| 
|
मीनु.... खुप छान ग... वेगळी कविता वेगळ्या विषयावर. वैभव... तुला काय लिहायचे... तु gr8 आहेस एकदा मला पाहायचय तुला कविता लिहिताना, कागदावर उतरणार्या त्या शब्दांची तारांबळ उडताना. ते शब्द,तो कागद आणि ती लेखणी ही होत असेल धन्य, वैभवाच्या हाती पडण्यासाठी त्यानी काय बरे केले असेल पुण्य? पुनम वैभवा, तुझ्या शब्द वैभवापुढे माझी कविता म्हणजे, कृष्णाच्या दरबारात उभा असलेला सुदामा... पण राहवत नाही रे लिहिल्यावाचुन...
|
Jayavi
| |
| Thursday, October 12, 2006 - 5:37 am: |
| 
|
मीनू....... अप्रतिम! वैभवा, Terrific! , तुझं एक एक काव्य, एक Master Piece असतो रे! पूनम, अगं किती सुरेख कौतुक करतेस गं. तुझ्या प्रतिक्रिया पण फ़ार फ़ार सुरेख असतात. स्वाती, श्यामली....... अगं करताय काय तुम्ही? पूनम, आने दो रे.... तुम्हारी तरफ़ से भी कुछ!
|
सर्वांचेच मनःपूर्वक आभार ... घडी ... खूप खूप बोलायचं असतं .... असं का वागलो ... असं का बोललो पण समोर कुणी असेल तर ना ? मग पुन्हा ठेवायचे .. शब्द घडी घालून कुणीतरी समोर येऊन .. जाईपर्यंत विस्कटून काल ... काल अशीच एक खूप दिवसांची घडी निसटली होती ... कुणीतरी डोळ्यांदेखत एक कविता विस्कटली होती
|
Shyamli
| |
| Thursday, October 12, 2006 - 6:31 am: |
| 
|
आई ग!! नको रे तुझी कविता तेवढी विस्कटू देऊ नकोस जया आजकल ठंडा मौसम है रे! 
|
Zaad
| |
| Thursday, October 12, 2006 - 6:43 am: |
| 
|
वैभव घडी घडीतून तुझी प्रतिभा उलगडत चालली आहे. एखादं छान पोर्ट्रेट पाहणार्या रसिकाप्रमाणे किती पाहू असं झालंय. मीनू, कविता खूपच अप्रतिम आहे. शेवट तर खासच. किती खरं आहे हे.... तात्त्विक वादंगांमधे खरा प्रश्न बाजूलाच राहतो.
|
Meenu
| |
| Thursday, October 12, 2006 - 6:46 am: |
| 
|
वैभव तुझ्या कवितेपुढे लिहायचं धाडस करतीये रे .. सुरकुत्या कधी कुणी मोडतं घडी , विस्कटतं कुणी .... मोडली तर वाटतं बरं मनाला विस्कटलं तर टोचत राहतं मोडली काय अन विस्कटली काय घडी ... उरतात फक्त सुरकुत्या .....
|
Shyamli
| |
| Thursday, October 12, 2006 - 6:49 am: |
| 
|
मीनू सुटलीयेस नुसती क्या बात है.....
|
Meenu
| |
| Thursday, October 12, 2006 - 7:00 am: |
| 
|
जखम किती दिवस झालेत , जखम होऊन ........, ही जखम नाही भरत कळेना अजुन का खपली नाही धरत ...? मीच जपते तु दिलेल्या , चॉकलेटच्या चांद्या तुझ्या हस्ताक्षरातलं , कुठलसं चिठकुर तुझ्या श्वासाचा गंध घेऊन , आलेलं वारं जपते सारं सारं , तशीच तु दिलेली जखमही , भळभळणारी ......
|
Princess
| |
| Thursday, October 12, 2006 - 7:06 am: |
| 
|
मीनु........ मीनु..... जखम....खुप आवडली.
|
वैभव, पोर्ट्रेट आणि घडी.. दोन्ही अप्रतीम. काय झालं एकदम घडी विस्कटायला? शलाका, शब्दांशी छान मैत्री आहे तुझी. मला आधी अष्टाक्षरी वाटली होती. मागल्या ओळीतल्या शेवटच्या शब्दाचा हात धरून पुढची ओळ येते त्यातली गंमत आवडली. श्यामली, रोजे चालू आहेत. सारंग, ' लिलाव' चा संदर्भ बरोबर आहे. मला आठवली ती ओळ. पण तो धुक्याचा शेर ( तरीही) नाहीच पटला. पण आता वाद पुरे, काय? मीनू, ' गुलाम' ने विचारात पाडलं. माझीही एक ' कविता न लिहीण्यावरची कविता' पोस्ट करत्ये..
|
स्तब्ध.. कितीतरी वेळ झाला.. हातात लेखणी धरून स्तब्ध बसल्ये समोर पसरलेल्या शुभ्र कागदाकडे पहात.. किती शांत.. नितळ दिसतोय.. मी आत्ता इथे असते, तर प्रतिबिंबसुद्धा पडलं असतं त्यात...
|
Chinnu
| |
| Thursday, October 12, 2006 - 9:23 am: |
| 
|
मीनु जपलेली जखम सहीये ग. सही चाललय लोक्स!
|
Zaad
| |
| Thursday, October 12, 2006 - 9:24 am: |
| 
|
सुंदर!! खूपच भावली स्तब्ध!!!
|
मी आत्ता इथे असते, तर प्रतिबिंबसुद्धा पडलं असतं त्यात... वाह वाह !!!! अप्रतिम .. स्वाती ... it was worth waiting for ur poems
|
प्रिंसेस वैभवला दिलेली प्रतिक्रिया.. खुप छान... आणि वैभव घडी अप्रतीम... फ़ार आवडली,... !!!
|
Shyamli
| |
| Thursday, October 12, 2006 - 10:14 am: |
| 
|
वाह!!!! स्तब्ध, ला काय बोलायच? सुपर्ब..... असे रोजे आयुष्यभर करीन की मी! 
|
|
|