Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 12, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » आश्विन » काव्यधारा » कविता » Archive through October 12, 2006 « Previous Next »

Lopamudraa
Wednesday, October 11, 2006 - 6:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बदललेली वाट

श्वासांवर पेलली स्वप्ने...
अशी धुंद.. की ओळखु लागले
माझे अस्तित्व त्यामुळेच मला..
कसरत केली.. जगण्याची
कसोटीला उतरण्याची....
परिक्षा तर द्याविच लागते ना...
स्वत:ला सिध्द करण्याची...
स्वप्नानी पोट नाही भरत म्हणतात
म्हणुन...
दुनीयेचा व्यापारही शिकले..
पण त्यांना कधी ना विकले..
कारण नफ़्याची तशी
गरज पडली नाही कधी..
पण तोटा झालेलाही चालत नाही..
या बाजारात.. आणि
थोडा balance ही हवाच..
गोळा केले.. काही शिक्के
काही खोटे काही खरे निघाले..
खरे ठेवले fix मध्ये..
खोटे चोर बाजारतही नाही खपले..
तशी गरज नव्हती माझ्या स्वप्नांना या सगळ्याची
थोडं चमचमत उन..
आणि चंद्रप्रकाशाची चांदी पुरे होती त्यांना..
पण जग स्वप्नांच्या वाटेने जात नाही म्हणुन..
स्वप्न्नांना जगाच्या वाटेने घेउन गेले..!!!



Shyamli
Wednesday, October 11, 2006 - 6:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्या बात है वैशाली.....

परत परत वाचतिये ग!
जाम आवडलय
ह्या ओळि तर कडेलोट आहेत

>>>>>पण जग स्वप्नांच्या वाटेने जात नाही म्हणुन..
स्वप्न्नांना जगाच्या वाटेने घेउन गेले..!!! >>>


Mrudgandha6
Wednesday, October 11, 2006 - 6:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


लोपा,
वा!! दोन्ही कविता अप्रतिम..
"पण जग स्वप्नांच्या वाटेने जात नाही म्हणुन..
स्वप्न्नांना जगाच्या वाटेने घेउन गेले..!!!"
अगदी अगदी....कळस आहे.

सारंग,
"तुझाच भास, ध्यासही तुझाच घ्यायचा
तुझ्या समोर मात्र वेड पांघरायचे!! "
क्या बात है..




Me_anand
Wednesday, October 11, 2006 - 7:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय चालले आपुल्या देशा, काय चालले सांगा बापू
सुतकताई सोडून द्या हो, बनले सगळेच खिसेकापू

तुम्ही वदला 'नकोच हिंसा, परम धर्म एक अहिंसा'
तुमचे आम्ही ऐकून बसलो, राजे झाले बनेल डाकू

तुम्ही दाविला मार्ग स्वदेशी, टाकून होळीमधे विदेशी
स्वदेशी आम्हीच खाऊन बसलो, विदेशीला का दोषारोपू?

तुम्ही वदला 'रामराज्य हे, न्याय समान सर्वां द्यावा'
न्यायदेवता आंधळी जेथे, न्यायाची का आशा राखू?

तुम्ही आमुचे राष्ट्रपिता हो, सेनानी हो, महात्मा हो,
समाधिवरी कुत्री फिरली, तुम्हांस कैसे तोंड दाखवू?


Vaibhav_joshi
Wednesday, October 11, 2006 - 7:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उगीच आरशात रूप न्याहळायचे...
अनोळख्यापरी घरात वावरायचे!
वा .... जमली रे सारंगा ...

मला भुजंगप्रयातमधली माझी एक रचना आठवली

तुला पाहता मी मला विस्मरावे
सखी सांग आता कसे सावरावे


मला फक्त न्याहळावे ह्या शब्दावर शंका आहे .. न्याहाळणे शब्द असा लिहीता येतो का ?
आणि हात फेरशी .... हाथ फेरना हा हिंदी शब्द आहे ना ? बघ जरा

मघाशी आनंद ने म्हट्ल्याप्रमाणे

खुळ्यापरी मनामध्ये उगी हसायचे!
कुणी कटाक्ष रोखताच बावरायचे!

हळूच मोगर्‍यावरून हात फेरशी,
जणू धुक्यात चांदणेच अंथरायचे!

ह्या सुट्या शेरांमध्ये कल्पना स्पष्ट होत नाहिये असे वाटून गेले ... अर्थात जाणकार ( म्हणजे स्वाती का रे भाऊ ? ) सांगतीलच
:-)

मृद्गंधा ... कवितेची चाहूल वाचलीच नव्हती ... मस्तच आहे ...

लोपा ... आज काय ऐकत नाही


Lopamudraa
Wednesday, October 11, 2006 - 7:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, ऐकतेय ऐकतेय.. तुम्ही चर्चेत रंगलाय तो आमचा प्रांत नाही म्हणुन

आनंद तुझी गझल फ़ार आवडली...!!! मस्तय..!!!


Me_anand
Wednesday, October 11, 2006 - 8:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद लोपमुद्रा...
ती गझल नहिये.... म्हणजे व्याकरणाच्या दृष्टीने... एक कविता म्हण सद्यस्थितीवरची.... :-)


Jayavi
Wednesday, October 11, 2006 - 10:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आई गं लोपा......... नुसती सुटलीयेस....... Terrific!

Swara
Wednesday, October 11, 2006 - 10:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली, प्रोत्साहनाबद्दल आभारी आहे.

मृद्गंधा


लोपा बदललेली वाट मनाला स्पर्शून गेली.

सारंग मजा आली वाचायला "ध्यास".

झाड तुमच्या मैत्रिणीची गझल पण भावना पोचवून गेली.


Swaatee_ambole
Wednesday, October 11, 2006 - 2:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग, वैभवच्या प्रतिक्रियेशी (' जाणकार म्हणजे स्वाती का' हा प्रश्न वगळता) सहमत आहे.
कवितेत आपण ज्या प्रतिमा वापरतो, त्यांचा शब्दार्थ आणि भावार्थ दोन्ही निःसंदिग्ध असायला हवेत. ( लगेच मनात येणारं उदाहरण ' पृथ्वीचे प्रेमगीत'). त्या अनुषंगाने मला 'धुक्यात चांदणे अंथरायचे' याचा कुठलाच अर्थ स्पष्ट झाला नाही.

झाड, वैभवने सविस्तर आणि समर्पक लिहीलंच आहे तुझ्या मैत्रिणीच्या रचनेबद्दल. तुझी workshop ची कल्पना खरंच चांगली आहे. आपल्याला सगळ्यांनाच शिकता येईल.

मृद्गंधा, कवितेची चाहूल छान आहे.

आनंद, एवढे निराश नका होऊ.

स्वर, घुसमट आवडली. अंतस्त म्हणजे काय? आणि हो, एकदम राजहंस वगैरे का आठवला तुम्हाला?

लोपा, सही.

शलाका, अहोजाहो केलंस तर बघ पुन्हा.


Shyamli
Wednesday, October 11, 2006 - 3:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो गुरुमाऊली कविता येउ द्या आता
लै झाली चर्चा
फार दिवस झाले तुमची कविता आली नाही
नवरात्रिचे उपास झाले,अंगारकी पण झाली ना


Swara
Wednesday, October 11, 2006 - 5:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती,
अंतस्त हा माझ्या अत्याचा शब्द आहे. ती तो अगदी पोटातून म्हणजे आतपासून अश्या अर्थी वापरते. म्हणजे अगणित घरे, अनंत वासे आणि आत पोटापर्यत खोल घुसमट. असा काहिसा अर्थ अभिप्रेत होता. मला हा शब्द फार आवडायचा. कदाचित म्हणुनच तो नकळत मझ्या कवितेत उतरला. पण आता तुम्ही विचारल्यावर मी confuse झाले आहे की हा शब्द बरोबर आहे की नाही.
राजहंसाचे म्हणाल तर ते तुम्हा सर्वांच्या सुंदर कवितां वरून सुचले


Kedarjoshi
Wednesday, October 11, 2006 - 5:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अंतस्त हा माझ्या अत्याचा शब्द आहे>>

स्वर तो अंतस्थ असा हवा.

Dineshvs
Wednesday, October 11, 2006 - 9:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैशाली, असा जगाला बदलायला लावणारा आत्मविश्वास पाहिजे. खुप छान.

Sarang23
Wednesday, October 11, 2006 - 11:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मित्रांनो...
वैभव, निनावी... न्याहळायचे अस शब्द वापरला जाऊ शकेल असे वाटले म्हणूनच तिथे टाकला होता...
कविता संग्रह : विशाखा... पान नंबर नाही सांगता येणार :-) पण न्याहळोनी असा शब्द प्रयोग झाल्याचे स्मरते...
शेतकर्‍याची कविता आहे... लिलाव नावाची

थोर थैलीतिल वाजवीत नाणी... अस काहीस आहे... अप्रतीम कविता...!!!

याशिवायही अन्यत्र तो शब्द वाचल्याचे स्मरणात आहेच...

शब्दरत्नाकर मध्ये खातरजमा केली आहे... न्याहाळणे आणि न्याहळणे दोन्ही चालू शकतं :-(

आता फेरशी कडे वळू...

काय हरकत आहे मी तो शब्द तसा वापरला तर...? नाही म्हणजे आपल्या भाषेला आणखी एक शब्द तरी मिळेल ना नवा! :-) ( पण हाही शब्द आधी वापरात आला आहे, आणि फारच प्रचलीत आहे:-( जसा प्यारा आहे तसा!!! )

आता खालिल शेराचा अर्थ पाहू या...

खुळ्यापरी मनामध्ये उगी हसायचे!
कुणी कटाक्ष रोखताच बावरायचे!

कधी कधी विचारांची तंद्री इतकी वाढते की एखादी जुनीच गोष्ट आठवून आपण मनातल्या मनात हसतो आणि कित्येक वेळा ते मनातल हसू चेहर्‍यावर येतं...
आणि मग आजुबाजूचे लोक आपल्या बावळटपणावर हसत आहेत हे जाणवल्यानंतर खजील व्हायचं हा मला तरी एक साधा अनुभव वाटला होता... आता तो अर्थ तसा समोर आला नाही यात २
possibilities आहेत. एक म्हणजे हा अनुभव तितका सहज येणारा नाही, अथवा मी तो शेरात मांडायला असमर्थ ठरलो... :-)
यातली दुसरी शक्यताच दाट आहे... नाही का? :-(

हळूच मोगर् ०दयावरून हात फेरशी,
जणू धुक्यात चांदणेच अंथरायचे!

आता इथे... तु हळूच मोगर्‍यावरून हात फ़िरवतेस असा पहिल्या ओळीचा अर्थ आहे... ( बहुदा याबद्दल वाद नसावा; असं समजून पुढे जातो... )
मोगरा इतका शुभ्र आणि स्वच्छ आहे की त्याची भुरळ कोणालाही पडावी...
पणा अशा मोगर्‍यावरून तू जेंव्हा हात फ़िरवतेस, तेंव्हा तो मोगरा धुक्यासारखा धुरकट दिसतो आणि तुझा फ़िरत जाणारा हात चांदणे अंथरल्याचा भास असतो... असा अर्थ अभिप्रेत होता...

याहूनही महत्त्वाचं म्हणजे... धुक्याचीच उपमा बर्‍याचदा सौंदर्यसंकेत म्हणून वापरली जाते, तीच मी, चांदणीसोबत
comparison साठी वापरली...
इतकेच म्हणाया आलो... ही गझल आठवली :-)
याव्यतिरीक्तही कुठल्या शेरात काही गडबड वाटत असल्यास जाणकारांनी जरूर कळवावे... :-)

सारंग


Ganeshbehere
Thursday, October 12, 2006 - 12:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थोडा balance ही हवाच..
गोळा केले.. काही शिक्के
काही खोटे काही खरे निघाले..
खरे ठेवले fix मध्ये..
खोटे चोर बाजारतही नाही खपले.. >>>>>>>>>>>>>>>>


लोपाताई , फ़ारच छान, मस्त, येऊ द्या अजुन.


Daad
Thursday, October 12, 2006 - 12:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धुंद मिटल्या पापणी
घन-भरले आभाळ
आभाळातल्या घनाचे
मनी नितळ बिंबाळ
बिंब, बिंब टिपणारा
कोण मनातला मोर?
मोर नाचले अंगण
पुन्हा कसे सावरी?

तन-मनाच्या अंगणी
पारीजातकाचा सडा
सडा पखरून गेला
गेला मनातला कुणी
कुण्या स्पर्शाने जागले
श्वास गंधाळ, गंधाळ
गंधाळले उच्श्वास,
श्वास, कसा सावरी?

आज मनाचेच साद,
पडसाद मनभर
जणु लाटेनं लुटावा
स्वत्:चाच फेनभार
फेनभारे ओथंबला,
डचमळे घट गोल,
घट कटी, जातो तोल,
तोल कसा सावरी?

-- शलाका


Zaad
Thursday, October 12, 2006 - 1:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शलाका, छान जमली आहे.
बिंबाळ चा अर्थ बिंब असाच घ्यायचा ना?


Meenu
Thursday, October 12, 2006 - 1:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गुलाम

नको होतं मला ते , भावनांचा गुलाम होणं
म्हणुनच मी हद्दपार केलंय , सार्‍याच भावनांना
आता कसं हलकं वाटतय .......
आताही दिसतं मला सौंदर्य अन दुःखही
पण जाणवत नाही काहीच
आतपर्यंत काहीच पोहोचत नाही ....
शब्दातुन मग उमटायचा प्रश्नच येत नाही
तरीच हल्ली मी कविताही लिहीत नाही
ओह !!! माझी कविताही त्यांचीच गुलाम होती तर ....


Shyamli
Thursday, October 12, 2006 - 2:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त ग मीनू...
....... ...... .....





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators