|
Swara
| |
| Tuesday, October 10, 2006 - 11:26 am: |
| 
|
धन्यवाद वैभव. खर तर प्रलयानंतरची नवी सुरुवात दाखवायची होती. पण तुम्ही म्हणता तशी प्रलयापाशी संपवून परिणाम वाढला असता. तुमचा वसंत सुरेख. सारंग मस्त गझल आणि त्याहून सुंदर विश्लेषण. पुलंचे शब्द चोरून... राजहंसाचे चालणे जगी झालीया शहाणे म्हणून काय कवणे चलूची नये? आसतील तुम्हा सर्वांच्या कविता अप्रतीम म्हणुन काय मझ्यासरख्यांन कविता पोस्टूच नयेत की काय? 
|
Kiru
| |
| Tuesday, October 10, 2006 - 11:32 am: |
| 
|
क्या बात है वैभव!! .. सारंग, 'गोळाबेरीज' आवडली रे..
|
Daad
| |
| Tuesday, October 10, 2006 - 8:29 pm: |
| 
|
सारंगची "गजल" छान तर आहेच पण, सर्वांचं त्यावरचं विवेचन अधिकच छान. विशेषत:, स्वाती, तुमचं विश्लेषण आणि तुम्ही दिलेली मनोगत ची link . त्यातलं, सुरेश भटांचं गज़ल काव्य प्रकारावरलं भाष्य, अप्रतिम! वैभव, तुमच्या कवितांबद्दल सांगायचं झालं तर अगदी पदरही न ढळलेली बैठकीची ठुमरी!! अदाकारी तर आहेच, पण बदनामीपुरतेही चांचल्य नाही! पूर्ण घरंदाज!! - मला कवितांच्या विषयांबद्दल नाही बोलायचंय, style बद्दल बोलायचंय!! स्वर, घुसमट आणि चिर शांती दोन्ही कविता जरा सावकाश वाचल्या. दोन्ही सुंदर. मानव देह आणि त्याच्या limitations मध्ये घुसमटणारं एखादं खूप संवेदनाशील मन? किंवा तुम्हाला दुसरं काहीतरी म्हणायचं असेल!! निरु, जाणीव सुंदरच. असो.... हितगूजच्या ह्या BB चं माझ्यामते हेच वैशिष्ट्य - "जो जे वांछिल तो ते लाहो"!! निखळ शब्दानंद किंवा शिकण्यासारखं खूप काही किंवा दोन्ही!! --शलाका
|
Sarang23
| |
| Tuesday, October 10, 2006 - 11:38 pm: |
| 
|
निनावी, उदाहरणादाखल मुद्दाम तीच गझल मी का घेतली हे स्पष्ट करतो... रास्त आणि स्वस्त यामध्ये स्त हे समान अक्षर आले आहे... त्या आधी काहीही यमकात बसत नाही... मग अशा वेळी स्त मधला स्वर हीच अलामत होते... नाहीतर मग आणखी एका गोष्टीमुळे वाद निर्माण होऊ शकेल... की ती उदाहरणात दिलेली गझल गैर - अलामती गझल आहे हे शक्य नाही... म्हणून जास्त आणि स्वस्त हे दोन्ही शब्द यमक आणि अ ही अलामत धरतात... आता वरच्या गझलेविषयी... ती कुठल्याही रूढ जातींमध्ये नाही हे जरी कबूल, तरी मात्रा वृत्ताचे सगळे नियम त्यात आहेत!!! मात्रा वृत्तामध्ये समान मात्रांचे गट पाडुन यती घेतला जातो, मग तू पहा की ही गझल आवर्तनी आहे की नाही सारंग, मी गज़ल या विषयातली शिकाऊ उमेदवार आहे, पण ' रास्त होते' आणि ' स्वस्त होते' मधे अ ही अलामत नाहीये. यात कॉमन अलामतच नाहीये.. किंवा अलामत भंग केली आहे असं म्हणावं लागेल. ' स्त' हे काफ़ियातलं कॉमन अक्षर आहे ना? मग त्याच्या आधी येणार्या अक्षरातला ( ज्यातले व्यंजन बदलते,) स्वर जो ( कॉमन ) असतो, ती अलामत. असं सुरेश भट म्हणतात... हो ना... पण उद्या उत्तरादाखल एक उर्दु गझल नक्की टाकतो जी सुरेश भटांचे गझलेचे सगळे नियम धाब्यावर बसवते, पण तरी ही गझल म्हणवते... कारण ती एका फार मोठ्या गझलकाराची गझल आहे! आणि स्वतः सुरेश भटांच्या, मी उदाहरणात दिल्याप्रमाणे, अनेक गझला आहेत... मला कुठल्याही सुरेश भट प्रेमींना दुखवायचे नाही... ( मीही त्यातलाच एक ) मी स्वत गझलेकडे वळण्याचे कारणही आदरणिय सुरेशजीच आहेत... पण सगळे अपवादही व्याकरणात अंतरभूत व्हावेत म्हणून हा खटाटोप... आणि शेवटी जी निखळ आनंद देते ती खरी गझल... नाही का?
|
सारंग ... काल दिवसभर गोळाबेरीजबद्दल काहीतरी खटकत होतं ... शेवटी रात्री पुन्हा समोर घेऊन बसलो .. गझलक्षेत्रातील काही तज्ञ लोकांना विचारले आणि मग काही गोष्टी लक्षात आल्या १. वृत्तबध्द ( मात्रावृत्तात सुध्दा ) गझल वाचताना किंवा म्हणताला लय हवीच हवी .. ती गोळाबेरीज मध्ये कुठेही दिसत नाही . असं म्हणण्याचं कारण म्हणजे मी बर्याच प्रकारे मिसर्यांची विभागणी करून पाहिली पण कुठेही समानता आढळत नाही . मी " हरेक दिवस " नंतर यती घेतली . आणि तसे गट पाडले तर " तुझा हात " नंतर यती बसतच नाही . तेच मक्त्याच्या बाबतीतही घडते २.मात्रावृतामध्ये प्रत्येक ओळीत तितक्याच मात्रा हव्यात हे तर मान्यच आहे . " कसं हसायचं तोंडदेखलं खोटं " इथे सं , चं , वरती अनुस्वार आल्याने दोन मात्रा होतात . कस आणि कसं मध्ये हाच फरक आहे ना ? कसं म्हणजे कसे हेच योग्य आहे ना ? मग त्या मिसर्याच्या मात्रा २१ होतात . व्याकरणाचा अट्टहास धरणार्याने आणि पाळणं शक्य असणार्याने अपवादाकडे वळू नये . आधी काव्याचा गाभा महत्त्वाचा हे कबूलच पण त्यातून ज्याला लय छंद सांभाळता येते , इतकी प्रतिभा ज्यात आहे त्याने पळवाट का काढावी ? गझलच काय कुठलही कलेचा निकष निखळ आनंद हाच आहे . पण वाचकाला ती नीट म्हणता न आल्याशिवाय निखळ आनंद कसा मिळेल ? सर्वांनाच ह्या चर्चेच्या अनुषंगाने माहिती मिळातीय आणि बरेच लोक उत्सुकही दिसले समजून घ्यायला म्हणून लिहीले
|
वैभव निनावी thank you .....!!! वैभव एखादी छानशी गजल येउ द्या.. !!!
|
Shyamli
| |
| Wednesday, October 11, 2006 - 3:33 am: |
| 
|
वैभव, नीनावी,सारंग... छान माहीती मिळतीये सांगत जा असच अधुन मधुन थांकु बर्का... सारंग गझल असो नसो(कळत नाही बुवा आपल्याला त्यातल काही) गोळाबेरीज छानच, आवडली आणि वसंत छान हो गुर्जी, एकदम फ्रेश स्वरा तुझी घुसमट खरच खुप छान मनापासुन आलेली कविता वाटली अगदी दाद तुझ्या प्रतीक्रीयाही दाद देण्यासारख्या.... लगे रहो 
|
वा!! सारंग,.. मस्तच वैभव,..तू लिहतोस अप्रतिम,दरवेळी नविन..मला मात्र प्रतिसाद म्हणून तेच तेच शब्द लिहायला कसेतरिच वाटतेय lol स्वर,..खरेच ग.. "जर फ़क्त जो चांगला गातो त्या पक्ष्यानेच गायचे ठरवले तर सारी झाडे मुकीच रहातील.." इथे किलबिल व्ह्यायलाच हवी.. आधी किलबिल,मग स्वर,मग थाट,मग राग,मग सगळे संगितशास्त्र.. तसेच आहे हे.. शेवटी आनंद महत्वाचा.. खाणीत सापडलेला, पैलू न पाडलेला हिरा हा शेवटी हिराच असतो..त्याला पैलू पाडल्यावर तो खुलून दिसतही असेलही पण, एखाद्या दगडाला पैलू पाडल्यावर का तो खुलत नाहि?..म्हणजेच शेवटी आधीच काहितरि गुणधर्म असावे लागतात.. काही हिरे न पैलू पाडताही इतके सुंदर असतात की त्यांना तसेच कोन्दणात जडवले जाते.. अशी उदाहरण आहेत..
|
Zaad
| |
| Wednesday, October 11, 2006 - 3:51 am: |
| 
|
माझ्या एका मैत्रिणीची ही गज़ल देत आहे. मला खूप आवडलेली आहे ही गज़ल. जाणकारांनी व्याकरणावर प्रकाश टाकावा. असण्यावरी नसणे तो पांघरून गेला. ढळता हर दिस स्वप्ने कुस्करून गेला. दाबण्या दु:खे उरी मी सोडला नि:श्वास जो हाय तो नि:श्वासही मज ठोकरून गेला. शब्दखेळी जगाने खेळली माझ्याशी अशी त्या वादळात माझा, अर्थ बावरून गेला. सावराया आप्त आले हाती घेऊनी भाले वाहता अश्रू साधा , मज सावरून गेला. शेवटचा डावही, उलटला माझ्यावरी आत्माही माझा हे शरीर वापरून गेला .
|
वा!! झाड,मस्त आहे "शेवटचा डावही, उलटला माझ्यावरी आत्माही माझा हे शरीर वापरून गेला".. अप्रतिम
|
झाड छाने गझल.... !!!.. ... .... ... .... ...
|
Shyamli
| |
| Wednesday, October 11, 2006 - 4:06 am: |
| 
|
आत्माही माझा हे शरीर वापरून गेला . >>> क्या बात है रे..... उच्च अगदी
|
चाहुल.. किती दिवस झाले.. चाहुलच नाही कसली तिची.. अन,मी मात्र.. काहीतरी सुटल्यासारखी, काहीतरी तुटल्यासारखी.. जणू उध्वस्त झालेय..तिच्या नसण्याने.. किती हाका देतेय,पण सगळ्याच जाताहेत विरुन हवेतल्या हवेतच.. अन,ही कातरवेळ, अधिकच गडद होत चाललीय.. सगळीकडे एक जीवघेणी शांतता पसरलीय एव्ह्ढी की.. श्वासांचा आवाजही गोंगाट वाटावा.. काहीतरी अव्यक्त..गदमतय आतल्या आत.. भरुन येतय पण, मोकळं होत नाही असं काहीतरी.. कुठेही चिटपाखरुदेखिल नाही अन क्षितिजावर मात्र.. कसलासा लोळ उठलाय.. वादळ असावं का?? हं,वादळच.. आणि ही वादळापुर्वीचीच शांतता.. एखादी सर कोसळणार जोरदार.. वळवाची.. हं हीच,हीच तर.. तिच्या येण्याची चाहुल आहे..
|
झाड ... मला वाटलं ते सांगतो पण एकच अट जाणकार वगैरे म्हणायच नाही
असण्यावरी नसणे तो पांघरून गेला. ढळता हर दिस स्वप्ने कुस्करून गेला. दुसरी ओळ पहिलीच्या लयीत म्हणता येतेय का ? नाही .. पर्याय असण्यावरी नसणे तो पांघरून गेला. ढळता हर दिस स्वप्नांना कुस्करून गेला .... दाबण्या दु:खे उरी मी सोडला नि:श्वास जो हाय तो नि:श्वासही मज ठोकरून गेला. अं हं असं बघ बरं ( मी फक्त गेयता , लय , म्हणतोय .. एक ढोबळ अंदाज यावा म्हणून. ) दुःख दडवले असे जगाला पत्ता नव्हता हाय परी निःश्वास मला ठोकरून गेला ...... शब्दखेळी जगाने खेळली माझ्याशी अशी त्या वादळात माझा, अर्थ बावरून गेला. अं हं ... असं बघ बरं शब्दखेळ त्यानेच सुरू केला असताना ? अर्थ लागला तेव्हा का बावरून गेला ? etc etc पण जमीन मस्त आहे म्हणजे ह्या लयीत गज़ल मस्त वाटत्ये .. आणि काही काही कल्पना अगदी चमकदार उतरल्या आहेत ... उदा . शेवटच्या द्विपंक्तीतली कल्पना अप्रतीम आहे .. वाह ! तुझी मैत्रीण चांगल्या गझल्स लिहू शकेल ... शुभेच्छा
|
Me_anand
| |
| Wednesday, October 11, 2006 - 4:21 am: |
| 
|
सारंग, मला वाटतं व्याकरणावर लक्ष देण्याआधी, गझलचं सगळ्यात मोठं लक्षण बघितलं पहिजे आणि ते म्हणजे गझलचा भावार्थ. गझलचा प्रत्येक शेर म्हणजे एक स्वतंत्र कविता असते.... अशा ५ पेक्षा अधिक कविता (यावरही मतभेद आहेत.), एका मध्यवर्ती संकल्पनेतून बांधलेल्या किंवा स्वतंत्र म्हणजे गझल अस म्हणता येइल. माफ कर, पण मला गोळाबेरीज मध्ये हेच लक्षण कमी वाटतं आहे. आनंद
|
Zaad
| |
| Wednesday, October 11, 2006 - 4:43 am: |
| 
|
धन्यवाद मंडळी (मैत्रिणीच्या वतीने ) वैभव, पटलं. (पण तुझी अट पाळता नाही येणार मला!! ) तू सुचवलेले पर्याय पण छान आहेत. शब्दखेळ त्यानेच सुरू केला असताना ? अर्थ लागला तेव्हा का बावरून गेला ? हे तर केवळ अप्रतिम! मला एक सुचवायचं आहे. आपण सगळे मिळून गझलेचं एखादं वर्कशॉप आयोजित केलं तर? ज्यांना खरंच गझलेतली खरी जाण आहे, त्यांच्याकडून समजून घ्यायला खूप आवडेल. स्थळाचा प्रॉब्लेम नक्कीच आहे, पण ज्यांना शक्य आहे त्यांच्यासाठी करायला काय हरकत आहे? मंडळी काय म्हणता?
|
उडता उडता.. नभ मोजणे.. आणि बघता बघता जमिनीवर टेकणे.. जमलं पाहिजे... झडता झडता.. रंग वाटणे.. आणि बघता बघता निष्काम गळणे.. जमलं पाहिजे... जगता जगता.. आकारात घडणे.. आणि बघता बघता... जगात मिसळणे... जमलं पाहिजे.. पडता पडता सावरणे... आणि बघता बघता.. स्वताला.. आतल्यासहीत पेलणे जमल पाहीजे..!!
|
Shyamli
| |
| Wednesday, October 11, 2006 - 5:21 am: |
| 
|
अग जमल पाहीजे ग बाई पण असा ह्ट्ट करुन कसं चालेल पाहु या जमतय का कविता छाने पण
|
लोपा ... मस्त आहे .. विशेष करून शेवटचं कडवं
|
Sarang23
| |
| Wednesday, October 11, 2006 - 6:21 am: |
| 
|
ध्यास तुझ्याच आठवांत धुंद मोहरायचे! अता कसे पुन्हा स्वतःस सावरायचे?! उगीच आरशात रूप न्याहळायचे... अनोळख्यापरी घरात वावरायचे! खुळ्यापरी मनामध्ये उगी हसायचे! कुणी कटाक्ष रोखताच बावरायचे! तुझाच भास, ध्यासही तुझाच घ्यायचा तुझ्या समोर मात्र वेड पांघरायचे!! हळूच मोगर्यावरून हात फेरशी, जणू धुक्यात चांदणेच अंथरायचे! अता नशा नसूनही नशेत राहतो; सखे असे न अंतरंग मंतरायचे! सारंग
|
|
|