|
Mrinmayee
| |
| Wednesday, September 27, 2006 - 8:51 am: |
| 
|
मिल्या, काय मस्त केलीय कवीता! !! शहाणा नवरा आहेस तु! बायकोला असंच घाबरावं. जाहीररित्या तिची गम्मत करून "just kidding म्हणून मोकळं व्हावं! वैभव, 'कालवून लाव नीट' अगदी A1 !!! तालासुरात म्हणून पाहिली. दिवसाची सुरवात खिदळण्यानी झाली. आता उरलेला दिवस छानच जाणार
|
Milya
| |
| Wednesday, September 27, 2006 - 9:14 am: |
| 
|
धन्स सगळ्यांना.. वैभव  u made my day एकदम मस्त. गझलेच्या मीटर मध्ये perfect बसतेय अगदी...
|
Asmaani
| |
| Wednesday, September 27, 2006 - 9:36 am: |
| 
|
मिल्या आणि वैभव, u r just अशक्य!
|
वैभव, हे आजपर्यंत मी वाचलेलं सर्वात best विडंबन आहे.
|
Dineshvs
| |
| Wednesday, September 27, 2006 - 12:20 pm: |
| 
|
मिल्या आणि वैभव, दोघांची विडंबने मस्तच आहेत.
|
Manuswini
| |
| Wednesday, September 27, 2006 - 12:32 pm: |
| 
|
वैभव झक्कस रे मी अगदे मनातल्या मनात म्हणून पाहीले. हे गाणेच माझे fav आहे एकदम अतिशय romantic
|
मिल्या आणि वैभव,दोघांचीही विडंबने जबरी आहेत
|
वैभव, . एकदम मस्त ! खरेच 'बंद होत जाय श्वास' होते माझेही.
|
Shaileshkm
| |
| Thursday, September 28, 2006 - 8:24 am: |
| 
|
मिल्या, कवितेनन्तर नाव लिहायला लागलास ते बर केलेस. तुज़्या कवितागाणि मैल मध्न फिरत अस्तात.
|
Daad
| |
| Friday, September 29, 2006 - 2:35 am: |
| 
|
वैभव, काय झकासच रे! अगदी हुबेहूब! हे विडंबन मी कवितांच्या BB वर टाकलं होतं मूळ गाणं घन:श्याम सुंदरा (भूपाळी) घन: ऊष्ण पिवळा पीवळा पडसोदय झाला धरी लवकरी रुमाला, रुमाला धरी लवकरी रुमाल, नासिकातळी श्लेम आला|| आणुनद्या लॉजिंजीस अन बाटली......,व्हिक्सची सरली करी गार्गल मिठ-पाणी घेउनी, रेकी घसा शेकी "गरम शेण लेपा" देती कुणी अचरटसा सल्ला.......||१ सायंकाळी एकेवेळी, खो-गो अवघे भक्षी अरुणोदय होताच जळाची, गरम पिशवी कुक्षी प्रभातकाळी उठुनी लावली, सुंठ निज वक्षी करुनी सडा युकलिप्टस, झोपी..... गुंडाळुन मफलरशी शिंका, ताप, पडसे, ..... बरा हा, होईल कधी खोकला?.......||२ -- शलाका
|
Swara
| |
| Sunday, October 01, 2006 - 4:30 pm: |
| 
|
chaffa आणि वैभव एकदम झकास HHPV . मिल्या, मजा आली वाचायला.
|
Sadda
| |
| Saturday, October 07, 2006 - 12:30 am: |
| 
|
मिल्या, वैभव एकदम सही.. hhpv 
|
माझाही एक प्रयत्न एक माजलेला कुत्रा एक माजलेला कुत्रा आहे माझ्याकडे बान्धून ठेवलाय साखळीत महिनाअखेर येताच फक्त साखळी उघडून सोडतो त्याला वसुलीसाठी आलेला माझा वाणी थकलेली उधारी विसरून जातो एखाद्या गर्भगळीत सशासारखा पाठीला पाय लावुन दुकानात लपायला पळून जातो एक माजलेला कुत्रा आहे माझ्याकडे... (वैभव, माफ करशीलच!) मूळ कविता "एक सुकलेला गजरा" /cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=75&post=875336#POST875336
|
मुळ कविता..संदीप खरेंची... मी मोर्चा नेला... नाही..!!! मी डोसा खाल्ला नाही,मी ईडली खाल्ली नाही.. मी साखर सुध्दा साधी कधी चहात घेतली नाही..!!! भोवताली पार्टी चाले, ती विस्फ़ारुन बघतांना कुणी गुलाबजाम ओरपतांना,कुणी रसगुल्ले ढापताना.. मी सॅलड खात बसले..सगळ्यांच्या सोबत जेव्हा... वरण भातही साधा मज कुणी विचारला नाही... मी डोसा.. खाल्ला नाही..मी............. वडा बघत राहीले..,पावही कधी ना चाखले.. अन पोट भरुन कधीही मी छोले खाल्ले नाहीत कुणी अग्रह केला तरी,प्लेट भरुन घेतली नाही.. एकच कोवळी काकडी, अन उकडलेली अंडी.. नाकात अजुन दरवळे ती भरलेली भेंडी.. मी वजन काट्याला भ्याले..,मी वाढत्या घेरालाही भ्याले.. मी मनात सुध्दा माझ्या कधी भजी तळली नाही.. मी डोसा खाल्ला नाही मी....... ..... मज नाश्ता जर का मिळता मी गाजर खाल्ले असते कुणा बोलवले घरी तर रताळे उकडले असते.. म्हणुन मजकडे कोणी आले वा गेले नाही.. मी अश्शी slim आहे... की एक कपडाही कधी...... उसवावा लागला नाही....!!!! मी डोसा खाल्ला नाही....मी ईडली खाल्ली नाही मी साखर सुध्दा साधी कधी दुधात घेतली नाही.......
|
/cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=103385&post=789525#POST789525>>. mul kavitaa.. ... ... ... ... ...
|
Psg
| |
| Tuesday, October 10, 2006 - 6:36 am: |
| 
|
विजय, लोपा झकास जमली आहेत दोन्ही
|
Maudee
| |
| Tuesday, October 10, 2006 - 6:47 am: |
| 
|
मिल्या, वैभव, दाद, विजय छानच लोपा वा..... मी मनातल्या मनात सुध्हा भजी तळली नाहीत...मस्तच... चाफ़्फ़ा, अरे वा तू इथे सुध्हा दरवळतो आहेस.... छान आहे तुझे विडंबन
|
Kandapohe
| |
| Tuesday, October 10, 2006 - 7:24 am: |
| 
|
लोपा सहीच जमले आहे. 
|
Dineshvs
| |
| Tuesday, October 10, 2006 - 8:59 am: |
| 
|
लोपा हे सगळे केले नाहीस ? मग तुझी वारी फ़ुकट गेली कि. छानच जमलय. बायकाना विनोदबुद्धी कमी असते, असा आपला उगाचच गैरसमज असतो नाही सगळ्यांचा !
|
इथे फ़क्त मराठी साहित्य पोष्ट करावे हि विनंती
|
|
|