Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 10, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » आश्विन » काव्यधारा » कविता » Archive through October 10, 2006 « Previous Next »

Daad
Monday, October 09, 2006 - 8:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वर, jo_s , झाड, स्वाती ताई, मृदगंधा....... thanks heaps !

Sarang23
Monday, October 09, 2006 - 11:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

  गोळाबेरीज!

चालणार्‍याने चालत जावे
मोजु नये अंतर;
सगळी गणितं क्षणात सुटतात -
झोपी गेल्यानंतर!

प्रश्न सारे उत्तर होतात,
सुटती सगळी कोडी;
जशी फिरावी छडि जादुची
अन बोलावे छूमंतर!


हरेक दिवस झाल्यागेल्याचा
हाच पुरावा रडू येण्याचा...

कसं हसायचं तोंडदेखल खोट?
हा खेळ तर तुझ्यासारख्याचा!

पात्रे बदलतात, नाटक तेच
घोळ रोजचा, पाप पुण्याचा!

तुझा हात हातात असताना,
प्रश्नच येत नाही फसण्याचा!

दगडावरही जपुन ठेव पाय;
संभव आहे जीव असण्याचा!!!


सारंग


Ramachandrac
Tuesday, October 10, 2006 - 12:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा सारंगा वा... सुरेख रे... खुप दीवसानी तुझी गझल वाचली आजचा दीवस सफल झाला...

Vaibhav_joshi
Tuesday, October 10, 2006 - 12:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्वांचे मनःपूर्वक आभार

झाड ... तू विश्लेषणा करण्याआधी मी ती कविता फार वेगळ्या अर्थाने घेतली होती . पण दोन्ही अर्थी खास . कधी भेटू तेव्हा चर्चा करू या

शलाका .. पाऊस कवितेतले काही काही शब्द फारच सुंदर उतरले आहेत.

स्वरा ... घुसमट फार आवडली . प्रलय पाशीच थांबली असती तर असाही एक विचार डोकावून गेला

सारंगा .. तंत्र सोडून मंत्र ? पण छान उतरलंय

राम ती गज़ल नाहिये रे



Ramachandrac
Tuesday, October 10, 2006 - 1:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभवा.. का रे? मला तरी ती गझलेच्या साच्यात बसती आहे असे वाटते.. pls मला समजावुन सांग रे

Vaibhav_joshi
Tuesday, October 10, 2006 - 1:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गझलेचा साचा हा एक गहन प्रकार आहे राम . यमक , अंत्ययमक , प्रत्येक ओळीत तितक्याच मात्रा आणि शक्यतो सांभाळला गेलेला मात्रांचा क्रम सुध्दा .... इतक सगळं जमून आलं तर ती गझल .. सारंगच्या कवितेत शेवटी फक्त चा आलंय म्हणून गझल कशी म्हणणार ? हे तर तुला सारंगही सांगेल

Ramachandrac
Tuesday, October 10, 2006 - 2:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभवा धन्यवाद रे... तरीही काही शंका आहेत त्या उद्याच्या भेटीत विचारतो...

Vaibhav_joshi
Tuesday, October 10, 2006 - 3:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वसंत ...

ती मुक्त खळाळत हसते तेव्हा
लकेर जाते रानी
झाडांना सुचवत गाणी

ती झाडे गुणगुण गुणगुण करती
ऋतू बदलतो सारा
वासंतिक दिमाख न्यारा

तो वसंत येतो माझ्या दारी
निरोप घेउन हाती
की सुगंध देण्यासाठी ?

श्वासात मिसळतो गंध तिचा
मी जगून घेतो थोडे
क्षणभरात सुटते कोडे

की तिच्यामुळे पालवी मनाची
अजुनी जिवंत आहे
ती खळाळेल तोवरी म्हणावे
अजुनी वसंत आहे


Lopamudraa
Tuesday, October 10, 2006 - 4:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्या बात है वैभव,... सुंदर...!!!

Sarang23
Tuesday, October 10, 2006 - 4:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्र राम आणि वैभव, धन्यवाद.
कुठे गडबड वाटतेय रे वैभवा? शेवटी फक्त चा आलाय?
माझ्या मते ही मात्रा वृत्तातील गझल आहे... " याचा " हा काफिया आहे आणि आ ही अलामत... आणि सुरेश भटांच्या म्हणण्यानुसार अशी गझल गैरमुरद्द्फ आहे... :-)


Sarang23
Tuesday, October 10, 2006 - 4:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, वसंत खासच आहे!

Devdattag
Tuesday, October 10, 2006 - 4:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग आणि वैभव सहिच रे दोघंही..:-)
सारंग, गैरमुरद्दफ़ बद्दल मेलशील का?


Vaibhav_joshi
Tuesday, October 10, 2006 - 5:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग ... तिसर्‍या शेर मध्ये मात्रा मोजताना गल्लत झाली होती .. दिलगीर आहे ... बरं झालं फोन केलास ...
राम ही गझल आहे रे ....
:-)


Sarang23
Tuesday, October 10, 2006 - 5:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो नक्की... तरी पण इथेही आपल्या सगळ्यांसाठी एक उदाहरण म्हणजे...

तुमको देखा तो ये खयाल आया
जिंदगी धूप तुम घना साया!


इथे, आया आणि साया असे शब्द आले आहेत. आया हा दोन्हीकडे सारखा आलाय. म्हणून आया किंवा साया हा झाला काफिया आणि आ ही अलामत ( स्वरचिन्ह )
अशा गझलेत रदीफ नाही... म्हणून ही गैरमुरद्दफ गझल...


Lopamudraa
Tuesday, October 10, 2006 - 5:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खुप दिवसानी बघितले कवितेकडे बर्‍याच जनांच्या छान छान कविता येउन गेल्या वाटत...
सारंग गोळाबेरीज छान आहे... आत्ता वाचली... !!! मस्त..!!


Psg
Tuesday, October 10, 2006 - 5:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, 'वसंत' अप्रतीम! मस्त!

Meenu
Tuesday, October 10, 2006 - 6:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग आता रदिफ काय तेही सांग .. म्हणजे व्यवस्थित कळेल

Sarang23
Tuesday, October 10, 2006 - 8:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक उदाहरण घेऊ…

ते तुझे मागणे कालचे रास्त होते
मोगरा माळणे पण कुठे स्वस्त होते


गझलेच्या दृष्टीने इथे तीन गोष्टी पाहण्यासारख्या आहेत.

काफिया ( यमक ) , अलामत ( स्वरचिन्ह ) आणि रदीफ ( अंत्ययमक )


रास्त होते आणि स्वस्त होते यामध्ये होते हा एकच शब्द मागे मागे चालत आल्यासारखा आहे ( म्हणजे रदीफ! )
याला आपण मराठी मध्ये यमकानंतर येणारा म्हणून अन्त्ययमक म्हणतो.

आणि यमकाचा शब्द म्हणजे रास्त आणि स्वस्त…
इथे अ ही अलामत ( स्त + अ ) म्हणजेच मराठीत स्वरचिन्ह आले आहे…

आता पुढचा शेर…

भेटणे बोलणे आपले संपलेले,
जाणताना असे टाळणे जास्त होते!


इथे काफिया जास्त ( स्त ) आणि होते हा रदीफ जसा च्या तसा आला आहे

आणि असच पुढे सगळीकडे चालु रहातं…

ज़सं की…

काळजाची अता संपली काळजी ही
काजळाचे तुझे कोरणे मस्त होते!


एका गझलेमध्ये ५ किंवा त्याहून जास्त शेर हवे असा नियम आहे

मला वाटतय की गझलेची साधारण कल्पना यायला हे पुरे आहे, नाही का?


सारंग



Zaad
Tuesday, October 10, 2006 - 9:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती,शलाका धन्यवाद.
शलाका किती सुंदर रसग्रहण केलंय तुम्ही!!
वैभव, वसंत आवडली. तू लावलेला दुसरा अर्थ (अरण्य कवितेचा) जाणून घ्यायला नक्कीच आवडेल मला.


Swaatee_ambole
Tuesday, October 10, 2006 - 10:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, ' वसंत' अप्रतिम. तुझ्या लौकिकाला साजेशी आहे.

शलाका, झाडच्या कवितेवरचं तुझं मुक्तचिंतन आवडलं.

सारंग, मी गज़ल या विषयातली शिकाऊ उमेदवार आहे, पण ' रास्त होते' आणि ' स्वस्त होते' मधे अ ही अलामत नाहीये. यात common अलामतच नाहीये.. किंवा अलामत भंग केली आहे असं म्हणावं लागेल. ' स्त' हे काफ़ियातलं common अक्षर आहे ना? मग त्याच्या आधी येणार्‍या अक्षरातला ( ज्यातले व्यंजन बदलते,) स्वर जो ( common ) असतो, ती अलामत.

आता तुझ्या आजच्या काव्याबद्दल थोडंसं..
ही मात्रावृत्तातली गज़ल आहे असं म्हणतोयस. रूढ मात्रावृत्तांपैकी दिसत नाही. म्हणजे सगळ्या ओळींमधे सारख्या मात्रा या अर्थी म्हटलं असावंस. मला मात्रांचा हिशोब नीट जमत नाही तेव्हा तो बरोबर आहे असं गृहीत धरू. तरीही या रचनेला ' वृत्तबद्ध' रचना म्हणता येईल का? ' वृत्त' याचा अर्थ जे ' आवर्ती' आहे, सारख्या वजनाच्या अक्षरसमूहांमुळे लयीत म्हणता येतं, ते वृत्तबद्ध काव्य. तुझी रचना लयीत वाचता येत नाही. तेव्हा मुळात हे मात्रावृत्तच नाही, गज़ल आहे की नाही हा पुढचा प्रश्न.

तसंच मला अर्थही नीटसा कळलेला नाही. विशेषतः पहिल्या द्विपंक्तीचा. पण तो तू समजावून सांगशीलच.


मीनू आणि इतर इच्छुकांसाठी.. गझलेच्या व्याकरणाबाबत
इथे चांगली माहिती आहे.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators