|
Ashwini
| |
| Thursday, October 05, 2006 - 5:31 pm: |
| 
|
वैभव, मस्तच. .. ..
|
Daad
| |
| Thursday, October 05, 2006 - 7:40 pm: |
| 
|
वैभव, सुकलेला गजरा बकुळीचा का रे? ... सुकल्यावरही दरवळणारा? मनाची महिनाअखेर? किती खरखुरं लिहिलयं? -- शलाका वैभव, सुकलेला गजरा बकुळीचा का रे? ... सुकल्यावरही दरवळणारा? मनाची महिनाअखेर? किती खरखुरं लिहिलयं? आनंद, मस्त! -- शलाका
|
Daad
| |
| Thursday, October 05, 2006 - 7:47 pm: |
| 
|
पाऊस आज पाऊस पाऊस आला आला, गेला गेला न्हाऊ-न्हाऊ सारे सारे, झाले नितळ सुंदर झाला हिरवा काळोख त्यात विजेचा लकाक जणू हिरव्या साडीला चंद्रकाडीची किनार षड्ज पिवळ्या ऊनाचा मंद समीर पंचम श्रुती श्रुती वेचीतो का मृत्त्:गंधाचा गंधार केळ लेकुरवाळी ही समजावी बकुळीला नको मोगर्याचे ऐकू, सडा आपला आवर आपल्यातंच ना दंग वडा-पिंपळाचे पार? मस्तं पिंजारीत झुले माड झावळ झिंजार मान तिरपी करून पुसे जुई अशोकाला, 'दूर काळ्या त्या ढगाचा कोणता रे तो आकार?' चाफा डुलतो पिवळा कोण्या गंधचाहुलीने? शेव पीळीत हासते वेल कोरांटीची नार वळचणीचे ते रोप, कुणी लावले? कशाचे? त्याला न्हाऊ घालते गं एक पागोळ्यांची धार गंध दाटला दाटला मनमोराचा पिसार जिथे नजर नजर, हिर्या-पाचूचा डवंर मनातल्या सखयाचा मनातलाच वावर तापलेल्या कायेतून मग हिरवा हुंकार -- शलाका
|
Swara
| |
| Thursday, October 05, 2006 - 10:31 pm: |
| 
|
वैभव, तुमचे अर्थपूर्ण तरी नेमके शब्द. सुंदरच. शलाका, मस्त आहे ग! आनंद, कविता आवडली.
|
वैभवा,सुकलेला गजरा सही रे..
|
Jo_s
| |
| Thursday, October 05, 2006 - 11:23 pm: |
| 
|
kiru धन्यवाद वैभवा मस्तच, झाड, शलाका छान सुधीर
|
Sadda
| |
| Friday, October 06, 2006 - 12:57 am: |
| 
|
वैभव सुकलेला गजरा मस्तच... 
|
Zaad
| |
| Friday, October 06, 2006 - 5:16 am: |
| 
|
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद मित्रान्नो!! वैभव, तुझ्या मनाची महिनाअखेरच जर अशी श्रीमंत असेल तर मग सुरुवात कशी असेल? शलाका, खूपच छान. वळचणीचे ते रोप, कुणी लावले? कशाचे? त्याला न्हाऊ घालते गं एक पागोळ्यांची धार व्वा!!!! दाद, माझं इथलं नाव 'झाड' असंच आहे. खरं तर या कवितेचं निरुपण नक्की नाही देता येणार मला. आमच्या रूम मधे क्यलेंडरवर अरण्याचं एक चित्र आहे, ते पाहून मला सुचली ही कविता. मुद्दाम काही सांगायचे नाहीये मला या कवितेतून, पण एकूणच अरण्यातलं जीवन,तिथला अंधार, त्यामूळे होणारं गहन गूढ वातावरण, एकाच जागी वर्षानुवर्षं उभी असलेली झाडं या सार्या गोष्टींमुळे मी अंतर्मुख झालो.....पण मग माझ्या मनातल्या भावनांचं प्रतिबिंब या अरण्यात पाहताना एकदम लक्षात येतं, अरे अरण्य आपल्या पोटातला अंधार असा कुठेच भरत नाहीत....कदाचित म्हणूनच कधी गळून पडत नाही अरण्य गंधार! झाडे देखील सजीवच. पण त्यांच्यात गती नाही. पण त्यांच्यात कसले विकार नसतात.विकार नसलेले सजीव.बेचिराख़ होताना ती कुणाला शाप देऊ शकत नाहीत. आसरा देतानाही निरपेक्ष असतात... वगैरे. या गोष्टी मी नव्याने सांगतोय असं नाही. पण त्यावेळी ही कविता सुचली तेव्हा या पूर्वसंस्काराने माहित असलेल्या गोष्टीच मी मांडल्या असाव्यात. काहीही असले तरी त्या चित्रातले वातवरण आणि त्यावेळची माझी (कातर म्हणायला हरकत नाही )अवस्था याची परिणती या कवितेत झाली!
|
हल्ली संध्याकाळ एकटी येत नाही …… तुझ्या भेटीची आस आणते जातान एकटीच जाते पण रात्र बनुन येताना ………… सोबतीला तुझे भास आणते! ह्या पावसाच्या उनाडक्या की ही मातीच मला छळतीये? ओलं ओलं होताना ती तुझ्या केसांचा वास आणते.. ……….. सोबतीला तुझे भास आणते! तुझ्या आठवणिंची आता मला भिती वाटायाला लागलीये संधिप्रकाश पडला की ती थरथरलेला श्वास आणते… ……….. सोबतीला तुझे भास आणते! माझ्या कवितेलाही तुज़ं किती वेड लागलय तु नसशील तिच्यात सामावलेली तर ती प्रत्येक ओळ उदास आणते…. ……….. सोबतीला तुझे भास आणते! धुंद रवी
|
वैभवा... गजरा सुंदर रे.. खास वैभव टच आहे कवितेला..
|
Bee
| |
| Friday, October 06, 2006 - 7:16 am: |
| 
|
झाड, परिणिती नाही परिणती आहे तो शब्द. बहुतेक मराठी लोकांची ह्या शब्दाबाबत हीच चुक होते, असे का असावे कळत नाही.. धुंद रवी, चांगलाच प्रेमात पडलेला दिसतोस.. :-)
|
Zaad
| |
| Friday, October 06, 2006 - 9:14 am: |
| 
|
धन्यवाद बी! मलाही काही तरी खटकतच होतं.
|
शलाका, छान लिहीलंयस. मलाही ते ' वळचणीचे ते रोप..' आवडलं. झाड, आता ही पार्श्वभूमी कळल्यावर पुन्हा प्रयत्न करते तुझी कविता समजून घ्यायचा. पण तू शब्द छान वापरतोस. वातावरणनिर्मिती सुंदर होते.
|
Swara
| |
| Friday, October 06, 2006 - 9:05 pm: |
| 
|
घुसमट आतली घुसमट वाढता वाढता इतकी वाढल्ये... की माझ्या खिडकीतून दिसणारा आकाशाचा तुकडा काळवंडून गेलाय. श्वासही ईतके जड झालेत की पेलवत नाहीत आता. निश्वास दबलेले असे की आतली काजळी सांडू नये बाहेर. आणि सोईस्करपणे छाती फुगते आहे भात्यासारखी आतली पोकळी वाढवत. कृष्णवलय दडवलय मी माझ्याच आत. भीती वाटते कधीतरी अंतरीची गाठ सुटेल. आणि माझ्याच घराचे वासे ओढले जातील आत. आणि मग... प्रलय! सारं संपल्यावर काय उरेल पूर्वीच? मग नवं घर, नवे वासे आणि नवी घुसमट... अगणित, अनंत आणि अंतस्त.
|
Swara
| |
| Friday, October 06, 2006 - 9:24 pm: |
| 
|
चीर शांती पुन्हा लोटलस मला तू निराशेच्या खोल गर्तेत. पण ही वेळ शेवटचीच. कारण नेहेमी आत काहीतरी तीळ तीळ तुटणारं आणि कण कण जळणारं, आज पूर्ण मेलयं. माझ्याचं स्वप्नांचा चक्काचूर माझ्याचं काळजात रुततोय आणि भळभळा वहातय रक्त. पण आता वेदना मात्र नाही. आहे ती चीर शांती, सर्व काही विलीन करून घेणारी...
|
Niru_kul
| |
| Monday, October 09, 2006 - 7:01 am: |
| 
|
इंद्रधनू..... तू मला नकार देशील असं होऊच शकत नाही.... छे! ते तुला शक्यच नाही.... कारण मला माहीत आहे, माझं प्रेम अजिबात दुबळं नाहीये... माझी भावना असमर्थ कशी ठरु शकते? आणि तुझ्या मनातही खोलवर कुठेतरी, माझ्या प्रेमाला जागा आहेच ना! तू कितीही नाही म्हणालीस तरीही, तू नक्कीच माझा विचार करतेस.... म्हणूनच तर माझ्या सहवासात, तू इतकी खुलतेस.... भले मग तुला दुनियादारी रोखत असेल, किंवा बंधनाच्या भयामुळे तू बोलत नसशील.... पण लक्षात ठेव, मी तुझ्याबाबतीत इतका खंबीर आहे, की तू जेवढा काळ मला तिष्ठत ठेवशील, तितकीच जास्त मी तुझी वाट पाहीन... आणि तूला माझ्या भावना समजत नाहीत, असं तू कसं म्हणू शकतेस? इंद्रधनुष्याचे रंग जाणायला काही आकाश व्हावे लागत नाही, नुसतं जमिनीवरुनही डोळाभर पाहीले, की त्या इंद्रधनूचे रंग सरळ मनाला भिडतात.... तुला आवडतो ना इंद्रधनुष्य! मग माझ्या मनाचा इंद्रधनू तू कसा नाकारु शकतेस? विचार स्वतःच्या मनाला, आणि बघ काय उत्तर येतं ते! मग जाणवेल तुझं तुलाच, की तू माझं आयुष्य इतकं सुंदर कसं करु शकतेस ते...... kavita edit karun punha takli aahe...
|
Niru_kul
| |
| Monday, October 09, 2006 - 8:05 am: |
| 
|
जाणीव.... आज पुन्हा व्यथा, जाणवायला लागली आहे, पुन्हा भरभरुन तुझी आठवण, यायला लागली आहे.... जीवापाड जपली होती, मनावरची खपली, आज पुन्हा तीच जखम भळभळून, वहायला लागली आहे.... खूप कष्टाने, आवरले होते मी आसवांना, आज पुन्हा पापणी, ओली व्हायला लागली आहे.... विसरु पहात होतो, त्या मोहक क्षणांना; वेदना ओठांवर माझ्या, हास्य आता फुलवायला लागली आहे.... कळलेच नाही मला, कसा जगलो मी तुजविना, जाणीव मृत्युची आता, मला व्हायला लागली आहे....
|
वा!!!,वैभव,सुकलेला गजरा सुगन्ध इथपर्यन्त आला.. स्वरा,हं काय बोलू?? रवी,खुपच सुन्दर.. दाद,छानच. निरु,जाणीव खरेच.. अप्रतिम
|
Swara
| |
| Monday, October 09, 2006 - 5:11 pm: |
| 
|
मृद्गंधा, "स्वरा,हं काय बोलू??" म्हणजे कविता अजिबात आवडली नाही असे का?

|
Daad
| |
| Monday, October 09, 2006 - 8:44 pm: |
| 
|
झाड, सुंदर आहे विश्लेषण तुमचं. कवितेबद्दल कवीच्या तोंडून ऐकण्यात एक वेगेळी मजा असते. किती किती समर्पक आहे ही कविता... मला सुचलेलं सगळं इथे लिहिते आहे! ही कवितांची BB आहे हे जाणूनही. झाडं, देण्याचं वरदान घेऊनच जन्माला येतात. जगतात तोवर आणि मेल्यावरही... ती देतातच! कुंती काय, कर्ण काय आणि अश्वत्थामा काय...... वरदानं मागून घेतली... आणि शापासारखी भोगली! जणुकाही 'वरदान मागणं' हाही एक शापच. तुमच्या अरण्यातल्या झाडांसारखंच! मिळालेल्या वरदानानं ह्या तिघांना मुक्त केलं नाही...... तर जखडून ठेवलं..... तुमच्या अरण्यातल्या झाडांसारखंच! कुंती आणि कर्ण यांनी जे वाट्याला आलं ते, भोगलं.... शापलं नाही कुणाला... तुमच्या अरण्यातल्या झाडांसारखंच! एकटी एकटी होऊन असहाय्यपणे रडली आहेत..... कर्ण आणि कुंती तुमच्या अरण्यातल्या झाडांसारखींच! एकच फरक त्या तिघांच्या संज्ञा लुप्त झाल्या नाहीत कधीच... म्हणून तुमच्या अरण्यातल्या झाडांसारखी अद्वैताला पोचली नाहीत ती! अश्वत्थामा तर संज्ञाचं ओझं घेऊन अजूनही फिरतोय! एका अर्थानं सुखी आहे मानवजात! झाडं सजीव खरी पण, त्यांना चिरंजिवित्वाचा शाप नाही अश्वत्थाम्या सारखा.... कारण, मग त्यांनी सोडलेल्या ब्रम्हास्त्रानं सार्या गर्भवती उत्तरांचा गर्भ खंडित झाला असता आणि त्यांना वाचवील असा कृष्णही नाही आपल्यात....... असो... खूप खळबळ उडवून गेलीय ही कविता. असेच लिहित रहा!! -- शलाका
|
|
|