Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 04, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » आश्विन » काव्यधारा » काहीच्या काही कविता » Archive through October 04, 2006 « Previous Next »

Lopamudraa
Wednesday, September 27, 2006 - 2:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्तच अगदी मृ... छान केलाया अनुवाद...!!!

Bhramar_vihar
Wednesday, September 27, 2006 - 3:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या, मस्तच. मृण्मयी, शेवटी लाटणं घेउन तू अगदी भारतीय वळणावर आणलस कवितेला! उच्च!

Rupali_rahul
Wednesday, September 27, 2006 - 5:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या, बडबडगीत नेहमीप्रमाणे खासच...
मृ, कवितेचा अस्सल मराठी अनुवाद केलास...


Psg
Wednesday, September 27, 2006 - 5:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृण, अनुवादित वाटत नाहिये इतकी छान झालीये कविता :-) मस्त

Princess
Wednesday, September 27, 2006 - 6:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृण, खुप छान अनुवाद केलाय ग... :-)

Mrinmayee
Wednesday, September 27, 2006 - 8:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रतिक्रियांबद्दल मन:पूर्वक आभार!
मिल्या, खूपच छान जमलीय कविता! मजा म्हणजे माझ्या मैत्रिणीच्या मुलाकडे 'हातात मोबाईल घेतलेल्या माकडाचं' चित्र आहे. तुझ्या नावासगट तिला कविता दिली. तिच्या कडून Thanks ! तिचं पिल्लु खूश होईल! :-)


Menikhil
Wednesday, September 27, 2006 - 9:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्या दिवशी तर बॉस कमलच झाली
मी चहा पीत असताना 'ती' समोर दिसली
नजरानजर होताच वाटल ती थोडिशी हसली
मग मी पण न बघितल्यागत नजर माझी फिरवली

वाराही त्या दिअवशी जरा खट्याळ झला होता
कुरळ्या बटांना तिच्या वर वर उडवत होता
ओढणीला तिच्या वेटोळे घालत होता
अन तिला बिचारीला सावरता सावरत नव्हता

"काय मस्त वारा सुटलाय" म्हटल जाउन म्हणाव
कोण? कुठली? नाव काय? म्हटल जाउन पुसाव
टी एल नी पण का ह्याच वेळी पचकाव?
अन महत्वाच काम म्हणुन केबिनमधे न्याव!

असो....

त्याच दिवशी ती पुन्हा मला भोजनालयात दिसली
योगायोगाने जेवायला ती माझ्याच समोर बसली
पण ती बसताच समोर...माझी टीम उठली
अन दैवाने माझी अशी पुन्हा फिरकी घेतली

"पुन्हा भेटेल आजच" ह्याची मला खात्री वाटली
जीव ओतून वाट बघायची नको ती सवय लागली
पण आजवर ती मल कधीच नाही दिसली
अन रेशमची का काय म्हणतात ती गाठ बांधण्या आधीच तुटली


Swaatee_ambole
Wednesday, September 27, 2006 - 10:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या, मस्त.
मृण, सहीच जमलाय अनुवाद.


Vaibhav_joshi
Thursday, September 28, 2006 - 6:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृण्मयी

मस्त जमलंय !!!!


Shyamli
Thursday, September 28, 2006 - 6:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अय्या मृ मस्त ग....
जबरदस्तच आवडल

मील्या सहिच


Meggi
Friday, September 29, 2006 - 1:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या, लय झक्कास :-) मृ, सगळ्या नवरे मंडळींच्या पाठित लाटणं घातलस की
निखिल, मस्त आहे कविता.. स्वानुभव आहे का रे? भेटेल.. भेटेल.. नक्कि भेटेल.. सध्या onsite ला गेलि असेल :-)


Jayavi
Friday, September 29, 2006 - 5:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृ, एकदम आवडेश :-)

निखिल, सही रे सही :-)


Jayavi
Tuesday, October 03, 2006 - 4:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही माझी एक बालकविता :-)

माझ्या राज्यात

नको गं उठवू आई
रंगलेय मी स्वप्नात
मी आहे राणी
माझ्या छोट्याशा राज्यात

आईस्क्रिमची नदी
अन् चॉकलेटची नाव
पेपरमिंटचे डोंगर
अन् बिस्किटांचा गाव

नाही इथे शाळा
अन् No Homework
फक्त आहे मज्जा
And no more work

दिवसभर खेळ फ़क्त
दिवसभर धम्माल
आम्हाला रागवायची
नाही कुणाची मजाल

रात्र होताच मात्र
संपली सारी खुशी
दुसरे काही नको आता
हवी तुझी कुशी

जयश्री


Himscool
Tuesday, October 03, 2006 - 5:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूळ कविता
खुश रहो!
जिन्दगि है छोटी हर पल मे खुश रहो...
ऑफ़िस मे खुश रहो, घर मे खुश रहो..
आज पनीर नही है, दल मे ही खुश रहो,
आज जीम जाने क समय नही, दो कदम चल के ही खुश रहो..
आज दोस्तों का साथ नही, TV देख के ही खुश रहो..
लडकी / लडका पटा नही सकते तो उस के सपने देख के खुश रहो...
आज कोइ नाराज़ है, उसके इस अंदाज़ मे भी खुश रहो..
ज़िसे देख नही सकते उसकी आवाज़ मे ही खुश रहो...
ज़िसे पा नही सकते उसके याद मे ही खुश रहो...
MBA करने का सोचा था, S/W मे ही खुश रहो...
Laptop ना मिला तो क्या, Desktop मे ही खुश रहो..
बीता हुआ कल जा चुका है, उसकी मीठी यादे है, उनमे ही खुश रहो..
आने वाले पल का पता नही.. सपनो मे ही खुश रहो...
हसते हसते ये पल बितायेंगे, आज मे ही खुश रहो...
जिन्दगी है छोटी, हर पल मे खुश रहो.....!!

अनुवाद -
आनंदी रहा!!!
हे जीवन छोटेसे आहे, प्रत्येक क्षण आनंदी रहा...
आनंदी रहा कार्यालयात आणि घरी सुद्धा आनंदी रहा...
आज पनीर मिळणार नाही, आमटी खाऊनच आनंदी रहा...
आज व्यायाम करायला वेळ नाही दोन पावलेच चालून आनंदी रहा...
आज मित्र बरोबर नाहीत, टी व्ही बघुनच आनंदी रहा...
मित्र / मैत्रिण पटवु शकत नाहीस, ती / तो जवळच आहे असे मानुन आनंदी रहा...
आज कोणीतरी नाराज आहे, त्याच्या नाराजी मध्येच आनंदी रहा...
जे काही दिसत नाही, त्याचा आवाज ऐकुनच आनंदी रहा...
जे मिळवू शकत नाही, त्याच्या आठवणीतच आनंदी रहा...
एम बी ए करायचे ठरवले होते, आय टी मध्येच आनंदी रहा...
लॅपटॉप नाही मिळाला तर काय, डेस्कटॉप मध्येच आनंदी रहा...
गेलेल्या क्षणांच्या गोड आठवणीत आनंदी रहा...
येणार्‍या क्षणांच्या स्वप्नात आनंदी रहा...
हसत हसत हे क्षण निघुन जातील आज आनंदी रहा...
हे जीवन छोटेसे आहे, प्रत्येक क्षण आनंदी रहा...
हिमांशु



Moderator_2
Tuesday, October 03, 2006 - 7:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गजानन,
तु पोस्टलेली कविता खालिल ठिकाणी हलवली आहे.


/cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=103385&post=874426#POST874426

Princess
Tuesday, October 03, 2006 - 7:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जया छान लिहिलिय ग... थोडासा बदल करुन माझ्या छोट्याला म्हणुन दाखवली मी... राणीचा राजा बनवला मी त्याला:-)

Kiru
Tuesday, October 03, 2006 - 11:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जयावी,
एकदम cute झालीये कवीता.. शेवट छानच..

हिमांशु.. खूप छान लिहिलयस.
आपण आयुष्यात मोठेच आनंद शोधत रहातो आणि अशा मोठ्या आनंदामागे धावताना छोटे छोटे आनंदाचे क्षण मात्र आपल्या हातून अलगद निसटून जातात..


Bee
Wednesday, October 04, 2006 - 12:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जयवी आधी सांग तू जयवी की जयावी? मला वाटते तुझ्या नावाचा उच्चार जयवी आहे. मागे मूडीनेही तुला जयावीच म्हंटले होते म्हणून विचारतो आहे.

कविता खूप सुंदर आहे.. लहान मुलांच्या मनात तुला डोकावता आले..


Jayavi
Wednesday, October 04, 2006 - 1:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम, किरु, बी, धन्यवाद :-)

बी, खरं तर माझं नाव जयश्री आहे रे. माझ्या नवर्‍याचं नाव अविनाश आहे म्हणून मी जयवी असं नाव घेतलंय. तू मला जयू म्हटलंस तरी चालेल :-)


Dineshvs
Wednesday, October 04, 2006 - 12:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जयवी, छान आहे कविता.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators