|
Vnidhi
| |
| Monday, September 11, 2006 - 10:08 pm: |
| 
|
pls पुढे जाऊ दे...कथा....उत्सुकता वाढत चालाली आहे...
|
Smitu
| |
| Tuesday, September 12, 2006 - 3:49 am: |
| 
|
शोनू- कथा छान रंगते आहे...
|
Fulpakhru
| |
| Thursday, September 14, 2006 - 3:43 pm: |
| 
|
शोनू लवकर पुढचा भाग टाक. छान लिहिते आहेस
|
Shonoo
| |
| Friday, September 15, 2006 - 1:22 pm: |
| 
|
दिसायला सुन्दर, हजारात उठून दिसेल असं रूप. आतिशय हुशार, कामाचा उत्साह आणि उरक दांडगा. युनिव्हर्सिटी मधे मोठ्या पदावर असून देखील गर्व नाही. विद्यार्थ्यांशी आणि प्राध्यापकांशी मिळून मिसळून वागणार. कोणाला काही अडचण आली तर ती कशी सोडवता येईल याच्यावर भर. नाहीतर युनिव्हर्सिटी मधले तिच्या लेव्हलचे बरेच लोक' प्रश्न तत्वाचा आहे' म्हणून अडवणूक करण्यात पटाईत. पण हिने कधीही कोणालाही नुसतं ' Sorry, it doesn't fit in our policy ' म्हटलेलं नाही. कॉलेजच्या सुरुवातीला एक्-दोन (माझ्या मते ) फालतु बॉयफ़्रेन्ड होते. त्यांचा डोळा तिच्या रूपावर आणि तिच्या कमाईवर असे. त्या बॉयफ़्रेन्ड ना जेऊ खाऊ घालणे, त्यांचे होमवर्क करून देणे इत्यादी कामे जुलिआ आवडीने करत असे. ते टोळ्भैरव हिचा फायदा घेत आणि ही जरा सीरियस रिलेशनशिपचा विचार करत्येय असं दिसलं की काढता पाय घेत. पण कधी तरी ते तिचं तिलाच कळलं ' I am following in my mom's footsteps' म्हणाली होती. तेंव्हापासून फारसे सीरियस बॉय्फ़्रेन्ड कोणी दिसले नाहीत. एखाद दोन डेट झाल्या की हीच बर्याच जणांना कटवत असे. याला अपवाद 'पीस कोअर' वाला. तो सोडून गेला तेंव्हा मलाही फार वाईट वाटलं होतं. नंतर जेफ शी ओळख झाली ती योगायोगानेच. तो ही आमच्याच युनिव्हर्सिटीमधे बिझनेस स्कूल मधे पी एच डी करत होता. एका अकाउन्टिन्ग फ़र्म मधे चार्-सहा वर्षं नोकरी करून तो परत शिक्षणाकडे वळला होता. त्यांच्या डिपार्टमेन्टमधे नवे कम्प्युटर बसवायला जुलिआ च्या लॅब मधले काही लोक जात असत. त्यांच्या कामावर देखरेख ठेवायला कधी कधी ही पण जात असे. तिथे जेफशी ओळख झाली. लवकरच जुलिआ त्याच्या रीसर्च शी सम्बंधित कम्प्युटरच्या कामामधे मदत करू लागली. त्या कामानिमित्त दोघांच्या भेटी गाठी वाढू लागल्या. मॉडेलिन्ग, सिम्युलेशन असल्या किचकट, रटाळ विषायांवरून सुरू झालेली गाडी मैत्रीचं स्टेशन ओलंडून सरळ प्रेमाच्या गावाला पोचली तोवर आमच्या डिपार्टमेन्ट मधे कोणाला काही कळलं नव्हतं.
|
Shonoo
| |
| Friday, September 15, 2006 - 1:25 pm: |
| 
|
सध्या ऑफ़िसच्या कामात खूप बिझी आहे. जमेल तसं हळू हळू एक-दोन- पानं लिहीतेय. पण वाचणारे आहेत, प्रतिक्रिया देणारे आहेत हे पाहून हुरूप येतो.
|
Sayba
| |
| Friday, September 15, 2006 - 2:39 pm: |
| 
|
छान आहे. काही काळजी करु नका. वर्षभर चालणार आहे ना ही गोष्ट. 
|
Shonoo
| |
| Friday, September 15, 2006 - 9:23 pm: |
| 
|
माझी आणि जुलिआची ओळख झाली तेंव्हा पासून दर वर्षी Thanksgiving ला मी तिच्या घरी जात आहे. तिच्या आईच्या वडिलांच्या घरी खरं तर. पण आजी गेल्या पासून घर चालवण्याची जबाबदारी जुलिआ ची. त्यात पुन्हा Thanksgiving म्हणजे जुलिआच्या आवडीचा सण. त्या दिवसासाठी ती बरंच खपून स्वैपाक करत असे. घर आवरणे, ठेवणीतली भांडी कुंडी काढून ठेवणे इत्यादी बरीच कामे असत. त्यात कधी घरच्यांची मदत मिळे तर कधी तिला सर्व एकटीला करावे लागे. पण ती कधी कुरबूर करत नसे. ज्या वर्षी जेफ़शी ओळख झाली त्यावर्षी thanksgiving च्या आठवड्यात सोमवारी मला म्हणाली 'तुला काहीतरी सांगायचंय' . मला वाटले की यंदा thanksgiving कॅन्सल की काय? पण बराच वेळ आढेवेढे घेऊन शेवटी म्हणाली की तिने जेफला पण त्या दिवशी बोलावले आहे. एखाद्या मुलीने मित्राला ( किंवा मुलाने मैत्रिणीला) thanksgiving डिनर ला घरी बोलावले म्हणजे मामला सीरियस म्हणायला हरकत नसते. माझा आश्चर्यचकित चेहरा पाहून म्हणाली ' मला वाटलंच होतं तुला काही कल्पना नसणार. त्यादिवशी त्याला माझ्या घरी पाहून तू चक्रावशील म्हणून तुला आधी सांगितलं'. Thanksgiving च्या दिवशी जेफने सर्वांना जिंकून घेतलं. आजोबांना तर तो फारच आवडला. आतापर्यंत जे जे मित्र त्यांच्या मुलींनी किंवा नातींनी आणले होते त्यात हा सर्वात उजवा असल्याचेही त्यांनी सांगून टाकले. त्याचवर्षी ख्रिस्मसच्या आदल्या रात्री जुलिआ जेफच्या आईवडिलांच्या घरी त्यांना भेटली. त्यांना ही जुलिआ एकदम आवडली. पुढच्या वर्षीच्या Valentine डे ला जेफ ने तिला प्रपोझ केलं आणी लगेच जून महिन्यात त्यांचं लग्न लागलं होतं. अमेरिकन पद्धतीप्रमाणे प्रपोझ केल्यानंतर निदान वर्षभर तरी वाट पाहून ( आणी तयारी करून ) मग लग्न व्हायला पाहिजे होतं. पण जेफ आणि जुलिआ दोघांनी लवकर आणि साधेपणी लग्न करायचं ठरवलं होतं
|
Shonoo
| |
| Friday, September 15, 2006 - 10:50 pm: |
| 
|
लग्नाच्या वेळी जुलिआ युनिव्हर्सिटीमधे नोकरीला लागलीच होती. लवकरच जेफने पण आपला थीसिस सादर केला आणि त्याला त्या नामांकित इंव्हेस्टमेंट बॅंकेत नोकरी लागली होती. त्याच्या रीसर्चच्या विषयाशी निगडीत काम होतं त्याचं त्यामुळे तो खूप खूष होता या नव्या नोकरीवर. दोघे नवरा बायको आठवडाभर सणकीन काम करायचे, शनिवार रविवार मजा करायचे हायकिंग, बाइक राइड, कॅम्पिंग, नाटक्-सिनेमा, बाहेर जेवणे खाणे. या दरम्यान माझा संसार वाढत चालला होता. नवरा, दोन मुलं, सर्व साधारण भारतीय लोकांच असतं तसं उपनगरात भलं थोरलं घर, त्या घराची देखभाल, सर्व सांभाळून नोकरी करायची म्हणजे तारेवरची कसरत वाटत असे मला. जुलिआ आणि जेफ दोघांनी एकमताने मुलं नकोत असा निर्णय घेतला होता. जुलिआचं हे मत तिच्या लग्नाच्या आधी पासून मला माहिती होतं. कितीतरी वेळा वाद घातले असतील आम्ही या विषयावर. ती म्हणायची की प्रत्येक जोडप्याने मुलं जन्माला घातलीच पाहिजेत अशी सक्ती का असावी. मी म्हणत असे की जन्माला नका घालू पण दत्तक तरी घ्या. parenthood काय असतं हे दुसर्यांकडे पाहून कसं कळणार? पण तिला पटायचं नाही. मला वाटत असे की तिला तिच्या आईवडिलांकडून तिला जी वागणूक मिळाली त्यावरून ती अशी झाली असावी. पण जेफ चे आइ वडील अतिशय मनमिळाऊ, गेली ३०-४०वर्षे सुखासमाधानेने एकत्र राहिलेले आहेत. त्याला सुद्धा असं का वाटावं? मला कधी कधी त्या दोघांचा हेवा वाटत असे. काही बन्धन नाही, जबाबदार्या नाहीत. मनात आलं की बाहेर जायला मोकळे. आमच्या कडे बाहेर जायचं म्हणजे घरातून निघून गाडीत सर्व जण आणि सर्वांचं सर्व सामान स्थानापन्न होईपर्यंत एक तास सहज लागतो. तेव्हढ्यात कोणाला शी/ शू काही आली नाही तर! पण केंव्हाही अडीअडचणीला आणि पुष्कळदा सहज म्हणून सुद्धा जेफ आणि जुलिआ आमच्या मुलांना सांभाळत असत. मुलांना देखील अंकल जेफ आणि आंटी जूल्स फार आवडत असत. जेफची जर नुसती नोकरी गेली असती तर त्याला दुसरी नोकरी लगेच मिळाली असती. आणि जुलिआच्या एकटीच्या पगारात सुद्धा त्यांचं व्यवस्थित भागलं असतं. त्यामुळे जुलिआची समस्या आर्थिक नव्हती हे नक्की. पण ती अगदी आतून धुमसत असल्यासारखी का वाटत होती? गेल्या तीन्-चार दिवसात तिने आणि जेफने बरीच चर्चा केली असणार, बर्याच लोकांशी बोलणं झालं असणार पण तिची अशी तडफड का? तिला अजून मार्ग सापडलेला नाहीये म्हणून ती अशी बेचैन आहे का? घरी पोचले तरी माझ्या मनात तिच्याबद्दलच उलट सुलट विचार घोटाळत होते. घरी पोचल्या पोचल्या दिवसभराची तुम्बलेली कामं दिसली आणि हे सर्व विचार कुठल्या कुठे पळाले. सर्व कामं आटोपून मुलांना झोपवून झाल्यावर नवर्याने विचारलं everytrhing Ok with Jules? . मानेनेच नाही म्हटलं माझ्या डोळ्यात तरळलेलं पाणी पाहून तो आणखीन काळजीत पडला. मग मी त्याला अगदी थोडक्यात सगळी गोष्ट सांगितली.
|
Bee
| |
| Sunday, September 17, 2006 - 11:28 pm: |
| 
|
शोनू, लिहित रहा.. आम्ही खरच वाचतो आहे.. :-)
|
Shonoo
| |
| Monday, September 18, 2006 - 9:49 pm: |
| 
|
नवरा म्हणाला ' अगं असं होत असतं corporate जगात. तुम्ही युनिव्हर्सिटीच्या जगात असता. बाह्य जगाशी तुमचा संबंध फारसा येत नाही. वरिष्ठांशी पटत नसेल तर काहीही बारक्याश्या कारणावरून काढून टाकतात. दोन चार दिवसात जुलिआला पण कळेल. एखाद दोन महिने घरी बसेल जेफ आणि मग परत नोकरी ला लागेल. त्याच्या कामाचे रीझल्टस बघतात लोकं फक्त. त्याला सहज नवी नोकरी मिळेल. काळजी करू नका तुम्ही.' पुढचा आठवडा जरा धावपळीचा गेला. नवीन वर्षाची सुरुवात, नवीन वेळापत्रक, नवे विद्यार्थी, नवे वर्ग. सर्व स्थिरथावर व्हायला वेळ लागणारच. त्या शुक्रवारी सकाळची एक लॅब फक्त होती. मग दिवस मोकळा होता. लंच ला भेटू या का म्हणून मी IM केला त्याला ताबडतोब उत्तर आलं 12:30, my office . मी खूष झाले. त्यांच्या मजल्यावरचा cafetaria एकदम पॉश आहे. डझनभर डीन आणि प्रोव्होस्ट वगैरे लोकांची ऑफ़िसेस आहेत तिथे. शिवाय मोठमोठ्या महत्वाच्या लोकांशी मीटिन्ग्स साठी दोन तीन कॉन्फ़रन्स रूम्स ही आहेत. Cafetaria एका कोपयात असल्याने तिथून कॅम्पस्चा बराचसा भाग दिसतो. इतक्या उंचावरून आपल्या रोजच्या जाणायेणाच्या वाटा, शिकवण्याच्या इमारती पहायला मला नेहेमीच आवडतं. शिवाय त्यांच्या cafetaria मधे जेवण अतिशय छान असतं अन सर्व्हिसपण मस्त असते. जुलिआला मात्र खाली येऊन टपरीवरून सॅन्डविच खायचं असतं नेहेमी. आज वरती जेवायला मिळणार म्हणून मी झपाझप तिच्या इमारतीच्या दिशेने जात होते. वाटेत लॉ स्कूल चे एक प्रोफ़ेसर दिसले I suppose you are headed to see your freind . माझी आणि जुलिआची मैत्री युनिव्हर्सिटी मधे जगजाहीर. मी नुसतंच हसून मान डोलावली. ' मी पण तिलाच भेटायला चाललोय'. माझ्या चेहर्यावरचं प्रश्नचिन्ह त्यांच्या लक्षात आलंच. पण त्यांनी फारसा खुलासा केला नाही. मी पण फार ताणून धरलं नाही. नवीन वर्ष कसं काय, उन्हाळाच्या सुटीत काय केलंत अशी फुटकळ प्रश्नोत्तरं होता होता आम्ही जुलिआच्या ऑफिसपाशी येऊन पोचलो. ती तयारच होती. मग आम्ही cafetaria मधे येऊन स्थानापन्न होईपर्यंत अशाच गप्पा चालू होत्या.
|
छान, चालु द्या आणि वेळ मिळेल तस लिहा पण लिहा नक्कि आम्हि वाट पाहतोय :-)
|
Shonoo
| |
| Wednesday, September 20, 2006 - 2:58 pm: |
| 
|
जेवता जेवता मग जुलिआ आठवडाभरातल्या घडामोडी सांगू लागली. जेफ ज्या वकिलाशी बोलत होता त्याने जेफ ची केस घेण्याबद्दल फारसा इन्टरेस्ट दाखवला नाही. त्यामुळे जेफ ने तो नाद सोडला होता. पण जुलिआ च्या मते त्याने इतक्या सहज हार मानणे चुकीचे होते. निदान खटला दाखल तरी करावा मग पुढचं पुढे बघता येईल असं तिला वाटत होतं त्या संदर्भात पुढे बोलणी करायला प्राध्यापक महाशयांना बोलावलं होतं तिने. त्यांचंही एकन्दरीत मत माझ्या नवर्यासारखंच होतं. पण जुलिआ चा कल पाहून त्यांनी जुलिआ ला मदत करायची तयारी दर्शवली. ते म्हणाले की आतापर्यंत चाललेल्या अशा केसेस चा अभ्यास करून ते नक्कि काय करायचं ते ठरवतील. माझी कल्पना होती की प्राध्यापकांच्या शोधातून जी माहिती मिळेल त्यावरून जुलिआ चं मत बदलेल आणि ती जेफच्या कंपनी विरुद्ध खटला वगैरे करण्याच्या भानगडीत पडणार नाही.
|
Lopamudraa
| |
| Wednesday, September 20, 2006 - 4:45 pm: |
| 
|
शोनु तुस्सी great हो... एकदम रंगात आलिये..कांदबरी/ कथा.. जे असेल ते..
|
Shonoo
| |
| Wednesday, September 20, 2006 - 5:37 pm: |
| 
|
सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत अंगणात, घरात, ऑफ़िसमधे ज्या काही उन्हाळ्याची आठवण करून देणार्या वस्तू असतील त्या सर्व काढून ठेऊन त्या जागी फ़ॉल ची स्थापना केली पाहिजे यावर जुलिआ चा कटाक्ष असतो. त्या त्या मौसमाच्या आगमनाची तयारी ठराविक मुहुर्तावर व्हायलाच पाहिजे. साधारण पंधरा तारखेपासून तिची माझ्या मागे भुणभुण सुरू होते. मी भरपूर शेवंतीची रोपं विकत घ्यावीत आणि तिने त्यातली थोडी लम्पास करावीत असा आमचा मी या नव्या घरात राह्यला आल्यापासून चा शिरस्ता आहे. तिच्या townhouse मधे लावायला तिला खरं तर एक्-दोन छोट्या कुंड्या पुरतात. पण मग माझी बाग ओकी बोकी दिसेल त्याचं काय? माझ्या सवडीने जाउन मी रोपं आणली आणि दुसया दिवशी तिला नेऊन दिली तर चालत नाही. आठवडाभर ती जवळपासच्या सर्व नर्सरी मधे जाऊन टेहळणी करुन येते. मग कुठे भाव चांगले आहेत, कुठे रंग सुंदर आहेत आणि कुठे रोपं जोमदार आहेत याची तुलना होते. माझी खात्री आहे की तिच्या कडे weighted rating and evaluation चं एक spreadsheet असणार. दरवर्षी ज्या नर्सरीचा नंबर वरती येईल तिथून खरेदी. मग शेवन्तीच्या रोपांबरोबर halloween संबंधित इतर खरेदी ही त्याबरोबरच होत असे. आम्ही अशी सगळी खरेदी करेपर्यंत जेफ़ आणि माझा नवरा घरी बसून फ़ूटबॉल बघतात आणी मुलांना सांभाळल्याचं सोंग वठवतात. यावर्षी मात्र एकवीस तारीख उलटली तरी तिच्याकडून काही हालचाल दिसेना. नवरा सुद्धा म्हणाला की यंदा चक्क त्याला फ़ॉल साठी लावायची झाडं आणायला लागणार की काय? 'तिला सांग मी होम डेपो मधून आणेन मग रोपं अशाने'. त्या शनिवारी सकाळी मी फोन करणार येव्हढ्यात तिचाच फोन आला. 'चला चला, फ़ॉल ची खरेदी उरकून टाकूया आज'
|
Shonoo
| |
| Saturday, September 23, 2006 - 2:30 pm: |
| 
|
नर्सरी मधे मागे पुढे खेपा करत, हे उचल, ते ठेव असं करत करत एकदाची खरेदी आटपून बाहेर पडे पर्यंत दोन्-तीन तास कस गेले ते कळलंच नाही. आता हायवे वर जायच्या अगोदर कॉफी पिऊया असं मी म्हणे पर्यंत तिने गाडी एका छोट्या कॉफीशॉप च्या दिशेने वळवली सुद्धा. जेव्हा जेव्हा या भागात एकत्र खरेदीला येतो तेंव्हा इथनं कॉफी प्यायल्याखेरीज परत जात नाही आम्ही कधी. अन हे कॉफीशॉप आहे ही तसंच. दोन व्हिएतनामी बहिणी चालवतात. अमेरिकेतील इतर नव्वद टक्के व्हिएतनामी मुली नेल सलॉन मधे काम करतात नाहीतर चायनीझ रेस्टॉरन्ट मधे. पण ते सोडून या दोघी बहिणी ही फ़्रेन्च बेकरी-कॉफीशॉप चालवतात याचं मला फार कौतुक वाटतं. त्यान्ची बिस्किटं पेस्ट्रीज एकदम लाजवाब आणि किम्मत सुद्धा वाजवी असते. नाहीतर आमच्या घराजवळ एक आहे फ़्रेन्च बेकरी- तिथे not even air is free म्हणते जुलिआ! त्या दुकानातून आधी घरी नेण्यासाठी बिस्किटं अन पेस्ट्री ची ऑर्डर दिली आणि मग कॉफी घेऊन दुकानाबाहेरच्या बाकवर येऊन बसलो. एक मोठा निश्वास टाकून जुलिआने सांगायला सुरुवात केली
|
Shonoo
| |
| Saturday, September 23, 2006 - 9:20 pm: |
| 
|
गेल्या दोन आठवड्यात त्या लॉ स्कूलच्या प्राध्यापकांनी पुष्कळ मदत केली होती. त्यांचं मत असं होतं की जर वरिष्ठांशी मतभेद असल्याचे पुरावे असतील तर ही केस लढता येण्या सारखी होती. जेफकडे तर त्याने त्या कंपनीत कामाला लागल्यापासूनची जवळ जवळ प्रत्येक ई-मेल आणि मेमो ची कॉपी होती. वरिष्ठांशी, कंपनीह्cया क्लायंट्स शी झालेल्या संभाषणांच्या तपशीलवार नोंदी होत्या. त्यामुळे प्राध्यापकांनी केस चालवायची तयारी दाखवली होती. त्या दृष्टीने जेफच्या आणी त्यांच्या दोनचार भेटी गाठी पण झाल्या होत्या आणि जेफ सुद्धा कोर्ट कचेरी करायला तयार होत होता. येत्या दोन चार दिवसात कागदपत्रं सर्व फायनल करून मग कंपनीला नोटिस पाठवण्यात येणार होती. प्राध्यापकांनी फी न घेता फक्त प्रत्यक्षात जेवढा खर्च येईल तेवढ्याच पैशात केस लढवायची तयारी दाखवली होती. ते आपल्या विद्यार्थ्यांकरवी बरच काम करून घेणार होते. असं केल्या ने युनिव्हर्सिटीचे काही नियम तर मोडले जात नाहीत ना हे ही त्यांनी तपासून घेतलं होतं. युनिव्हर्सिटीचा काही आक्षेप नाही म्हटल्यावर मग जुलिआ ने पण होकार दिला होता. मला आता अगदीच राहवेना. शेवटी एकदाचं तिला विचारलंच मी ' बाई ग, त्याला कामावरून काढून टाकल्याचं कारण कळल्यावर तू इतकी अपमानित झाली होतीस. आता त्याच्याच वतीने कोर्टात जायची तयारी करते आहेस. या सर्वातून तुला आणखीन मनस्ताप नाही का होणार? का तू या उठाठेवी करते आहेस? जेफ ला दोन-चार महिन्यात नवी नोकरी सहज मिळेल.' त्यावर मला म्हणाली ' त्याच्यावर त्याच्या कंपनीने अन्याय केला आहे. अशा अन्यायाविरुद्ध तक्रार न करता मूग गिळून गप्प बसणे चुकीचं आहे. अशांना धडा शिकवलाच पाहिजे.' 'पण जेफने 'तसल्या' साईट बघितल्या तर होत्या ना. आणि त्याने असं वागलेलं तुला पटलेलं नाहीये त्याचं काय?'
|
Shonoo
| |
| Saturday, September 23, 2006 - 10:51 pm: |
| 
|
'ती आमच्या दोघांमधली, खाजगी बाब आहे. त्याच्या या केसशी काय संबंध?' इति जुलिआ. 'तुम्हा दोघांमधली बाब आहे हे खरंय. पण आता तुम्ही केस करणार म्हटल्या वर या गोष्टीचा उहापोह होईलच की. त्याने जर एकदा जरी तसली साइट ऑफ़िसच्या कम्प्युटरवरून उघडली असेल तर तेवढा पुरावा पुरेसा होईल ना कंपनीच्या बाजूने' ' अगं मी त्यांच्या कंपनीची पॉलिसी अगदी पूर्ण वाचली, प्राध्यापकांनी पण ती पूर्ण वाचली. शिवाय युनिव्हर्सिटीच्या पोलिसीबरोबर तुलना पण केली आम्ही. त्यांच्या पॉलिसीमधे inappropriate use हे जास्त करून कंपनीत कामानिमित्त जे insider information मिळू शकतं त्याच्या गैरवापराला प्रतिबन्ध करणारी आहे. हे मोठं लूपहोलच आहे त्यांच्या पॉलिसीमधे' एकंदरीत तिने आता निर्णय घेतलाच होता, त्याची अम्मलबजावणी पण सुरू झाली होती. पण या सर्व गोष्टींमधून तिला जी काही बरी वाइट प्रसिद्धी मिळेल त्याची तिला फारशी कल्पना दिसली नाही. मी ते सर्व जाणवून देण्याचा प्रयत्न केला. पण तिला त्याची फारशी काळजी वाटत नव्हती. ' अगं असल्या केसेस किती चालत असतील दरवर्षी? मिळून मिळून काय प्रसिद्धी मिळेल आम्हाला? स्थानिक टि व्ही चॅनेलवर एक दोन वाक्यात गुंडाळतील फार तर!'
|
Shonoo
| |
| Saturday, September 23, 2006 - 11:06 pm: |
| 
|
जुलिआच काय, प्राध्यापकांनी सुध्दा कल्पना केली नसेल एव्हढी प्रसिद्धी मिळाली या केसला. कंपनी ला नोटिस पाठवल्या वर त्यांनी ठरवलं की जेफ चं चारित्र्यहनन केल्याने त्यांच्या बाजूल खटला चालवताना फायदा होईल. जुलिआचा आणि प्राध्यापकांचा उल्लेख न करता जेफ नोकरी गेल्या नंतर सुद्धा आपल्या कृतीचे समर्थन करतोय अशा अर्थाच्या बातम्या पसरवल्या कंपनीने. आतापर्यंत जुलिआचा उद्देश फक्त कंपनीने माफी मागावी, थोडीफार नुकसान भरपाई द्यावी येवढाच होता. पण ज्यादिवशी कंपनीतर्फे ही बातमी अशा स्वरूपात पब्लिश झाली त्या दिवशी जुलिआ बिथरली. तिने अगदी चंग बांधला की त्या कंपनीला धडा शिकवायचाच. ऑक्टोबर च्या मध्यावर जुलिआने कोर्टात वकिलातर्फ़े मागणी केली की जेफच्या कंपनीने त्याने तसल्या साइट बघितल्याच्या पुरावा सादर करावा. तो सादर करताना कंपनीनेने जे कागदपत्र सादर केले होते त्याच्यात जेफखेरीज इतर सर्वांची नावे ब्लॉक केली होती. ते पाहिल्यावर जुलिआ म्हणाली की हे तर Doctored documents आहेत. असा tampered eviDance कोर्टात कसा ग्राह्य धरता येईल. प्राध्यापकांचं असं मत पडलं की इतर लोकांची प्रायव्हसी जपण्याकरता कंपनीला असं करण्याची मुभा आहे.
|
Shonoo
| |
| Tuesday, October 03, 2006 - 9:39 pm: |
| 
|
मागील अंकावरून पुढे चालू इतर लोकांची नावे आणि त्यांनी उघडलेल्या, बघितलेल्या साइट ब्लॉक केलेली कागदपत्र बघितल्या वर जुलिआची विचार चक्रं जोरजोरात फिरू लागली. ज्या प्रमाणे एखादी कंपनी आपल्या माणसांनी बघितलेल्या साइटची नोंद ठेवते त्याप्रमाणे, eBay, Google, Yahoo आणि इतर सर्व साइट सुद्धा कुठून visitors आले याच्या नोंदी ठेवतात. यात लोकांच्या user account व्यतिरिक्त बरीच माहिती असते ज्याच्यावरून तो user account प्रत्यक्षात कोणाचा आहे, कुठल्या कम्प्युटर वरून आलेला आहे इत्यादी माहिती कळू शकते जितके जास्त visitors येतील त्यावर जाहिराती मिळने अवल.म्बून असल्याने सर्व कंपन्या ही माहिती फार काळजीपुर्वक गोळा करतात. शिवाय प्रत्येक user चे प्रोफ़ाइल ही सतत maintain करत असतात. जुलिआला या सर्व प्रक्रियेची, त्या करता वापरल्या जाणार्या अनेक programs ची पुरेपूर माहिती होती. तिचंही कामच होतं ना ते! तिने वकिलांशी चर्चा करून असं ठरवलं की जी साईट बघितल्या बद्दल जेफ़ला काढून टाकण्यात आलं आहे त्या कंपनीला आणि तसल्याच इतर दोन्-तीन कंपन्यांना त्यांचे रेकॉर्ड्स कोर्टापुढे सादर करायला लावायचे. कोर्टात तिने हा अर्ज सादर केल्यावर जेफच्या कंपनीचे लोकं आणखीन खवळले. त्यांनी असा अर्ज म्हणजे लोकांच्या प्रायव्हसीवर गदा आहे वगैरे प्रचार सुरू केला. या सर्व घडामोडींमधे Halloween आला आणि गेला ते जुलिआला कळलंच नाही. नाहीतरी त्यांच्या घराच्या आसपास फारशी लहान मुलं नव्हतीच. कधी कधी ती आमच्या घरी बसून नाहीतर आजोबांकडे जाउन ती गोळ्या वाटत असे. पण यावर्षी तिचं कशातही लक्ष नव्हतं. मी सुद्धा विद्यार्थ्यांच्या परिक्षा, प्रॉजेक्ट, माझ्या मुलांचं होमवर्क आणि अभ्यासेतर उचापती यामधे बुडलेलीच होते. IM वरच जुलिआची खबर बात मिळत होती. thanks giving च्या आदल्या शुक्रवारी मी वर्गावरून येईपर्यंत सेल फोनवर मेसेज, ऑफिसच्या फोनवर मेसेज, एक अर्जंट इ-मेल येव्हढे निरोप कमी म्हणून मी फोनवरचे मेसेज बघेपर्यंत बाईसाहेब स्वत: दारात.
|
Bee
| |
| Wednesday, October 04, 2006 - 12:47 am: |
| 
|
शोनू, सर्व भाग लिहून झाल्यानंतर पूर्ण कथा परत एकदा वाचून काढणार आहे. तू लिहिते आहेस हे बघून खूप बरे वाटले.
|
|
|