|
Zaad
| |
| Tuesday, October 03, 2006 - 3:01 am: |
| 
|
अरण्यात धुके दाटले की झाडे रडून घेतात..... येरव्ही चालूच असते चक्र बहर-पानगळतीचे आणि तसेही पोचत नाहीच ऊन मुळांपर्यंत कधी ढळतीचे. अरण्यात झाडे समूहाने उन्मळून पडत नाहीत, वणव्यात खाक होतात. अरण्यात धुके दाटले की झाडे रडून घेतात..... अरण्य कुंतीच्या दु:खाइतके निबिड कठिण अरण्य कर्णाच्या शापाइतके अबोध गहन. अरण्य आदिमतेची निशाणी चिरंतन अरण्य अश्वत्थाम्याची विराणी करुणघन. अरण्ये अश्रापाला आसरा देतात अरण्ये बेचिराख होताना कुणाला शाप देतात? अरण्यात धुके दाटले की झाडे रडून घेतात..... अरण्ये पाखरांच्या पंखांत कधी आपल्या पोटातला भरत नाहीत अंधार जीर्ण वृक्षांच्या सालींसारखा कधी गळून पडत नाही अरण्य गंधार. अरण्यात संध्याकाळी सर्व संज्ञा लुप्त होतात अरण्यात झाडे अद्वैताला पोचतात? अरण्यात धुके दाटले की झाडे रडून घेतात.....
|
Niru_kul
| |
| Tuesday, October 03, 2006 - 4:02 am: |
| 
|
तू माझी ध्रुव चांदणी...... मी राजा तुझ्या मनाचा, तू माझ्या स्वप्नांची राणी; मी चंद्र शीतल या नभीचा, तू माझी ध्रुव चांदणी.... माझी नजर नेहमीच, तुझ्या ह्रदयाला साद घालते, माझी व्याकुळता आता फक्त, तुझीच साथ मागते; तुझीच मूर्ती पुजतो मी, माझ्या मनाच्या राऊळी, मी चंद्र शीतल या नभीचा, तू माझी ध्रुव चांदणी.... तुझ्या शिवाय या ह्रदयाला, आता काहीच सुचत नाही, तुझ्यासाठीच्या हळवेपणाशिवाय, या मनात काहीच रुजत नाही, माझ्या भावनांचे साम्राज्य मी, करतो अर्पण तुझ्याच चरणी, मी चंद्र शीतल या नभीचा, तू माझी ध्रुव चांदणी.... भर दिवसा आता मला, तुझीच स्वप्नं पडतात, रोज रात्री निद्रेअभावी, तुझीच स्मरणं घडतात्; माझी बनावीस तू अर्धांगी, हीच आता मागणी, मी चंद्र शीतल या नभीचा, तू माझी ध्रुव चांदणी....
|
Jayavi
| |
| Tuesday, October 03, 2006 - 4:20 am: |
| 
|
ए, काय रे....... काय सुरेख फ़ुललाय अश्विन.....! कुणाकुणाची तारीफ़ करायची. फ़ार फ़ार सुरेख लिहिताहेत सगळे!
|
Me_anand
| |
| Tuesday, October 03, 2006 - 5:12 am: |
| 
|
घर घरातल्या सुखाच्या सोयी वाढायल्या लागल्या आणि घरातलं घरपण हळूच घराबाहेर सरकवलं गेलं आता उरला होता फक्त 'घर' हे सामान्यनाम मिरवणारा, चार भिंतींचा पुंजका डोक्यावर कॉंक्रीटचं छप्पर होतं, माया नव्हती खिडक्या फक्त पडदे ओढण्यापुरत्या उरल्या वार्याने केव्हाच पाठ फिरवली होती दारं घट्ट बंद होती येणार्याला गच्चं प्रेमाच्या मिठीत घेइल असं घरच आता उरलं नव्हतं नाही म्हणायला देवळाच्या ओटीवर, चहाच्या टपरीवर, जुन्या एखाद्या पारावर किंवा आठवणींच्या कट्ट्यावर माणूसकी जीव चोरून जगत होती.. कॉंक्रीटची जंगलं बांधणार्या नतद्रष्टांचं तिकडही लक्ष गेलं आणि फिरायला लागले विकासाचे नांगर, गाढवांचे नांगर..... वेगवेगळ्या नावांच्या पाट्या, उसन्या दिमाखात मिरवणारी यंत्र आपापल्या रंगीत डब्यांमधे चैनीत लोळत होती आणि एखाद्याच उरलेल्या घराची उब शोधत, मूठभर जिवंत माणसं वणवण फिरत होती.....
|
Himscool
| |
| Tuesday, October 03, 2006 - 5:43 am: |
| 
|
आनंद, तुझी कविता सध्या झी मराठी वर चालू असलेल्या 'या सुखानों या' ह्या मालिकेसाठी एकदम योग्य आहे... असेच काहीसे घडेल अधिकारी कुटुंबा मध्ये.... स्मि, एक वास्तववादी कविता...
|
वा!! झाड,निरु,आनंद अगदी हळवं करुन टाकलत..
|
Kiru
| |
| Tuesday, October 03, 2006 - 11:25 am: |
| 
|
व्वा...!! सुधीर.. 'धूसर' अप्रतीम निसर्ग अनुभूती देते... स्वरा, 'आकाश' आवडली.. विशेषत: शेवट. स्मिता, सुमेधा.. खूप छान. झाड, 'अरण्यात धुके दाटले की' अंतर्मूख करुन गेली.. अप्रतीम..!!! आनंद.. 'घर' आवडली.. 'येणार्याला गच्च प्रेमाच्या मिठीत घेईल असं घरच आता उरलं नव्हतं' अगदी खरं.. एकूण पुर्वीच्या 'घरा'ला 'घरघर' लागलीये अताशा.
|
Daad
| |
| Tuesday, October 03, 2006 - 9:50 pm: |
| 
|
झाड? (नक्की काय म्हणायचं तुम्हाला? ज़ाद?) - काय गहन आहे ही कविता? फारच छान! खरं सांगायचं तर, या कवितेचं तुमचं स्वत:चं निरुपण वाचायला खूप आवडेल....... 'अरण्ये बेचिराख होताना कुणाला शाप देतात? अरण्यात धुके दाटले की झाडे रडून घेतात..... ' निरु, आनंद, .... सुरेख! -- शलाका
|
Smi_dod
| |
| Wednesday, October 04, 2006 - 12:13 am: |
| 
|
धन्स दाद,किरु हिम्स... ... 
|
Me_anand
| |
| Wednesday, October 04, 2006 - 2:53 am: |
| 
|
धन्यवाद दाद, किरू, मृदगंधा, हिम्स...!!!
|
Niru_kul
| |
| Wednesday, October 04, 2006 - 9:30 am: |
| 
|
तू माझ्याशी लग्न करशील का? तू... तू अशी... मोहक, सुंदर, दिलखेच, वेधक...... अन मी... मी असा... हळवा, शांत, एकलकोंडा आणि थोडासा बावळट...... तुला वाटतं जमेल आपलं? मला तर माझ्यापेक्षाही तुझ्यावर जास्त भरवसा आहे...... तू घेशील सांभाळून मला... जेव्हा मी पडेन, रडेन, व्याकुळ होईन अन अडखळेन...... आणि मी... मी तुला देईन... विश्वास, जन्मभराची साथ, आधार आणि निखळ प्रेम...... तू जपशील माझा हळवेपणा... मी पुरवेन तुझे सगळे हट्ट... तू फुलवशील आपल्या नात्याला... आणि मी... मी हसवेन तुझ्या अश्रुंना..... या दुनियेच्या दुनियादारीत, तू मला खंबीर साथ देशील... मी तुझ्या प्रत्येक स्वप्नाला सत्यात उतरवेन... बघ... नीट विचार करुनच निर्णय घे... शेवटी तुझ्या सुखातच तर माझं सुख लपलयं... तुला माहीत आहे.... तरीही परत एकदा सांगतो... मी तुझ्यावर मनापासुन प्रेम करतो.... म्हणुनच आज धीर करुन, तुला स्पष्ट विचारतो आहे... तू माझ्याशी लग्न करशील का? माझ्या आयुष्याची तू, अर्धांगी बनशील का?
|
Asmaani
| |
| Wednesday, October 04, 2006 - 1:14 pm: |
| 
|
जयविला अनुमोदन. खरंच समजत नाहिये कुणाकुणाची तारिफ करावी ते! एक से एक gr8 लोक आहेत इथे. झाड, कविता खूप आवडली.
|
Swara
| |
| Wednesday, October 04, 2006 - 5:27 pm: |
| 
|
धन्यवाद Daad आणि kiru .
|
एक सुकलेला गजरा ... एक सुकलेला गजरा आहे माझ्याकडे जपून ठेवलाय पाकिटात ..... मनाची महिनाअखेर येताच फक्त पाकीट उघडून दाखवतो त्याला . पुढच्याक्षणी माझं मन अगतिकता विसरून जातं ... एखाद्या गर्भश्रीमंत माणसासारखं , ऐटबाज पावलं टाकत , जगात वावरायला निघून जातं एक सुकलेला गजरा आहे माझ्याकडे .... अजूनही !!!!
|
Hems
| |
| Thursday, October 05, 2006 - 1:55 am: |
| 
|
वा! वैभव, मस्त कविता!!
|
Me_anand
| |
| Thursday, October 05, 2006 - 4:51 am: |
| 
|
निसर्ग्-संगर गर्द हिरव्या फलटणीतुनी उठून दिसती करडे भाले निसर्गसंगरी पुन्हा झुंजण्या हिरवे सैनिक सज्ज जाहले तृषार्त धरित्री, भकास वारे तेज हरपुनी बसले तारे विसरुनी गेली धरा हासणे पिऊनी प्रखर तेजाचे प्याले कासाविस ती मुकी पाखरे अशृस्तवही जळ ते न उरे धावा करिती आर्त रवाने गगनालाही भरे कापरे कडकडीत या तटबंदीला थेंब टपोरे भेदूनी गेले उरांत भरुनी पुन्हा विरश्री हिरवे सैनिक सज्ज जाहले
|
Chinnu
| |
| Thursday, October 05, 2006 - 10:26 am: |
| 
|
वैभव वाह, सुकलेल्या गजर्याचा आजीवन पगार! क्या बात है!!
|
वैभव, सुंदर.
|
Asmaani
| |
| Thursday, October 05, 2006 - 3:11 pm: |
| 
|
वैभव, नेहमीप्रमाणेच उत्तम! आनंद, हिरवे सैन्य छानच!
|
|
|